Tuesday, 30 January 2024

मराठा समाजाचे सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकाला सहकार्य करण्याचे आवाहन

 मराठा समाजाचे सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकाला सहकार्य करण्याचे आवाहन

   

              मुंबईदि. २९ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिकशैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी २३ जानेवारी पासून सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण ३१ जानेवारी २०२४ पर्यत करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावेअसे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फ़त करण्यात येत आहे.

                सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेत आहेत. नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेण्यात येत आहे. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाहीअशी माहिती आयोगामार्फत प्रसिद्धी पत्रकान्वये  कळविली आहे.

***

नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करा

 नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन आपल्या दारी प्रमाणेच मुख्यमंत्री सचिवालयातून संनियंत्रण

 

            मुंबईदि. २९ : तरूणांसाठी रोजगार हा जिव्हाळ्याचा विषय आहे. एका तरुणाला रोजगार म्हणजेत्याच्या कुटुंबांचा आनंदसमाधान. त्यामुळे नमो रोजगार अभियानांतर्गत होणारा नमो महारोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच विभागांनी मेहनत घ्यावी. त्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयातूनच संनियंत्रण केले जाईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

            शासन आपल्या दारी प्रमाणेच नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न व्हावेतअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            नमो महारोजगार अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महारोजगार मेळाव्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढामुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिककौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ताकौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी आदी उपस्थित होते. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्माठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेशासन आपल्या दारी हे अभियान यशस्वी झाले आहे. त्याचप्रमाणे नमो महारोजगार अभियानांतर्गत नागपूर येथील महारोजगार मेळावा यशस्वी झाला आहे. त्याचप्रमाणे आता यापुढे होणारे महारोजगार मेळावे शासनाच्या सर्व विभागांनी एकत्र येऊनमेहनत घेऊन यशस्वी करणे आवश्यक आहे. एका तरूणाला रोजगार मिळालातर त्याच्या कुटुंबांलाही मोठा दिलासा मिळतो. त्यामुळेच या महारोजगार मेळाव्यात जास्तीत कंपन्यांनी यावे यासाठी प्रयत्न व्हावेत. या मेळाव्यात सहभागी तरुणांचीही कुशलनिमकुशल अशी वर्गवारीची माहितीही उपलब्ध करून देण्यात यावी. मोठ्या कंपन्यांसोबतआपले महानगरपालिकाबांधकाम क्षेत्रातील कंपन्यात्यांच्या संघटनातसेच मोठे उद्योग नोकऱ्यांचे ऑनलाईन प्लॅटफार्मसरिक्रुटमेंट कंपन्यांही यावेतअसे नियोजन करण्यात यावे.

            मंत्री श्री. लोढा यांनी देखील महारोजगार मेळावा हा महाराष्ट्र राज्याचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. त्यामुळे तो यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न केले जावेत यासाठी समन्वयाने आणि एकजुटीने प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. ठाणे हा जिल्हा कोकणच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने हा मेळावा प्रचंड यशस्वी व्हावाअसे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

            बैठकीत ठाणे येथील महारोजगार मेळाव्याच्या आयोजनाचे स्थळ निश्चितीतसेच रस्तेवाहतूक सुविधा अनुषांगिक बाबींबाबत आढावा घेण्यात आला.

००००


 

आधुनिक मुंबईच्या निर्मितीमध्ये ज्यू धर्मियांचे योगदान मोठे

 आधुनिक मुंबईच्या निर्मितीमध्ये ज्यू धर्मियांचे योगदान मोठे


- राज्यपाल रमेश बैस


 


            मुंबई, दि. २९ : पारशी समाजाप्रमाणेच आधुनिक मुंबईच्या निर्मितीमध्ये ज्यू धर्मियांचे योगदान मोठे आहे. मुंबईचा इतिहास व येथील सुंदर वास्तूंच्या निर्मितीमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. या समाजातील उद्यमशील व दानशूर लोकांनी मुंबई, पुणे व इतरत्र निर्माण केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व तंत्रशिक्षण संस्था आज देखील समाजातील सर्व सामाजिक - आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना सेवा देत आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.  


            दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मारल्या गेलेल्या लाखो ज्यू धर्मीय लोकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित 'इंटरनॅशनल होलोकॉस्ट रेमेब्रन्स डे' निमित्त मुंबईतील ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ असलेल्या केनिसेथ इलियाहु सिनेगॉग येथे राज्यपाल श्री. बैस यांच्या उपस्थितीत प्रार्थना सभा झाली. यावेळी अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी, जर्मनीचे वाणिज्यदूत एकिम फैबिग, इस्रायलचे वाणिज्यदूत कोबी शोशानी, विविध देशांचे वाणिज्यदूत, जेकब ससून ट्रस्टचे अध्यक्ष व ज्यू समाजाचे नेते सॉलोमन सोफर, संगीता जिंदाल, तसेच ज्यू समाज बांधव उपस्थित होते.


            युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्ध काळात ६० लाख ज्यू धर्मीय लोकांना अतिशय क्रूर पद्धतीने मारण्यात आले. अशा अमानवीय कृत्याचे दुसरे उदाहरण जगात सापडणार नाही. भारत जगातील निवडक देशांमधील एक देश आहे, जेथे ज्यू धर्मियांचे खुलेपणाने स्वागत करण्यात आले व त्यांना त्यांच्या चालीरीती व धर्म आचारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. ज्यू धर्मियांची प्रार्थनास्थळे भारताच्या सर्वधर्म समभावाचे उदाहरण आहे, असे सांगताना ज्यू समाजातील सामाजिक व आर्थिक मागासलेल्या लोकांचे आर्थिक कल्याण करण्यासाठी तसेच त्यांचा वारसा जतन करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.


            यावेळी अमेरिका, जर्मनी, इस्रायल येथील वाणिज्यदूतांची तसेच बगदादी ज्यू समाजाचे नेते सॉलोमन सोफर यांची समयोचित भाषणे झाले. सुरुवातीला मृतात्म्यांसाठी प्रार्थना करण्यात आली व श्रद्धांजली वाहण्यात आली.


0000


International Holocaust Remembrance Day observed in Mumbai


 


            Maharashtra Governor Ramesh Bais attended a prayer meeting organised by the Jewish Prayer House 'Keneseth Eliyahoo Synagogue' in Mumbai on the occasion of the International Holocaust Remembrance Day on Monday (29 Jan). The Holocaust Remembrance Day is observed to pay respects to the nearly 6 million Jews killed in Europe during and after the Second World War.


            Consul General of the United States of America in Mumbai Mike Hankey, Consul General of Germany Achim Fabig, Consul General of Israel in Mumbai Kobbi Shoshani, Chairman of the Jacob Sassoon's Trust Solomon Sopher, members of the Jewish community and diplomats from various countries

 were present.


0000


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हरित हायड्रोजन निर्मितीसाठी सात कंपन्यांसमवेत सामंजस्य करार महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक; ६४ हजार रोजगार निर्मिती

 मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हरित हायड्रोजन निर्मितीसाठी

सात कंपन्यांसमवेत सामंजस्य करार

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक६४ हजार रोजगार निर्मिती

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. २९ : हरित हायड्रोजन काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटी रुपये एवढी आर्थिक गुंतवणूक करणारे सात प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यामाध्यमातून ६४ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासन आणि हायड्रोजन उर्जा निर्मिती करणाऱ्या विकासकांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्लामहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रामहाऊर्जाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील हरित हायड्रोजनवर फोकस केला आहे. केंद्र सरकारच्या हरित हायड्रोजन मिशनच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य शासनाने "हरित हायड्रोजन धोरण-२०२३" प्रकाशित केले आहे. त्याद्वारे २०३० पर्यंत ५०० केटीपीए इतका हरित हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे हरित हायड्रोजन विकासकांना विविध अनुदान सवलती देऊ केलेल्या आहेत.

            महाराष्ट्रात उद्योगस्नेही सरकार असून आवश्यक ते पायाभूत सुविधाकुशल मनुष्यबळ असल्याने राज्यात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र हरित हायड्रोजन परिसंस्थेमध्ये अग्रेसर बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

हरित हायड्रोजन धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीहरित हायड्रोजन संदर्भात प्रभावशाली धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत डीकार्बनाईज करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार वाटचाल सुरू असून हरित हायड्रोजन असे तंत्रज्ञान आहे की पर्यावरणाचा समतोल राखून उर्जा निर्मिती करणे शक्य होणार आहे. राज्य सरकारने जे धोरण तयार केले आहे, त्यात आवश्यक ते बदल अवश्य सुचवावेतअसे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र हरित हायड्रोजन क्षेत्रात पथदर्शी राज्य बनावे त्यासाठी झालेले सामंजस्य करार यशस्वीरित्या कार्यान्वित होतीलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

            यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती शुक्ला यांनी प्रास्ताविक केले. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रात एनटीपीसी ग्रीन एनर्जीअवादा ग्रीन हायड्रोजनरिन्यू ई-फ्यूअल्सआयनॉक्स एअर प्रॉडक्टस्एल.एन.टी. ग्रीन टेकजे. एस. डब्ल्यू ग्रीन हायड्रोजनवेलस्पन गोदावरी जीएच २ या सात विकासकांच्या प्रस्तावित प्रकल्पांमुळे २ लाख ७६ हजार ३०० कोटी एवढी आर्थिक गुंतवणूक  होणार आहे. या सात प्रकल्पांची क्षमता ९१० केटीपीए (किलो टन्स पर ॲनम) असून त्यामुळे ६४ हजार रोजगार निर्मिती होऊन प्रति वर्ष ५११ कोटी कि.लो. ग्रॅम. कार्बन उत्सर्जनात कपात होईल. यापासून सुमारे ४,७३२ केटीपीए हरित अमोनिया निर्यातीस चालना मिळणार आहे.


महाराष्ट्रात गुंतवणुकीचा निप्पॉन स्टील सोबत सामंजस्य करार ४० हजार कोटींची गुंतवणूक; २० हजार रोजगार निर्मिती

 महाराष्ट्रात गुंतवणुकीचा निप्पॉन स्टील सोबत सामंजस्य करार

४० हजार कोटींची गुंतवणूक२० हजार रोजगार निर्मिती

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. २९ : औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र जगभरातील उद्योजकांचे पसंतीचे राज्य ठरत असून दावोस मधील सामंजस्य करारानंतर आज महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात सहा एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्याकरीता अर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडिया कंपनी सोबत ४० हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे २० हजार प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउद्योग मंत्री उदय सामंतमुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिकउद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मानिप्पॉन स्टीलचे उपसंचालक कुबोटा सॅनमुख्य कार्यकारी अधिकारी अमित हरलका आदी उपस्थित होते.

            नुकतेच दावोस येथे प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी एका प्रकल्पावर समाधान न ठेवता एकापेक्षा अधिक प्रकल्पांसाठी गुंतवणूक करण्यात यावी अशी मुख्यमंत्र्यांनी श्री. मित्तल यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्यातील लोह खाणींना जोडणारा हा प्रकल्प राज्याच्या औद्योगिक विकासात महत्वाचे योगदान देणारा आहे. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. नुकत्याच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्यात सुमारे ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात असलेल्या पायाभूत सुविधाकुशल मनुष्यबळ यामुळे औद्योगिक विकास वेगाने होत आहे. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेआज झालेला सामंजस्य करार हा अविस्मरणीय क्षण आहे. राज्यात आम्ही आपले स्वागत करतो. राज्यात असलेल्या पोषक वातावरणामुळे गुंतवणूक वाढत असून महाराष्ट्रात सध्या अतिविशाल पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. देशात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांपैकी सुमारे ३५ टक्के प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प असून त्याद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष २० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

००००


कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक पदांचा लवकरच निकाल जाहीर करणार

 कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक पदांचा

लवकरच निकाल जाहीर करणार

 

            मुंबई दि. 29 : आय.बी.पी.एस संस्थेमार्फत सप्टेंबर 2023 मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. निकालाबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून यथाशीघ्र निकाल घोषीत करण्यासाठी आय.बी.पी.एस संस्थेस कळविले गेले आहेअशी माहिती कृषी आयुक्तालय पुणेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ज्ञानचंद्र गित्ते यांनी कळविले आहे.

0000

कुणबी जात प्रमाणपत्राच्या वितरणासाठी ३० व ३१ जानेवारी रोजी विशेष शिबिराचे आयोजन मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांची माहिती

 कुणबी जात प्रमाणपत्राच्या वितरणासाठी

३० व ३१ जानेवारी रोजी विशेष शिबिराचे आयोजन

मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांची माहिती

            मुंबईदि. २९ : मुंबई शहर जिल्ह्याच्या विविध शासकीयनिमशासकीय कार्यालयांमध्ये आढळून आलेल्या कुणबीमराठा- कुणबीकुणबी- मराठा प्रवर्गाच्या अभिलेख्यांची व्यक्तीनिहाय यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या यादीमध्ये समाविष्ट व्यक्ती तसेच आवश्यक पुरावे सादर करणारे अर्जदार नियमानुसार पात्र ठरत असल्यासअशा व्यक्तींचे जात प्रमाणपत्र संदर्भातील अर्ज भरुन घेणेते स्वीकारण्यासाठी ३० व ३१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० या कालावधीत विशेष शिबिर होणार आहेअसे मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे (सा. प्र.) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या  पत्रकान्वये कळविले आहे.

            हे शिबिर जिल्हास्तरीय आपले सरकार सेवा केंद्रजिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारओल्ड कस्टम हाऊसशहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबई येथे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण ९ वॉर्डमधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षात होईल.

            मा. न्यायमूर्ती शिंदे समिती (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने विविध जिल्ह्यांत आढळून आलेल्या कुणबी नोंदीसंदर्भात संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र तत्काळ निर्गमित करणे आवश्यक असल्याचे राज्य शासनाने १८ जानेवारी २०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार कुणबीमराठा- कुणबीकुणबी- मराठा जातीसंदर्भात आढळून आलेल्या नोंदींच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबीमराठा- कुणबीकुणबी- मराठा जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

            मुंबई शहर जिल्ह्यातील कुणबीमराठा- कुणबीकुणबी- मराठा या प्रवर्गातील नागरिकांनी आपल्याकडील उपलब्ध पुराव्यांसह शिबिरांच्या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हाधिकारीमुंबई शहर यांनी केले आहे.

            विशेष कक्ष स्थापन केलेल्या ठिकाणांची यादी व संपर्क क्रमांक असे (अनुक्रमे कार्यालयाचे नाव/बृहन्मुंबई वॉर्डपत्ताआपले सरकार केंद्र चालकाचे नावमोबाईल क्रमांक या क्रमाने) : जिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहरतळमजलाओल्ड कस्टम हाऊसशहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबईनीलेश बापूसाहेब माने- देशमुख९७६९२४१३१४. ’ वॉर्ड१३४ ईशहीद भगतसिंग मार्गरिझर्व्ह बँकेजवळफोर्टमुंबईप्रभू हिरा राठोड९७६८०५७१८०. बी’ वॉर्ड१२१रामचंद्र भट मार्गसर ज. जी. रुग्णालयासमोरमुंबईसुधीर रमाकांत चिंबूलकर९००४३५२१३४. सी’ वॉर्ड७६श्रीकांत पालेकर मार्गचंदनवाडी स्मशानभूमीजवळमुंबईमहेश नथुराम साळवी९८७०८७७५३३. डी’ वॉर्डजोबनपुत्र कम्पाऊंडनाना चौकमुंबईऋग्वेद रवींद्र खांडेकर (९९६७०२१५२२)प्रथमेश प्रकाश राऊत (९८९२००२१७०). ’ वॉर्ड१०शेख हफिजुद्दीन मार्गभायखळामुंबईयश एन्टरप्रायजेस (९७०२२८९७६४)परवेझ अहमद अन्सारी (९८२१३८७९१८). एफ’ नॉर्थप्लॉट क्रमांक ९६भाऊ दाजी रोडकिंग्ज सर्कलमाटुंगा पूर्वमुंबईरुपेश दत्तराम जाधव (९१६७९१८४४०)मनाली मधुकर  जाधव (९३२०४७४८९३). एफ’ साऊथजगन्नाथ भातनकर मार्गडॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड जंक्शनपरळ नाकामुंबईसिद्धी प्रमाणे बामणे (९९८७३१५९५६)गणेश हनुमंत सूर्यवंशी (९३२३०३६२११). जी’ नॉर्थहरिश्चंद्र येलवे मार्गप्लाझा सिनेमा मागेमुंबईप्रवीण साहेबराव निकाळजे (९८९२०५०६४५)अथर्व जितेंद्र तांडेल (९१३७३४५०९६). जी’ साऊथधनमिल नाकाना. म. जोशीमार्गमुंबईचैतन्य हेमंत दाभोळकर (८८९८८५२३७३)पूजा विनायक मयेकर (८०८२७६९३९३).

Featured post

Lakshvedhi