Wednesday, 15 November 2023

Dr CRP Veeramuthuvel, a top scientist istro

 Dr CRP Veeramuthuvel, a top scientist of the Indian Space Research Organisation (ISRO) and project director of lunar mission Chandrayaan-3, has donated away ₹25 lakh – an amount equivalent to his two years' salary – received as prize money.


"My conscience was not permitting me to take this large amount of award money, hence donation was the best option," NDTV quoted Veeramuthuvel as saying.


The amount was awarded to him by the Tamil Nadu government, as a mark of appreciation for his efforts in the successful landing of the rover on the Moon's surface. The same reward was also given to eight members of his core team.


Despite carrying the burden of a ₹72 lakh home loan, Veeramuthuvel decided to donate the amount to the institutions that have shaped him as a scientist. Therefore, he donated the amount to the alumni associations of Elumalai Polytechnic College, West Tambaram, Chennai; National Institute of Technology (NIT), Tiruchirapalli; Sri Sairam Engineering College and the Indian Institute of Technology (IIT) Madras, Chennai.


Veeramuthuvel, a son of a Railway technician, said the success of Chandrayaan-3 was "more about we and less about me".


"I come from a poor family, having studied in a government railway school in Villupuram and yet money does not mean much to me. ISRO gives us a rich environment to contribute towards national development and that is most satisfying," he reportedly said.


The scientist also noted that he was working continuously over the past four years for the Chandrayaan-3 mission, and “did not take a single vacation or holiday" during the period.


The lunar mission made India the fourth country, after the US, erstwhile Soviet Union and China, to make a soft-landing on the Moon's surface. The successful landing on the lunar surface was recorded on August 23.


ब्रिटीश पंतप्रधानांचे घर, 10 Downing St... पहा दिवाळी कशी साजरी केली

 ब्रिटीश पंतप्रधानांचे घर, 10 Downing St...

🪔🪔


कित्येक वर्षापासून फटाके न वाजवणारी दोन गावे* वाचून आश्चर्य वाटलं नां?

 *कित्येक वर्षापासून फटाके न वाजवणारी दोन गावे*

वाचून आश्चर्य वाटलं नां?


 तमिळनाडूतील तिरुपत्तूर जवळील *वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टी* या  दोन गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून फटाके न फोडता दिवाळी साजरी करतात.

 कारण..

*त्यांना पशू-पक्ष्यांना दुखवायचे नसते.* 


या गावातील रहिवाशी म्हणतात, 

*“आम्ही या गावात पक्ष्यांसाठीच फटाके फोडत नाही. पक्षी हे आपल्या पाळीव प्राण्यासारखे आहेत म्हणून आम्ही  फटाके फोडणे पूर्णपणे टाळतो. आमच्या मुलांनाही पक्ष्यासाठी फटाके फोडण्यापासून दूर ठेवले आहे. कित्येक वर्षे झाली आहेत, आम्ही कधीही फटाके वाजवून दिवाळी साजरी केलेली नाही,”* 


त्यामूळे आज...

 *वेतांगुडी हे पक्ष्यांचे अभयारण्य झाले आहे.*


 हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास झाले आहे.


हे पक्षी *स्वित्झर्लंड, रशिया, इंडोनेशिया आणि श्रीलंका* येथून उड्डाण करतात. 

या *अभयारण्यात  वर्षाला 15,000 पक्षी आकर्षित होतात.*


जवळपास अर्ध्या शतकापासून स्थलांतरित पक्ष्यांच्या 200 हून अधिक प्रजातींसाठी सुरक्षित आणि संरक्षित प्रजनन स्थळांपैकी ही गावे व तेथील अभयारण्य  मानले गेले आहे.


हे पक्षी अनेक वर्षापासून वेतांगुडी, पेरिया कोल्लुकुडी पट्टी आणि चिन्ना कोल्लुकुडी पट्टी येथील सिंचन तलावांवर येत असत.  *फटाक्यांमुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन त्यांच्या येण्यावर परिणाम होऊ लागला.* 

*तेव्हापासून स्थानिक ग्रामस्थ फटाकेविरहित उत्सव साजरा करू लागले.*

आता पशू-पक्षी येथे *शांततेत* राहतात.

 

ग्रामस्थ म्हणतात, "आम्ही  दिवाळीतच नव्हे, तर  *सण, उत्सव, लग्न यामध्येही फटाके फोडत नाही.. आम्ही फटाके फोडणे टाळतो, कारण ते पशू-पक्ष्यांना त्रास देतात. इथे येणार्‍या पक्ष्यांना आम्ही आपली घरची मुलं म्हणून पाहतो.”*


ग्रामस्थांच्या या निर्णयाचे कौतुक म्हणून *वनविभागाच्या वतीने प्रत्येक दिवाळीला गावांतील रहिवाशांना अर्धा किलो मिठाईचे वाटप केले जात असते.*

 हे अभयारण्य मदुराईपासून ५१ किलोमीटर अंतरावर आहे


मागील रविवारी कोलकत्ता-इडनगार्डन्स  येथे सामन्यानंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे  पोलीस ड्युटीवरील घोड्याचा मृत्यु अनेक संवेदनशील मनांना हेलावून गेला.  हवाप्रदूषण- ध्वनिप्रदूषण याचे चटके मानवाला आता बसू लागले आहेत. तरीही काहीजण अजूनही डोळ्यावर घोड्यासारखी झापडे लावून वागत आहेत. 


*अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. आपली संस्कृती-परंपरा यांचे जतन करणे हे महत्त्वपूर्ण आहेच.*


पण आनंदाचा हा सण साजरा करताना---


निसर्गाचा वरदहस्त असलेल्या  आपल्या देशात ध्वनिप्रदूषण, हवाप्रदूषण वाढवून,

 आपण *आपल्याच  भावी पिढीला अंधारात ढकलत आहोत* याचे भानही येणे गरजेचे आहे आणि....

 सोबत फटाक्यांना ठामपणे नाही म्हणण्याची *ठोस कृती.* 


*वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टी या  गावातील सुजाण ग्रामस्थांप्रमाणे.*

बघा पटतंय कां?

                       

🙏

शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

 शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

 

        ठाणे,दि.15:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील  निवासस्थानी शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी नायब तहसिलदार श्री.दिनेश पैठणकरमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक श्री.प्रभाकर काळे उपस्थित होते.

 

0000

 

फोटो ओळ -

        शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.




*💖बहीण 💖 💖एक अनोखं नातं💖*

 *💖बहीण 💖*                        

     *💖एक अनोखं नातं💖*


*आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.*

*असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं*...!


*🌹🌹🌹भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐*

बहीण भाऊ* नाते म्हणजे पाणीपुरी

 *बहीण भाऊ*

   बहीण भाऊ हे नमुने जन्मालाच यावे लागतात. पोतंभर पैसे घेऊन बाजारात गेलात तरी दुकानात हे नग... नगाने मिळायचे नाहीत.

   प्रेम, जिव्हाळा, हेवा, स्पर्धा, आस्था, काळजी असे सगळे भाव ह्या एका नात्यात सामावलेले असतात. 

     थोडक्यात हे नातं अगदी पाणीपुरी सारखं असतं. भांडणाचा तिखटपणा, चेष्टेचा अंबटपणा, प्रेमाचा गोडवा, काळजीचं मीठ, कुरकुरीत खिलाडुपणा असं सगळं ह्यात असतं, पण ह्यात नं कडवटपणाला मात्र जागा नाही.

   एकाने पूर्व म्हटलं की दुस-याने पश्चिम म्हटलेच म्हणून समजा. पण दुस-या कोणाशी भांडण्याची वेळ आली की, मात्र ह्यांची एकी मजबूत. दोघांपैकी एकाला झाप पडत असली की दुस-याच्या  वर्तनात अचानक सदाचार आणि सन्मती दिसु लागते. ते कसे काय, हा दीर्घ संशोधनाचाच विषय आहे. चाॅकलेट वाटून घेताना सुतभर कमी जास्त होऊ नये म्हणून स्केलपट्टीने मोजणारे हे, कधी अचानक स्वतःच्या वाटणीचा आवडीचा उकडीचा मोदक भावंडाला आवडतो म्हणून त्याला किंवा तिला देतील हे सांगता येत नाही. 

एकमेकांवर सतत नजर ठेवून असणारे बहीण-भाऊ एकमेकांचं गुपित मात्र कुणालाही कळू देत नाहीत.  

   शिक्षकांनी दिलेला मार, लपून छपून पाहीलेले सिनेमे, शिकवणीला मारलेली चाट, ही असली गुपित स्वतःच्या वयाची चाळीशी उलटली की, हे बहीण भाऊ आई समोर अलगद उलगडत जातात, अर्थात तेव्हा देखील आईच्या मूडचा अंदाज घेऊन मगच. 

    अगदी तारीख वार किंमती सहीत आई बाबांनी पहिल्यासाठी काय घेतलं होतं हे दुस-याच्या  आणि दुस-यासाठी काय घेतलं होतं हे पहिल्याच्या इत्यंभूत लक्षात असतं. 

    भावंडाच्या मारामा-या सोडवताना अरे काय, वैरी आहात का एकमेकांचे?' म्हणणारी आई जेव्हा भावाला बहिणीच्या काळजीने कासावीस होताना बघते किंवा बहिणीला निजलेल्या भावाच्या डोक्यावरून हात फिरवताना पाहते तेव्हा तिचे डोळे भरून येतात. 

    विनाकारण तासन् तास हसणारी काही भावंड मोठी झाल्यावर विनाकारण एकमेकांना साधा फोन देखील करत नाहीत. 

     न भांडता मोठे झालेले बहीण भाऊ मी तरी कधी पाहीले नाहीत.  पोहणं कसं एकदा शिकलं की विसरत नाही, तसं बहीण भावांच्या स्वतःच भांडण सोडवण्याच्या कलेचं देखील  आहे. जसं पाण्यात पडल्यावर जिवाचा आटापिटा करत आपण  हातपाय मारतो नं तशी तळमळ हवी भांडण सोडवायला.

    जसं पोतं भर पैशात भाऊ बहीण विकत मिळत नसतात तसे ते तीळभर अभिमानानं मात्र  कायमचे दूर होऊ शकतात.


लहानपणी आईने कान पिळला की, आपोआप शहाणपण यायचं आणि भांडण मिटायच. पण *आई  बाप* काही जन्मभर पुरत नाहीत आणि *भाऊ बहीण* विकत काही मिळत नाहीत.


*भाऊबीज निमित्ताने सर्व भाऊ बहिणींना हार्दिक शुभेच्छा.*


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

पदवीधर मतदार नोंदणी

 पदवीदार मतदार संघासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म भरण्याची मुदत (दुसरा टप्पा ) *22 nov to 30 nov* आहे.

    तरी अजून नोंदवायचे शिल्लक असल्यास नाव नोंदवून घ्यावे

Featured post

Lakshvedhi