Monday, 30 May 2022

 भवतालचा ताजा अंक प्रसिद्ध !

भवताल मासिकाचा मे २०२२ चा अंक प्रसिद्ध झाला आहे.

* ('कोविड १९' नंतर) वटवाघुळांकडे नेमके कसे पाहायचे?

* कृष्णा खोऱ्यातील माणसाचे ४ - ५ लख वर्षांपूर्वीचे अस्तित्व

* 'लोक जैवविविधता नोंद वही' तयार करणाऱ्या गावाची गोष्ट

* कळसुबाई परिसरातील पावसाची वेगळी तयारी

* फाटलेला शूज शिवण्याची सोय नसते तेव्हा...

* शांतता, बाळ झोपलंय !

* आणि बरेच काही...

अशा माहितीपूर्ण व रंजक लेखांनी सजलेला हा अंक.


हा अंक आणि अंकाचे कव्हर आपणासोबत शेअर करत आहोत. अंकाचे कव्हर आणि नावनोंदणीची लिंक आपल्या संपर्कात शेअर करावी. लोकांना नाव नोंदवण्याचे आवाहन करावे, ही विनंती.


भवताल मासिकाच्या नावनोंदणीसाठी लिंक- https://bhavatal.com/connectus/masik-nondani-information

- टीम भवताल.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


 *बाळा तुझे नाव नाही सांगितलेस..?*


टाळ्यांच्या कडकडाटातच तो तरुण खाली बसला. तरुण कसला, १५ वर्षांचा मुलगाच तो, तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग..! पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं..! त्या कडकडाटातही श्रोत्यांचे आवाज येतच होते.


कुणी म्हणत होतं, “काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं..? अंहं! कधीच ऐकलं नव्हतं!!”


त्यावर एकजण म्हणाला – “दुसरा लोकमान्य होणार हा, लिहून घ्या!!”


तर तिसऱ्याचे, “पण केवढा सुकुमार आहे नाही? देखणा.. राजबिंडा!”


यावर चौथा, “हो ना, वाटतंय की आपल्या या छोट्याश्या दहिवली गावात कुणी राजपुत्रच अवतरलाय. देखणा, विद्वान आणि खिळवून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा धनी..!”


लहानग्यांची आणि किशोरांची वक्तृत्वस्पर्धा होती ती. होता होता स्पर्धा संपली. सूत्रसंचालकाने तसे घोषित केले आणि त्यासोबतच स्पर्धेच्या अध्यक्षांना विनंतीही केली – निकाल संपण्यापूर्वी दोन शब्द बोलण्याची!


अध्यक्षमहोदय बोलायला उभे राहिले. एकवार सगळ्यांवरून नजर फिरवली त्यांनी. मऊशार भात खाताना अचानकच खडा लागावा, तशी त्यांची नजर मघाशीच्या “त्या” मुलावर अडली! एक नि:श्वास सोडून ते बोलू लागले,


“आमच्यावेळी अश्या स्पर्धा फारश्या होत नसत. पण जेव्हा व्हायच्या, त्यावेळी आम्ही अतिशय उत्साहाने भाग घ्यायचो. चार-चार दिवस खपून स्पर्धेची तयारी करायचो आणि बेधडक बोलायचो! आजदेखील सर्वांचीच भाषणे उत्तम झाली. साजेशी झाली. परंतू हल्ली काही मुलांमध्ये आळस फार भरलाय. वक्तृत्वस्पर्धेतली भाषणे पालकांकडून लिहून घेऊ लागलीयेत ती मुलं. पाठ केलेलं उसनवार भाषण म्हणून टाळ्या मिळवल्या जातायत.


आमच्या अनुभवी नजरेतनं अश्या हुशाऱ्या सुटत नाहीत. इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी मांडूच शकत नाही, हे लागलीच लक्षात येते. पण काय करणार? स्पर्धेचे नियम आहेत. काही बंधनं आहेत. ती पाळण्यासाठी मला अश्याच एका मुलाला प्रथम क्रमांक देणं भाग पडतंय. पण माझी अशी इच्छा आहे की, इथून पुढे त्याने स्वत:हून तयारी करून स्पर्धेत उतरावे. भले साधेच भाषण करावे, पण स्वत:चे करावे”.


बोलता बोलता त्यांनी “त्या” मुलाच्या दिशेने हात केला, “बाळ पुढे ये..”


सगळ्यांच्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या. त्याची चर्या शांत होती. परंतू नीट पाहिले असते तर त्याच्या कानांच्या पाळ्या लाल झालेल्या दिसल्या असत्या, नाकपुड्यांची थरथर जाणवली असती! पण टाळ्यांच्या गजरात अश्या सूक्ष्म तपशीलांकडे कुणाचे लक्ष जाते?


तो पुढे आला. अध्यक्ष महोदयांनी त्याच्या हातात प्रथम क्रमांकाचे बक्षिस दिले. पुन्हा एकवार टाळ्यांचा कडकडाट झाला. आवाज जरासा थांबल्यावर “त्या”ने अध्यक्षांच्या दिशेने पाहिले आणि मनातली खळबळ आवाजात किंचितही जाणवू न देता म्हणाला,


“महोदय, आपली काही हरकत नसेल तर मी थोडंसं बोलू का”?


“अवश्य! बोल ना..”


बक्षिसपत्र बाजूला ठेवले आणि पुन्हा एकवार तो व्यासपीठावर जाऊन उभा राहिला. सभागृहात टाचणी पडली तरी कानठळ्या बसतील अशी शांतता पसरली. सगळ्यांचे लक्ष “तो” काय बोलतो याकडे लागलेले. खोल श्वास घेऊन तो बोलू लागला,


“मला पारितोषिक मिळाले हा माझा सन्मान आहे. त्याबद्दल मी सन्माननीय व्यासपीठ, स्पर्धेचे संयोजक आणि उत्तम श्रोतागण यांच्या सगळ्यांच्या चरणी प्रथमत:च कृतज्ञता व्यक्त करतो”.


क्षणभर थांबला. पण पुन्हा निर्धारपूर्वक बोलू लागला,


“परंतू मा. अध्यक्ष महोदयांना वाटते की, ते भाषण मी लिहिलेले नाही – पालकांनी लिहून दिलेय. ते म्हणतात की, इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी कसे मांडू शकेल? मी त्यांना विचारू इच्छितो की अध्यक्ष महोदय, तुम्ही उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वयाच्या १५ व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही असाच कोटीक्रम लावणार आहात काय? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली नसून ज्ञानेश्वरांच्या आई-अण्णांनी त्यांना लिहून दिलीये – कारण इतक्या लहान मुलाला असे प्रगल्भ विचार सुचणेच शक्य नाही – असेच म्हणणार आहात काय”?


अवघी सभा दचकली. “त्या”ने अध्यक्षांकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली,


“तरीदेखील अध्यक्ष महोदयांना शंका असेल तर मी संयोजकांना विनंती करतो की, मला याच क्षणी – आत्ताच्या आत्ता वक्तृत्वासाठी एखादा विषय द्या आणि तयारीसाठी घटकाभराचा वेळ द्या. आणि मी माझा अभ्यास पणाला लावून त्याही विषयावर भाषण करून दाखवतो की नाही पहाच! मगच ते बक्षिस मला द्यायचं की नाही ठरवा”!!


अभावितपणे कुणीतरी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि पाहाता-पाहाता सारे सभागृह पुन्हा एकवार टाळ्यांच्या गजराने कुंद होऊन गेले.


इतका वेळ धीराने बोलणारा “तो” आता मात्र घाबरला. आपण चुकून या व्यासपीठाच्या मर्यादेचा भंग तर नाही ना केला? एवढे विद्वान अध्यक्ष महोदय, पण आपल्या या उद्धट वर्तनाने चिडले तर नसतील ना? त्याने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाहिले. त्यांची नजर स्थिर होती. परंतू सूर्य उगवण्यापूर्वी नभांत जशी हळूवार लालिमा चढत जाते, अगदी तश्याच हळूवारपणे त्यांच्या चर्येवर हास्यप्रभा फाकू लागली होती! शांत चेहऱ्याचे रुपांतर हळूहळू प्रसन्नतेत झाले आणि हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी त्याला जवळ येण्याचा इशारा केला. तो अवघडून आला तर त्यांनी त्याला मिठीच मारली. त्याच्या पाठीवर थाप देत ते बक्षिसपत्र – “काळ” या गाजणाऱ्या नियतकालिकाचे वर्षभराचे मोफत सभासदत्व – त्याच्या हाती दिले.


म्हणाले, “बाळा तू आज माझे डोळे उघडलेस. विद्वत्ता, बुद्धिमत्ता वयावर अवलंबून नसते, तर ती व्यक्तीच्या मेहनतीवर आणि अभ्यासावर अवलंबून असते, हे तू आज मज पढतपंडिताला दाखवून दिलेस. या बक्षिसावर अधिकारच आहे तुझा. फक्त तुझा!!”


सारी सभा अवाक होऊन पाहात होती. तो आनंदाने उत्साहित होऊन व्यासपीठावरून उतरला. गर्दीतून वाट काढत जाऊ लागला.


तेवढ्यात अध्यक्षांनी हाक मारली, “अरे बाळा, मला तुझे नाव नाही सांगितलेस”?


हाक ऐकताच तो थबकला. वळाला. त्याची छाती अभिमानाने फुलून आली होती. त्याने मान उंचावली आणि म्हणाला,


*“माझं नाव सावरकर... विनायक दामोदर सावरकर”!!!*

 


 *खूप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे ' लोक काय म्हणतील ? ' .*

        🌹 *शुभ सकाळ*🌹

Sunday, 29 May 2022

 *अगर आप को मालूम हो जाए कि यह भजन कौन गा रहा है तो आप आश्चर्यचकित हो जाएंगे!*

 यह और कोई नहीं है, *यह हमारे देश के प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी हैं।*

 धन्य है वह देश जहाँ का प्रधानमंत्री ऐसी धार्मिक आस्था व संस्कृति को जानने और समझने वाला हो...*

*बहुत ही गर्व की बात है। एकदम प्रोफेशनल सिंगर की तरह गाया है।* 

🌸🌸🌸

🚩🚩🚩🙏🙏


🙏

 *👉सुख म्हणजे नक्की काय असतं!*


सोलापूर इथल्या एका संस्थेने माझं दोन दिवसांचं मोटीवेशनल शिबिर आयोजीत केलं होतं. विविध वयोगटांतले आणि विविध व्यवसायातले शिबिरार्थी उत्साहाने सामील झाले होते. शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता आनंदाने कसं जगावं? मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं. प्रश्न अगदी साधा होता,


सुख म्हणजे काय?


उत्तरं अगदी भन्नाट होती. एकाने लिहीलं, निरोगी दीर्घायुष्य म्हणजे सुख. एकाने लिहिलं, घरात पत्नीने तोंड बंद ठेवणं म्हणजे सुख. एक उत्तर होतं, सकाळी उठल्यावर संडासला साफ होणं म्हणजे सुख. एकाचं उत्तर होतं, म्हातारपणी मुलं आधाराला जवळपास असणं म्हणजे सुख. कुणाचं उत्तर होतं, भरपूर पैसा गाठीशी असणं म्हणजे सुख. तर कुणी लिहीलं होतं की शरीर धडधाकट असणं म्हणजे सुख. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या.


साऱ्या शंभर शिबिरार्थींच्या सुखाच्या कल्पना जेव्हा मी एकत्र केल्या तेव्हा लक्षात आलं, प्रत्येकजण कोणत्या तरी एका बाबतीत दु:खी आहे. म्हणजे कुणाची बायको भांडखोर आहे, कुणाला बद्धकोष्ठाचा त्रास आहे, कुणाची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत.... आणि ती उणीव त्या प्रत्येकाला टोचते आहे. म्हणजे उरलेल्या नव्व्याणव टक्के बाबतीत तो सुखी आहे. म्हणजेच काय तर प्रत्येकजण नव्व्याणव टक्के सुखी आहे आणि फक्त एक टक्का दु:खी आहे. हे केवळ एक टक्का दु:ख आपण चघळत बसतोय आणि उरलेल्या ९९% सुखाकडे दुर्लक्ष करतोय. आहे की नाही गंमत. मी जेव्हा त्या साऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली तेव्हा सारेच चकीत झाले.


हीच तर सुखाची गंमत आहे. आपण सुखात असतो. पण आपण सुखात आहोत हेच आपल्याला माहित नसतं. जेव्हा काही कारणामुळे त्या गोष्टीची आपल्या आयुष्यात उणीव निर्माण होते तेव्हा आपल्याला कळतं, अरे... एवढा वेळ आपण सुखात होतो.


लहान असताना वाटतं, लहानपण म्हणजे परावलम्बित्व. केव्हा एकदा मोठे होतोय आणि स्वत:च्या पायावर उभे रहातोय. मोठं झाल्यावर वाटतं, किती टेन्शन रे बाबा. प्रत्येक गोष्टीत टेन्शन. जागा शोधायचं टेन्शन. कर्जाचे हप्ते भरायचं टेन्शन. ऑफीसमध्ये साहेबांना तोंड द्यायचं तेन्शन. त्यापेक्षा बालपण किती सुखाचं होतं. ग्रुह्स्थाश्रमात प्रवेश केल्यावर वाटतं, संसारसंगे बहु कष्टलो मी! केव्हा एकदा मुलं मोठी होतायत आणि या जबाबदाऱ्यांतून मोकळा होतोय. मुलं मोठी होतात तेव्हा आपण व्रुद्ध झालेलॊ असतो. आणि गात्रं कुरकुर करु लागतात. तेव्हा वाटतं, अरे तो बहराचा काळ किती सुखाचा होता.


माझे एक ज्येष्ठ मित्र रवीन्द्र परळकर अलीकडे बऱ्याच दिवसांनी मला भेटले. शिळोप्याच्या गप्पा झाल्या. म्हटलं,


“थोडे वाळलेले दिसताय. बरं नव्हतं की काय?”


तर ते म्हणाले, “प्रोस्टेट्च्या त्रासाने आजारी होतो. काय झालं, एक दिवस रात्री लघवी कोंडली. प्रोस्टेट ग्लॅंड वाढल्यामुळे त्याचा भार ब्लॅडरवर आला होता आणि लघवीलाच होईना. ओटिपोटावर भार असह्य झाला. मी वेदनांनी गडाबडा लोळू लागलो. अख्खी रात्र पेनकीलर घेऊन काढली. दुसऱ्या दिवशी फॅमिली डॉक्टरना घरी बोलवलं तर ते म्हणाले युरॉलॉजिस्टकडे घेऊन जा. युरॉलॉजिस्टकडे जाऊन ॲडमिट व्हायला दुपारचे अकरा वाजत आलेले. म्हणजे गेले पंधरा सोळा तास मला लघवीला झालं नव्हतं. वेदना असह्य होत होत्या. ब्लॅडर फुगून पोटातच फुटायची भिती निर्माण झाली होती. शेवटी एकदाचं मला ॲडमिट करुन घेण्यात आलं. आणि ब्लॅडर पंक्चर करुन सर्व युरीन बाहेर काढण्यात आली. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला. आपल्याला दिवसातून वेळेवर लघवीला होणं ही सुद्धा किती सुखाची गोष्ट आहे.”


परळकरांचं उदाहरण हे सुखाच्या शोधात दु:खी असलेल्या प्रत्येकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. हातपाय धडधाकट आहेत. दोन घास पोटात जातायत हे सुख नव्हे काय? परवर्दिगार मेहर्बान होऊन पावसा पाण्यापासून रक्षण करतोय हे सुख नव्हे काय? घराबाहेर पडल्यावर मागे एक वाट पहाणारं दार आहे हे सुख नव्हे काय? ’एका लग्नाची गोष्ट’ या प्रशांत दामलेंच्या नाटकातलं गाणं मला आठ्वतय,,


*मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं*

*काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं*


मित्र हो, जाणीवांच्या खिडक्या सताड उघड्या ठेऊन विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खूप सुखी आहात.  

*चला तर मग, सगळ्या तक्रारी उडवून लावा, सारी निराशा झटकून टाका आणि आनंदाने जगू लागा.*

➖➖🙏🏻🌹🌹🙏

 *वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते!*

आयुषचे माजी महासंचालक डॉ.जी.डी.लवेकर यांनी पाठवले आहे.

*पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा !!*

▪️जसे वर्षे घालवतो तसे रोज म्हातारा होत असतो,पाय नेहमी सक्रिय आणि मजबूत असले पाहिजेत.

जसजसे सतत म्हातारे होत असतो/वृद्ध होत असतो,तस तसे केस राखाडी होण्याची/ त्वचा निस्तेज/ चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची भीती बाळगू नये.

*दीर्घायुष्य* प्रदीर्घ तंदुरुस्त आयुष्याच्या लक्षणांपैकी लोक प्रिय यूएस मॅगझिन"प्रिव्हेन्शन" द्वारे सारांशित केले आहे,पायां चे मजबूत स्नायू *सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक* म्हणून शीर्षस्थानी सूचीबद्ध आहेत.कृपया दररोज चालत जा.

▪️जर फक्त २ आठवडे पाय हलवले नाही तर पायाची खरी ताकद १० वर्षांनी कमी होईल.

*फक्त चाला*

▪️डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की वृद्ध,तरुण २ आठवड्यांच्या *निष्क्रियता* दरम्यान,पायां च्या स्नायूंची ताकद *एक तृतीयांश* कमकुवत होऊ शकते* जे २०-३० वर्षांच्या वृद्धत्वाच्या समतुल्य आहे !!

*म्हणून फक्त चाला*

▪️पायाचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे नंतर पुनर्वसन व व्यायाम केले तरीही ते बरे होण्यास बराच वेळ लागेल.

म्हणून *चालण्यासारखा नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे*

▪️संपूर्ण शरीराचे वजन/भार शिल्लक राहून पायांवर विश्रांती घ्या.

*पाय हे १ प्रकारचे खांब* आहेत,जे मानवी शरीराचे संपूर्ण भार सहन करतात.

*रोज चाला.*

▪️मजेची गोष्ट म्हणजे,माणसा च्या ५०% हाडे, ५०% स्नायू २ पायांत असतात.*चालत जा*

▪️मानवी शरीरातील सर्वात मोठे व मजबूत सांधे,हाडे देखील पायांमध्ये असतात.

*10K पावले/दिवस*

▪️मजबूत हाडे,मजबूत स्नायू, लवचिक सांधे *लोह त्रिकोण* बनवतात जो सर्वात महत्वाचा भार वाहतो म्हणजेच *मानवी शरीर"*

▪️७०% मानवी क्रियाकलाप व व्यक्तीच्या जीवनातील ऊर्जा बर्न दोन पायांनी केली जाते.

▪️हे माहीत आहे का?जेव्हा एखादी व्यक्ती तरुण असते तेव्हा तिच्या *मांडीत ८०० किलो वजनाची छोटी गाडी उचलण्याइतकी ताकद असते*

*पाय हे शरीराच्या हालचाली चे केंद्र आहे*

▪️दोन्ही पायांना मिळून मानवी शरीराच्या ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या आणि ५०% रक्त त्यामधून वाहत असते.

▪️हे शरीराला जोडणारे सर्वात मोठे रक्ताभिसरण नेटवर्क आहे. *म्हणून रोज चाला*

▪️फक्त जेव्हा पाय निरोगी असतात तेव्हाच रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो,त्यामुळे ज्यांच्या पायाचे स्नायू मजबूत असतात त्यांचे हृदय नक्कीच मजबूत असते.* चाला.

▪️ वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते

▪️एखादी व्यक्ती मोठी होते, मेंदू,पाय यांच्यातील सूचनांच्या प्रसारणाची अचूकता व गती कमी होते,ती व्यक्ती तरुण असताना कमी होते.*कृपया चालत जा*

▪️याशिवाय,तथाकथित हाडां चे खत कॅल्शियम कालांतराने लवकर/नंतर नष्ट होते,ज्यामुळे वृद्धांना हाडे फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते.वृद्धां मध्ये हाडांचे फ्रॅक्चर सहजपणे अनेक गुंतागुंत निर्माण करू शकतात. विशेषत: मेंदूच्या थ्रोम्बोसिससारखे घातक रोग.

▪️हे माहीत आहे का ? साधारणपणे १५% वृद्ध रूग्ण जास्तीत जास्त मरतात. १ वर्षा च्या आत मांडीचे हाड फ्रॅक्चर ! *रोज न चुकता चाला*

*पायांचा व्यायाम,वयाच्या ६० वर्षानंतरही कधीही उशीर होत नाही*

▪️पाय कालांतराने हळूहळू म्हातारे होत असले तरी,पाय/पायांचा व्यायाम करणे हे आयुष्यभराचे काम आहे.

*10,000 पावले चाला*

▪️केवळ नियमितपणे पाय बळकट केल्याने पुढील वृद्धत्व टाळता येते/कमी करता येते. *३६५ दिवस चाला*

▪️पायांना पुरेसा व्यायाम मिळावा,पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्या साठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे चाला.

*तुम्ही ही महत्त्वाची माहिती तुमच्या 40+ मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर केली पाहिजे, कारण प्रत्येकजण दररोज वृद्ध होत आहे*


🚶🏻‍♀️🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️



🙏🙏 So walking every day 👍

Featured post

Lakshvedhi