महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार
सन २००९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०-
महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले,
औषध द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या
विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत
अधिनियम, १९८१
यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम
गृह विभाग
मंत्रालय मुंबई ४०० ०३२,
दिनांक १५ जुलै, २००९
सन २००९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०- महाराष्ट्र
झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषध द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या
विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१ यात आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश
ज्याअर्थी, राज्य विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहांचे
अधिवेशन चालू नाही, आणि ज्याअर्थी, यात यापुढे
दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्य विषयक
गुन्हेगार व धोकादाय व्यक्ती अधिनियम, १९८१ यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या
राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्त्तित्वात
असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, आणि, आता, भारताच्या संविधान अनुच्छेद २१३ च्या
खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे,
पुढील अभ्यादेश प्रख्यापित करीत आहेत.
१.
(१) या अध्यादेशास, महाराष्ट्र झोपडपट्टी
गुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक
कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) अध्यादेश, २००९ असे म्हणावे.
२) तो तात्काळ
अंमलात येईल.
२. महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्य
विषयक गुन्हेगार व धोकादाय व्यक्ती अधिनियम, १९८१ (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य
अधिनियम” असा करण्यात आला आहे) याच्या
पूर्ण नावामध्ये “ औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती” या मजकुराऐवजी “औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक
व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाया व्यक्ती (व्हिडिओ पायरेटस्)” हा मजकूर दाखल करण्यांत
येईल.
३. मुख्य अधिनियमाच्या कलम १ मध्ये पोट-कलम (१) मधील
“व धोकादायक व्यक्ती” या मजकुराऐवजी “ धोकादायक
व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाया व्यक्ती (व्हिडिओ पायरेटस्)” हा मजकूर दाखल करण्यांत
येईल.
४. मुख्य अधिनियमांच्या कलम २ मध्ये.
(क)
खंड (अ) मध्ये - एक) उपखंड (चार) नंतर, पुढील
उपखंड जादा दाखल करण्यात येईल. (पाच) दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाया व्यक्तींच्या बाबतीत, ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेत
बाधा पोहोचेल किंवा बाधा पोहोचण्याचा संभव असेल असे दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना
प्रदर्शन करणारी व्यक्ती म्हणून ती करीत असेल किंवा करण्याच्या तयारीत असेल अशा कृत्यांपैकी
कोणतेही कृत्य”
(दोन) स्पष्टीकरणामध्ये
“आरोग्याला गंभीर किंवा विस्तृत प्रमाणावर धोका निर्माण होत असेल किंवा असा धोका निर्माण
होण्याचा संभव असेल” या मजकुरानंतर पुढील मजकूर
जादा दाखल करण्यांत येईल-
“किंवा संगीत कलाकृतींच्या किंवा चित्रपट कलाकृतीच्या
विनापरवाना प्रती काढून आणि त्यांचे वितरण करुन जनजीवनात अस्वस्थता निर्माण करीत असेल
व त्यामुळे प्रशासनावरील विश्वास गमावला जात असेल”
(ख)
खंड (फ) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल-
(फ-१) दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारी
व्यक्ती” म्हणजे ज्या व्यक्त्ीविरुध्द्
कॉपीराईट अधिनियम, १९५७ अन्वये चलचित्रपटाशी किंवा ध्वनिमुद्रणाशी संबंधित कॉपीराईटच्या
उल्लंघनासाठी यापूर्वी किमान एक तरी आरोपपत्र दाखल करण्यांत आले आहे आणि न्यायालयाने
अशा अपराधाची दखल घेतलेली आहे. आणि जिने चलचित्रपट किवा ध्वनिमुद्रण अथवा चित्रपटातीलं
िकंवा ध्वनिमुद्रणातील ध्वनिमुद्रणाचा कोणताही भाग यांच्या संबंधातील कॉपीराईटचे उल्लंघन
करणारे व उक्त अधिनियमान्वये शिक्षापात्र असेलेल असे अपराध केले आहेत किंवा करण्याचा
प्रयत्न केल आहे अथवा असे अपराध करण्याची अपप्रेरणा दिली आहे, ती व्यक्ती होय”
५. मुख्य अधिनियमाच्या कलम १७ मध्ये -
(क) खंड (अ) मध्ये “आणि” हा शब्द वगळण्यांत येईल,
(ख) खंड (ब) मध्ये शेवटी “ आणि” हा शब्द जादा दाखल करण्यांत येईल.
(ग)
खंड (ब) नंतर पुढील खंड जादा दाखल करण्यांत येईल.
“(क) महाराष्ट्र
झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषध द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या
विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१ याच्या प्रारंभाच्या दिवशी आणि त्यानंतर,
कोणत्याही दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाया कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत.
निवेदन
:
दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाया व्यक्ती (व्हिडिओ पायरसी) सर्वत्र पेव फुटलेले आहे
व त्यामुळे सध्या प्रेक्षक चित्रपटगृहांकडे फिरकत नसल्याने शासन, चित्रपट निर्माते,
वितरक व चित्रपटगृह-मालक या सर्वांना मिळणाया महसुलाची
हानी होत आहे आणि चित्रपट उद्योगावर आणीबाणीची वेळ आली आहे. शासनाने या संकटाचे निवारण
करुन चित्रपटगृहामध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करावे याकरिता, चित्रपट उद्योगातील विविध
संघटनांच्या प्रतिनिधींनी शासनाला अभिवेदने सादर केलेली आहे. याशिवाय, दृ्कश्राव्य
कलाकृतींच्या अशा विनापरवाना प्रदर्शनाच्या परिणामी, जनतेचे विविध घटक आणि चित्रपट
निर्माते, वितरक, इत्यादींमध्ये देखील मतभेद, वाद निर्माण होत आहेत.
२. दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन हे,
सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक ठरेल अशा प्रकारचे कृत्य आहे. त्यामुळे दृकश्राव्य कलाकृतींचे
विनापरवाना प्रदर्शन करणाया व्यक्तीला सार्वजनिक सुव्यवस्था
राखण्यास बाधक ठरेल अशा प्रकारचे कार्य करण्यास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने या अधिनियमाखाली
तिला स्थानबध्द् करणे संबंधीत प्राधिकायांना
शक्य व्हावे म्हणून, महाराष्ट्र शासनास तामिळनाडू सरकारने, तामिनाडू हातभट्टीवाले,
औषधिद्रव्य विषयक गुन्हेगार, वनविषयक गुन्हेगार, गुंड, अनैतिक व्यापार करणारे गुन्हेगार
आणि झोपडपट्टी बळकवणारे चोर विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २००४
(२००४ चा तामिळनाडू अधिनियम क्र. १०) याद्वारे केलेल्या सुधारणांच्या धर्तीवर, महाराष्ट्र
झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या
विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१ यामध्ये सुधारणा करणे इष्ट वाटते.
शिवाय अतिरिक्त खबरदारी म्हणून, जिच्याविरुध्द् कॉपीराईट अधिनियम, १९५७ अन्वये चलचित्रपटाशी
किंवा ध्वनिमुद्रणाशी संबंधित कॉपीराईटच्या उल्लंघनासाठी किमान एक तरी आरोपपत्र दाखल
करण्यांत आले असेल आणि न्यायालयाने त्या अपराधाची दखल घेतलेली असूल अशा व्यक्तीलाच
केवळ, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारी व्यक्ती म्हणून स्थानबध्द
करता येऊ शकेल अशी तरतूद करण्यांत आली आहे.
३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन
चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक
गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१
(१०८१ चा महा. ५५) यामध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ
कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची
खात्री पटली आहे म्हणून हा अध्यादेश प्रख्यापित करण्यांत येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
एस.सी. जमीर
महाराष्ट्राचे
राज्यपाल,
अॅना दाणी,
शासनाचे प्रधान सचिव