चमचा
चमचा स्वयंपाकघरातील
एक महत्वाचे उपकरण. जन्मापासून ते अखेरपर्यंत साथ संगत देणार साधन. आई हाताने भरविण्यापेक्षा
कष्ट साध्य काम चमच्याने करते अतिशय सोईस्कर व तिथपासून ते म्हातारपणापर्यंत लटपटत्या
हाताने खाण्याचे पदार्थ खाली पडण्यापासून वाचविण्याचे काम करणारा हा चमचा.
हा चमचा दोन दुव्यांना जोडून एकत्र आणणारा पुलच.
बालवाडी ते महाविदयालय
उदाहरण घ्यायचे म्हटले तर हात धुवण्याचा त्रास घेण्यापेक्षा दुपारच्या टिफीन मध्ये
चमचा घेऊन मित्रमंडळींना खाऊ घालून तृप्त करण्याचे माध्यम.
नोकरी म्हणा व्यवसायातही
चमचा हाच माध्यम. चमच्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकतच नाही. सुयश मिळवायचे असेल तर बॉसकडे
तारीफ करण्यासाठी चमचा असेल तर शंभर टक्के तुमच्या व्यवसाय नोकरी यशस्वी करतो. हसण्याचा
विषयाबरोबरच उपहासाचा विषय ही हा “चमचा, काँटा बन पर किसीका चमचा मत बन” “चमचा है ये” अशी पालुपदे, दुषणे जरी चमच्याला मिळत असली तरी तो कोणाच्यातरी
कसल्यातरी कामाला येतो ना. ज्याच्या कामाला येतो त्याचा आनंद गगनात मावेनासा होता व
ज्यांनी चमच्याचा वापर केला नाही त्याला सापशिडीसारखा शिडी न मिळाल्याने साप खाऊन टाकतो
अशी मरणावस्था होते ती ही चमच्यामुळे.
हया चमच्यामुळे
नोकरी व्यवसाय उत्तम रितीने चालत असल्यामुळे एखादी मैत्रीण किंवा मित्र पटवावयाचा असेल
तरी सुध्दा लागतो तो चमचाच. त्याशिवाय तरुणाईचे पान हालतच नाही. चिठया चपाटया, दोन
जिवांना एकत्र आणण्याचे कामही करतो तोही हा चमचा.
राजकारणातही एखादे
साधे व्यक्तीमत्वाला आकार आधार देण्याचे काम करतो तो ही चमचाच. पहा राजकारणात मंत्रीपासून
सेटींग लावण्यासाठी चमच्यासारखे व्यक्तिमत्व तुमच्या सोबत असेल तरच हिमालय पर्वंत सर
करता येतो. येरागबाळयाचे काम नाही हे तेथे पाहिजे चमचा.
घ्या हाती चमचा
व मारा एखादा तमाचा, तोसुध्दा चमच्यानेच.