४. आयकर भरा व विकासाचा लाभ घ्या.
करदात्याकडून
प्राप्त झालेल्या करांच्या रकमेतून प्राथमिक ते उच्च शिक्षण, उत्तम आरोग्यासाठी हॉस्पिटल्स,
मोफत औषधे स्वच्छता मोहिम, अन्न व निवारा, पायाभूत सुविधा, देशाची सुरक्षितता, विदयुत,
जल पुरवठा, इ साठी वित्तीय पुरवठा, अदिवासी, अनुसुचित जाती, इतर मागासवर्गीय, विशेष
मागासवर्ग, महिलांसाठी वसतीगृह, क्रीडा संकुल कर्ज, अनुदान, शिष्यवृत्ती प्रदान केली
जाते.
अशा
विविध सामाजिक कल्याणाकरीता आपलाही हातभार असणे अत्यावश्यक आहे किंबहुना आपली ही सामाजिक
कर्तव्ये आहेत. आयकर हे आपले आर्थिक नुकसान नसून सामाजिक सोई सुविधांना आपण हातभार
लावतो ही जाणीव ठेवावी व ह्या सोईसुविधांचा आपण हिस्सा आहोत ही जाणीव ठेवावी व वेळीच
आयकर भरा.
५. रोख व्यवहार टाळा. डिजीटल पेमेन्टस पध्दत स्विकारा
भारताच्या
मजबूत आर्थिक करणासाठी व व्यवहार सुरक्षीत राहण्यासाठी रोख व्यवहार टाळा. डिजीटल व्यवहार
स्विकारा. डिजीटल व्यवहारांमुळे पारदर्शकता आणि सुलभता निर्माण झाली आहे व हे सकारात्मक
लक्षणआहे. यामुळे मजबूत आथिक करणामुळे देशाचा विकास झाल्याने पयायाने करोडो भारतीयांना
फायदा झाला आहे.
६. घनकचरा व्यवस्थापन.
घनकचरा व्यवस्थापनासाठी भंगार संकलकाची
ग्रामपचांयत,नगरपरिषदेने नियुक्ती करुन,उदयोगसमुहाने परिसरातील, गावातील, शहरातील प्लॅस्टीक,
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, लोखंड, रद्दीपेपर, काच, संकलनाची जबाबदारी दयावी. ज्यामुळे उत्पन्न
तर मिळेल घनकचरा व्यवस्थापन यशस्वीपणे साध्य होईल..
७. भ्रष्टाचार मुक्त भारत -
लाच देणे व घेणे हा गुन्हा असला तरी
अनेकवेळा वेळेचे बंधन वा अनेक कारणांमुळे लाच देणे मानसिकता नसली तरी आगतिकतेमुळे व्यक्ती
लाच देणेस तयार होते. ज्यामुळे भ्रष्टाचार नावाचा अजगर वाढत जातो व सर्वसामान्यांचे
जीवन मेटाकुटीला येते. एकीकडे अधिकाधीक श्रीमंत व दुसरीकडे अधिकाधिक गरीबी यामुळे आर्थिक्
सामाजिक विषमता वाढत जाते व त्यांचे दुष्परिणाम आर्थिक सामाजिक व्यवस्थेवर होतो.
ह्यासाठी मी लाच देणार नाही हे वचन
ठेवा. लाच मागणार्यांची तक्रार जिल्हा लाचलुचपत कार्यालयाकडे करा. अेसीबी टोलफ्री
क्रमांक - १०६४,
व्हॉटसअॅप - ९९३०७७९९००
(उर्वरित उद्याच्या भागात)