Sunday, 15 June 2025

राष्ट्रीय शिक्षण धोरण देशाच्या वैचारिक पुनरुत्थानासाठी ऐतिहासिक पाऊल

 राष्ट्रीय शिक्षण धोरण देशाच्या वैचारिक पुनरुत्थानासाठी ऐतिहासिक पाऊल

-केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

              भारताची स्वातंत्र्याची लढाई केवळ ब्रिटिशांविरुद्ध नव्हतीतर शिक्षण व्यवस्थेतून भारतीय मूल्यांचा संचार करण्याची होती. ब्रिटिशांनी मॅकॉले शिक्षणपद्धती लागू करत भारताच्या पारंपरिक ज्ञान व्यवस्थेचे नुकसान केले आणि आपल्याला दासत्व मनोवृत्तीकडे ढकलले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे देशाच्या वैचारिक व मानसिक पुनरुत्थानासाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेतअसे मत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेचा इतिहासत्यातील बदलांची गरज आणि भविष्यातील दिशादर्शक भूमिका यावेळी स्पष्ट केली.

 

              केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले कीनरसी मोनजीसारख्या संस्था ही केवळ शिक्षणसंस्था नसूनत्या नवभारताच्या उभारणीसाठी प्रेरणास्थान आहेत. एसव्हीकेएम संस्थेने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कणा ठरू शकणाऱ्या कॉमर्सट्रेडिंग व उद्योजकतेसारख्या क्षेत्रांत मोठे योगदान दिले पाहिजे. उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून केंद्रीय मंत्री श्री. प्रधान म्हणाले की, "तुम्ही केवळ विद्यार्थी नसूननवभारताचे सेनानी आहात. विकसित भारताच्या निर्मितीत तुमचे योगदान महत्त्वाचे आहेअसे त्यांनी सांगितले.

 

विद्यार्थ्यांबरोबर संवाद

              मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग आणि नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या इमारतीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. यावेळी त्यांनी ऑटोमेशन लॅबमॅन्युफॅक्चरिंग लॅब मधील विद्यार्थ्यांकडून नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच प्रा. वाय.के. भूषण इन्फॉर्मेशन अँड नॉलेज रिसोर्स सेंटर येथील डिजिटल व फायनान्स लॅब आणि ग्रंथालयाची पाहणी केलीयावेळी त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi