Tuesday, 10 August 2021

 भायखळा आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

29 ट्रेडसाठी 1500 जागा उपलब्ध

    मुंबईदि. 10 : भायखळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) 29 ट्रेडसाठी 1 हजार 500 जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु आहेदहावी उत्तीर्ण इच्छूक उमेदवारांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेअसे आवाहन प्राचार्य आरबीभावसार यांनी केले आहेमुंबई शहर जिल्ह्यामध्ये भायखळा आयटीआयसह दादर येथे मुलींचे तसेच जनरल आयटीआयमांडवीधारावीलोअर परेलमुंबई-01 या शासकीय आयटीआयसाठीही प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

भायखळा आयटीआयमध्ये प्रवेशासाठी मार्गदर्शन करण्यात येत असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा संस्थेतच उपलब्ध करुन देण्यात आली आहेज्या उमेदवारांना संस्थेत येणे शक्य नसेल त्यांनी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावीआयटीआयच्या ट्रेड (कोर्सबद्दलची माहिती https://mumbai.dvet.gov.in/mumbai-city-institutes/iti-mumbai-11/ या लिंकवर उपलब्ध आहेप्रवेश अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी https://meet.google.com/nqp-chnm-esi या गुगल लिंकवर दररोज वेळ दुपारी 3 ते 5 या वेळेत मार्गदर्शन करण्यात येते.

      374, साने गुरुजी मार्गआग्रीपाडा पोलिस स्टेशनसमोरघास गलीभायखळामुंबई - 11 येथे हे आयटीआय कार्यरत आहेभायखळा रेल्वे स्टेशनमहालक्ष्मी रेल्वे स्टेशन  मुंबई सेंट्रलपासून 10 मिनिटांच्या अंतरावर आयटीआय आहेअधिक माहितीसाठी विजया शिंदे (मोबाईल क्रमांक 8689986244 आणि डी.जेगावकर  (मोबाईल क्रमांक 8689971216) यांच्याशी संपर्क साधावा.

      प्रत्येक व्यवसायाच्या तुकडीमध्ये 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेतकॉम्पुटर ऑपरेटर अँ प्रोग्रामींग सिस्टंटसर्व्हेअरड्रॉप्टमन सिव्हीलड्रॉप्टसमन मेकॅनिकलइलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिइन्फरमेशन कमुनिकेशन टेक्नॉलाजी आर्कीटेक्चरलड्रॉप्टसमनडेक्स टॉप ब्लिशिंग (डी टी पीइंटेरीअर डेकोरेटरइलेक्ट्रीशियनवायरमन या ट्रेडची महिलांमध्ये मागणी असतेमहिलासांठी रेल्वेमध्ये प्रवासाची मोफत सुविधा उपलब्ध आहे.

      भायखळा आयटीआमध्ये टेक्नीशियन मेडीकल इलेक्ट्रॉनिक्सटेक्नीशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम हे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविले जातातमुंबई हे मेडीकल  मेडीकल क्विपमेंट मॅनुफॅक्चरींग इंडस्ट्रीचे हब असून येथील हॉस्पीटलमध्ये मशिन दुरुस्तीचे काम या व्यवसायात शिकविले जातेमुंबई येथील कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये पुष्कळ रोजगार उपलब्ध असून त्याकरिता ड्रॉफटसमन सिव्हीलर्व्हेअरकारपेंटरइंटेरीअर डेकोरेटर आणि डिजाईनप्लंबरमेसन या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जातेमुंबईमध्ये ऑटोमोबाईल र्व्हि स्टेशन पुष्कळ आहेततसेच महिंद्रा अँड हिंद्राआयशर सारख्या इंडस्ट्री आहेतया इंडस्ट्रीला तसेच टोमोबाईल र्व्हि स्टेशनला लागणारी मेकॅनि मोटार व्हेईकलडिझेल मेकॅनिवेल्डर हे ट्रेड या आयटीआयमध्ये शिकविले जातात.

      मुंबई येथे सर्विस इंडस्ट्रीमध्ये सुध्दा पुष्कळ रोजगार उपलब्ध आहेतमुंबई येथे आयटी इंडस्ट्री आहेत्याकरीता लागणारे कॉम्पुटर ऑपरेटर ॲड प्रोग्रामींग सिस्टंटकॉम्पटर हार्डवेअर ॲन्ड नेटवर्की मेकॅनि तसेच र्व्हि इंडस्ट्रीला लागणारी वायरमनइलेक्ट्रीशियनमेकॅनिक रेफ्रीजिरेशन ॲड एअर कंडीशनींगडेस्कटॉप ब्लिशींग ऑपरेटर हे अभ्यासक्रम शिकविले जातातमुंबईत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी इंडस्ट्रीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेतत्याकरीता लागणारे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिइन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेश टेक्नॉलॉजीटेक्नीशियन पॉवर इलेक्ट्रॉनीक्स ॲड सिस्टीमचे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची गरज असतेहे ट्रेड देखील या संस्थेमध्ये शिकविले जातातमॅनुफॅक्चरींग इंडस्ट्री उदागोदरेजमहिंद्रा ॲड महिंद्राभारत गिअर्सआयशरतळोजा एमआयडीसी तसेच ठाणे-बेलापूर रोडवरतारापूर एमआयडीसीमध्ये पुष्कळ मॅनुफॅक्चरींग इंडस्ट्रीज आहेतत्याकरीता लागणारे फीटरमशिन टूल मेंटेनन्समशिनिष्टमशिनिष्ट ग्राईंडरवेल्डरटूल डायमेकरटर्नर या व्यवसाय ट्रेडचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या <span lang="HI" style="font-size: 12.0


 ऑक्सिजन बाबतीत महाराष्ट्र देशातील

पहिले स्वयंपूर्ण राज्य ठरेल

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मीरा-भाईंदर ऑक्स‍िजन प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण

 

             ठाणे, दि. 10 : दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये ऑक्सिजनअभावी विविध अडचणींचा सामना रुग्णाला करावा लागला. आता संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्स‍िजनबाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे महाराष्ट्र हे देशातील ऑक्स‍िजन बाबतीत स्वयंपूर्ण होणारे पहिले राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

            मीरा-भाईंदर येथील ऑक्स‍िजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक आदी उपस्थित होते.

            मीरा-भाईंदर महानगरपालिकेने विविध लोकोपयोगी विकासकामे केलेली आहेत, यामध्ये जलतरण तलाव तसेच नाट्यगृह यांचे काम प्रगतिपथावर आहे. मीरा-भाईंदर भागांमध्ये कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आमदार प्रताप सरनाईक यांच्या कामाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करण्यात आली आहेत आणि भविष्यामध्ये केली जाणार आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

            कोरोना काळामध्ये सर्वात प्रथम ठाणे जिल्ह्याने ऑक्स‍िजन प्रकल्प उभारला होता यामुळे ठाणे जिल्ह्याने ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण झालेला पहिला जिल्हा होण्याचा मान मिळविला आहे.

            मागील लाटेचा अनुभव पाहता संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्स‍िजनपासून वंचित राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

            कोरोनामुक्त गाव ही संकल्पना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपले गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर महाराष्ट्र नक्कीच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

००००

 अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठीत करणार

- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

 

            मुंबई, दि. 10 : राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी उपाययोजना सुचविण्यात याव्यात यासाठी तज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात यावीअसे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी प्रा.वर्षा गायकवाड बोलत होत्या.

             यावेळी वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेखशालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा,सहसचिव इम्तियाज काझीआमदार डॉ. वजाहत मिर्झामाजी मंत्री नसीम खानमाजी आमदार एमएम शेखअंजुमन इस्लामचे अध्यक्ष जहीर काझीउर्दु शिक्षक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शेख नजीरोद्दीन आदीसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्याअल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर विद्यार्थ्याची जातधर्मयासोबतच अल्पसंख्याक असल्याचा उल्लेख असावा अशा आशयाचे पत्र अल्पसंख्याक विभागाला देण्यात येईल. अल्पसंख्याक शाळांमधील रिक्त पदांच्या प्रलंबित असलेल्या भरतीला  भरतीबंदीच्या निर्णयातून वगळण्यात यावे यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल. प्रत्येक महसूली विभागात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा असावी अशी मागणी असून याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर केल्यास शालेय शिक्षण विभागातर्फे यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही प्रा. गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

            अनुदानशिक्षक भरती, शिक्षणाचा अधिकार अधिनियमातील तरतुदीयासह अल्पसंख्याक शाळांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत मुंबईमराठवाडापुणेविदर्भ या विभागातून अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या समस्या प्रा. गायकवाड यांनी जाणून घेतल्या.

0000

 भविष्य निर्वाह निधी वार्षिक

विवरण पत्र सेवार्थ प्रणालीवर

 

           मुंबईदि. 10 :   विदर्भ व मराठवाडा विभागातील शासकीय वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे  वर्ष 2020-21 या वित्तीय वर्षाचे भविष्य निर्वाह निधी वार्षिक विवरण पत्र मुख्य महालेखाकार- 2 नागपूर कार्यालयाच्या  <https://agmaha.cag.gov.in/GPFNagv1.aspह्या लिंकवर अपलोड करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी आपले वार्षिक विवरणपत्र फक्त सेवार्थ पोर्टलमध्ये पाहण्यासाठी अथवा डाऊनलोड व प्रिन्ट काढण्यासाठी https://sevarth.mahakosh.gov.in/login.isp या लिंकवर उपलब्ध मार्गदर्शिका पुस्तिकेत पाहू शकतील.       

            शासनाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक उपलब्ध असल्यास कर्मचाऱ्यांना त्यांच्या जमा निधीची तसेच त्यांना दिलेल्या अग्रिम राशीची रक्कम एसएमएसद्वारे संदेश पाठवून कळविता येईल. ज्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक अद्यापही नोंदणीकृत झाला नसेल त्यांनी आपला मोबाईल क्रमांक fm.mh2.ae@cag.gov.in या ईमेल पत्त्यावर  किंवा 09423441755  या  मोबाईल  क्रमांकावर संदेश (एस.एम.एस.) पाठवून नोंदणी करुन घ्यावा.

            सर्व कर्मचाऱ्यांनी आपले नावजन्म तारीखभविष्य निर्वाह निधी विवरणपत्र सेवार्थ प्रणालीमध्ये तपासून घ्यावे. तफावत असल्यास सेवार्थ प्रणालीमध्ये सुधारित करुन आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून दुरुस्ती करुन घ्यावी. महालेखाकार कार्यालयाच्या अभिलेख्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ-आयडी सह gpftakrarngp@gmail.comवर ईमेल पाठवावा किंवा 0712-2560484या फॅक्सवर सूचित करावे.

            कर्मचारी महालेखाकार कार्यालयाच्या <https:/agmaha.cag.gov.in/या लिंकवर नोंदणीकृत करुन भविष्य निर्वाह निधी लेख्याची सद्य:स्थिती पाहू शकतील. भविष्य निर्वाह निधी अनुसूचिमध्ये अभिदात्याचे लेखा क्रमांकविभागाशी संबंधित सिरीज व पूर्ण नाव असल्याची कर्मचाऱ्यांनी खात्री करावी. मासिक अधिदानाची राशी  किंवा घेतलेल्या अग्रिमची भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झाली नसल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत कोषागार प्रमाणक  व दिनांकअनुसूचित प्रमाणकाची राशीअनुसूचिबरोबर पाठवावी. जेणेकरुन नोंद न झालेले  क्रेडिट व  अग्रिमाची लेख्यामध्ये नोंद घेतली जाईल व सेवा निवृत्तीच्यावेळी भविष्य निर्वाह निधीची राशी प्राधिकृत करताना होणारा विलंब टाळता येईलअसे वरिष्ठ लेखाधिकारीमहालेखाकार-2  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000


 प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या धर्तीवर केसरी शिधापत्रिका धारकांना राज्य सरकारकडून एका वर्षांपर्यंतचे धान्य देण्यास मंत्री छगन भुजबळ याचा नकार; आ. अतुल भातखळकर यांनी केली होती मागणी.”


मुंबई, दि. १० ऑगस्ट (प्रतिनिधी)

कोरोनामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली असल्यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा स्वतः धान्य विकत घेऊन केसरी शिधापत्रिका धारकांना एका वर्षांपर्यंतचे गहू-तांदूळ मोफत किंवा माफक दरात देण्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नकार दिला आहे, यातून राज्यातील गरीब जनतेच्या हालअपेष्टेशी काहीही देणंघेणं नसलेल्या व केवळ वसुलीत स्वारस्य मानणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची गरीबविरोधी मानसिकता पुन्हा एकदा सिद्ध झाली असल्याची टीका भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.

राज्यातील शिधापत्रिका व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंमलबजावणी मधील अनियमितते संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारलेल्या तारांकित प्रश्नांच्या वेळी आ. भातखळकर यांनी बैठक घेण्याच्या केलेल्या मागणीनुसार आज बैठक आयोजित केली होती. यावेळी आ. भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारकडून राज्यातील १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये ३ वर्षांसाठी मोफत धान्य वाटप करण्यात आले होते हि मंत्री छगन भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किमान एक वर्षी तरी केसरी शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच, कोरोनाच्या काळात गावी गेलेल्या किंवा रास्त धान्य दुकानातून धान्य न घेतल्यामुळे राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या प्राधान्यक्रमातुन वगळण्यात आलेल्या राज्यातील केशरी शिधापत्रिका धारकांना पुन्हा एकदा प्राधान्यक्रमात घेऊन मोफत धान्य देण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच, राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून भेसळयुक्त धान्य वाटप केले जात असल्याची बाब छगन भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिली, त्याला छगन भुजबळ यांनी होकार देत अनेक स्वस्त धान्य दुकानांमधून भेसळयुक्त धान्य वाटप केले जात असल्याचे मान्य केले व या दोन्ही विषयात तात्काळ कारवाई करू असे आश्वासन सुद्धा छगन भुजबळ यांनी दिले.

तसेच, अंत्योदय योजनेत असलेले कुटुंब विभक्त झाल्यानंतर त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात येत नसल्यामुळे राज्य सरकारने धोरणात्मक बदल करत अंत्योदय योजनेतील विभक्त शिधापत्रिकाधारकास किमान सहा महिन्यापर्यंत अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा व तो आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याचे सिद्ध करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा अवधी द्यावा अशी आग्रही सुद्धा आ. भातखळकर यांनी यावेळी केली.

भेसळयुक्त धान्य वाटप करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई न केल्यास व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या प्राधान्यक्रमातुन वगळण्यात आलेल्या केशरी शिधापत्रिका धारकांना पुढील 7 दिवसाच्या आत पुन्हा एकदा प्राधान्यक्रमात टाकण्याचे आदेश न दिल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी दिला.

 इतर मागास वर्गाचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

·       महाज्योतीवसतिगृहशिष्यवृत्तीसाठी प्राधान्याने निधी

·       ओबीसी जनमोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 

          मुंबईदि. 10 : इतर मागासवर्ग समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी राज्यशासन वचनबद्ध आहेअसे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीत संबंधित सचिवांनी तात्काळ कार्यवाही करूनअहवाल देण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडील इम्पेरिकल डाटा राज्याला द्यावा अशी आग्रही मागणी केल्याचेही सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे ओबीसी जनमोर्चाच्या वतीने माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळइतर मागासबहूजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवारउद्योगमंत्री सुभाष देसाईमुख्य सचिव सीताराम कुंटेवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक तसेच ग्रामविकास आणि सामान्य प्रशासन विभागाचे सचिव उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले कीमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळशामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्यासाठी आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रमाने निधी दिला जाईल. महाज्योती संस्थेची उपकेंद्रे राज्यातील विभागीय ठिकाणी सुरू करणेमहाज्योतीला स्वतंत्र कर्मचारी-अधिकारी नेमणे संदर्भात त्वरीत कार्यवाही करावीअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            या शिष्टमंडळाने राज्याची तमिळनाडू आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावीअशी मागणी केली. यासंदर्भात मंत्री श्री. भुजबळ यांनी इम्पेरिकल डाटाची मागणी केंद्राकडे करण्यात आली असूनसध्या सुरु असलेल्या संसद अधिवेशनाच्या माध्यमातून देखील या प्रश्नी राज्याची बाजू मांडण्यात येत आहे. तसेच आयोगाच्या माध्यमातून देखील आकडेवारी उपलब्ध करून देण्याचा पर्याय असल्याचे सांगितले.

            बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणालेओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला असूनलवकरच ती सुरु होतील.

            भटक्या आणि विमुक्त जातीचे पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावेतसेच ३१ ऑगस्टला विमुक्त दिन साजरा करण्यात यावाअशी मागणी लक्ष्मण गायकवाड यांनी केली. या मागणीवर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

            बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षणओबीसींना शैक्षणिक शुल्क व शिष्यवृत्तीजातपडताळणीतील बोगस दाखलेतांडा-वस्ती सुधार समिती या अनुषंगानेही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी संबंधित सचिवांनी यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावीअशा सूचना दिल्या.

            शिष्टमंडळात चंद्रकांत बावकरज्ञानेश्वर गोरेजे. डी. तांडेललक्ष्मण गायकवाडहरिभाऊ शेळकेगणेश हाकेअँड. पल्लवी रेणके आदींचा समावेश होता.

  का अमृत महोत्सवाचे उद्घाटन

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रंथालये ऑनलाईन करावीत

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

 

            मुंबई, दि. 9 : राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात जवळपास 12 लाख पुस्तके आहेत. ही ग्रंथसंपदा जतन करण्याबरोबरच भावी पिढीला सहज उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जगभरातील विद्यार्थ्यांना ग्रंथालये ऑनलाईन उपलब्ध करुन द्यावे. यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.  

            उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि राज्य मध्यावर्ती ग्रंथालयाच्यावतीने राज्य मध्यावर्ती ग्रंथालय येथे आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालो, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव प्रताप लुबाळ, ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, ग्रंथपाल संजय बनसोड, संबंधित अधिकारी, वाचक उपस्थित होते.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, इतिहासाची माहिती भावी पिढीला उपलब्ध व्हावी यासाठी ग्रंथालय सक्षम असली पाहिजेत. ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करुन तरुण पिढीला इतिहासाची माहिती उपलब्ध करुन द्यावी. त्याच बरोबर या ग्रंथालयामध्ये संशोधन केंद्रही सुरु करावे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) परीक्षेची तयारी करण्यासाठी शासनस्तरावर विविध माध्यमातून  प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ग्रंथालयांनी फिरते ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रंथसंपदा ग्रामपंचायत पातळीपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. शासकीय ग्रंथालयामध्ये ग्रंथ विक्रीसाठीही परवानगी देण्यात येणार आहे, असे ही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

            सचिव इंद्रा मालो म्हणाल्या, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त ग्रंथालय संचालनालयातर्फे  'आजादी का अमृत महोत्सवहा महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उपक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवावा.

            जिल्हाधिकारी राजीव निवतकर म्हणाले, करो या मरो’ ही घोषणा देत महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची सुरूवात केली. भारत छोडो चळवळीची ही इमारत साक्षीदार आहे. आपल्या देशातील स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्य चळवळीचे आपल्या मनामध्ये असलेले प्रतिबिंब कायम राहावे म्हणून 'आजादी का अमृत महोत्सवहा उपक्रम साजरा करण्यात येत आहे.

            ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले म्हणाल्या, देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण करत आहे. महात्मा गांधीनी केलेल्या ‘दांडी यात्रा’ या स्वातंत्र चळवळीतील आंदोलनाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून साबरमती आश्रमापासून 'आजादी का अमृत महोत्सवया महोत्सवाचा शुभारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाचे सांस्कृतिक मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय, राज्यातील शासकीय आणि शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून दि. 9 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीत विविध कार्यक्रम व उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. त्याचा आरंभ व उद्द्याटन सोहळा दि. 9 ऑगस्ट या ऐतिहासिक क्रांती दिनी महाराष्ट्र राज्याचे शिखर ग्रंथालय असलेले राज्य मध्यावर्ती ग्रंथालयापासून होत आहे, अशी माहिती श्रीमती इंगोले यांनी दिली.

            यावेळी याठिकाणी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकीय, भौगोलिक, इतिहास, विज्ञान भरारी, भारतातील कला, क्रीडा, व साहित्यामधील मानकरी, भारताचे राजकीय अस्तित्व,  कृषीप्रधान भारत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, भारतीय आधुनिक स्त्री, उतुंग भरारी अशा विविध ग्रंथाचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाची मान्यवरांनी पाहाणी केली.

0000


Featured post

Lakshvedhi