Monday, 28 February 2022

 महाराष्ट्रातील विमानतळांच्या प्रश्‍नांवर संयुक्त बैठक घेऊ - केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे.

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चे अध्यक्ष ललित गांधी यांना आश्‍वासन.

नवी दिल्ली ः महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या विकासासंबंधी व विमानसेवांच्या विस्तारासंबंधी नागरी उड्डयण मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांची संयुक्त बैठक आयोजित करू असे आश्‍वासन केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री नाम. ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले.

‘असोचेम’ या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित हवाई वाहतुक परिषदेप्रसंगी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी नाम. ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन चर्चा केली त्याप्रसंगी त्यांनी हे आश्‍वासन दिले.

ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील कार्यरत विमानतळांच्या विस्तारीकरण, हवाई सेवांचा विस्तार, नवीन प्रस्तावित विमानतळांच्या प्रलंबित कामासंबंधीचे मुद्दे आदी विषयानंतर सिंधीया यांचेशी चर्चा केली व महाराष्ट्रातील सर्व विमानतळांच्या विषयांचे सविस्तर निवेदन सादर केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीबरोबर झालेल्या संयुक्त बैठकीचे इतिवृत्त ही त्यांनी मंत्री महोदयांना सादर केले.

विशेषतः कोल्हापूर, नाशिक, जळगांव, औरंगाबाद, नागपुर येथुन नवीन हवाई सेवांचा प्रारंभ, विमानतळ विस्तारीकरण यावर प्राधान्याने लक्ष देण्याची विनंती केली.

सोलापूर विमानतळावरील प्रवासी वाहतुक नियमित सुरू होण्यामधील अडथळे दुर करणे, पूणे मुंबई येथील नवीन विमानतळांच्या कामाची गति वाढविणे.

अमरावती, अकोला, रत्नागिरी विमानतळ कार्यान्वित करणे या मुद्दयांवर प्रामुख्याने ललित गांधी यांनी नाम. ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रामुख्याने लक्ष देण्याची विनंती केली.

कोल्हापूर विमानतळास छत्रपति राजाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही यावेळी ललित गांधी यांनी केली.

तत्पूर्वी परिषदेत मार्गदर्शन करताना नाम. सिंधीया यांनी भारतात हवाई वाहतुक क्षेत्रात प्रचंड संधी असुन येत्या काळात ऑटॉमोबाईल क्षेत्राप्रमाणे हे क्षेत्र प्रगती करेल असे सांगितले.

छोट्या शहरांमध्ये विमानसेवा पोहोचविणे हे भारत सरकारचे प्रमुख धोरण असल्याचे सांगुन शहरांतर्गत वाहतुकीसाठी हेलीकॉप्टर सेवांचा विस्तार करण्याचे नवीन धोरण तयार करण्यात येत असल्याचेही सांगितले.

 







माय मराठी.


 

 


 कांशी विश्वनाथ 



 *न आणि ण,*

*श आणि ष,*

*ळ आणि ड,*

*चांदणीमधील च आणि चंद्रमधील च* 

*जहाजमधील ज आणि जीवनमधील ज*

*यांच्या उच्चारातील* 

*फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !* 


*बाकीच्यांणा मराठी भाशा दिणाच्या मणापासूण षुभेच्छा !!!*

😆😆🤪🥴



 

 


 *इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू!*


लेखक- विद्याधर गणेश आठवले.

दोन वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आमच्या स्क्वाड्रनला पुन्हा हलवण्याचा निर्णय झाला. आम्ही सगळा मांडलेला पसारा आवरून जामनगरला आलो. 

     अजुनही आमच्याकडे तीच जुनीपुराणी हंटर विमानं होती आणि नवीन विमानं मिळण्याची शक्यता दुरापास्त असल्यामुळे आम्ही याचा पार्ट त्याला, त्याचा पार्ट याला करत करत शिळ्या कढीला ऊत आणण्यासाठी झटत होतो! 

     जामनगरला पठाणकोट सारखंच प्रचंड मोठं एअर फोर्स स्टेशन होतं. खूप मोठा टेक्निकल एरिया, खूप मोठा डोमेस्टिक एरिया, सिनेमा थिएटर, स्विमिंग पूल, रिक्रिएशन सेंटर, डार्क रूमसह सर्व सुविधा युक्त हौशी फोटो क्लब, अशा नागरी सुविधा होत्या!

     सुकाॅय ७, मिग २१ आणि मि ८ हेलिकॉप्टर तसंच बेल हेलिकॉप्टरच्या स्क्वाॅड्रन होत्या. त्यात आता आमच्या हंटरची भर पडली!

      सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धातील वाॅर हिरो, किलर ब्रदर्स पैकी, ग्रुप कॅप्टन डी किलर जामनगरला आमचे स्टेशन कमांडर होते !

     साक्षात किलर सरांना प्रत्यक्ष भेटण्याच्या कल्पनेनेच मी हरखून गेलो होतो ! किलर सर, जठार सर हे म्हणजे साक्षात 'काळ ' असं बरंच काही ऐकलेलं असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती! 

      किलर सरांनी आणि जठार सरांनी युद्धांमधे पाकिस्तानी एअर फोर्सच्या धावपट्या उखडून, चहूबाजूंनी गोळ्या लागून चाळण झालेली, पेटती विमानं आणून आपल्या रनवेवर उतरवली होती! या असामान्य कामगिरी बद्दल त्याना शौर्य पदकं मिळाली होती! कोणत्या मटेरियलचं काळीज बनवलं असेल परमेश्वराने या माणसांचं! !

      विमानाला गोळ्या लागून आग लागलेली असताना, आपला जीव वाचविण्यासाठी, विमान सोडून 'बेल आऊट' न करता, त्या विमानाचे काही ना काही पार्टस् वापरता येतील आणि आपल्या देशाचं काही फाॅरेन एक्सचेंज वाचेल या उदात्त हेतूने, स्वतःच्या जीवावर उदार होऊन ते विमान आणून आपल्या विमानतळावर उतरवण्यासाठी आपलं सर्व कौशल्य पणाला लावणारे योद्धे ज्या देशाकडे असतील त्यांना जगातलं कोणतंही आणि कितीही शक्तिमान राष्ट्र पराभूत करू शकणार नाही !

      प्रत्यक्षात किलर सरांना पाहिल्यावर माझा भलताच भ्रमनिरास झाला! नावच किलर असलेला माणूस भयंकर उग्र व्यक्तिमत्वाचा असणार अशी माझी कल्पना होती! 

     हा लाल गोरा अँग्लो इंडियन माणूस अतिशय प्रसन्न आणि गोड चेहर्‍याचा होता! अत्यंत प्रेमळ स्वभाव! सगळ्यांना सांभाळून घेण्याची कामाची आश्वासक पद्धत! सगळ्या सोशल अॅक्टिव्हिटीज मधे उत्साहाने सहभागी व्हायची हौस! उतरंडीतल्या शेवटच्या पायरीवरच्या माणसाच्या सुद्धा खांद्यावर हात टाकून, त्याची समस्या स्वतः समजून घेऊन त्यावर उपाय करण्याची धडपड! देवाने हे एक वेगळंच रसायन घडवलं होतं! 

     आकाशात जीवघेण्या भराऱ्या मारणाऱ्या, या उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या माणसाकडून मी जमिनीवर रहाणं किती महत्वाचं असतं ते शिकून घेतलं! 'तुमच्या सहकार्यांच्या कोंदणात तुम्ही किती घट्ट बसला आहात त्यावर तुमचं पद, तुमची प्रतिष्ठा किती अधिकाधिक उजळून निघणार हे अवलंबून असतं ' हा एक खूप महत्वाचा धडा, किलर सरांचं प्रशासकीय कौशल्य जवळून निरखताना आपोआप मिळाला, ज्याचा मी पुढे उच्च पदावर काम करताना मला खूप फायदा झाला! यशाची गुरुकिल्लीच किलर सरांनी नकळत माझ्या हाती सोपविली! 

      एका रोमहर्षक प्रसंगात 'किलर' म्हणजे काय ते प्रत्यक्षच पहायला मिळालं ! एका मिग- २१ चं टेस्ट फ्लाईंग करण्यासाठी किलर सरांनी टेक ऑफ घेतला. आकाशात झेपावल्या क्षणीच, विमानाची कॅनाॅपी (फायटर विमानात पायलटला बाहेरचं पहाता यावं म्हणून ठेवलेलं फायबरचं पारदर्शक कवच) उडून गेली ! हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा अपघात होता! आता कल्पना करा की, डोळ्यावर शील्ड नसली तर ऐंशी किलो मीटर वेगाने मोटर सायकल सुद्धा चालवता येत नाही! हा माणूस बाराशे नॉटिकल माईल्स वेगाने टेक ऑफ घेत असताना याच्या डोळ्यासमोरची विंड शिल्ड नाहीशी झाली! काय करावं या माणसाने? 

      विमान सोडून तात्काळ इजेक्ट करायला हवं होतं! नियंत्रण कक्षातून तशा सूचनाही दिल्या होत्या, पण नवं कोरं विमान सोडून देणाऱ्या माणसाचं नांव किलर असूच शकत नाही! त्यांनी नियंत्रण कक्षाला उलट सांगितलं, "क्रॅश लँडिंगची तयारी करा! मी विमान उतरवतोय!"

     क्षणात अनेक सिग्नल्सची देवाण घेवाण झाली. किलर सरांच्या वरिष्ठांनी कळकळीची विनंती केली, " 'किलर' या देशासाठी विमानापेक्षा किंमती आहे! विमान सोड!"

      किलर सरांनी बहुदा सांगितलं असावं, "Don't worry Sir, you will have both!"

     रनवेवर क्रॅश लँडिंगची तयारी झाली. प्रत्येक जण आपापलं कर्तव्य करण्यासाठी सज्ज झालेला होता आणि मनात, "देवा, किलर सरांना वाचव." अशी तळमळीने प्रार्थना करत होता. 

      डोळ्यांना काहीही दिसत नसताना, केवळ इच्छाशक्ती आणि अनुभवाच्या जोरावर सर्किट मधे फिरून त्यांनी फ्युएल संपवलं आणि आपण लँडिंग करत असल्याची सूचना दिली! नियंत्रण कक्षाकडून आपण परफेक्ट लँडिंग लाईनवर आहोत याची खात्री करून घेतली आणि त्या ऐतिहासिक क्षणाकडे सरकायला सुरुवात झाली.... 

      प्रत्येक जण श्वास रोखून, काळजावर दगड ठेवून, आता पुढे काय वाढून ठेवलंय त्याची प्रतिक्षा करत होता! 

      विमानाचं अंडर कॅरेज सुरक्षितपणे उघडलं! तीनही चाकं व्यवस्थित बाहेर पडली! विमान उंची कमी करत करत योग्य दिशेने रनवेकडे येऊ लागलं! 

     विमान इतक्या परफेक्ट लाईनवर होतं की पायलटला काही दिसत नाहीये हे खरंच वाटत नव्हतं! प्रत्यक्षात नियंत्रण कक्षातून मिळणाऱ्या फक्त सूचनांच्या बळावर विमान उतरत होतं!

     सर्व काही सुरळीत होत आहे असं वाटत असतानाच विमान एका बाजूने कलंडल्या सारखं झालं आणि विमानाच्या मागच्या दोन चाकांपैकी एक चाक बॅरियरच्या सिमेंट पोलला टच झाल्यामुळे तुटून गेलं....

     आता मागचं एकच चाक उरलं होतं, ते टेकून नीट बॅलन्स झाला तर पुढचं टेकणार! गती आणखी कमी करण्यासाठी, चाक तुटताच किलरसरांनी टेलशूट (मागे उघडणारं पॅराशूट) ओपन केलं होतं ! 

      शेवटी विमान एका बाजूला घसरून बाॅडी घासल्यामुळे आग लागणार, हे आता सगळ्यांना कळून चुकलं होतं! क्रॅश व्यवस्थापन पुढच्या भयंकर प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी अति सज्ज झालं होतं !

अति समिप.... सावधान.... 

विमानाची गती संपता संपता ते तिरकं तिरकं जात असताना काँक्रिटच्या रनवेवर बाॅडी टेकणार नाही असं दोन चाकांवर बॅलन्स करत ते रनवे सोडून बाजूच्या मातीवर आल्याची खात्री पटल्यावरच किलर सरांनी इंजिन स्विच आॅफ केलं आणि विमानाला आग लागण्यापासूनही वाचवलं! 

      डाॅक्टरनी किलर सर कसे आहेत ते पहाण्यासाठी काॅकपिटकडे धाव घेतली... त्यांच्या चेहऱ्यापासून संपूर्ण शरीर इतकं सुजलं होतं की सेफ्टी बेल्ट कापून काढल्यानंतर सुद्धा त्याना काॅकपिटमधून बाहेर काढणं अवघड झालं होतं!   

      चेहर्‍यावर ना नाक दिसत होतं ना डोळे! बेल्ट कापता कापताच ते बेशुद्ध झाले! कसंबसं काॅकपिटमधून बाहेर काढून त्याना आय एन एस वलसुरा ला नेव्हीच्या हाॅस्पिटलमधे दाखल केलं, तेव्हा ते कोमात गेले होते! 

      सतरा दिवस मृत्यूशी झुंज देऊन ह्या महारथीने अचाट पराक्रम करून देशाचं एक विमान आणि एक जिगरबाज पायलट वाचवला आणि पुन्हा आकाशात झेप घ्यायला सज्ज झाला! 

     इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू! 

_*©️ विद्याधर गणेश आठवले.*_

(आवडल्यास शेअर करतांना कृपया मुळ कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच आहे तशी शेअर करावी ही नम्र विनंती.- मेघःशाम सोनवणे 9325927222.)

*सौ.‌विशाखा कुलकर्णी, पुणे* यांच्या सौजन्याने.

Sunday, 27 February 2022

 



 

 







Mayaechi marathi

 



 जनसामान्यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी

परराष्ट्र मंत्रालयाने ‘मिशन मोडने’ काम करावे

-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

        मुंबई, दि. 27 : परराष्ट्र व्यवहार देशाकरिता अतिशय महत्वाचा विभाग असून करोनाच्या कठीण काळात या विभागाने अतिशय कुशलतेने काम केले. सध्या युक्रेन येथे उद्भवलेल्या परिस्थितीत देखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारतीय लोकांना सुरक्षित आणण्यासाठी चांगले काम करीत आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कार्यामुळे देशाची प्रतिमा तयार होते असे सांगून परराष्ट्र मंत्रालयाने नागरिक तसेच देशात येणाऱ्या पाहुण्यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाच्या मुंबईतील विभागीय पारपत्र कार्यालय, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, प्रवासी संरक्षक विभाग तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागीय शाखा सचिवालयातर्फे एक आठवड्याच्या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सांगता व बक्षीस समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे आज रविवारी संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

            या कार्यक्रमाला क्षेत्रीय पारपत्र अधिकारी डॉ राजेश गवांडे, प्रवासी संरक्षक अधिकारी राहुल बऱ्हाट, भारतीय संस्कृती संबंध परिषदेच्या विभागीय संचालिका रेणू प्रिथियानी व परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी, कर्मचारी व निमंत्रित उपस्थित होते.

            देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबई येथे अनेक राष्ट्रप्रमुख, विदेशातील प्रांतीय मुख्यमंत्री, संसद सदस्य, राजदूत व उद्योजक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे मुंबईतील परराष्ट्र मंत्रालय विभाग दिल्लीपेक्षाही अधिक सक्रिय आहे, असे सांगून परराष्ट्र मंत्रालयातील लोक किती तत्परतेने आणि लोकाभिमुखतेने काम करतात यावर देखील देशाच्या परराष्ट्र नीतीचे यश अवलंबून असते असे राज्यपालांनी सांगितले.     

            सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना सामान्य नागरिकांना त्वरित प्रतिसाद देणारी प्रणाली विकसित केली होती असे सांगून या प्रणालीच्याही पुढे जाऊन परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सौजन्यपूर्ण सेवा दिली तर तो विभाग आदर्श विभाग म्हणून प्रस्थापित होईल असे राज्यपालांनी सांगितले.  

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच काव्य संमेलनातील सहभागी कवींचा सत्कार करण्यात आला.

000

Governor Koshyari attends Azadi Ka Amrit Mahotsav

celebrations organised by MEA

      Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari attended the concluding programme and awards ceremony of the weeklong celebrations of Azadi Ka Amrit Mahotsav organised by the regional offices of Ministry of External Affairs in Mumbai on Sunday (27 Feb).

      The celebration involving cultural, social and sports event was organised jointly by the Regional Passport Office, Protector of Emigrants, Indian Council of Cultural Relations and MEA Branch Secretariat.

       Head of MEA Secretariat Mumbai and Regional Passport officer Dr Rajesh Gawande, Protector of Immigrants Rahul Barhat and Regional Director of ICCR Renu Prithiani were present.

      The Governor distributed prizes and felicitated poets participating in the Kavya Sammelan organised on the occasion.

000



 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा

अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या पुण्यातील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी.

            मुंबई, दि. 26- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2021 आज राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवरील 1098 उपकेंद्रांवर घेण्यात आली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळा आणि एसएनडीटी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांना आयोगाचे अध्यक्ष श्री. किशोरराजे निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. आसनव्यवस्था आणि परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या वेळीही श्री. निंबाळकर यांनी नागपूर येथील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या होत्या.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2021 द्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील 666 पदांची भरती करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील 1098 परीक्षा केंद्रांवर 3 लाख 62 हजार 319 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला असून या परीक्षा प्रक्रियेची श्री. निंबाळकर यांनी पुणे शहरातील विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. डेक्कन जिमखाना येथील विमलाबाई गरवारे प्रशाला आणि कर्वे रोडवरील श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयाच्या केंद्रांवर सुरु असलेल्या परीक्षा प्रक्रियेची श्री. निंबाळकर यांनी पाहणी केली. 


             दि. 23 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात आली, त्यावेळीही नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना श्री. निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली होती.


            भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आयोग ‘ॲक्शन मोड’ मध्ये - श्री. निंबाळकर


राज्यातील सर्व केंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2021 सुरळीतपणे पार पडली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.  


            स्वतः अध्यक्ष परीक्षा केंद्रांना भेटी देत असून परीक्षा प्रक्रिया आणि नियोजनाची माहिती घेत आहेत. आयोगाकडे प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रिया लवकर करण्यासाठी आयोग 'ॲक्शन मोड'मध्ये असून दोन दिवसांत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध पदांच्या मुलाखती घेऊन त्या मुलाखतींचा निकाल व गुणवत्ता यादी त्याच दिवशी जाहीर केली आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.


 


00000


 


 


 


 


 

 राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासू क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील पदवी आणि पदव्युत्तर उपक्रम                                                                                    - क्रीडा मंत्री सुनील केदार

            मुंबई, दि.26: देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्यात आले असून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर या पदव्यांच्या अभ्यासक्रमास विद्यापीठ अनुदान मंडळाने (सुजीसी) मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात या विद्यापीठात सुरु करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम देशात प्रथमच महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात सुरु होत असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

            वानखेडे स्टेडियम येथे माध्यमांशी संवाद साधाताना ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, भारताचे माजी डावखरे फिरकी पटू निलेश कुलकर्णी, क्रीडा विभागाच्या उपसचिव श्रीमती नानल यांची उपस्थिती होती.

            श्री. केदार म्हणाले, राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे जगातील सर्वोउत्कृष्ट विद्यापीठ करण्याचा मानस आहे. क्रीडा विद्यापीठातील सुरु होणारा अभ्यासक्रम राज्यासाठी नवीन आहे. यामध्ये उणिवा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. माध्यमांनी आणि क्रीडा क्षेत्रातील तज्ञांनी सूचना केल्यास त्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल आणि योग्य त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. देशात विविध भागात 700 पेक्षा जास्त महाविद्यालयात क्रीडा अभ्यासक्रमाचे कोर्सेस सुरु आहेत. त्यांनाही त्या कोर्सेससाठी विद्यापीठामुळे मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            राज्यात गेल्या दिड वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची घोषणा झाली त्याच वेळी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार होता, परंतू पूर्ण जगावरच कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव होता. आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याने अभ्यासक्रम सुरु करता आला नाही. आता हळूहळू कोरोना प्रादुर्भाव कमी कमी होत असल्याने विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            भारतातील तरुणांसाठी मान्यताप्राप्त पदवीला पर्याय म्हणून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन या विषयामध्ये बॅचलर्स आणि मास्टर्स या पदव्याचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठ अनुदान मंडळाने (यूजीसी) घेतला, त्याचे स्वागत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र, पुणे या संस्थेने केले आहे. क्रीडा शिक्षणाचे नामकरण करण्याची गरज लक्षात घेऊन समकालीन व भविष्याभिमुख अध्यापनशास्त्रात बदल निर्माण करण्यात महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सादर करून भारतात एक संघटित व संरचित "स्पोर्ट्स-एड" क्षेत्र निर्माण करण्यात अग्रेसर ठरलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल असेही श्री. केदार यांनी सांगितले.

            राज्यातील दोन्ही सभागृहात विद्यापीठाचा निर्णय एकमताने मंजूर झाला त्याबद्दल सर्व लोक प्रतिनिधींचे श्री. केदार यांनी यावेळी अभार मानले. भारतातील क्रीडा शिक्षणाच्या विविध घटकांना योग्य ती मान्यता मिळविण्यासाठी श्री. केदार यांनी 'यूजीसी'च्या अधिकाऱ्यांसोबत जवळून काम केले आहे. "बॅचलर्स इन स्पोर्ट्स सायन्स अँड स्पोर्ट्स मॅनेजमेंट' या पदवीला मान्यता मिळाल्याने देशातील क्रीडा नैपुण्याच्या परिसंस्थेमध्ये व्यावसायिता निर्माण होईल आणि 10 अब्ज डॉलर मूल्याच्या क्रीडा व्यवस्थापन उद्योगात संधी उपलब्ध होण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच, यापूर्वी वित्तीय सेवा व माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांत ज्या प्रमाणे महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य ठरले, त्याचप्रमाणे क्रीडा प्रतिभा समृद्ध करणारे एक अग्रणी राज्य म्हणून ते उदयास येईल असे श्री. केदार यांनी सांगितले.

            विविध क्रीडा प्रकारांतील विज्ञान व व्यवस्थापन यांत कुशल व्यावसायिक निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने आपल्याकडे यापूर्वी क्रीडा शिक्षणामध्ये पुनर्कल्पना आणि परिवर्तन घडवून आणण्याचे एकमेव धोरण होते. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन झाल्याने आता तंत्रज्ञान, व्यवस्थापन, क्रीडा प्रशासन यातील विविध पैलूंचा समावेश करून क्रीडा शिक्षणात क्रांती घडवून आणणे आणि क्रीडा क्षेत्रात भारतातर्फे पराक्रम गाजवू शकतील, असे भविष्यातील क्रीडा व्यावसायिक तयार करणे हे आमचे ध्येय तयार झाले आहे. यापुढे व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला भारतीय क्रीडा उद्योगाच्या दीर्घकालीन विकासासाठी त्यातील प्रतिभा, नोकऱ्या आणि क्रीडा बौद्धिक संपत्ती तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झेप घेता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात वसलेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ ही शारीरिक व क्रीडा शिक्षण, क्रीडा विज्ञान व क्रीडा वैद्यक, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यमे व संज्ञापन, क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण या विषयांचे अभ्यासक्रम राबविणारी पहिलीच शिक्षणसंस्था आहे. पहिल्या टप्प्यात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी, क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील ३ वर्षांचा अभ्यासक्रम, तसेच क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू करण्यात आला आहे. या संस्थेने क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन व क्रीडा व्यवस्थापन यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये 'आयआयटी' आणि 'आयआयएम या संस्थांचे देखील सहकार्य मागितले आहे; जेणेकरुन एकत्रित आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करता येईल असे श्री. केदार यांनी सांगितले.

            क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया म्हणाले, "भारतातील क्रीडा परिसंस्थेसाठी ही एक महत्त्वाची घडामोड ठरणार आहे. देशातील तरुणांच्या करिअरला चालना देणाऱ्या प्रमुख अभ्यासक्रमांमध्ये आता क्रीडा हा विषयही महत्त्वाचा ठरेल. अर्थात, या तरुणांना आपण क्रीडा शास्त्रात व्यावसायिक पद्धतीने घडविले पाहिजे. आमचे उद्योग तज्ज्ञ त्यांना क्रीडा व्यावसायिक बनण्यात मदत करतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

00000


 


 



 युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले

विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार

          मुंबई, दि, 26- एअर इंडियाचे AI - 1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास दाखल झाले. 

          यावेळी विमानतळावर, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनीधी यांनी युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार मानले.

    विद्यार्थ्यांसाठी विमानतळावर चहापान व बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच त्यांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी मदत करण्यात येत होती. मुंबईत परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे, यवतमाळ, नागपुर, मुंबई अशा विविध भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

      युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने सर्वत्र अत्यंत भीतीदायक व दहशतीचे वातावरण आहे. मात्र युक्रेनमधील भारतीय दूतावासाने केलेली मदत व महाराष्ट्र शासनाची भक्कम साथ व संपर्कासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आज आम्ही मुंबईत सुखरूप परतलो आहोत, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया नागपूर येथील विद्यार्थी गौरव बावणे यांनी दिली.

          युक्रेनमध्ये परतलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य शासनाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्याची माहिती जिल्हास्तरावर संकलित करण्याचे काम सुरु आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्प लाईन क्रमांक जाहीर केले आहेत. तसेच राज्याचे नियंत्रण कक्ष 022- 22027990 या नंबरवर तसेच हॉटॲप क्र.9321587143 आणि controlroom@maharashtra.gov.in या संपर्काचा राज्यातील विद्यार्थ्यांना फायदा झाला.

      मुंबईत परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सौरभ राठोड, करीना नोरोना, निलेश तिवारी, गौरव बावणे, अदनान खान, सनीला पाटील, अजय शर्मा आदी विद्यार्थ्याचा समावेश आहे.मुंबईत सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून पहायला मिळाला. या विद्यार्थ्यांनी युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीतून मायदेशी सुखरुप पोहोचवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य शासनाने केलेल्या मदतीबद्दल अभार व्यक्त केले.

००००




 

 







 


 ┅═══◉❁✿☬✿❁◉═══┅

*💫शब्द हे चावी सारखे असतात, जर योग्य शब्दांची निवड केली तर ते कोणाच्याही हृदयाचे टाळे उघडू शकतात, आणि कोणाचेही तोंड बंद करू शकतात...*

   

*🌹🌼शुभ सकाळ🌼🌹*

┅═══◉❁✿☬✿❁◉═══┅

Saturday, 26 February 2022

 युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार

-- आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

 

                ·         मदतीसाठी राज्य नियंत्रण तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

            मुंबई,दि.२५- सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून  राज्यातील  अंदाजे १२०० विद्यार्थी युक्रेन देशात अडकले आहेत. त्यातील ३०० विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला आहे. राज्य नियंत्रण कक्ष या विद्यार्थ्यींशी संपर्कात असून महाराष्ट्र शासनाकडून या विद्यार्थ्यांना तसेच अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न  सुरू आहेत  अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

            सिंहगड निवासस्थानी युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी तसेच नागरिकांसंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते.

            मदत व पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणालेयुक्रेनमध्ये महाराष्ट्रातील अंदाजे १२०० विद्यार्थी अडकले असून ३०० विद्यार्थ्यांनी पालकांशी संपर्क साधला असल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहे.युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावर देखील संकलित करण्याचे काम सुरू आहे.सर्व जिल्हाधिकारी यांनी देखील हेल्पलाईन नंबर जाहीर केलेले आहेत.  राज्याचा नियंत्रण कक्ष  022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर मोबाईल तसेच व्हॉटस क्रमांक ९३२१५८७१४३ आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा.

            श्री.वडेट्टीवार म्हणालेमहाराष्ट्रातील किती लोक अडकले  आहेत याची माहिती विभाग घेत आहे.तात्काळ संपर्क केंद्रही सुरू केले आहे. जी-जी मदत हवी असेल ती मदत देण्यासाठी राज्य सरकार  देण्यास तयार आहे .केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत.कदाचित युक्रेनमधून विमान उडू शकणार नाही. त्यामुळे बाजूच्या देशातून जर विमान घेतले तर त्यासाठी तयारी दर्शवली आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा स्तरावर संकलित करण्याची तयारी केली आहे. काही लोकांशी संपर्क होण्यात अडचणी येत आहेत. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने  नवी दिल्ली येथे  हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयनवी दिल्ली येथील क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

 टोल फ्री - 1800118797

 फोन 011-23012113 / 23014104 / 23017905

 फॅक्स 011-23088124

 ईमेल situationroom@mea.gov.in या हेल्पलाईनवर संपर्क

साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

0000


 मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग;

कालबद्ध रीतीने इतर मागण्यांवरही कार्यवाही झाली पाहिजे

-------------------------

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

               मुंबईदि. 25 : मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य शासन व मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा विस्तृत आढावा घेण्यात आला तसेच प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कालबद्ध रीतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

            या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारमराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाणसमितीचे सदस्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरातगृह मंत्री दिलीप वळसे पाटीलवैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीमहाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी तसेच आदी संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.

            मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी मराठा समाजासंदर्भातील निर्णयांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती व समाजाच्यासमन्वयकांच्या मागण्यांची माहिती दिली. या विषयांवर विचारविनिमय होऊन अनेक निर्णय घेण्यात आले. मराठा समाजासाठी स्वतंत्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची लवकरच घोषणा होणार आहे. निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे केवळ ओबीसी प्रकरणांची हाताळणी असेलअसेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.

सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती

            मराठा समाजासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीला गती मिळेल.

व्यवस्थापकीय संचालकांची रिक्त पदे भरणार

            अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह विविध महामंडळांची संचालक व व्यवस्थापकीय संचालकांची पदे रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 'सारथीसंस्थेच्या विभागीय उपकेंद्रांसाठी भूखंड देण्याचे प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर झाले असूनत्यावर तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले .

सारथीची पदभरती प्रक्रिया महिन्याभरात

            'सारथीसंस्थेसाठी आवश्यक असलेल्या 273 पदांसाठी भरती प्रक्रिया महिन्याभरात केली  जाईल. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 18 नागरिकांच्या वारसांना राज्य परिवहन मंडळात रुजू करून घेण्यात आले असूनउर्वरित प्रकरणांवरही तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले.

इतर वसतिगृहेही सुरू करण्यासाठी प्रयत्न

            डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत ठाणेपुणेसातारा (कराड)सांगली (मिरज)कोल्हापूरनाशिक व अहमदनगर येथील सात वसतिगृहे वापरासाठी सज्जे असून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी इतर जिल्ह्यांमध्येही वसतिगृहे कार्यरत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही या वेळी निश्चित करण्यात आले.

            मराठा आंदोलनातील जे गुन्हे मागे घ्यायचे राहिले आहेत त्यांच्याबाबतीत महाधिवक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली गृह तसेच विधी व न्याय विभागाकडून न्यायालयाकडे तातडीने पाठपुरावा करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

            मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील निर्णयांची माहिती राज्य शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करुन ती वेळोवेळी अद्यावत करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

            सर्वोच्च न्यायालयाने मराठा आऱक्षण रद्दबातल केल्यानंतर विविध नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांबाबत लवकरच आणखी एक बैठक होणार असूनत्यामध्ये विविध कायदेशीर मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे..

Continue ४) अशोक केळकर मराठी भाषाअभ्यासक पुरस्कार (संस्था) - मराठी अभ्यास परिषदपुणे

o   मराठी भाषेचा सर्वांगीण विकासलोकव्यवहारात मराठीचा वापरज्ञानव्यवहारात मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि मराठीजनांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे या चतु:सूत्रीनुसार मराठी भाषेच्या हिताच्या आणि समृद्धीच्या दृष्टीने ही संस्था चाळीस वर्षे सातत्याने कार्यरत आहे.

o   भाषाविषयक सैद्धान्तिक विचारविमर्शभाषांतरित साहित्याची चिकित्सा तसेच भाषा आणि जीवन यातील विविधपदरी संबंध आणि त्यावरचे भाष्य मांडणारी भाषा या विषयाला वाहिलेले 'भाषा आणि जीवनहे त्रैमासिक 1983 पासून आजतागायत सुमारे चाळीस वर्षे प्रकाशित होणारे केवळ मराठीच नव्हे तर सकल भारतीय भाषांतील हे एकमेव भाषाशास्त्रीय नियतकालिक.

o   कोशबोलीभाषाअन्य भाषारूपे यांचा अभ्यासभाषा आणि संस्कृती यासंबंधी लेखन आणि लेखक यांना पुरस्कार.2018 पासून या पुरस्काराचे नामकरण 'प्राध्यापक ना. गो. कालेलकर पुरस्कार'.

o   वर्धापन दिनानिमित्त व्याख्यानेचर्चासत्रेपरिसंवाद तसेच मराठी भाषा दिनानिमित्त 'भाषातज्ज्ञ श्रीमती सत्त्वशीला सामंत स्मृति व्याख्यानइ. उपक्रम.

o   त्रिभाषा-सूत्राचे मूल्यमापनभाषिक नीती आणि व्यवहारप्रसार माध्यमे आणि मराठीचा विकासपाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन आदी विषयांवर सकारात्मक मंथन.

5) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्कार (व्यक्ती) - डॉ. चंद्रकांत पाटीलपुणे

o   कवीसमीक्षकअनुवादकअनेक बहुचर्चित मराठी आणि हिंदी कवितासंग्रहांचे संपादक तसेच राष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याचे मोलाचे कार्य केले.

o   १९६६ साली ज्येष्ट भालचंद्र नेमाडे यांच्यासह 'वाचाया लघु नियतकालिकाचे प्रकाशन.

o   हिंदी साहित्याचा मराठी अनुवाद आणि मराठी साहित्याचा हिंदी अनुवाद करण्याचे कार्य.

o   दोन हजारहून अधिक कवितांचा अनुवादकविता-नाटक-कादंबरी यांच्या अनुवादांचे ४० संग्रह१० संपादित ग्रंथ५ कवितासंग्रह५ लेखसंग्रह अशी ग्रंथसंपदा.

o   गेली सात वर्षे ज्ञानपीठ पुरस्कारासाठीच्या अंतिम निवड समितीत परीक्षक तसेच मध्यप्रदेश सरकारचा कबीर सन्मानकुसुमांजली राष्ट्रीय पुरस्कारसाहित्य अकादमी पुरस्कार यांसह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार समित्यांत परीक्षक म्हणून कार्य.

o   महाराष्ट्र शासनाच्या चार पुरस्कारांसह मध्यप्रदेशउत्तर प्रदेश या राज्यांचे पुरस्कारविविध राष्ट्रीय पुरस्कार आणि अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार.

 

5) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्कार (संस्था) - मराठी अभ्यास केंद्रमुंबई

o   मराठी भाषासमाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन.

o   शालेय शिक्षणात येणारे मराठी भाषेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करून राज्य शासनाला द्विस्तरीय आराखडा सादर.

o   'उच्च शिक्षणाची दशा आणि दिशाहा उच्च शिक्षणात मराठीच्या वापरासंबंधी लक्ष वेधणारा अभ्यासग्रंथ प्रकाशित. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर सर्वत्र मराठी माध्यम उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा. त्यातून मुंबई विद्यापीठाच्या 'बॅचलर ऑफ मास मीडियाअभ्यासक्रमांचे मराठीकरण.

o   न्यायव्यवहारात मराठीचा वापर व्हावा यासाठी 'न्यायाच्या प्रतीक्षेत मराठीह्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन करून जिल्हा व तालुका न्यायालय वकील परिषदेत त्याचे वितरण तसेच या संदर्भातील चर्चासत्रांचे आयोजन.

o   माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात मराठीचा वापर वाढावा यासाठी संगणकीय मराठीच्या वापराबद्दल कार्यशाळा. राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक संगणकात मराठीचा वापर अनिवार्य होण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांशी चर्चा. मराठीसाठी इन्स्क्रिप्ट फलक सर्वमान्य व्हावा,  एमएससीआयटी अभ्यासक्रमात युनिकोड व मराठीचा समावेश व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा. त्या संबंधित पुस्तिका प्रकाशित.

0000


 

वृत्त क्र. 630

 

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने

 मराठी भाषा गौरव दिनी 53 पुस्तकांचे लोकार्पण

            मुंबईदि. 25; साहित्य संस्कृतीकलाइतिहास अशा विविध विषयांवरील वैविध्यपूर्णमहत्त्वपूर्णनाविन्यपूर्ण व दुर्मिळ 53 पुस्तकांचे लोकार्पण मराठी भाषा गौरवदिनी दि. 27 फेब्रुवारी, 2022 रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी दिली आहे.

            महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पुस्तक प्रकाशन’ हे मुख्य उद्दिष्ट असून साहित्य संस्कृतीकलाइतिहास यासारख्या विषयांवर वैचारीकसमीक्षात्मकचरित्रात्मकवाङमयीन संशोधन या विषयांवरील वैविध्यपूर्णमहत्त्वपूर्णनाविन्यपूर्ण व दुर्मिळ ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केले जातात. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेल्या पुस्तकांचे दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी लोकार्पण करण्याची अनेक वर्षाची मंडळाची परंपरा आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कोरोनासारख्या महासंकटातही ही परंपरा खंडित न होऊ देता मंडळाकडून अत्यंत मौलिक अशा 53 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते त्यांच्या मंत्रालयीन दालनात दि. 23 फेब्रुवारी, 2022 रोजी झाले, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील यांनी कळविले आहे.

 मराठी भाषा गौरव दिनी 27 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत

गौरव व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

            मुंबईदि. 25 : ज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी रविवारी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिननिमित्त मराठी भाषा विभागातर्फे सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा गौरव व त्यांना पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            यावेळी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. भारत सासणे यांच्यासह श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था  - लोकवाङ्मय गृहमुंबईअशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराचे मानकरी  (व्यक्ती) - डॉ. रमेश वरखेडे, नाशिकमराठी अभ्यास परिषद, पूणे (संस्था) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्काराचे मानकरी (व्यक्ती) - डॉ. चंद्रकांत पाटीलपुणेकविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्कार मिळालेली (संस्था) - मराठी अभ्यास केंद्रमुंबई यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

            या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाईमुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख,मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदममहापौर श्रीमती किशोरी पेडणेकरखासदार अरविंद सावंतआमदार राहुल नार्वेकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  यावेळी चौरंग निर्मित 'शारदेच्या अंगणी मराठीच्या प्रांगणीहा कार्यक्रम सादर होणार आहे.

पुरस्काराचे नाव व पुरस्कारार्थी यांची माहिती

1)         विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक – डॉ.भारत सासणे

         ·         डॉ. भारत सासणे यांनी कथानाटकएकांकिकाकादंबरीबालसाहित्यललित व श्रुतिका लेखनचित्रपट पटकथा या वाङ्मय प्रकारात लेखन केले असून त्यांची 35 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

         ·         डॉ.भारत सासणे यांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी 7 पुरस्कार व इतर 30 पुरस्कार मिळाले आहेत. मराठवाडा साहित्य संमेलनसांगली येथे झालेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व जळगांव येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

         ·         डॉ.भारत सासणे यांनी दीर्घकथा’ हा वाङ्मयप्रकार नाविन्यपूर्णतेने व प्रयोगशीलतेने हाताळला आहे.

         ·         सामाजिक वास्तवाच्या चित्रणात अद्भताचे आणि कल्पकतेचे रंग मिसळून कथात्मक साहित्याला विचारपूर्वक कलात्मक आकार दिली.

 2)       श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था 

        - लोकवाङ्मय गृहमुंबई

o   पुस्तक व्यवसायापुढची सगळी आव्हाने पेलून  सदैव पुरोगामी विचारांशी बांधिलकी बाळगणाऱ्या लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने समाजाला नवी दृष्टी देणारे वाङ्मय सातत्याने प्रकाशित केले आहे.

o   महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बृहद चरित्र’, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या मुलाखतींचा संग्रहअशोक केळकरांचा रुजुवात’ हा मराठी समिक्षेचा मानदंडसतीश काळसेकर यांचे कसदार साहित्यदहा निवडक लेखकांच्या साहित्याची संपादित निवडक साहित्यमाला’, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र-चरित्रअशोक शहाणेअरुण खोपकरअरुण काळेप्रतिमा जोशीजयंत पवारमनोहर ओकनितिन रिंढेअशा नव्या वळणाच्या प्रयोगशील लेखकांच्या साहित्याने लोकवाङ्मयची सूची उजळून निघाली आहे.

o   नवीन लेखक / कवींना पुढे आणण्यासाठी कवि संमेलनविविध लेखनविषयक स्पर्धाआपले वाङ्मय वृत्त या मासिकाद्वारे साहित्यिकसामाजिक व सांस्कृतिक परिघावरील लिखाणाला चालना  देण्याचे काम लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने केले आहे.

o   वि.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कारासह मराठी विज्ञान परिषदफेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्समराठवाडा साहित्य परिषदअखिल भारतीय मराठी साहित्य संघ या संस्थांचे  पुरस्कार लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेस प्राप्त झाले आहेत.

o   लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेची गेल्या पन्नास वर्षांतील तेराशे पुस्तकांची भरघोस निर्मिती मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात मौलिक स्वरुपाची भर घालणारी आहे.

                                   

3) अशोक केळकर मराठी भाषाअभ्यासक पुरस्कार (व्यक्ती)- डॉ. रमेश नारायण वरखेडेनाशिक

o   अनुष्टुभ’ या मराठी साहित्य आणि समिक्षाव्यवहारात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक.

o   पुणे विद्यापीठात व्यावहारिक मराठीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात तसेच पाठ्यपुस्तक निर्मितीतही पुढाकार.

o   का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्र धुळे येथे कार्यरत असताना खानदेशातील भिलोरीपावराबंजाराअहिराणी या बोलींचा भाषिक आणि लोकसांस्कृतिक अभ्यास करण्यासाठी पद्धतिशास्त्र विकसित केले. तसेच ह्या विषयाचा अभ्यास करणाऱ्यांना उपयुक्त असे समाज भाषाविज्ञान:प्रमुख संकल्पना’ हे पुस्तक १९८८ मध्ये प्रकाशित.

o   19वर्षे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अनुदेशन तंत्रविज्ञानाचे प्राध्यापक आणि मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेचे संचालक म्हणून कार्यरत. स्वयं-अध्ययनपर पुस्तकांची निर्मिती. ग्रंथालयशास्त्रवृत्तपत्रविद्यामानवी हक्कग्राहक संरक्षणपंचायतराजसामाजिक परिवर्तन आणि चळवळी असे अनेक नवे अभ्यासक्रम विकसित करून त्यांची परिभाषा तयार केली.

o   निवृत्तीनंतर नाशिक येथे इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनिअरिंग या संस्थेचे अध्यक्ष आणि 'क्रिटिकल इन्क्वायरीया द्वैभाषिक संशोधन-पत्रिकेचे आठ वर्षे संपादन.

Featured post

Lakshvedhi