Saturday, 31 August 2024

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम” जाहीर

 विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि. 30 : राज्यातील आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवरभारत निवडणूक आयोगाकडून राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 (दुसरा) कार्यक्रम दि.25.06.2024 ते दि.30.08.2024 या कालावधीत राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार आज दि.30.08.2024 रोजी राज्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्येतसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 (दुसरा) अतंर्गत दि.06.08.2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच प्रारुप याद्यांसाठी दि.06.08.2024 ते दि.30.08.2024 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात आल्या. दि.06.08.2024 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये एकूण मतदार 9 कोटी 36 लाख 75 हजार 934 होती. आता या उपक्रमानंतर प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम मतदार याद्यांनुसार राज्यात एकूण मतदार 9 कोटी 53 लाख 74 हजार 302 एवढे झालेले आहेत. प्रारुप मतदार यादीपेक्षा अंतिम मतदार यादीमध्ये 16 लाख 98 हजार 368 मतदारांची संख्या वाढलेली आहे.

प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने अंतिम मतदार यादीतील मतदारांमधील बदलाचा तपशिल  पुढील तक्त्यात दर्शविल्यानुसार आहे:-

अ.क्र.

बाब

पुरुष मतदार

स्त्री मतदार

तृतीयपंथी

एकूण

1.

दि.06.08.2024 रोजी प्रसिध्द झालेली प्रारुप मतदार यादी

4,86,53,088

4,50,17,066

5,780

9,36,75,934

2.

स्वीकारलेले एकूण दावे  

8,80,656

11,97,240

185

20,78,081

3.

स्वीकारलेल्या एकूण हरकती

1,99,748

1,79,944

21

3,79,713

4.

दि.30.08.2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी

4,93,33,996

4,60,34,362

5,944

9,53,74,302

5.

प्रारुप मतदार यादीवर मतदारांमधील निव्वळ बदल

6,80,908

10,17,296

164

16,98,368

 

या कार्यक्रमादरम्यान दि.10, 11 व 17, 18 ऑगस्ट, 2024 या तारखांना मतदार नोंदणीसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर युवक, महिला, दिव्यांग यांच्याकरिता विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती.

त्याचप्रमाणे राज्यातील विविध सामाजिक संस्थामहाविद्यालये यांच्या सहकार्याने राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरामुळे अंतिम मतदार यादीमध्ये नवीन युवक मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. प्रारुप मतदार यादीच्या तुलनेमध्ये अंतिम मतदार यादीमधील नवीन मतदारांमध्ये झालेली वाढ पुढीलप्रमाणे आहे. :-

वयोमर्यादा

दि.06.08.2024 रोजीची प्रारुप मतदार यादी.

दि.30.08.2024 रोजीची अंतीम मतदार यादी.

निव्वळ वाढ

18 - 19

14,99,405

18,67,170

3,67,765

20 - 29

1,74,29,276

1,81,84,847

7,55,571

दि. 06.08.2024 रोजीच्या प्रारुप मतदार यादीमध्ये दिव्यांग मतदारांची संख्या 6,06,505 एवढी होती. आता दि.30.08.2024 रोजीच्या अंतीम मतदार यादीनुसार दिव्यांग मतदारांची नोंदणी 6,28,063 इतकी झालेली आहे. त्यानुसार अंतीम मतदार यादीमध्ये दिव्यांग मतदारामध्ये 21,558 इतक्या संख्येने वाढ झालेली आहे.

महिला बचत गटअंगणवाडी सेविकागृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर 925 वरून 933 इतके वाढलेले आहे. या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकतीच्या कालावधीमध्ये नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांनानोदींमध्ये दुरुस्ती केलेल्या मतदारांना मतदान छायाचित्र ओळखपत्र देण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. या कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी जरी प्रसिद्ध करण्यात आलेली असलीतरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 मध्ये नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधी 10 दिवसांपर्यंत नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. 

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अंतिम मतदार यादीमध्ये नागरिकांनी आपली नावे तपासून घ्यावीत व अद्ययावत करावीत. ज्यांची नावे यादीत नाहीत त्यांनी अर्ज सादर करून नाव नोंदणी करावी. मतदारांनी आपले नाव जुन्या मतदान केंद्रात नसेलतर नजिकच्या मतदार केंद्रात असल्याची खात्री करून घ्यावी किंवा व्होटर हेल्प लाईन ॲपवर जाऊन मतदान केंद्राचा पर्याय निवडावा व आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

००००

शालेय शिक्षण विभागांतर्गत बदल्यांसाठी मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पैसे घेण्याची बातमी तथ्यहीन शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाचा खुलासा

 शालेय शिक्षण विभागांतर्गत बदल्यांसाठी

मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पैसे घेण्याची बातमी तथ्यहीन

शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाचा खुलासा

 

मुंबईदि. 30 : शालेय शिक्षण विभागामध्ये 2024 मध्ये कोणाची बदली करण्याचा प्रश्नच नव्हता. बदल्याच होणार नसल्याने त्यासाठी पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच यापूर्वीही बदल्या होताना त्यासाठीही कधीही पैसे घेतले जात नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रेट कार्ड जाहीर केले असल्याच्या आशयाची बातमी एका डिजिटल माध्यमामध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे, बदल्याच होणार नसल्याने या बातमीत कोणतेही तथ्य नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सन 2024 मधील नियमित बदल्या करण्यासंदर्भात राज्य शासनाने आदेश दिलेले नव्हते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागांतर्गत बदल्या होणार नाहीतअसे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. तसेच बदल्यांचे  कोणतेही प्रस्ताव सादर करू नये असे निर्देश विभागाच्या प्रधान सचिव यांना एक महिन्यापूर्वीच शालेय शिक्षण मंत्री यांनी दिले होते.

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे यावर्षी राज्य शासनाने नियमित बदल्या केल्या नाहीत. नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 30 ऑगस्ट पर्यंत बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतच्या वटहुकूमाची अधिसूचना दि. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राप्त झाली. त्यानुसार बदल्यांची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे . बदल्याच करावयाच्या नसल्याने शालेय शिक्षण विभागाने नागरी सेवा मंडळाची कोणतीही बैठक आयोजित केलेली नाही. तथापि शालेय शिक्षण विभागांतर्गत बदल्या होणार नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी यापूर्वीच जाहीर केल्याने बदल्या करण्याचा किंवा त्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांनी पैसे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीअसे मंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. बदल्यांची कार्यपद्धती असते त्यानुसार बदल्यांचा प्रस्ताव आयुक्तांकडून विभागाच्या प्रधान सचिवांकडे यावा लागतो. त्यानंतर प्रस्तावाची छाननी होऊन त्यावर नागरी सेवा मंडळाची बैठक होते त्यानंतर नागरी सेवा मंडळाच्या शिफारसीने प्रस्ताव विभागाच्या मंत्री यांना सादर करण्यात येतो. तथापि शालेय शिक्षण विभागातील बदल्या करायच्या नाहीत असा निर्णय यापूर्वी झाल्याने आयुक्तांनी तसा प्रस्ताव शासनास पाठवला नाही. त्यामुळे बदल्यांचा प्रस्तावच आला नसल्याने त्यावर कार्यवाही करण्याचा प्रश्न नव्हता. प्रस्तावच मंत्रालयात आला नसल्याने बदलीसाठी कोणी मंत्रालयात येण्याचा व पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Friday, 30 August 2024

Goa Sets High Benchmarks for Regenerative and Sustainable Tourism at the Western & Central States/Union Territories Tourism Ministers Conference

 Goa Sets High Benchmarks for Regenerative and Sustainable Tourism at the Western & Central States/Union Territories Tourism Ministers Conference

 

Goa, 30th August 2024 – The Department of Tourism, Goa, had the privilege of participating in the Western & Central States/Union Territories Tourism Ministers Conference orgamised by the Ministry of Tourism, Government of India at Taj Cidade Goa Horizon. This high-level meeting brought together Hon'ble Union Tourism Minister, GOI, Shri. Gajendra Singh Shekhawat, Hon'ble Union Minister for the State for Tourism, GOI, Shri. Suresh Gopi, Union Tourism Secretary, GOI, Smt. V. Vidyavathi, Hon'ble Deputy Chief Minister and Tourism Minister, Rajasthan, Smt. Diya Kumari, Hon'ble Tourism Minister, Madhya Pradesh, Shri. Dharmendra Bhav Singh Lodhi, Hon'ble Tourism Minister, Chattisgarh, Shri. Kedar Kashyap, along with other officials from across states and union territories to discuss collaborative strategies for advancing tourism across the region.

 

The Hon'ble Minister of Tourism, Shri. Rohan A. Khaunte, along with the Director of Tourism, Shri. Suneel Anchipaka, IAS, represented the state at this significant gathering. In his keynote address, Tourism Minister Khaunte outlined his visionary roadmap for positioning Goa as a leader in sustainable and regenerative tourism, while fostering collaboration to enhance the national tourism landscape. He also presented a video that introduced the delegation to Real Goa.

 

Hon'ble Union Tourism Minister, GOI, Shri. Gajendra Singh Shekhawat, emphasized the pivotal role of tourism and significant growth in the industry stating, “We must strive to enrich our tourism landscape through new avenues such as local cuisine, immersive walking and pilgrimage trails, and unique experiential tourism. By embracing these elements and learning from each other’s strengths and practices, we can further elevate our tourism industry and foster a more connected, vibrant global community.”

 

Hon'ble Union Minister for the State for Tourism, GOI, Shri. Suresh Gopi also expressed his views during the conference. Additionally, Ministers and Secretaries/Directors from other states delivered presentations on tourism in their respective regions.

 

Championing Sustainable and Regenerative Tourism, Goa is set to become a model for sustainable and regenerative tourism in India. Tourism Minister Khaunte emphasized the state's commitment to green tourism practices, cultural preservation, and community-driven initiatives that benefit both tourists and locals. He noted that the recent G20 discussions have further guided the state in crafting a sustainable roadmap for the future.

 

Moving beyond its reputation as a beach destination, Goa aims to offer a wider range of experiences — from luxury stays and wellness retreats to adventure activities, cultural tourism, and hinterland exploration. The introduction of future projects like the Lord Parashuram Monument and the Chhatrapati Shivaji Maharaj Digital Museum reflects Goa’s efforts to promote non-beach tourism, making it a year-round destination.

 

Goa’s vision includes strengthening ties with other states and union territories to create a cohesive tourism strategy. By sharing best practices, resources, and data, the aim is to elevate India’s overall tourism experience and position the country as a global leader in diverse tourism offerings. The Minister discussed new initiatives, including projects like a 5-star wedding destination hotel and the management of iconic sites such as Fort Aguada. These initiatives aim to attract investment, boost innovation, and enhance the quality of tourism infrastructure in Goa.

 

Highlighting Goa's recent accolades, the Minister emphasized that Goa has altogether won over 12 prestigious awards in the past two years, including the Today’s Traveller Awards, PATWA Award, Most Innovative Product Award for Regenerative Tourism, ET Travel Awards, and the National Tourism Award. These achievements underscore Goa's status as a premier destination for varied tourism experiences.

 

Goa is setting high standards for tourism development, with a commitment to continuous innovation and quality enhancement. The Minister introduced future attractions, such as a 3D video showcasing Goa’s unique Lord Parashuram Iconic Monument (structured as a bow and arrow) and the Chhatrapati Shivaji Maharaj Digital Museum, along with plans for a World Class Oceanarium as a new anchor for adventure tourism.

 

The Department of Tourism, Goa, reaffirmed its dedication to promoting a collaborative approach with other states and union territories, enhancing the overall tourism experience in India while advocating for sustainable practices. Goa will continue to participate actively in national and international tourism forums, expand its market presence, and forge innovative partnerships that ensure growth, safety, and security for all visitors.

 

Issued by

The Department of Tourism, Government of Goa


विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त कार्यक्रमासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

 विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त कार्यक्रमासाठी

 सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 

मुंबईदि.२९ :- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त मंगळवार३ सप्टेंबर २०२४ रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती सभागृहविधान भवनमुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावेअशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीबाबत आढावा बैठक विधानभवन येथे आज घेतली.

कार्यक्रमस्थळी बैठक व्यवस्थाविधान भवन परिसरातील स्वच्छतानिवासस्वागतवैद्यकीय पथकसुरक्षा पासेसवाहन पार्किंगप्रसिद्धी व्यवस्था आदींचे नियोजन विभागांकडून जाणून घेतले. विधान भवन परिसरात सर्व आरोग्य सुविधांनी युक्त रुग्णवाहिकामोबाईल टॉयलेट्स ची व्यवस्था करण्यात यावीतसेच  प्रत्येक पथकाने आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पडण्याच्या सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केल्या. पाऊस आणि ऊन यांच्या बचावासाठी विधान भवन प्रवेशद्वारा जवळ उपाययोजना करण्यात यावी. कार्यक्रम योग्य प्रकारे पार पडण्यासाठी संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळेमुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.अभिनव देशमुख,पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढेपोलीस उपायुक्त दत्ता कांबळेउपसचिव हेमंत डांगेजे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळेआरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सरिता हजारे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकाआपत्ती व्यवस्थापनहवामान शास्त्रपोलीससार्वजनिक बांधकाम,आरोग्यराजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त ३ सप्टेंबर रोजी ग्रंथाचे प्रकाशन "उत्कृष्ट संसदपटू" आणि "उत्कृष्ट भाषण" पुरस्कारांचे वितरण ­­­'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' ग्रंथाचे प्रकाशन

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त ३ सप्टेंबर रोजी ग्रंथाचे प्रकाशन

"उत्कृष्ट संसदपटू" आणि "उत्कृष्ट भाषण" पुरस्कारांचे वितरण

­­­'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' ग्रंथाचे प्रकाशन

 

 मुंबईदि. २९ :- महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळमहाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधानपरिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांतील सन २०१९ ते २०२४ या कालावधीतील 'उत्कृष्ट संसदपटू' आणि 'उत्कृष्ट भाषण' पुरस्कारप्राप्त सदस्यांना मंगळवार३ सप्टेंबर२०२४ रोजी  राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त होणाऱ्या या विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व' या ग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहेअशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या  उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली.

 राष्ट्रकुल संसदीय मंडळमहाराष्ट्र शाखा ही देशातील राज्य विधानमंडळांमध्ये स्थापन झालेली (सन १९५२) सर्वात पहिली शाखा आहे. संसदीय लोकशाहीच्या संदर्भात सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रम राष्ट्रकुल संसदीय मंडळमहाराष्ट्र शाखेतर्फे सातत्याने राबविण्यात येतात. सन १९९५ पासून दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना प्रत्येक वर्षासाठी "उत्कृष्ट संसदपटू" आणि "उत्कृष्ट भाषण" पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून पुरस्कारप्राप्त सदस्यांना दि.३ सप्टेंबर२०२४ रोजीच्या समारंभात गौरविण्यात येईल.

या समारंभास राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि  अजित पवारसंसदीय कार्य मंत्री  चंद्रकांत पाटीलविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळदोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि  विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या गौरवशाली परंपरेतील या संस्मरणीय आणि ऐतिहासिक सोहळ्यासाठी दोन्ही सभागृहांचे विद्यमान सदस्यविधानपरिषदेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्रातील संसद सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावेअसे आवाहनही पीठासीन अधिकारी यांनी केले.

प्रवासी सुविधांनीयुक्त नवीन सातारा बस स्थानकाची निर्मिती करावी

 प्रवासी सुविधांनीयुक्त नवीन सातारा बस स्थानकाची निर्मिती करावी

-उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

 

मुंबईदि. २९ : सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची वास्तू जुनी झाली असून येथील प्रवासी सुविधांवरही मर्यादा येत आहेत. सातारा शहरातील बस स्थानकाची वास्तू पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानकाची निर्मिती करावी. यामध्ये प्रवासी सुविधांना अधिक प्राधान्य देण्यात यावेअसे निर्देश  उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

 मंत्रालयीन दालनात आज सातारा बसस्थानक दुरूस्ती व सुशोभीकरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरमहामंडळाचे महाव्यवस्थापक (बांधकाम) दिनेश महाजन उपस्थित होते.

सातारा येथील संपूर्ण बसस्थानकाचा कायापालट करण्याचे निर्देश देताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई म्हणाले कीबस स्थानक निर्मितीचा प्रस्ताव सादर करावा. बस स्थानकाचा चांगला आरखडा अंतिम करावा. बस स्थानकामध्ये प्रवासी सुविधांना प्राधान्य देण्यात यावे. बांधकाम एकाच टप्प्यात शक्य नसल्यास दोन टप्प्यात करावे. बस स्थानकाचा दर्शनी भाग आकर्षक करून प्लॅटफॉर्मची संख्या वाढविण्यात यावीप्रवाशांसाठी स्वच्छतागृहचालकवाहक यांच्यासाठी निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्यात यावी. पाटण येथील बस स्थानकाचे काम पूर्ण करावे. बस स्थानकावर चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करण्यात यावी. सातारा जिल्ह्यातील मरळीहिरवडी व तराळी बस स्थानकांची कामेही गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत तातडीने प्रस्ताव तयार करावा

 दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत तातडीने प्रस्ताव तयार करावा

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

   मुंबईदि.29 :  दिव्यांग बांधवांसाठी  स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावाअशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  दिल्या.

मंत्रालयात दिव्यांग बांधवांसाठी  स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला आमदार बच्चू कडूउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणालेया विद्यापीठाच्या माध्यमातून  दिव्यांग विद्यार्थ्यांना  उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतीलआणि त्यामुळे त्यांच्या कौशल्यांचा विकास होईलविद्यापीठाचा प्रस्ताव तयार करताना या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठ्यक्रमांसोबतच विशेष प्रशिक्षण कार्यक्रमसंशोधन आणि इतर उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल असा प्रस्ताव तयार करावा. प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. 

या निर्णयामुळे दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच गती मिळेल असेही मंत्री  श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi