Monday, 16 June 2025

शाळा प्रवेशोत्सव 2025; पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत

 शाळा प्रवेशोत्सव 2025;

पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत

 

मुंबईदि.15 - राज्यात विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये सोमवार 16 जून, 2025 रोजी शाळा सुरू होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक  शाळा दुर्वेसतालुकाजिल्हा पालघर या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेतअशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

         तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनपा शाळा क्रमांक 23किसन नगरठाणे तसेच शिवडी वडाळा इस्टेट मनपा शाळाआंध्रा हायस्कूल जवळवडाळा या शाळेत उपस्थित राहतील तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडीतालुका बारामतीजिल्हा पुणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडीतालुका पाटोदाजिल्हा बीड येथे भेट देतील.

           शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळातुंगण दिगर तालुका बागलाणजिल्हा नाशिक येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करंजीता. जि. वर्धा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेतअशी माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi