Tuesday, 29 October 2024

मलबार हिल निवडणूक कार्यालयाला केंद्रीय निवडणूक निरीक्षक पी. रामजी यांची भेट

 मलबार हिल निवडणूक कार्यालयाला

केंद्रीय निवडणूक निरीक्षक पी. रामजी यांची भेट

 

  मुंबईदि. २९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता मुंबई शहर जिल्ह्यातील १८५-मलबार हिल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाला केंद्रीय निवडणूक निरीक्षक पी. रामजी यांनी भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी मलबार हिल मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी कामकाजाविषयी माहिती दिली.

  केंद्रीय निवडणूक निरीक्षक पी. रामजी यांनी स्ट्राँगरूमची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्थेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक पी. रामजी यांचे संपर्क अधिकारी संतोष ठुबे  यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


सी-व्हिजिल ॲपवरील आचारसंहिता भंगाच्या १६४६ तक्रारी निकाली

 सी-व्हिजिल ॲपवरील आचारसंहिता भंगाच्या

१६४६ तक्रारी निकाली

 मुंबईदि. २९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दि. १५ ते २९ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण १६४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १६४६ तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

 सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते

आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या - ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’

 आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या - काय करावे’ आणि काय करू नये

 

            विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

            आचारसंहिता अधिक विस्तृत असल्याने त्यापैकी निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी काय करावे’ आणि काय करू नये’ याबाबत काही महत्त्वाची तत्वे सांगितलेली आहेत.

आचारसंहिता काळात काय करावे?

            निवडणूक घोषित होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरू ठेवता येतील. पूरअवर्षण इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदतीचे कार्य सुरू ठेवता येईल. मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रकमेची किंवा इतर वैद्यकीय मदत देता येईल. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका ही त्यांची धोरणेपूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी. स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.

प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धक किंवा इतर सुविधांचा वापर करण्याची परवानगी मिळवावी आणि ते वापरण्याच्या नियमांचे पालन करावे. सभांमध्ये अडथळे आणणाऱ्यासुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. मिरवणूक सुरू होण्याची तसेच संपण्याची वेळ व जागा आणि ती जिथून जाणार असेल तो मार्ग अगोदर निश्चित करून पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्हउमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये.

आचारसंहिता काळात काय करू नये?

            निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे पालन करताना राजकीय पक्ष तसेच उमेदवारांना सत्ताधारी पक्ष / शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे. उमेदवार आणि मतदानासाठी आलेला मतदार यांच्याशिवाय इतर कोणाही मंत्र्याला मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करता येणार नाही. शासकीय काम आणि निवडणूक मोहीम/ निवडणूक प्रचार यांची सरमिसळ करू नये. इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करू नये. वेगवेगळ्या जातीसमूह आणि धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेषतणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणेभित्तीपत्रकेसंगीत यांच्यासाठी करू नये. मतदारांना लाच देणेदारुचे वाटप करणेमतदारांवर गैरवाजवी दडपण वा धाकदपटशा दाखविणेतोतयेगिरीमतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रचार करणेमतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या ४८ तासांत सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यांसारख्या गोष्टींना मनाई आहे.

इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये. ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ नये. इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रुप करू नयेत. याचबरोबर मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाजवळ भित्तीपत्रकेध्वजचिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये.

            आचारसंहितेच्या या तत्त्वांचा भंग झाल्याचे नागरिकांना आढळल्यास त्यांनी सी-व्हिजील ॲपवर ध्वनीमुद्रणध्वनीचित्रमुद्रण या माध्यमातून तक्रार करावीअसे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

0000


उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी

 उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना

मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी

            मुंबईदि. २९ येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावायाकरिता उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी उद्योग,ऊर्जाकामगार व खनिकर्म विभागाने जाहिर करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा१९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायातव्यापारातऔद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीलामतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूहमहामंडळेकंपन्या व संस्थाऔद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे. पोटकलम (1) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

अपवादात्मक परिस्थितीत कामगारअधिकारीकर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तरमतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईलमात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहीलकोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल अथवा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळेउद्योग समूहकंपन्या व संस्थांमध्येऔद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यासत्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईलअसे उद्योगऊर्जाकामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित परिपत्रकात नमूद केले आहे.

००००

तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन

 तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन

निवडणूक काळात नागरिकांनी, व्यापाऱ्यांनीव्यावसायिकांनी कोणतेही साहित्यरकमा सोबत ठेवतांना त्‍यासंदर्भाचे योग्य दस्‍तऐवज सोबत ठेवावेतअसे आवाहन प्रशासनाने केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून दाखल झालेले निवडणूक निरीक्षक तपासणी संदर्भात जागरूक असून जिल्ह्यातील जप्ती प्रकरणातील आढावा घेण्यात येत आहे.

विविध यंत्रणांकडून तपासणी

विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत पैशांचा गैरवापरमद्याचा मोफत पुरवठाभेटवस्तूंचे वाटपकिंवा कोणतेही आमिष दिले जाऊ नयेयासाठी पोलीस प्रशासनासह इन्कम टॅक्सराज्य उत्पादन शुल्ककेंद्रीय वस्तू आणि सेवा करराज्य वस्तू आणि सेवा करव्यावसायिक करअमली पदार्थ नियंत्रण दलसीमा सुरक्षा दलसशस्त्र सीमा दलपोलीस दल केंद्रीयऔद्योगिक सुरक्षा दलभारतीय किनारा दलरेल्वे संरक्षण दलपोस्ट विभागवन विभागनागरी उड्डयन विभागविमानतळ प्राधिकरणराज्य नागरी विमान वाहतूक विभागराज्य परिवहन विभागयांच्यासह  फिरते पथक ( एफएसटी ) स्टॅटिक सर्विलन्स टीम ( एसएसटी ) कार्यरत आहेत.

निवडणूक काळात  वाहनांची कसून तपासणी होत असून दररोज हा अहवाल निवडणूक विभागाला सादर केला जात  असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.

- - - - - ००० - - - - -

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; ठिकठिकाणी तपासणी

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

बंदोबस्तात वाढठिकठिकाणी तपासणी

तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. 29 :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात बंदोबस्त वाढविण्‍यात आला असून स्थिर व फिरत्या पथकांकडून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रियेत प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आदर्श आचारसंहितेची 28 पथके स्थापन करण्यात आली आहेत. 211-भरारी पथके, 226- स्थिर पाहणी पथके, 172- व्हिडिओ निगराणी पथके,65- व्हिडिओ पाहणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. 105- तपासणी नाके आहेत.

महानगरपालिकेचे अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात नाही

  

महानगरपालिकेचे अत्यावश्यक सेवेतील

अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात नाही

 

मुंबई, दि. 29 :- विधानसभा निवडणूक 2024 साठी विविध यंत्रणांकडील मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात आले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा त्यामध्ये समावेश नसल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या निवडणूक शाखेने स्पष्ट केले आहे.

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 15 प्रभागातील मनुष्यबळ मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घेण्यात आले असून यामधील बहुतेक कर्मचारी हे मतदान किंवा मतमोजणी दिवशीच कार्यरत असणार आहेत, असेही निवडणूक शाखेने कळविले आहे.

-----000-------


 

Featured post

Lakshvedhi