*समुद्रभाजी पुराण*
मोदका पेक्षा *मोदकं* (एक लहान मासा) आवडणारे काही लोक असतात.
आंबटपणा नसून देखील कैरी, चिंच किंवा आवळ्याप्रमाणेच तोंडाला पाणी सुटवण्याची ताकद माशांमध्ये असते.
मांदेली, मोदकं या सारखे मासे मोजून खाल्ले तर गणित हमखास चुकतं.
कुठला काटा काढायचा, कुठला खाऊन टाकायचा आणि कुठल्या काट्याच्या वाट्याला जाऊ नये ही आयुष्यातील गणितं मासेच शिकवतात.
बोंबील वाढल्यावर जरा काटा काढून दे असं म्हणणारा ओरिजिनल फिशलव्हर नसतो.
पेग भरलेला असताना पेगकडे दुर्लक्ष करायला लावण्याची ताकद छोट्या छोट्या तळलेल्या कोलंबी मध्ये असते.
कितीही मासे खाल्ले तरी, आज खूप जेवण झालं, अंगावर आलंय वगैरे प्रकार होत नाहीत.
'चार दिवस तेच खातोय, आता किमान आठवडा भर तरी नको' हे वाक्य मटण, चिकन, अंडी किंवा अगदी कडधान्यं, भाज्या खाऊन सुद्धा बोललं तरी चालतं, पण मासे खाऊन.......केवळ अशक्य.
सुरमई ताजी नाही, आज रावस घेऊन जा असं सांगणाऱ्या व्यक्तीबरोबर घनिष्ठ मैत्री करावी.
आम्ही फक्त सुरमई, पापलेट, कोलंबी आणि हलवा खातो... हे आम्ही फिरायला फक्त लंडनलाच जातो म्हणण्यासारखं आहे.
टूरवर गेले असताना जेवण्याच्या वेळी ‘इथे मासे कुठे चांगले मिळतात हो?’ हा प्रश्न (कोणत्याही भाषेत) विचारणारे हे उत्तम सहप्रवासी असतात असा माझा अनुभव आहे.
मासे शिजवायच्या आमटी, कालवण, रस्सा, तिखलं, करी किंवा भाजी अशा अनेक रेसिपी असतात. फक्त एकाच प्रकारची रेसिपी सगळ्या माशांना नाही चालत.
वांग्याच्या भाजीत जवळा, करंदी, सोडे घातले तर चव सुधारते. पण जवळा, करंदी किंवा सोड्याच्या भाजीत वांगी मिक्स केली तर मजा कमी होते.
मोरी (शार्क) मटनासारखी बनवायची नसते. मोरी ही मोरी सारखीच बनवायची असते.
बोंबलाचा बदकाशी काही संबंध नाही. त्याला बॉम्बे डक हे नाव मुंबई वरून पोस्ट किंवा डाक ज्या ट्रेनने जायची त्या ट्रेन मधून नेले गेल्यामुळे पडले. बॉम्बे डक. दिल्ली, इंदोर, लखनौ सारख्या काही प्रदेशातल्या जेवणाला सर्वोत्तम समजणाऱ्या लोकांचा बहुदा जलचरांबरोबर परिचय झालेला नसतो.
देशातल्या कुपोषणासारख्या भीषण समस्या फक्त माशांच्या आहारातल्या समावेशाने नियंत्रणात आणल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत.
सुक्या माशांचं एक स्वतंत्र विश्व आहे. त्यांना 'तेच ते' म्हणणाऱ्यांनी फक्त हराभरा कबाब खावा.
🦈🐟🐠🦐🦞🦀
।। इति श्री मत्स्यपुराणम् समाप्तम् ।।
No comments:
Post a Comment