Tuesday, 2 November 2021

 गांधीनगर येथील प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश

22 सुवर्ण23 रजत अशा एकूण 45 पदकांची कमाई करुन पटकावले अग्रस्थान

 कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडून युवक-युवतींचे अभिनंदन

            मुंबईदि. 1 : केंद्र शासनामार्फत गांधीनगर (गुजरात) येथे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या युवकांनी २२ सुवर्ण आणि २३ रजत पदकेअशा एकुण ४५ पदकांची कमाई करुन स्पर्धेत अग्रस्थान पटकावले आहे. या सर्व स्पर्धकांचे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

            राज्यातून आता एकुण ६० पेक्षा अधिक स्पर्धक बंगळुरु येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होणार असून तेथील विजेते स्पर्धक पुढील वर्षी शांघाय (चीन) येथे होणाऱ्या जागतिक स्किल्स चँपीयनशीपमध्ये सहभागी होतील. गांधीनगर स्पर्धेत पश्चिम प्रादेशिक ५ राज्ये आणि ओडीशा राज्याचा सहभाग होता. एकुण ८२ पैकी ४५ पदके पटकावून ५५ टक्के पदकांवर महाराष्ट्रातील युवक-युवतींनी आपले नाव कोरले आहे.  स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने २२ सुवर्ण आणि २३ रजत (एकुण ४५)राजस्थानने ८ सुवर्ण आणि ८ रजत (एकुण १६)गुजरातने ८ सुवर्ण आणि ४ रजत (एकुण १२)मध्य प्रदेशने ३ सुवर्ण आणि १ रजत (एकुण ४) गोव्याने १ सुवर्ण आणि २ रजत (एकुण ३) तर ओडीशाने २ रजत पदकांची कमाई केली आहे.

            या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्वपूर्ण योगदान देईलअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी तरुणांनी जिद्दीने शांघाय येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्वपूर्ण योगदान देतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आता जागतिक स्पर्धेतील विजयाचे ध्येय ठेवावे - प्रधान सचिव मनिषा वर्मा

            कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या कीराज्यातील सर्व स्पर्धक विविध कौशल्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहेत. गांधीनगर येथील प्रादेशिक स्पर्धेत महाराष्ट्रातील युवक-युवतींनी मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. या स्पर्धकांनी आता राष्ट्रीय स्पर्धेची आणि त्यानंतर होणाऱ्या जागतिक स्पर्धेची जय्यत तयारी करावी. स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना कौशल्य विकास विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल. उर्वरित विद्यार्थ्यांनाही त्यांच्यातील कौशल्याला चालना देण्याच्या अनुषंगाने विभाग संपूर्ण मदत करेलअसे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील तरुणांचे यश अद्भूत - दीपेन्द्र सिंह कुशवाह

            कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंन्द्र सिंह कुशवाह म्हणाले कीगांधीनगर येथील स्पर्धेत महाराष्ट्रातील तरुणांनी मिळविलेले यश अद्भूत असेच आहे. यासाठी या तरुणांनी फार मेहनत घेतली आहे. आता राष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धेसाठीही त्यांनी अशीच तयारी करावी. या युवक-युवतींना विविध नामवंत उद्योगांशी कशा पद्धतीने जोडता येईल यासाठी विभाग प्रयत्न करेल. स्पर्धेत यश मिळविण्याबरोबरच या युवकांना त्यांच्यातील नवसंकल्पना आणि कौशल्याचा उद्योजकतेसाठी वापर करता येईल. कौशल्य विकास सोसायटीमार्फत यासाठी चालना देण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

सुवर्ण पदक विजेते

            राज्यातील मोहम्मद सलमान अन्सारीरिंकल करोत्रादिशा सोनवणेकोमल शिवाजीराव कोडलीकरअंकीता अंबाजी गांगुर्डेज्ञानेश्वर बाबुराव पांचाळस्टॅनली सोलोमनयोगेश दत्तात्रय राजदेवदेवेज्याश्रीराम कुलकर्णीलावण्या पुंड,  विश्वजित रेवनाथ भुर्केआयुषी अरोरापुर्वी सिधपुरागणेश भावे दगडोबामित्रा रावअर्जुन मोगरे,  ओंकार गौतम कोकाटेजीवन संपत चौधरीतोजांगण रवींद्र ढाणूविकास चौधरीसजिव कुमार सबवथ यांनी सुवर्ण पदक पटकावले.

रजत पदक विजेते

            मिलींद निकमयोगेश अनिल खंडागळेसलमान रफीक शेखवेद इंगळेहर्षल गजानन शिरभातेसचिन भारत जाधववृंदा पाटीलसृष्टी मित्रायश दिनेश चव्हाणआकांक्षा केलास पवारमिर्झा कबिरुल्लाह बेग मिर्झा असदुल्लाह बेगप्रियांका सिद्धार्थ टिळकयोगेश दत्तू गनगोडेप्रतिक राजेंद्र हिनघेदआनंद फकिरा घोडकेध्रुव पाटीलओम विनायक गायकवाडअश्लेषा भरत इंगवलेअभिषेक भाई पाटीलमोहम्मद हानिफ मोहम्मद यासीन बेलीमआदित्य दीपक हुगे,  भार्गव कुलकर्णीजुनेद अडेनवाला यांनी रजत पदक पटकावले.

००

 *Dr. Meena Nerurkar is professionally qualified as a gynecologist but her passion for acting and filmmaking*

आपल ते सोनं पण ओळखणार कोण..?🤔

👉 *खोबरेल तेल*

खोबरे, खोबरेल तेल किती विलक्षण आणि गुणकारी आहे..! 

माझे स्वतःचे कितीतरी गैरसमज दूर झाले ! 

कृपया मित्र मैत्रिणींनो हा लेख जरूर वाचा आणि आवडला तर ज्यांच्या ज्यांच्यावर तुमचे प्रेम माया आहे त्यांना पाठवा ....! 

तुमच्यासाठी ख़ास डॉ मीना नेरुरकर यांचा हा लेख ..!!

"कोकोनट ऑइल"

गेली तीस वर्षे नारळाच्या खोबर्‍याला, खोबरेल तेलाला आरोग्यबाधक ठरवल्यावर त्याचे ग्रह पालटले आहेत.

दिवसागणिक वाढत असलेल्या अल्झायमर या रोगावर जालीम उपाय म्हणून खोबरेल तेलाला आत्ता महत्त्व आलेले आहे.

अमेरिकेत डॉक्टर पेशंटना टोस्टवर खोबरेल तेल लावून द्या, असे सांगत आहेत. इतके दिवस आजूबाजूचा काहीही गंध नसलेली अल्झायमर पीडित जनता महिनाभराच्या टोस्टवरच्या खोबरेल तेलाने एकेकाळचे परिचित जग परत नव्याने ओळखायला लागलेली आहे. कोकोनट ऑइलचे भाग्य पालटायला डॉ. ब्रूस फाइफ याच्या रूपाने गॉडफादर लाभला.

अमेरिकेच्या र्‍होड आयलंड राज्यात राहणार्‍या या न्यूट्रिशयन शेजारी पॉल सोएर्स नावाचा फिलिपिनो माणूस होता. पॉल मिरॅकल ऑइल विकायचा. आजूबाजूची फिलिपिनो जनता काहीही झाले की त्याच्या दुकानात धावत यायची व तेल घेऊन जायची.

कुतुहल म्हणून ब्रूसने एके दिवशी पॉलला विचारणा केली. पॉल म्हणाला, थायलंड वा फिलिपाइन्स देशातून नारळ आणतो, नारळाच्या डोळ्यात खिळा घालून पाणी काढतो, मग तो हातोड्याने फोडतो, आतले खोबरे किसतो, ते पाण्यात उकळत ठेवतो, पाणी आटून वर राहते ते कोकोनट ऑइल. कसल्याही व्याधीवर उपचार म्हणून देतो.

डॉ. ब्रूस न्यूट्रिशनिस्ट असल्यामुळे त्याला प्रक्रिया न झालेल्या नैसर्गिक खाद्यपदार्थामध्ये रस होता खोबर्‍यातून तेल काढण्याची किचकट प्रक्रिया सोपी करायला ब्रूसने खूप मदत केली. पॉलला खोबरे वाटायला मिक्सर आणून दिला. खोबर्‍यातून तेल काढायला द्राक्षातून वाइन काढायचा प्रेस आणून दिला. आता तेल काढणे खूप सोपे झाले. पॉलच्या सांगण्यावरून काहीही दुखत असले की, ब्रूसने चमचाभर कोकोनट ऑइल तोंडाने घ्यायला सुरुवात केली. कापलेल्या खरचटलेल्या ठिकाणी कोकोनट ऑइल लावायला सुरुवात केली. ब्रूसचे वजन कमी झाले, त्याची त्वचा तुकतुकीत दिसायला लागली. जखम पटकन भरायला लागली. ब्रूसच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.

इतके दिवस नारळाला का वाईट म्हणत होते याबद्दल त्याने खोलात जाऊन तपास करायला सुरुवात केल्यावर त्याला आढळून आले की, सोयाबीन इंडस्ट्रीने जगात पाय रोवण्यासाठी मुद्दाम खोबर्‍याविरुद्ध अपप्रचार करायला सुरुवात केली होती. सगळे जण हार्ट अटॅकला घाबरतात. खोबरेल तेलात स्निग्धांश जास्त असतात व त्याने हार्ट अटॅक येतो, पण सोयाबीनचे पदार्थ खाल्ले तर हृदयविकार कमी होतात असा खोटा प्रचार सुरू केला. झाले. घाबरट लोकांनी हा रिपोर्ट वाचल्यावर नारळाचे पदार्थ खाणे कमी केले. चाणाक्ष सोयाबीन इंडस्ट्रीने स्वत:चे घोडे पुढे दामटले.

ब्रूसने नारळ वापरत असलेल्या देशात जाऊन खोबरेल तेलावर संशोधन केले. खोबर्‍यात असतात ते Medium chain fatty acids जे शरीराला हितकारक असतात. थायलंड,इंडोनेशिया, फिलिपाइन्स, पॉलिनेशियन देश खोबर्‍यावर जगतात. त्यांच्यात हार्ट अटॅकचे प्रमाण जगापेक्षा खूप कमी आहे. ब्रूसने शोधाअंती खोबर्‍यामुळे हार्ट अटॅक येत नाही असे विधान केले.

१९९९साली त्याने Coconut Oil miracle या नावाचे पुस्तक स्वत:च प्रसिद्ध केले. ते वाचून डॉ. मेरी न्यूपोर्ट हिने २००८ साली अल्झायमरच्या रोग्यांमध्ये कोकोनट ऑइलचा उपयोग करून पाहिला. फरक बघून तीदेखील चकीत झाली. इंटरनेटमुळे तो रिपोर्ट जगभर पसरला.

यू ट्यूबवर डॉक्टर हेल्दी फूडसाठी नारळाचे दूध कसे बिनधास्तपणे वापरावे याच्या रोज नव्या रेसिपीज देतात.

माझ्या आजीच्या बटव्यात जगातल्या सगळ्या व्याधींवर अक्सर इलाज म्हणून एकच औषध होते ते म्हणजे खोबरेल तेल. 

परीक्षा आली की डोकं थंड राहावे म्हणून ती माझ्या डोक्यावर खोबरेल तेल थापटायची,  केस काळे राहावेत म्हणून आंघोळीच्या आधी डोक्याला खोबरल तेलाचा मसाज करायची,  कातडीत चरबी होऊ नये म्हणून अंगाला खोबरेल तेल चोळायची,  कान दुखला तर कानात गरम खोबरेल तेलाची धार सोडायची...

सर्दी झाली, डोके खाली करून नाकात गरम खोबरेल तेलाचे थेंब घालायची. 

ती जेव्हा ९५ व्या वर्षी गेली तेव्हा डोक्यावरचे सगळे केस शाबूत होते व काळे होते.

सध्या माझी हॉर्वर्ड विद्यापीठातली हुशार मुलगी अदिती नियमितपणे खोबरेल तेल वापरते. पणजी सारखे डोक्याला अंगाला तर लावतेच, पण ब्रूसने सांगितल्याप्रमाणे रोज तीन चमचे तेल पिते. खोबरेल तेलात जेवण करते. खोबरेल तेलावर वाढूनही मी त्याचा वापर थांबवला म्हणून माझी कीव करते. कोकोनट गुरू डॉ. ब्रूसच्या अथक प्रयत्नांनी अमेरिकेतही कोकोनट ऑईल खूप लोकप्रिय होत आहे. आता मी ही न बिचकता वाटी वाटी सोलकढी पिते. आमट्या, उसळी, कालवणांना नारळाचे वाटण घालते. कोकोनट ऑइल अँटी एजिंग असल्याचे रोज नवनवे रिपोर्ट बाहेर येत आहेत.

*डॉ. मीना नेरूरकर....*

खूपच माहितीप्रद ,ऊपयुक्त लेख वाटल्याने फाॅरवर्ड केला आहे ..

Monday, 1 November 2021


 

 मतदार नोंदणीसाठी महिलांनी पुढे यावे

                                             - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 

              मुंबईदि. 1 : संपूर्ण राज्यात आजपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या मोहिमेत महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असून जास्तीत जास्त महिला नवमतदारांची नोंदणी व्हावीयासाठी निवडणूक विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी समन्वयाने काम करावे व शेवटच्या महिलांपर्यंत पोहोचून त्यांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी उद्युक्त करावेअसे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अधिकाऱ्यांना केले.

               दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राज्यात होणाऱ्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होतेया बैठकीस महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकरसर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारीप्रकल्प संचालक,  राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्वीप सल्लागार दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.

               श्री.देशपांडे म्हणाले कीजास्तीत जास्त महिलांची मतदार नोंदणी करण्याकरिता त्यांच्यापर्यंत संदेश घेऊन जाणे आवश्यक आहे. नवविवाहितेचे नाव तिच्या सासरकडील मतदार यादीत होण्यासाठी प्रयत्न करावेयासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात यावा. मतदार यादीत महिलांना नाव नोंदणी करावयाची आहेही माहिती जर एका महिलेपर्यंत गेली तरी ती सर्व कुटुंबापर्यंत जाते. नाव नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. दिनांक 13 व 14 नोव्हेंबर आणि 26 व 27 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येत असून दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असल्याची माहिती श्री.देशपांडे यांनी दिली.

              राज्यातील नवमतदारतृतीयपंथी तसेच दिव्यांगांचे नाव मतदार यादीत समाविष्ठ होण्यासाठी आवश्यक ती लागणारी सर्व मदत उमेदमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केली जाईलअशी ग्वाही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.वसेकर यांनी यावेळी दिली.

००००


 

 आदिवासी भगिनींनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी यंदाही राजभवन उजळणार

दीपावलीनिमित्त राज्यपालांचे कर्मचाऱ्यांना आकाश कंदील व मिठाई वाटप

           

            मुंबई, दि. 1 :  दीपावलीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवनातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आदिवासी भगिनींनी तयार केलेले आकाश कंदील तसेच मिठाईचे वाटप केले.

            पालघर जिल्ह्यातील आदिवासी भगिनींनी बांबूपासून हे पर्यावरण-स्नेही आकाश कंदील तयार केले असून सेवा विवेक’ (विवेक ग्रामविकास केंद्र) या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राजभवन येथे पाठविण्यात आले. गेल्या वर्षी देखील राजभवनाकडून येथील आकाश कंदील घेण्यात आले होते.

            दिवाळीनिमित्त राजभवन परिसरात आज एका रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांनी स्पर्धकांच्या कलाकृती पाहिल्या व विजेत्या स्पर्धकांना कौतुकाची थाप दिली.

            यावेळी राजभवनात कर्मचारी व त्यांचे कुटुंबियश्रमिक तसेच पोलीस दलातील जवान उपस्थित होते.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमारविशेष सचिव राकेश नैथानीउपसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर प्रामुख्याने उपस्थित होते.       


 *संपू दे अंधार सारा*

 उजळू दे आकाश तारे

 *गंधाळल्या पहाटेस येथे*

वाहू दे आनंद वारे....

*जाग यावी सृष्टीला की*

 होऊ दे माणूस जागा

*भ्रष्ट सारे नष्ट व्हावे*

घट्ट व्हावा प्रेम धागा...

*स्वच्छ सारे मार्ग व्हावे*

अन् मने ही साफ व्हावी

*मोकळ्या श्वासात येथे*

जीवसृष्टी जन्म घ्यावी...

*स्पंदनांचा अर्थ येथे*

एकमेकांना कळावा

*ही सकाळ रोज यावी*

आणि माणसाचा देव व्हावा.........

*आजपासून दिवाळी सुरू होतेय*...

*सगळ्यांना दीपोत्सवाच्या  मनःपूर्वक शुभेच्छा!!!*

  *🌹सुप्रभात🌹*

 ☀️                       *सुप्रभात*                      ☀️

*बहुत फर्क होता है..*

         *किसी को 'जानने' और 'समझने' में....*

*जानता वो है जो 'साथ' होता हैं....*

       *समझता वो है जो 'पास' होता हैं...

            🙏🏻🙏🙏*🌹एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात.

*पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!*

         

      🌹🌻 *|| शुभ सकाळ ||*🌻🌹

Featured post

Lakshvedhi