Monday, 28 July 2025

विमा संस्थांनी जनजागृती, विश्वासार्ह सेवावर भर द्यावा

 विमा संस्थांनी जनजागृतीविश्वासार्ह सेवावर भर द्यावा

- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन

आयबीएआयच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्थापना दिन कार्यक्रम

मुंबई, दि. २५ : विमा हा केवळ आर्थिक उत्पादन नसून तो सामाजिक सुरक्षाजोखीम व्यवस्थापन आणि आर्थिक स्थैर्य यासाठी अत्यावश्यक साधन आहे. भारतीय विमा ब्रोकर संघटनेसारख्या संस्थांनी नागरिकांना केवळ विमा पॉलिसीची विक्री न करता जनजागृतीसुलभ माहिती आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

कफ परेड येथे भारतीय विमा ब्रोकर संघटनेच्या (आयबीएआय) रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्थापना दिन कार्यक्रमात राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत होते. भारतीय विमा ब्रोकर संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रकुमार भरिंदवालराज्यपालांचे उपसचिव एस. रामामूर्तीभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे सदस्य सत्यजित त्रिपाठीविमा समितीच्या सदस्या श्रीमती टी.एल. अलामेलूआयबीएआयचे उपाध्यक्ष मोहन एससचिव निर्मल बजाज आदींसह शासकीय व नियामक संस्थांचे वरिष्ठ अधिकारीविमा व वित्तीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले कीही संस्था रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने हा आनंदाचा क्षण आहे. विमा दलाल (ब्रोकर) हे विमाधारक व विमा कंपनी यांच्यातील दुवा आहेत. ते ग्राहक केंद्रित आणि उपयोगी उपाय सूचवितात. भारत देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहेत्यामध्ये कॉर्पोरेट विमा सेवांचे महत्व अधोरेखित होते. ते सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या विमा उद्योगातील विस्ताराशीही संबंधित आहेत. हे सर्व राष्ट्रीय प्राधान्याचे विषय असून सुरक्षिततेची व्याप्ती आणि परस्पर सहकार्य विमा क्षेत्रातही महत्वाचे आहे. भारत क्षमतेचा विकासज्ञानाचे वाटपआणि तंत्रज्ञानाचा स्वीकार यामध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे. विम्याचे भविष्य डेटा उपक्रमांमध्येग्राहकांच्या सूचीबद्धतेमध्ये असल्याने आयबीएआयने यामध्येही सहभागी होवून भविष्यातील अर्थव्यवस्थेचे प्रेरणास्थान बनावे,असेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi