Thursday, 30 November 2023

कोकणचा विकास हाच आमचा ध्यास ; विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच

 कोकणचा विकास हाच आमचा ध्यास ;

विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनी प्रकल्पाचे भूमिपूजन

 

            रत्नागिरीदि. 30 (जिमाका) : कोकण हे महाराष्ट्राचे वैभव आहे. कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

            खेड लोटे एमआयडीसी येथे हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपुजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतआमदार योगेश कदमएचसीसीबीचे सीईओ जुआन पॅब्‍लो रॉड्रिग्जमाजी आमदार सदानंद चव्हाणएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्माएचसीसीबीचे जनसंपर्क अधिकारी हिमांशु प्रियदर्शी आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीपर्यावरणपूरक उद्योग आले पाहिजेत. रत्नागिरी जिल्हा आता उद्योग वाढीसाठी पुढे येत आहे. आताचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प आणण्यात यश मिळविले. महाराष्ट्रामध्ये उद्योगव्यापार वाढण्यासाठी गती दिली आहे. अवघ्या महिनाभरात कोका कोलाला आवश्यक त्या परवानगी देण्यात आल्यायालाच गतिमान सरकार म्हणतात. अशा उद्योगांसाठी महाराष्ट्र रेड कार्पेट’ टाकून तयार आहे. या कंपनीत 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. साठ उत्पादने या कंपनीतून उत्पादित होणार आहेत. स्थानिक लोकांना रोजगार देण्याची भूमिका शासनाची आहेस्थानिकांना प्राधान्य दिले जाईल. कोकाकोला प्रकल्प मोठा आहे. महाराष्ट्रात यापुढेही उद्योग येतील. कोकणाला विकासाकडे न्यायचे आहे. प्रगतीकडे न्यायचे आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आले पाहिजेत. गुंतवणुकीच्या पसंतीसाठी महाराष्ट्र हे प्रमुख राज्य आहे.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यामुळे राज्यात विकास उद्योग वाढतो आहे. कोकणातील समुद्र किनारा समृद्ध आहेयामुळे पर्यटन आणि उद्योग वाढीला चालना मिळेल. मुंबई - गोवा ग्रीन फिल्ड रस्ता तयार करतोय. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. त्यामतुळे त्यासाठी लवकरच कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी होईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले कीकोका कोला प्रकल्पाला अल्पावधीत सर्व सुविधा या कंपनीला उपलब्ध करून दिल्या. एमआयडीसीच्या माध्यमातून आवश्यक त्या परवानग्या देण्यात आल्या. आज याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोका कोला कंपनीला 3 लाख 7 हजार चौरस मीटरची जमीन हस्तांतरण पावती देण्यात येणार आहे. येथील जमिनदारांचे काही प्रश्न होते. माजी मंत्री रामदास कदम व आपण आणि एमआयडीसीचे अधिकारी यांनी ग्रामस्थांचे प्रश्न सोडविले. प्रकल्प सुरू झाल्यावर 80 टक्के स्थानिकांना नोकऱ्या देण्याची मागणी आहे. या मागणीला प्राधान्य देणार आहोतअसेही  उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले.

000

घडी मोडणे*.. साडी ची छान परंपरा

 *घडी मोडणे*..

  *पूर्वी नवी साडी घेतली की बायका कोणाला तरी घडी मोडायला द्यायच्या*..

    *किती प्रेमळ रिवाज होता* ना तो.. आतासारखी वारंवार साड्यांची खरेदी नसायची तेव्हा..वर्षाला एखाद - दोन साड्यांपर्यंतच मध्यमवर्गीयांची फार तर मजल असायची..त्याच त्याच साड्या नेसाव्या लागत..पण तरीही आपली *नवी-कोरी साडी, नणंदेला, जावेला, शेजारणीला घडी मोडायला द्यायला, मन मोठंच असावं लागत असेल*.. 

    *नात्यागोत्यातली एखादी गरीब बाई पण घडी मोडायला चालायची...* त्यानिमित्ताने तिच्या अंगाला कोरं कापड लागायचं..तिला *कान-कोंडं* वाटू नाही म्हणून...*, "तुम्ही नेसल्या की मला पटपट नव्या साड्या मिळतात"* असंही वरून म्हणायचं..आणि *गरिबीनं पिचलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगला असल्याचा आनंद बहाल करायचा*....🥰🥰🥰🥰

      *मनांच्या श्रीमंतीचा काळ होता तो!* 🌹🙏✔️💯🌹🙏

   🙏🏻🌸


सुयोग महिला मंडळ बांद्रा, प्रदर्शन अवश्य भेट द्या

 




पणन विभागाच्या विविध विकास कामांचा मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा

 पणन विभागाच्या विविध विकास कामांचा

मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा

 

            मुंबई, दि. 29 : कोकणात काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र उभारणे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्याबाबतच्या प्रस्तावाचा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा घेतला.

             यावेळी पणन संचालक केदारी जाधव, व्यवस्थापकीय संचालक संजय कदम व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मंत्री श्री. सत्तार म्हणाले कीकोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याबाबत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. विद्यापीठाकडून सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त करून घेण्याची कार्यवाही पणन मंडळाकडून करण्यात येत आहे.

                कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ज्या ठिकाणी शेतकरी भवन नाही तेथे शेतकरी बांधवांना निवासासोबतच व मुक्कामाच्या ठिकाणी शेतीशी निगडित सर्व साहित्य व बहुआयामी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे. राज्यात एकूण 306 कृषी उत्पन्न बाजार समिती असून शेतकरी भवन नसलेल्या 116 बाजार समितीमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी बाजार समित्यांना शासन अनुदान देणे प्रस्तावित असल्याचे मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.

अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध विकास कामांचा मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा

 अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध विकास कामांचा 


मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा


           


            मुंबई, दि. 29 : सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) नगरपालिका क्षेत्रात अल्पसंख्याक समाजातील नोकरदार महिलांसाठी प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र महिला वसतिगृह बांधकामास निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती, अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.


            अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा आज मंत्री सत्तार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार, उपसचिव आ. ना. भोंडवे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


             यावेळी मंत्री श्री सत्तार म्हणाले, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित निगम, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने कर्ज घेण्यासाठी शासन हमी मर्यादेमध्ये 30 कोटी रुपये वरून 500 कोटी रुपये इतकी वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे भाग भांडवल 700 कोटी रुपये वरून वाढवून 1000 कोटी रुपये करण्याचे प्रस्तावित आहे. छत्रपती संभाजीनगर येथील आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम बांधण्याबाबतही योग्य तो प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. सत्तार यांनी दिले.


               सिल्लोड येथे ऊर्दू घर बांधण्यासाठी धर्मादाय संस्थेने शासनास दान केलेल्या जागेवर ऊर्दू घर बांधण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अनुदानात वाढ, तसेच पारंपरिक शिक्षणाबरोबर बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे मदरश्यांचे अनुदान 2 लाखावरुन 10 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मौलाना आझाद महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेची कर्ज मर्यादा 20 लाख रुपये करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.


0000

मालेगाव तालुक्यातील काष्टी क्रीडा संकुलासाठी 25 कोटी रुपयांची तत्वतः मान्यता

 मालेगाव तालुक्यातील काष्टी क्रीडा संकुलासाठी

25 कोटी रुपयांची तत्वतः मान्यता

- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

 

            मुंबईदि. 29 : मालेगाव (जि. नाशिक) तालुक्यातील काष्टी क्रीडा संकुलासाठी 25 कोटी रुपयांची तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

            मंत्रालयात आज काष्टी क्रीडा संकुलासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसेक्रीडा विभागाचे आयुक्त सुहास दिवसे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), उपसचिव सुनील हांजे हे उपस्थित होते.

            मंत्री श्री.बनसोडे म्हणाले कीमालेगाव शहरासह कृषी विद्यापीठ आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना सरावाबरोबर स्पर्धा घेण्यासाठी या क्रीडा संकुलाचा उपयोग होणार आहे. या क्रीडा संकुलासाठी लवकरात लवकर शासनास प्रस्ताव सदार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

            राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत काष्टी येथील १५ एकर जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करावी. क्रीडा अधिकारी यांनी जागा हस्तांतरण आणि क्रीडा संकुलातील सोयीसुविधा विषयी सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री श्री. बनसोडे यांनी दिल्या.

            मंत्री श्री. भुसे यांनी मालेगाव कॅम्प भायगाव रोड येथे क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या जागेवर अद्ययावत जलतरण तलाव  बांधण्यात यावे. शहरातील लोकसंख्या तसेच या ठिकाणी उपलब्ध असलेल्या क्रीडा संकुलाचा मालेगाव परिसरातील खेळाडूंच्या गुणवत्तेचा विचार करता जलतरण तलाव व क्रीडांगण हे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बांधकाम कामगार पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्या उद्घाटन

 बांधकाम कामगार पूर्व प्रशिक्षण

कार्यक्रमाचे उद्या उद्घाटन

  

            मुंबई, दि. 29 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेच्या माध्यमातून भारतीय मजदूर संघ आणि कन्स्ट्रक्शन स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांसाठी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, श्रमिकांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

            या प्रशिक्षण कार्यक्रमाचे गुरुवार ३० नोव्हेंबर २०२३ रोजी  शारदा मं‍दिर महाविद्यालय एच.जी.रोड जे. के. टॉवरजवळ ग्रामदेवी मुंबई येथे सायंकाळी ५ वाजता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.      

खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा

 खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी

अधिनियमात सुधारणा

            शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणा कमाल मर्यादा) अधिनियम1961 मधील कलम 28-1 अअ (3) अन्वये माजी पात्र खंडकऱ्यांना अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांना वाटप करण्यात आलेल्या जमिनीचा भोगवटादार वर्ग-1 करण्यासाठीराज्यशासनाला शेती महामंडळाकडील गावाच्या गावठाण हद्दीपासून 5 किलोमीटरच्या परिसरातील जमिनीबाबत  शासकीयनिमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक प्रयोजनासाठी विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

            तसेच या अधिनियमाच्या कलम 29 च्या पहिल्या परंतुकामध्ये शर्तभंगासाठी  जमिनीच्या चालू बाजारदर मूल्याच्या 50% ऐवजी 75% रक्कम विनिर्दिष्ट करणेकलम 27 खाली वाटप केलेल्या सिलिंग जमिनीकरीता वाटपाच्या 10 वर्षानंतर शर्तभंग असल्यास नियमानुकूल केल्यानंतर व रुपांतरण अधिमूल्य भरल्यानंतर वर्ग-1 मध्ये रुपांतर करणेतसेच अधिनियमातील शास्तीबाबतचे कलम 40अ व्यपगत करणे यासाठी सुधारणा करण्यात येईल.

समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही

 समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे

अनुदान कमी होणार नाही


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते


समूह विद्यापीठ राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन


 


            मुंबई, दि. 29 : समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही किंवा त्यांची शैक्षणिक, आर्थिक शिस्त यात कोणताही बदल होणार नाही. समूह विद्यापीठात सहभागी होण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले.


            सिडनहँम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित समूह विद्यापीठ स्थापनेसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


            या राज्यस्तरीय परिषदेला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अजित बाविस्कर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, राज्यातील स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. समूह विद्यापीठ हा असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, ज्यामुळे उच्च शिक्षणाची गंगोत्री तळा-गाळापर्यंत पोहोचण्यास आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.


            समूह विद्यापीठांच्या माध्यमातून शहर किंवा परिसरातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि संशोधन संस्थांच्या एकत्रीकरणातून विविध प्रकारची मानवी आणि पायाभूत संसाधने एकत्रित आणणे व या संसाधनांचा प्रभावी वापर करून उच्च शिक्षणामध्ये सुसूत्रता, नेमकेपणा, बहु/आंतरशाखीय अभ्यासक्रम, दर्जा आणि कौशल्य विकासाच्या संकल्पनेला अधिक बळकट करण्याचा उद्देश आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


            प्रधान सचिव श्री. रस्तोगी म्हणाले की, राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापन्याकरिता शासनाने मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिली आहे. यामुळे विद्यापीठांवरील प्रशासकीय भार कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील.


            कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना उच्च शिक्षण संचालक श्री. देवळाणकर म्हणाले की, राज्यात अनेक स्वायत्त शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन आणि शैक्षणिक दर्जा उत्तम आहे. शैक्षणिकदृष्ट्या उच्च कामगिरी करणारे, आवश्यक ती पायाभूत सुविधा, प्रशिक्षित अध्यापक तसेच समूह विद्यापीठाच्या दृष्टीने समन्वय करण्यासाठी सक्षम असणारे महाविद्यालय, संस्था समूह विद्यापीठासाठी इच्छुक आहेत. यासाठी याविषयी सविस्तर चर्चा, विचार मंथन व्हावे यासाठी राज्यस्तरीय परिषद आयोजित केली आहे.


००००

समाज उन्नतीसाठी सेवकांना मिळणारे पुरस्कार हे प्रेरक व ऊर्जादायी

 समाज उन्नतीसाठी सेवकांना मिळणारे पुरस्कार हे प्रेरक व ऊर्जादायी

 - मंत्री डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था राज्य पुरस्कारांचे वितरण

                                                                                                                              

            नाशिकदि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आदिवासी विकास विभागासोबतच आदिवासी सेवक हा महत्वाचा दुवा आहे. सेवाभावी मनोवृत्तीतून आदिवासी सेवक व सेवा संस्था या दुर्लक्षित समाजास मदत करीत असतात. समाज उन्नतीसाठी या सेवकांना मिळणारे पुरस्कार हे त्यांच्यासाठी प्रेरक व ऊर्जादायी असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

            महाकवी कालिदास कलामंदिरात आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्थांना सन 2019 ते 2022 या चार वर्षाच्या राज्य पुरस्कारांचे आज मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते एका सोहळ्यात वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

            याप्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळीमाजी आमदार उत्तम इंगळेशिवराम झोलेएन.डी. गावितसंजय कुलकर्णीसंतोष ठुबेसुदर्शन नगरे यांच्यासह पुरस्कारार्थींचे कुटुंबीयनातेवाईकआदिवासी विकास विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

            डॉ. गावित म्हणाले कीआदिवासी हा समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्यांपासून इतरांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल. आपल्या हातून यापुढेही समाजाची सेवा घडत राहो व पुरस्कार्थींनी यापुढेही जोमाने काम करावे ही अपेक्षा मंत्री डॉ. गावित यांनी व्यक्त केली. ज्या आदिवासी बांधवांना स्वतःचे घर नाही त्यांना येत्या दोन वर्षात हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी सहावीपासूनच अॅकॅडमी सुरू करणार असून स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने त्यांची तयारी करून घेतली जाणार आहे. डिजिटल माध्यमातून शिक्षणासाठी  शिक्षकांनाही आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. बिरसा मुंडा रस्ते जोड योजनेच्या माध्यमातून सर्व वाड्यावस्त्यापाडे बारमाही रस्त्याने जोडण्यात येतील. आदिवासी बांधवांसाठी वनोपज स्थानिक पातळीवर संकलित करून त्यावर प्रक्रिया करून

            उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मदत करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया केलेले उत्पादने आदिवासी विकास विभाग खरेदी करण्यासाठी विक्री व्यवस्था उभारली जाणार आहे. आदिवासी बांधवांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी विभाग योजनाही राबवित आहेत, असेही मंत्री डॉ. गावित यांनी  सांगितले.

            प्रास्ताविकात श्रीमती गुंडे यांनी पुरस्कारांची पार्श्वभूमी विशद केली. आदिवासी विकास विभाग राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. आदिवासी सेवकास 25 हजार तर संस्थेला 51 हजार रुपयांचा पुरस्कार दिला जातो. कोरोना कालावधीमुळे मागील चार वर्षाचे पुरस्कार एकत्रित देण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

            पुरस्कारार्थीचा परिचय देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कारार्थी डॉ. शशिकांत वाणीनुरानी कुतुबअलीनामदेव नाडेकरसंतोष जनाठेमधुकर आचार्य आदींनी मनोगत व्यक्त केले. अपर आयुक्त श्री. माळी यांनी आभार मानले.

असे आहेत आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कारार्थी

२०१९-२०२०

२०२०-२०२१

२०२१-२०२२

२०२२-२०२३

श्रीरघुजी येसाजी गवळीनाशिक

१६श्रीअनिल नामदेव वाघनाशिक

३१ श्रीज्ञानेश्वर सिताराम भोयेनाशिक

४६ श्रीदत्तात्रय हनुमंता मुठेअहमदनगर

श्रीमती अनिताताई रामदास घारेनाशिक

१७श्रीगमन ईसन सोनवणेनाशिक

३२ श्रीसुरेश पुनाजी पवार, , नाशिक

४७ श्रीदेवरे श्रावण नानाजीनाशिक

श्रीउद्धव पांडुरंग मोरेनाशिक

१८ श्रीमती सविता जगदीश जयस्वालनंदरबार

३३ श्रीगोसा बहादूर खर्डेनंदरबार

४८ श्रीईश्वर संतोष माळीनंदरबार

श्रीजितेंद्र बापूराव चव्हाणजळगांव

१९ श्रीरवींद्र नागो भुरकंडेपालघर

३४ श्रीमतीसविता सहदेव मतेपुणे

४९ श्रीयुवराज दगाजीराव पाटीलनंदरबार

डॉशशिकांत जगन्नाथ वाणीनंदरबार

२० श्रीनामदेव लक्ष्मण नाडेकरपूणे

३५ श्रीकिसन मारुती तळपाडेमुंबई

५० श्रीमधुकर श्रीराम आचार्यनाशिक

श्रीनुरानी हैदरअली कुतुबअलीनंदरबार

२१ श्रीतुळा रुपा लांघीपूणे

३६ श्रीमहादेव आंबो घाटाळठाणे

५१ सौशिला सुरेश उईकेगोंदिया

श्रीदगडू रामचंद्र सोनवणेनाशिक

२२ श्रीमती प्रमिला उध्दव मसरामठाणे

३७ श्रीनागोराव उरकुरडा गुरनुलेनांदेड

५२ श्रीजितेंद्र चंद्रसेन पाडवीनंदरबार

श्रीरुपसिंग बिरबा पाडवीनंदरबार

२३ श्रीअशोक म्हाळू इरनकठाणे

३८ श्रीठकाजी नारायण कानवडेअहमदनगर

५३ श्रीमती ता गणपत किरवेपुणे

श्रीधाकल जान खुताडेपालघर

२४ श्रीकडूदास हरिभाऊ कांबळेबीड

३९ श्रीसुरेश मुकुंद पागीपालघर

५४डॉपोपरे वाळिबा विठ्ठलठाणे

१० श्रीपक पांडुरंग साळुंखेपालघर

२५ श्रीभागोराव नारायण शिरडेनांदेड

४० श्रीमरंजना किशोर संखेपालघर

५५ श्रीरत्नाकर तुकाराम घरतरायगड

११ श्रीप्रकाश रामचंद्र वायदंडेसातारा

२६ श्रीभगवान आश्रु कोकाटेबुलढाणा

४१ श्रीवसंत नवशा भसरापालघर

५६ श्रीसंतोष शिवराम जनाठेपालघर

१२ श्रीजयपाल परशुराम पाटीलरायगड

२७ श्रीधोंडिराम किसन थैलनाशिक

४२ श्री वसंत नारायण कनाकेयवतमाळ

५७ श्रीलक्ष्मण ढवळ टोपलेपालघर

१३ श्रीभास्कर लडकू दळवीपालघर

२८ श्रीगणपत सहादु मुकणेनाशिक

४३ डॉमधुकर गणपत कोटनाकेचंद्रपूर

५८ डॉचरणजित सिंग बलविरसिंग सलुजागडचिरोली

१४ श्रीसुभाष केशवराव येणोरकरअमरावती

२९ श्रीबिसन सिताराम सयामभंडारा

४४ श्रीताराम हावशा भिवनकरवर्धा

५९ श्रीबबन धुवालाल गोरामननागपूर

१५ श्रीरमेश मिरगुजी उईकेनागपूर

३० श्रीसखाराम ठका गांगडअहमदनगर

४५ श्रीवसंत श्यामराव घरटेधुळे

६० श्रीदिनेश अंबादास शेरामनागपूर

आदिवासी सेवा संस्था पुरस्कारार्थी

२०२१-२०२२

२०२२-२०२३

कैदिलवरसिंग पाडवी स्मारक स्मृती संस्थानंदरबार

 कन्हैयालाल बहुउददेशिय संस्थाधुळे

दीनदयाल वनवासी विकास संस्थानंदरबार

 शिक्षण प्रसारक मंडळ मोरचंडीयवतमाळ

 श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थागडचिरोली

 अहिल्या मंडळरायगड

 ज्ञान विकास मंडळधुळे

 वन संवर्धन संस्थाठाणे

 

0000


 

Featured post

Lakshvedhi