चमचा
चमचा स्वयंपाकघरातील
एक महत्वाचे उपकरण. जन्मापासून ते अखेरपर्यंत साथ संगत देणार साधन. आई हाताने भरविण्यापेक्षा
कष्ट साध्य काम चमच्याने करते अतिशय सोईस्कर व तिथपासून ते म्हातारपणापर्यंत लटपटत्या
हाताने खाण्याचे पदार्थ खाली पडण्यापासून वाचविण्याचे काम करणारा हा चमचा.
हा चमचा दोन दुव्यांना जोडून एकत्र आणणारा पुलच.
बालवाडी ते महाविदयालय
उदाहरण घ्यायचे म्हटले तर हात धुवण्याचा त्रास घेण्यापेक्षा दुपारच्या टिफीन मध्ये
चमचा घेऊन मित्रमंडळींना खाऊ घालून तृप्त करण्याचे माध्यम.
नोकरी म्हणा व्यवसायातही
चमचा हाच माध्यम. चमच्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकतच नाही. सुयश मिळवायचे असेल तर बॉसकडे
तारीफ करण्यासाठी चमचा असेल तर शंभर टक्के तुमच्या व्यवसाय नोकरी यशस्वी करतो. हसण्याचा
विषयाबरोबरच उपहासाचा विषय ही हा “चमचा, काँटा बन पर किसीका चमचा मत बन” “चमचा है ये” अशी पालुपदे, दुषणे जरी चमच्याला मिळत असली तरी तो कोणाच्यातरी
कसल्यातरी कामाला येतो ना. ज्याच्या कामाला येतो त्याचा आनंद गगनात मावेनासा होता व
ज्यांनी चमच्याचा वापर केला नाही त्याला सापशिडीसारखा शिडी न मिळाल्याने साप खाऊन टाकतो
अशी मरणावस्था होते ती ही चमच्यामुळे.
हया चमच्यामुळे
नोकरी व्यवसाय उत्तम रितीने चालत असल्यामुळे एखादी मैत्रीण किंवा मित्र पटवावयाचा असेल
तरी सुध्दा लागतो तो चमचाच. त्याशिवाय तरुणाईचे पान हालतच नाही. चिठया चपाटया, दोन
जिवांना एकत्र आणण्याचे कामही करतो तोही हा चमचा.
राजकारणातही एखादे
साधे व्यक्तीमत्वाला आकार आधार देण्याचे काम करतो तो ही चमचाच. पहा राजकारणात मंत्रीपासून
सेटींग लावण्यासाठी चमच्यासारखे व्यक्तिमत्व तुमच्या सोबत असेल तरच हिमालय पर्वंत सर
करता येतो. येरागबाळयाचे काम नाही हे तेथे पाहिजे चमचा.
घ्या हाती चमचा
व मारा एखादा तमाचा, तोसुध्दा चमच्यानेच.
ReplyDeleteएक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात.
समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.
आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता.
मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.
विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे. धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील.
मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील.
धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात.
पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे.
नेत्यांना बुध्द आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो.
त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही.
अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही.
‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ.
त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ.
सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते. दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात.
कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात. अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे.
पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?) नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे.
माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली.
पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे.
‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर निवेदिका क्षिप्रा मानकर
ReplyDeleteयांचे व्याख्यान
नवी दिल्ली, दि. 29 : सुप्रसिद्ध निवेदिका क्षिप्रा मानकर यांचे ‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर उद्या शुक्रवार दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 38 वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून “महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला” सुरु आहे. या व्याख्यानमालेत 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता क्षिप्रा मानकर या ‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर विचार मांडणार आहेत.
क्षिप्रा मानकर यांच्या विषयी
मुळच्या अमरावतीच्या असणा-या क्षिप्रा मानकर या उत्कृष्ट निवेदिका, समुपदेशक म्हणुन या प्रसिद्ध आहेत. अमरावती विद्यापीठातून बी.एस.सी., पुर्ण केले. यासह त्यांनी पत्रकारीतेत, समाजकार्य या विषयात पदवीत्तोर शिक्षणपुर्ण केले. अमरावतीतील स्थानिक आरसीएन या डिजीटल माध्यमांच्या त्या संचालक आहेत. त्यांनी अमरावतीमधील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा स्त्री रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय (असंर्गजन्य रोग नियंत्रण अभियान) समुपदेशक म्हणुन काम केलेले आहे. त्यांनी अनेक विषयांवर व्याख्याने देत असतात.
श्रीमती मानकर यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये अमरावती विद्यापीठाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका पुरस्कार, उत्कृष्ट एनएसएस फर्स्ट कलर होल्डर पुरस्कार, उत्कृष्ट वक्ता पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
शुक्रवार, दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI, फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप
https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share
तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.
००००