Friday, 7 February 2025

आचार्य किशोर कुणाल यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याची दु:खद बातमी नुकतीच वाचण्यात आली. मराठी माध्यमांनी ही बातमी सुद्धा दिलेली नाही. कारण आपल्याकडे श्री.किशोर कुणाल यांच्याबद्दल कोणाला फारशी माहिती नसावी. पण रामजन्मभूमीचा विषय ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयातून सोडवला जाण्यामागे ज्या काही व्यक्तींचे परिश्रम कारणीभूत होते त्यात श्री.किशोर कुणाल यांचा समावेश करावा लागतो. मी 'अयोध्या' ह्या माझ्या ग्रंथाच्या लेखनासाठी अभ्यास करत असताना श्री.किशोर कुणाल यांचे साहित्य व कार्य माझ्या वाचनात आले. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील (सध्याचा वैशाली जिल्हा) बरुराज नामक खेड्यात जन्मलेले श्री.किशोर कुणाल हे १९७२ साली IPS अधिकारी झाले. आपल्या पोलीस सेवेची सुरुवात त्यांनी गुजरात मधून केली. गुजरात राज्याचे पोलीस संचालक म्हणून काम केल्यानंतर त्यांची नेमणूक केंद्र सरकारमध्ये झाली होती. व्ही.पी.सिंग पंतप्रधान असताना त्यांनी १९९० साली केंद्रीय गृह मंत्रालयात ‘अयोध्या’ विषयासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला होता. श्री. किशोर कुणाल ह्यांची नेमणूक ह्या कक्षात Officer on Special Duty - OSD for Ayodhya ह्या मुद्दाम निर्माण केलेल्या पदावर केली गेली. रामजन्मभूमी विवादातील दोन्ही बाजूंना चर्चेसाठी एकत्र आणून त्यातून काही समजुतीचा तोडगा निघावा ह्यासाठी हा कक्ष काम करत होता. विशेषत: दोन्ही बाजूंनी समोरासमोर येऊन चर्चा करावी, आपापले पुरावे एकमेकांना द्यावेत यासाठी ह्या कक्षाने प्रयत्न केले. त्यातून समोर आलेल्या पुराव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून सरकारच्या वतीने ते न्यायालयात मांडण्याचे कामही हा कक्ष करणार होता. हे किशोर कुणाल पोलीस सेवेतील आय.पी.एस. अधिकारी असले तरी संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी संस्कृत मध्ये पी.एच.डी मिळवली होती. त्याही खेरीज अन्य काही भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांचा इतिहासाचाही अभ्यास दांडगा होता. त्यांची ही पात्रता लक्षात घेऊनच त्यांची नेमणूक ह्या अत्यंत अवघड व संवेदनशील पदावर केली गेली होती. व्ही.पी. सिंगांच्या नंतर आलेल्या दोन्ही पंतप्रधानांनी - चंद्रशेखर व नरसिंह राव - कुणाल ह्यांना त्या पदावर कायम ठेवले होते. त्या पदावर काम करताना श्री. कुणाल ह्यांना दोन्ही बाजूंचे पुरावे पहाण्याची व तपासण्याची संधी मिळाली. ते काम त्यांनी अत्यंत मेहेनत घेऊन पार पाडले. श्री.किशोर कुणाल यांनी ह्या पदावर काम करताना प्रचंड मेहेनत घेऊन स्वत: संशोधन करून अनेक नवे साहित्यिक व महसुली पुरावे पुढे आणले. ह्या पुराव्यांमुळे रामजन्मभूमीवरील प्राचीन राम मंदिराचे अस्तित्व सिद्ध करायला मोठी मदत झाली. उच्च व सर्वोच्च न्यायालयासमोर देखील त्यातील अनेक मुद्दे मांडले गेले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम टप्प्यात बाबरी मस्जिद अॅक्शऩ कमिटीचे वकील राजीव धवन ह्यांनी नैराश्यापोटी जो नकाशा भर न्यायालयात फाडून टाकला होता तो नकाशाही कुणाल ह्यांनीच उघडकीला आणला होता. त्यावेळी दोन्ही बाजूंकडून उपलब्ध झालेले पुरावे आणि स्वत: संशोधन करून मिळवलेले साहित्य ह्यांच्या आधारे त्यांनी दोन ग्रंथ लिहिले आहेत. Ayodhya Revisited व Ayodhya : Beyond Adduced Evidence हे त्यांचे प्रत्येकी ७६० पृष्ठांचे दोन ग्रंथ म्हणजे अयोध्येच्या इतिहासावरील विविध प्रकारच्या संदर्भ व पुराव्यांचे उत्कृष्ट संग्रह आहेत. भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन करणाऱ्या अभ्यासकांसाठी हे दोन्ही ग्रंथ पुढील अनेक वर्षे संदर्घ ग्रंथ म्हणून उपयुक्त रहाणार आहेत. सरकारच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर श्री. किशोर कुणाल यांनी आपल्या मूळ गावात धर्म जागरण व प्रचाराचे काम सुरु केले ते आजतागायत सुरु आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय इतिहासाच्या वास्तव इतिहासाचा एक खंदा अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेला आहे. आपल्या इतिहासाच्या वास्तव अभ्यासाला व पुनर्लेखनाला चालना मिळत असताना त्यांचे निधन झाले आहे, हा दुर्दैवाचा भाग आहे. पण त्यांनी करून ठेवलेले संशोधन कार्य पुढील अनेक पिढ्यांना उपयोगी पडणार आहे. श्री. किशोर कुणाल यांना विनम्र श्रद्धांजली. (माधवराव भांडारी यांची X वरील पोस्ट )

 आचार्य किशोर कुणाल यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याची दु:खद बातमी नुकतीच वाचण्यात आली. मराठी माध्यमांनी ही बातमी सुद्धा दिलेली नाही. कारण आपल्याकडे श्री.किशोर कुणाल यांच्याबद्दल कोणाला फारशी माहिती नसावी. पण रामजन्मभूमीचा विषय ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयातून सोडवला जाण्यामागे ज्या काही व्यक्तींचे परिश्रम कारणीभूत होते त्यात श्री.किशोर कुणाल यांचा समावेश करावा लागतो. मी 'अयोध्या' ह्या माझ्या ग्रंथाच्या लेखनासाठी अभ्यास करत असताना आचार्य किशोर कुणाल यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याची दु:खद बातमी नुकतीच वाचण्यात आली. मराठी माध्यमांनी ही बातमी सुद्धा दिलेली नाही. कारण आपल्याकडे श्री.किशोर कुणाल यांच्याबद्दल कोणाला फारशी माहिती नसावी. पण रामजन्मभूमीचा विषय ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयातून सोडवला जाण्यामागे ज्या काही व्यक्तींचे परिश्रम कारणीभूत होते त्यात श्री.किशोर कुणाल यांचा समावेश करावा लागतो. मी 'अयोध्या' ह्या माझ्या ग्रंथाच्या लेखनासाठी अभ्यास करत असताना श्री.किशोर कुणाल यांचे साहित्य व कार्य माझ्या वाचनात आले. 

बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील (सध्याचा वैशाली जिल्हा) बरुराज नामक खेड्यात जन्मलेले श्री.किशोर कुणाल हे १९७२ साली IPS अधिकारी झाले. आपल्या पोलीस सेवेची सुरुवात त्यांनी गुजरात मधून केली. गुजरात राज्याचे पोलीस संचालक म्हणून काम केल्यानंतर त्यांची नेमणूक केंद्र सरकारमध्ये झाली होती.

व्ही.पी.सिंग पंतप्रधान असताना त्यांनी १९९० साली केंद्रीय गृह मंत्रालयात ‘अयोध्या’ विषयासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला होता. श्री. किशोर कुणाल ह्यांची नेमणूक ह्या कक्षात Officer on Special Duty - OSD for Ayodhya ह्या मुद्दाम निर्माण केलेल्या पदावर केली गेली.

रामजन्मभूमी विवादातील दोन्ही बाजूंना चर्चेसाठी एकत्र आणून त्यातून काही समजुतीचा तोडगा निघावा ह्यासाठी हा कक्ष काम करत होता. विशेषत: दोन्ही बाजूंनी समोरासमोर येऊन चर्चा करावी, आपापले पुरावे एकमेकांना द्यावेत यासाठी ह्या कक्षाने प्रयत्न केले. त्यातून समोर आलेल्या पुराव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून सरकारच्या वतीने ते न्यायालयात मांडण्याचे कामही हा कक्ष करणार होता.

हे किशोर कुणाल पोलीस सेवेतील आय.पी.एस. अधिकारी असले तरी संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी संस्कृत मध्ये पी.एच.डी मिळवली होती. त्याही खेरीज अन्य काही भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांचा इतिहासाचाही अभ्यास दांडगा होता. त्यांची ही पात्रता लक्षात घेऊनच त्यांची नेमणूक ह्या अत्यंत अवघड व संवेदनशील पदावर केली गेली होती. व्ही.पी. सिंगांच्या नंतर आलेल्या दोन्ही पंतप्रधानांनी - चंद्रशेखर व नरसिंह राव - कुणाल ह्यांना त्या पदावर कायम ठेवले होते.

त्या पदावर काम करताना श्री. कुणाल ह्यांना दोन्ही बाजूंचे पुरावे पहाण्याची व तपासण्याची संधी मिळाली. ते काम त्यांनी अत्यंत मेहेनत घेऊन पार पाडले.

श्री.किशोर कुणाल यांनी ह्या पदावर काम करताना प्रचंड मेहेनत घेऊन स्वत: संशोधन करून अनेक नवे साहित्यिक व महसुली पुरावे पुढे आणले. ह्या पुराव्यांमुळे रामजन्मभूमीवरील प्राचीन राम मंदिराचे अस्तित्व सिद्ध करायला मोठी मदत झाली. उच्च व सर्वोच्च न्यायालयासमोर देखील त्यातील अनेक मुद्दे मांडले गेले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम टप्प्यात बाबरी मस्जिद अॅक्शऩ कमिटीचे वकील राजीव धवन ह्यांनी नैराश्यापोटी जो नकाशा भर न्यायालयात फाडून टाकला होता तो नकाशाही कुणाल ह्यांनीच उघडकीला आणला होता.

त्यावेळी दोन्ही बाजूंकडून उपलब्ध झालेले पुरावे आणि स्वत: संशोधन करून मिळवलेले साहित्य ह्यांच्या आधारे त्यांनी दोन ग्रंथ लिहिले आहेत. Ayodhya Revisited व Ayodhya : Beyond Adduced Evidence हे त्यांचे प्रत्येकी ७६० पृष्ठांचे दोन ग्रंथ म्हणजे अयोध्येच्या इतिहासावरील विविध प्रकारच्या संदर्भ व पुराव्यांचे उत्कृष्ट संग्रह आहेत. भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन करणाऱ्या अभ्यासकांसाठी हे दोन्ही ग्रंथ पुढील अनेक वर्षे संदर्घ ग्रंथ म्हणून उपयुक्त रहाणार आहेत. सरकारच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर श्री. किशोर कुणाल यांनी आपल्या मूळ गावात धर्म जागरण व प्रचाराचे काम सुरु केले ते आजतागायत सुरु आहे.

त्यांच्या निधनामुळे भारतीय इतिहासाच्या वास्तव इतिहासाचा एक खंदा अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेला आहे. आपल्या इतिहासाच्या वास्तव अभ्यासाला व पुनर्लेखनाला चालना मिळत असताना त्यांचे निधन झाले आहे, हा दुर्दैवाचा भाग आहे. पण त्यांनी करून ठेवलेले संशोधन कार्य पुढील अनेक पिढ्यांना उपयोगी पडणार आहे.

श्री. किशोर कुणाल यांना विनम्र श्रद्धांजली.

(माधवराव भांडारी यांची X वरील पोस्ट ) माझ्या वाचनात आले. 

(माधवराव भांडारी यांची X वरील पोस्ट )

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi