दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. साधना तायडे यांची मुलाखत.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 1 June 2022
दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. साधना तायडे यांची मुलाखत.
मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 1 जून व गुरूवार 2 जून 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
31 मे हा जगभरात तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करतात. तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे तंबाखू व्यसनाचे दुष्परिणामाबाबत जनसामान्यांत जागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाने विविध कार्यक्रम सुरू केले आहेत. तसेच या विषयी आरोग्य विभाग राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती डॉ. साधना तायडे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.
००००
आपत्कालीन परिस्थितीत शून्य जीवितहानीचे उद्दिष्ट ठेवून काम करा
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पावसाळ्यात धरणसाठ्यातील पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करा
मुंबई, दि. 31 : गेल्या दोन वर्षात पावसाची सुरूवात ही वादळांनीच झाली आहे. यंदा देखील पाऊस चांगला पडेल असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे ही चांगली गोष्ट आहे. पावसाळ्यापूर्वी प्रथमच एनडीआरएफच्या नऊ तुकड्या सात जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. जलसंपदा विभागाने धरणसाठ्यातील पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करून संबधित अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबत आदेशीत करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्सुनपूर्व बैठकीत केल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे मान्सून पूर्वतयारीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस आयुक्त संजय पांडे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, कोस्ट गार्डचे महासंचालक अनुराग कौशिक, नेव्ही कमांडर कर्नल सुनिल रॉय, एअर फोर्सचे ग्रुप कमांडर प्रविणकुमार, मध्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक ए.के.लाहोटी, पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक पी.बुटानी, ग्रुप कॅप्टन प्रविण कुमार, एमएमआरडीचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ.के.एच.गोविंदराज, एनडीआरएफचे कमांडर आशिषकुमार, जलसंपदाचे सहसचिव अतुल कपोले, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.जयंत सरकर, एसडीआरएफचे अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त या बैठकीला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, गेल्या दोन वर्षात अचानक कमी कालावधीत जास्त पाऊस पडला. तसेच निसर्गाचा अंदाज कळत असला तरी कधी काय घडेल हे सांगता येत नाही. यंदाच्या पावसाळ्यात आपण सर्व यंत्रणांनी मान्सुनपूर्व सर्व तयारी चांगली केली आहे. विशेषत: पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून ऐनवेळी मदत व बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रथमच एनडीआरएफच्या ९ तुकड्या ७ जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्याची माहिती आज मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली. ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम १५ जूनपासून पोहोचतील. याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफची एक तुकडी नांदेड व एक तुकडी गडचिरोली येथे १५ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा रीतीने पूर्व नियोजित पद्धतीने केलेल्या व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा नेहमीच महत्वाचा मुद्दा असतो. पूर नियंत्रण जलसंपदा विभागाचे अधिकारी नियोजनाने व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात. त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवरच राहावे आणि मुख्य अभियंता यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय अजिबात मुख्यालय सोडू नये असे निर्देश आजच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले. पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणातून किती पाणी कसे सोडण्यात येत आहे ते सर्वसामान्यांना रियल टाईम कळावे म्हणून जलसंपदा विभागाने यंत्रणा विकसित केली असून त्याद्वारे धरण क्षेत्रातील व परिसरातील नागरिकांना आगाऊ सूचनाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती ही माहिती जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावरून १५ जूनपासून थेट पाहू शकतो. तंत्रज्ञानाचा अवलंब करून ही यंत्रणा उभारल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले व गेल्या वर्षी चिपळूण पुरानंतर आपण आढावा घेऊन यासंदर्भात दिलेल्या सूचनेप्रमाणे ही यंत्रणा सुरू होत आहे याचा निश्चित उपयोग होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जलसंपदा विभागानेही पूर कालावधीत दक्ष राहणे गरजेचे : उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पूर कालावधीत धरणातील पाणी साठ्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. स्थानिक यंत्रणांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये. तसेच आपत्ती कालावधीत संपर्क यंत्रणा प्रभावी असण्यासाठी देखील आपत्ती विभागाने दक्ष रहावे. मुंबईत पाणी साठल्यामुळे मॅनहोल वरती जाळी बसवून ज्या ठिकाणी जाळी बसवली आहे त्या ठिकाणी मॅनहोल आहे हे समजावे यासाठी मोठी पताका उभारावी जेणेकरून या ठिकाणी लोक जाणार नाहीत. कोकण तसेच कोल्हापूर, सातारा व सांगली या भागात वाढता पुराचा धोका लक्षात घेता राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची टीम कायमस्वरूपी या भागात राहण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपत्ती कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.
दरड कोसळणाऱ्या धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी लवकरच धोरण : विजय वडेट्टीवार
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, गेल्या काही वर्षांत राज्याच्या कोणत्या ना कोणत्या भागाला पुराच्या संकटाचा सामना करावा लागला आहे. पूर आणि भूस्खलनाचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांच्या पुनर्वसनासंबंधी धोरणही लवकरच मंजूर होणार असून यामुळे दरड कोसळणाऱ्या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होईल. राज्यातील १४ जिल्ह्यात सॅटेलाईट फोन, ६९ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू शकतात अशा ठिकाणी कायमस्वरूपी अशा गावांचे पुनर्वसन, ज्या जिल्ह्यात पूर येतो अशा जिल्ह्यांना ११६ बोटी व १८ मदत व शोध कार्यासाठी अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून दिली आहेत. ज्या ठिकाणी वीज पडते अशा ठिकाणी वीज अटकावासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणे. सर्व जिल्ह्यांसाठी स्टेट ऑफ आर्ट उपग्रह संप्रेषण व्यवस्था तसेच जीआयएससक्षम, आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारीत निर्णयासाठी सहाय्यभूत ठरणारी व्यवस्था निर्णय घेणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्याच्या दृष्टीने प्रभावी प्रतिसाद आणि निर्णय घेणे यामुळे शक्य होईल, असेही मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले.
मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, आपत्ती कालावधीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय असून, आपत्ती प्रतिसाद यंत्रणा ही राज्यात लागू करण्यात येत आहे. आपत्तीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणामध्ये योग्य तो समन्वय राहावा यासाठी ही यंत्रणा काम करणार आहे. अचानक येणारे पूर, दरडी कोसळणे आदी आपत्तीला तोंड देण्यासाठी स्थानिक ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा गतीमान असली पाहिजे यासाठी जिल्ह्यांनी मागणी केलेल्या साहित्याची तसेच निधीची उपलब्धतता करून दिली आहे, असेही मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेली पूर्वतयारी, या कालावधीत प्रभावी संपर्कासाठी सॅटेलाईट फोन, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक येथे तैनात करणे,आपत्ती कालावधीत तत्काळ संपर्कासाठी १०७७ हा संपर्क क्रमांकही नव्याने सुरू करण्यात आला आहे अशी माहिती विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता यांनी बैठकीत सविस्तर माहिती सादर केली.
यावेळी सर्व विभागांनी त्यांच्या विभागासाठी केलेली पूर्व तयारी बैठकीत सादर केली.
….....
वृ
*हौसिंग सोसायटीची रिडेव्हलपमेंट म्हणजे काय असतं?*
*जुनं घर बिल्डरला द्यायचं आणि त्याच्या बदली फुकट, नवं, मोठ्ठ आणि आधुनिक सुखसोई असलेलं घर घ्यायचं!*
रिडेव्हलपमेंट म्हणजे जर इतकी सोपी गोष्ट असती तर इतके प्रोजेक्ट्स फेल गेलेच नसते!! खरं कि नाही?
मग रिडेव्हलपमेंट यशस्वीरीत्या पारपाडण्यासाठी काय करायला हवं?
महेश गजेंद्रगडकरच्या म्हणण्याप्रमाणे रिडेव्हलपमेंट हा सोसायटीच्या सभासदांच्या मानसशास्त्राच्या व्यवस्थापनाचा विषय आहे. हे व्यवस्थापन ज्यांना जमते तेच रिडेव्हल्पमेंट करण्यात यशस्वी होतात. हा महेशचा अनुभव आहे. कारण महेश १०० सभासद असलेल्या सोसायटीचा चेयरमन आहे. आणि तो त्याच्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट करतो आहे..
महेश वकील असल्याने त्याला स्वानुभवाबरोबरच कायद्याचेही ज्ञान आहे. आणि आता रिडेव्हल्पमेंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट कॅन्सल्टंट हा त्याचा व्यवसाय झाला आहे.
माझ्या सोसायटीची रिडेव्हल्पमेंट करायची ठरल्यावर मला जेंव्हा भयंकर अनुभव आले तेंव्हा मी महेशकडे गेलो आणि रिडेव्हल्पमेंट कशी करावी हे समजून घेतले.
मला रिडेव्हलपमेंट यशस्वीरीत्या करण्याची पद्धत समजली पण माझ्या सोसायटीतल्या इतर सभासदांना हे कसे समजून सांगावे हा प्रश्नच होता.
खरं तर महेश रिडेव्हल्पमेंटवर सेमिनार घेतो. सोसायटीत जाऊन सभासदांना मार्गदर्शन करतो..पण त्याकरता तो जी फी घेतो ती द्यायला माझ्या सोसायटीच्या रिडेव्हलोपमेंट कमिटीला पटवणं मला अशक्य होते.
का अशक्य होते हे तुम्हाला माहीतच आहे. सोसायटीची रिडेव्हल्पमेंट हा फुकटचा खेळ आहे. बिल्डर सगळं करून देतो. फक्त जास्तीत जास्त टक्के वाढीव क्षेत्रफळ देणारा आणि "नावाजलेला" - म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर होर्डिंग लावणारा - बिल्डर पकडला की झालं. असं जगातल्या सगळ्या सोसायटीतल्या सगळ्यांचं मत असतं.
यावर उपाय म्हणून मी एक आयडिया केली. महेशला म्हटलं कॅमेऱ्या समोर बसून तू मला रिडेव्हलपमेंट कशी करावी हे शिकव. तो व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करतो.म्हणजे माझ्या सोसायटीतल्या लोकांना रिडेव्हल्पमेंट यशस्वी अशी करावी हे कळेल. त्यांचा सोईच्या वेळी ते घर बसल्या फुकट व्हिडिओ बघू शकतील. आणि मग त्यांना रिडेव्हल्पमेंट करण्याची योग्य पद्धत कळेल..आमची सोसायटी फसणार नाही. लटकणार नाही. अडकणार नाही. आणि मग तुझ्या सोसायटीसारखी माझीही सोसायटी रिडेव्हलप होईल.
महेश माझा खरा मित्र असल्याने तो लगेच तयार झाला. आम्ही विडिओ तयार केले. विषय फारच मोठ्ठा असल्याने त्याचे ४० - ५० मिनिटांचे ३ एपिसोड झाले. रिडेव्हल्पमेंटचा विचार मनात आल्या पासून बिल्डर अपॉईंट करेपर्यंत काय काय करावे याची सविस्तर माहिती यात आहे. रिडेव्हल्पमेंटची कायदेशीर प्रक्रिया, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्ट अँपॉईंट करणे, टेंडर कसे काढावे, एमओयू कसा करावा, बिल्डरबरोबरच्या अग्रीमेंटमध्ये कुठले कुठले मुद्दे असावेत वगैरे वगैरे सगळं यात सांगितलं आहे.
आज मी माझ्या सोसायटीला हे विडिओ बघण्याचं आग्रहाचं आणि कळकळीच निमंत्रण दिलय.
तुमच्या सोसायटीत जर रिडेव्हलोपमेंटकरण्याचा बेत शिजत असेल तर तुम्हीही हे ३ विडिओ एपिसोड यूट्यूबवर जरूर बघा. आणि तुमच्या सोसायटीतल्या सगळ्यांना बघायला सांगा. म्हणजे मग रिडेव्हलपमेंट यशस्वीरीत्या पारपाडण्यासाठी काय करायला हवं हे त्यांनाही माहिती होईल
Part 1 - - https://youtu.be/Z0utipsa12o
Part 2 - - https://youtu.be/CC3JYxB-GDY
Part 3 - - https://youtu.be/76YXke3ULn4
Featured post
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...