Saturday, 30 October 2021

 नागनदी पुनर्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी

२ हजार ११७ कोटींच्या कामांना होणार सुरुवात

 

             नवी दिल्ली२७ : नागपूर येथील नागनदीच्या पुनर्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आज कॅबिनेटच्या खर्च व  वित्त समितीने (ईएफसी) मंजुरी दिली आहेयाद्वारे प्रकल्पाच्या २ हजार ११७ कोटींच्या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

            नागनदी पुनर्जीवन प्रकल्पाच्या पूर्णत्वास आठ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून याअंतर्गत ९२ एमएलडी  क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, ५०० कि.मी. सीवरेज नेटवर्कपंपीकरण स्टेशन कम्युनिटी टॅायलेट निर्माण केले जाणार आहेत.

               नागपूर शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या नागनदीला पुनर्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी  योजना  मंजूर केली आहे. नागनदीच्या प्रवाह क्षेत्रातील भूजलपातळी वाढवण्यात आल्यास नदी पुनर्जीवित होईल, असा निष्कर्ष नागपुरातील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने केलेल्या संशोधनात काढण्यात आला होता.

         नागनदी आधी शुद्ध पाण्याने प्रवाहित होती. झपाट्याने झालेल्या शहरीकरणाचे परिणाम नदीच्या मूळ प्रवाहावर झाला आहे. नागपूर महापालिकेने केंद्र सरकारकडे नागनदी पुनर्जीवित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे केंद्र शासनाने या प्रकल्पास मंजुरी दिली होती. केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीने दिलेल्या आजच्या मंजुरीनंतर आता या प्रकल्पाच्या  प्रत्यक्षाला सुरूवात होणार आहे.

 पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी साहित्य मुंबई पोलीस कल्याण निधीतून;

राज्य शासनातर्फे नाही

§  मुंबई पोलिसांचा खुलासा

           

मुंबई दि. 30-  मुंबई शहर पोलीस दलातील कार्यरत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित्त शुभेच्छापत्रदिवाळी फराळमिठाई आणि छोटीशी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. या दिवाळी शुभेच्छा खर्चासाठी मुंबई पोलीस कल्याण निधीचा वापर करण्यात येतो. ही योजना राज्यशासनाची नसून पूर्णतः पोलीस कल्याण निधीची योजना आहे. यंदा मुंबई पोलीसांकरिता कार्यरत असलेल्या 6 पोलीस कॅन्टीनमध्ये दिवाळीसाठी आवश्यक साहित्यावर 750/- रुपये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

            पोलीस कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीप्रोत्साहनविविध अधिकारी कर्मचारी सत्कारआरोग्यविषयक सुविधाव्यायामशाळावाचनालय तसेच पोलिसांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालय दिवाळी शुभेच्छामिठाई आणि भेटवस्तू स्वरूपात दरवर्षी देत होते.

            गेले दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शुभेच्छा पत्रमिठाई आणि भेटवस्तू वितरित करताना येणाऱ्या अडचणी टाळण्याच्या उद्देशाने भेटवस्तूंऐवजी या रकमेचे थेट साहित्य खरेदी करण्याचा पर्याय सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पोलीस सबसिडीयरी कॅन्टीनमधून खरेदी केलेल्या साहित्यावर 30 टक्के सवलत मिळत आहे. याबरोबरच यावर्षी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पसंतीचे व आवश्यक असे दिवाळी सणासाठी लागणाऱ्या साहित्यामधील 750/- रु किंमतीचे साहित्य देखील मोफत मिळणार आहे.

            मुंबई पोलीसांकरिता कार्यरत असलेल्या 6 पोलीस कॅन्टीनमधून हे साहित्य खरेदी करावयाचे असून ही योजना दि. 30 ऑक्टोबर पासून कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

0000


Natual paint vedic

 


 


Diye se diya jale

 The above film has been made and shot by Milind Dhaimade . His co. is called LOVE and FAITH. Film has gone on air today....he and his team worked very hard and had to shoot it in Bhuleshwar - C P Tank.


_Diye se Diya jale_


 बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान

पर्यटकवन्यजीव प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरावे

 - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

                                      ·         उद्यानाचा विकासविविध उपक्रमांसाठी निधी कमी पडू देणार नाही

 

            मुंबईदि. 29 : - बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या विविध प्रकल्पांच्या उभारणीत उद्योजकांचे तसेच स्थानिकांचे सहकार्य घ्या. प्राधान्यक्रम निश्चित करून कामे वेळेत पूर्ण करा. प्राणी उद्यान पर्यटकवन्यजीव प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरावे असे प्रयत्न कराअसे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली.

            बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेवित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्तावन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाशमुख्य वन संरक्षक सुनील लिमये आदी उपस्थित होते.     बैठकीत सुरुवातीला प्राणी उद्यानाचे व्यवस्थापकीय संचालक एन.वासुदेवन यांनी सादरीकरण केले.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीया प्रकल्पासाठी उद्योजकांना आणि स्थानिकांना सोबत घेऊन नियोजन करा. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उद्यानात विविध देशांतील  प्राणी, पक्षी आणण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामस्थांना रोजगारउद्योग संधी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. पर्यटकांना आकर्षित करता येईल अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठी वन विकास प्राधिकरणाने समन्वय साधावा. उद्योजकस्थानिक व्यावसायिक आदींना सोबत घ्यावे. समृद्धी महामार्ग पूर्ण होत आहे. यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अफ्रिकन सफारीनाईट सफारी असे विविध उपक्रम राबविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. याठिकाणी आदिवासी ग्राम तयार करून आदिवासींनी उत्पादीत केलेल्या मालासाठी बाजारपेठ निर्माण करावी.आदिवासी परंपरा आणि संस्कृती पर्यटकांना माहिती होण्यासाठी आदिवासी चित्रकलानृत्य आदीचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करावेत्यांना रोजगार उपलब्ध होईल असे उपक्रम राबविण्यात यावेत असेही श्री ठाकरे यांनी सांगितले.

            उद्यानात वन्य प्राणी आणि तृणभक्षी प्राण्यांच्या विविध प्रजाती त्यांच्या जवळच्या नैसर्गिक अधिवासात हे उद्यान आधीच नागपुरातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून बहरले आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आफ्रिकन सफारीवॉक-इन एव्हियरीट्रायबल ट्रेलवॉकिंग ट्रेल यासारखे आकर्षक प्रकल्प  राबविण्यात येणार आहेत. एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून हा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. नागपूर शहरास लागून असल्याने या प्रकल्पामुळे या भागात निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधी सुध्दा उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धनसंशोधन व शिक्षण तसेच वन्यजीवांचे पुनर्वसन याबाबतचे कामही या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात केले जाणार आहे. प्राणी उद्यानात येणाऱ्या पर्यटकांकरिता पार्किंगप्रसाधनगृहपिण्याचे पाणीवाहने इत्यादी सुविधा करण्यात आल्याचेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

 जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणीची प्रक्रिया एकत्रितपणे करावी

-सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

         ·         पारपत्र व्यवस्थेसारखी संगणकीकृत व्यवस्था उभारावी

         ·         बार्टीचे 60 एकरावर भव्य प्रशिक्षण केंद्र उभारणार

           

            पुणे, दि. 29 : जातीचे प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी या दोन्ही प्रक्रिया एकीकृत (इंटिग्रेटेड) कराव्यात आणि पारपत्र वितरण व्यवस्थेप्रमाणे ही प्रक्रिया अत्याधुनिक करावीअसे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कामकाजाचा आढावा सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांनी बार्टीच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरेआयुक्त ओमप्रकाश देशमुखबार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी उपस्थित होते.

            जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतच्या विलंबाच्या तक्रारी येता कामा नयेत  असे सांगून सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे म्हणालेहे प्रमाणपत्र वितरित करण्यातील प्रशासकीय अडचणी सोडवाव्यात. पडताळणीचा प्रस्ताव असलेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जात प्रमाणपत्र असल्यास त्यांना नियमातील तरतुदीनुसार तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यासाठी जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणीची प्रक्रिया गतीनेपारदर्शक पद्धतीने होण्यासाठी पारपत्र कार्यालयातील संगणकीकृत व्यवस्थेसारखी एकीकृत व्यवस्था तयार कराअसे निर्देशही श्री. मुंडे यांनी दिले.

            श्री.मुंडे म्हणालेबार्टीचे हडपसर येथील 60 एकर जागेत जागतिक दर्जाचे भव्य पंचतारांकित प्रशिक्षण केंद्र उभे करायचे आहे. त्यासाठीचा 30 एकर जागेचा आराखडा तात्काळ तयार करून सादर करावा. येथे एक भव्य ग्रंथालय उभे रहावे. प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना जगात मागणी असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण मिळेल असे नियोजन करावे. येत्या हिवाळी अधिवेशनात यासाठी पुरवणी मागण्यांद्वारे तरतूद करता येईल यादृष्टीने गतीने प्रस्ताव द्यावेत. बार्टीने आता काळानुसार बदलले पाहिजे. येथे संशोधन अग्रक्रमाने झाले पाहिजे. तसेच बार्टीचा राज्यभरात विस्तार होणे गरजेचे आहे, असेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

            लातूर येथे सामाजिक न्याय विभागाची भव्य इमारत उभी असून तेथे 6 डिसेंबरला प्रशिक्षण केंद्र सुरू होईल यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण करावी. परळी येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला तात्काळ गती द्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले त्या शाळेचा पुनर्विकासग्रंथालय विकास करण्याचा प्रस्ताव करण्यात यावा. प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य पुर्नप्रकाशित करायचे आहे. बार्टीच्या योजनांमध्ये कालसुसंगत बदल करणे गरजेचे आहे.  भविष्यात राबवायच्या योजनांसाठी अनुसूचित जातीनवबौद्ध समाजातील  लाभार्थ्यांची कायमस्वरूपी माहिती उपलब्ध होण्यासाठी डेटाबँक विकसित करण्याचे निर्देशही श्री.मुंडे यांनी दिले.

            यावेळी बार्टीचे महासंचालक श्री. गजभिये यांनी सादरीकरण केले. बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिनेश डोकेप्रादेशिक उपायुक्तजिल्ह्याचे सहायक आयुक्तजिल्हा समाजकल्याण अधिकारीबार्टीचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi