Friday, 29 September 2023

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

                                                                                सुमंत भ

            मुंबई, दि.२९ : राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबविण्यात यावेत तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषद यांनी व्यापक प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करावे,असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले आहेत.


            राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर २०२३ हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे. या दिवशी सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र, परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सचिव श्री. भांगे यांनी सांगितले आहे. 


 

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील विद्यार्थी व लोकसहभागातून गड -किल्ले आणि परिसर स्वच्छता मोहीम

 राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील विद्यार्थी व लोकसहभागातून गड -किल्ले आणि परिसर स्वच्छता मोहीम .                                                    मंत्री मंगल प्रभात लोढा


 


१ ऑक्टोबर रोजी परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर रोजी गड-किल्ले परिसर स्वच्छता अभियान


 


            मुंबई,दि. 29 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे १ ऑक्टोबर रोजी नजिकचा परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर रोजी राज्यातील गड -किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.


            मंत्री श्री लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात १ ऑक्टोबर रोजी 'स्वच्छतेसाठी एक तारीख -एक तास उपक्रम' राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने राज्यात कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय.) यांच्या माध्यमातून आणि स्थानिक लोकप्रतिनिधी,सामाजिक संस्था,दुर्गप्रेमी यांच्या सहभागातून १ ऑक्टोबर रोजी परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर रोजी गड-किल्ले परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानात सहभागी होण्यासाठी जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाशी (आयटीआय) संपर्क साधावा.


            आपला परिसर आणि आपल्या इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले स्वच्छ आणि सुंदर ठेवले गेले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 व्या वर्षानिमित्त कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील विद्यार्थ्यांद्वारे शिवरायांना एक अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम आखण्यात आली आहे. स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्रासाठी राज्यात १ ऑक्टोबर ते 15 डिसेंबर पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कौशल्य विकास विभागाच्या या स्वच्छता विषयक उपक्रमांसाठी सर्वांनी सहभागी होऊन व हे अभियान यशस्वी करूया असे आवाहन ही मंत्री श्री.लोढा यांनी केले आहे.


 


            व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी म्हणाले, राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. स्थानिक आय.टी.आय.आपल्या नजीकच्या गड किल्ल्यावर व परिसर स्वच्छता मोहीम स्थानिक नियोजनानुसार स्वच्छता मोहिमेचा उपक्रम राबविणार आहे.


 

गौरी पुजन, आगरी पद्धतीने शिरकी गाव पेन रायगड


 Nilakshi Patil Patil❤️🥰❤️: सर्व गाण्यांचे संकल्पना - स्मिता गावंड. लेखिका - स्मिता गावंड. मुख्य गायिका - सुनंदा गावंड. सह गायिका - स्मिता गावंड, मनीषा गावंड, निता पाटील, रुपाली पाटील, निलाक्षी पाटील. वाद्य वाजंत्री (ढोल) - पार्थ गावNilakshi Patil Patil❤️🥰❤️: Hech

आज बाप्पा भिजू नये महणून निरागस मुलांनी काय केलं *🌹🙏 गणपती बाप्पा मोरया.. 🙏🌹*


 

माणसाला समज हवी"*

 " *माणसाला समज हवी"* 


 *मित्रांनो नमस्कार,* 


कोणताही माणूस मुळात तो वाईट नसतो. वाईट असतात ते त्याचे "विचार" आणि केवळ या विचारातूनच तो वाईट प्रवृत्तीचा बनतो. या वाईट प्रवृत्ती कशा हाताळायच्या याचेही एक शास्त्र असतं आणि ते शास्त्र म्हणजे माणसाला असणारी 'समज'. माणसाला योग्य वयात योग्य 'समज' यायला लागते म्हणतात, आणि ती समज एकदा का आली की माणसांमधील वाईट प्रवृत्ती नायनाट होण्यास मदत होते. परंतु सगळ्यांमध्येच असं होतं असेही नाही. मानव संसाधन विभागात असल्यामुळे मी आजवर अनेक लोकांना भेटलो व लोकांशी संबंध आला. परंतु सर्वांमध्ये हीच तफावत जाणून येते. वयानुसार याच्यामध्ये फरक पडतो आपण म्हणतो, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून वयानुसार व्यक्तीला समज येथे असे नाही. एखाद्या व्यक्तीला कमी वयामध्ये खूप चांगली समज येते. आणि एखाद्या व्यक्तीला वयोवृद्ध झाल्यानंतर ही समज येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बालपणापासून आपण स्वतःहून किती गोष्टी समजून व स्पष्ट करून घेतल्या. ही विचाराची स्पष्टता ज्यांना ज्या वयामध्ये झाली, अशा सर्व व्यक्तींना समज ही वेगवेगळ्या प्रसंगामधून व वेगवेगळ्या वयामध्ये आली असे दिसते. आपले विचार प्रगल्भ झाले की, आपल्यामध्ये "प्रगल्भता" येते. आपण ठरवलेल्या दिशांनी जात असताना अचानकपणे रस्ता चुकतो आणि रस्ता चुकलोय हे आपल्याला डोळ्यांनी दिसतो. म्हणून आपण लगेच जागृत अवस्थेत येतो आणि योग्य रस्ता धरतो. तसं विचाराच्या बाबतीत होत नाही. बोलत-बोलत व शब्दा- शब्दातून आपण कोणत्यातरी वेगळ्या दिशेला मार्गक्रमण करतो आणि त्याच्यातून निर्माण होतात ते गैरसमज आणि मतभेद. समज चांगली येण्यासाठी आपल्या मनामध्ये स्पष्ट विचार असायला हवेत. स्पष्ट विचार कोणताही गोंधळ व गैरसमज निर्माण होऊ देत नाहीत. 


खऱ्या अर्थाने ज्यावेळेस व्यक्ती ऐकून घेण्याचे, संयम बाळगण्याचे व समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये तन-मन लावून असतो, तेव्हा त्याच्या मधून येणारा परिणाम हा, निश्चितच समजूतदारपणाचा असतो आणि हाच समजूतदारपणा आपल्याला 'समज' नावाची देणगी आयुष्यभरासाठी देऊन जातो. 


"समज" ही जीवनाचा पाया आहे आणि "समज" असणे आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेचे आहे. "समज" कमी असेल तर आयुष्य हे ताण-तणावाचे व गुंतागुंतीचे होऊन जाते. समोरच्याने हे मुद्दामून माझ्यासाठी केलेला आहे. माझ्यावर तू जळतो आहे. माझी प्रगती झालेली त्यांना आवडत नाही. मी त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे. अशा काही गोष्टींचा त्रास आपण स्वतःला करून घेतो आणि होतो सुद्धा. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्यामध्ये असणारा "समजूतदारपणा" हा खूप कमी व नकारात्मक आहे. याचे परिणाम ही अत्यंत गंभीर स्वरूपाचे आपल्या जीवनावरती आघात करून जातात. म्हणून नेहमी कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःमध्ये "सकारात्मक समाज" निर्माण करणे, आपण केलेल्या विचारावरती परत विश्लेषणात्मक विचार करणे, जेणेकरून आपल्या मधल्या समजूतदारपणाचं "दर्शन" आपल्यालाही व समाजालाही होईल व त्याची किंमत कोणालाही चुकवावी लागणार नाही. 


आपल्यामध्ये "समज" असेल तर वादविवाद भांडण तंटे "गैरसमज" असे प्रकार आपल्या जीवनामध्ये होत नाहीत आणि आपण शांततेत संकटात ही मार्ग काढू शकतो.

गौरी गणपतीचे सणाला,महाराष्ट्र लोकधारा


 [शिर्की pen, रायगड] Nilakshi Patil l❤️🥰❤️: सर्व गाण्यांचे संकल्पना - स्मिता गावंड. लेखिका - स्मिता गावंड. मुख्य गायिका - सुनंदा गावंड. सह गायिका - स्मिता गावंड, मनीषा गावंड, निता पाटील, रुपाली पाटील, निलाक्षी पाटील. वाद्य वाजंत्री (ढोल) - पार्थ गावंड.

[ Nilakshi Patil Patil❤️🥰❤️: 1 ला गाणी गौरी घरी घेऊन येताना बहिणी आणा माहेराला आधी आ गौराबाईला

Featured post

Lakshvedhi