Tuesday, 30 April 2019

पाणी वाचावा


ऩियतीने अखेर  फास आवळला
दक्षिण अफ्रिका या देशातील मुख्य शहर केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे, त्यांच्या सरकारने 16 एप्रिल 2019 नंतर पाणी पुरवठा करू शकणार नाही म्हणून असमर्थता दाखविली आहे. अखेर जगाचा दु:खद प्रवास सुरू होण्याची ही वेळ कोणावरही येईल.पाणी जपून वापरा. पाण्याची नासडी थांबवा. आपण देखील लातुरला रेल्वेने पाणी पाठवलं होतं. जगात फक्त 2.7% पिण्यायोग्य पाणी आहे.

जवळच्या सर्वच धरणातील पाणी कमी झाल्याने भूगर्भातील पाणी पातळी खोलवर गेली आहे. तेव्हा   आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू. तुम्ही हे सहज करु शकता:-
1. रोज गाड्या धुवू नका.
2. अंगणात पाणी मारू नका.
3. सतत नळ चालू ठेऊ नका.
4. इतर अनेक चांगल्या उपाययोजना करुन त्यायोगे पाणी वाचवूया.
) घरातील गळके नळ रिपेअर करा
) सोसायटीतील गळकी टाकी , पाईप , बॉल कॉक रिपेअर करा
या संकटाचा एकत्र सामना करूया

2 comments:

  1. न्युमोनियापासून बालकांच्या संरक्षणासाठी

    राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश

    · दरवर्षी 19 लाख बालकांना देणार लस



    मुंबई, दि. 12 : बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून दरवर्षी सुमारे 19 लाख बालकांना ही लस दिली जाणार आहे, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

    बालकांना बीसीजी, पोलिओ, रोटाव्हायरस, पेंटाव्हेलेंट, गोवर रुबेला, जेई, डीपीटी इत्यादी लसी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जातात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बालकांचे न्युमोनियापासून संरक्षण करण्याकरीता पीसीव्ही लस दिली जाणार आहे. राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत या लसीचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

    बालकांना पीसीव्ही लसीच्या तीन मात्रा दिल्या जाणार असून जन्मानंतर सहाव्या आठवड्यात 14 व्या आठवड्यात आणि नवव्या महिन्यात लस दिली जाणार आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमात ही लस देण्यास सुरुवात झाल्यानंतर अर्भकांच्या मृत्युच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले. या लसीसंदर्भात प्रशिक्षण आणि मार्गदर्शक सूचना जिल्ह्यांना देण्यात आले असून जाणीव जागृतीसाठी पोस्टर्स, बॅनर्स तयार करण्यात आल्याचे डॉ.व्यास यांनी सांगितले.

    स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी बॅक्टेरीयामुळे हा आजार होतो. यामुळे श्वसनमार्गाला संसर्ग होऊन फुप्फुसाला सूज येते. गंभीर न्युमोनिया होण्याचा धोका दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो. संसर्गामुळे एक वर्षाच्या आतील मुलांमध्ये डायरिया आणि न्युमोनिया होऊन ते दगावण्याचे प्रमाण लक्षात घेऊन राज्यशासनाने डायरीया प्रतिबंधासाठी रोटा व्हायरस लस तर आता न्युमोनिया प्रतिबंधाकरीता पीसीव्ही लसीचा समावेश केलेला आहे. दुर्गम तसेच अतिवृष्टीचे प्रमाण अधिक असलेल्या भागात जेथे कोंदट वातावरणामुळे बालकांमध्ये न्युमोनियाचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते अशा भागातील बालकांना ही लस या आजारापासून रोखण्यास महत्वपूर्ण ठरणार असल्याचे डॉ.व्यास यांनी सांगितले.

    खाजगी रुग्णालयांमध्ये ही लस सशुल्क उपलब्ध असून आता शासकीय आरोग्य संस्था, रुग्णालय तसेच लसीकरण सत्र आयोजित केलेल्या ठिकाणी ही लस सर्वांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे अतिरिक्त संचालक डॉ.डी.एन.पाटील यांनी सांगितले.

    000

    ReplyDelete
  2. 🙏
    सर्वांना विनंती आहे कृपया आपल्या घरातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील किंवा आपले मित्र कोरोना लसीकरण करून येणार आहेत किंवा केलेले आहेत त्यांना कदाचित *एक ते दोन दिवसांमध्ये खूप अंगदुखी किंवा वेदना किंवा बारीक ताप थंडी येण्याची शक्यता आहे* अशा वेळेस कृपा करून आपल्याला लसीकरणाचे वेळेस लसीकरण केंद्रावर दिलेल्या *फक्त पॅरासिटॅमॉल गोळ्यांचे सेवन* करायचे आहे कृपया अशा वेळेस आपल्या डॉक्टरांकडे जाऊन *वेदनाशामक इंजेक्शनचा आग्रह करू नका.*
    आजच तशी *भयानक केस घडलेली* आहे की *एका डॉक्टर मित्राने लसीकरणानंतर त्याच्या पत्नीला पण अंग दुखीचा त्रास जाणवल्यानंतर डायक्लोफिनॅक इंजेक्शन दिले आणि अवघ्या काही वेळातच तिचा मृत्यू झाला* ही घटना *खूप सिरीयस* आहे *लसीकरण घेतल्यानंतर आपल्या शरीरात एक प्रकारची प्रतिकारक्षमता निर्माण होत असते आणि आपण इंजेक्शन घेऊन त्या प्रतिकारक्षम तेला खंड करतो* अशा वेळेस आपले शरीर आपल्या *शरीरात विरोधात काम करणे सुरू करते आणि यामध्ये आपल्याला धोका संभवतो* त्यामुळे विनंती आहे *कृपया लसीकरणानंतर सात ते दहा दिवस कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन डॉक्टर कडून घेऊ नये किंवा आपण लसीकरण करून दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरला आपण लसीकरण करून आल्याची कल्पना द्यावी* हे तुमच्या आणि डॉक्टरच्या हिताचे आहे.
    ही सत्य घटना आहे. रत्नागिरीमधील.
    *काळजीपुर्वक सर्वांना पोस्ट वाचून दाखवा* 🙏
    *आपल्या माहितीकरिता पाठवत आहे तसेच आपल्या ग्रुपवर सर्वांना माहिती देण्यात यावी हि विनंती*.👆🏿💐🙏

    ReplyDelete

Featured post

Lakshvedhi