राज्यातील ग्रामीण व नागरी भागात
पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत.
महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
शासन परिपत्रक क्रमांक : टंचाई २०१८/प्र.क्र. २०/पापु-१४
जी.टी. रुग्णालय संकुल, ७ वा मजला,
मंत्रालय, मुंबई ४००० ००१
दिनांक : १८ एप्रिल, २०१९
वाचा
:-
1)
शासन
निर्णय, पा. पु. व स्व. वि., क्रमांक :- टंचाई ३०९९/प्र.क्र.१३/पापु-१४, दिनांक १ फेब्रुवारी,
१९९९.
2)
शासन निर्णय, पा.पु. व स्व. वि., क्रमांक :- टंचाई
२०९९/प्र.क्र.१४/पापु-१४,
दिनांक २ फेब्रुवारी, १९९९.
3)
शासन निर्णय, पा.पु. व स्व. वि., क्रमांक :- टंचाई
१०९९/प्र.क्र.१२/पापु-१४,
दिनांक ३ फेब्रुवारी, १९९९.
4)
शासन
निर्णय, पा.पु. व स्व. वि., क्रमांक :- टंचाई १००५/प्र.क्र.३०५/पापु-१४,
दिनांक २४ जानेवारी, २००६.
5)
शासन
निर्णय, पा.पु. व स्व. वि., क्रमांक :- टंचाई २००८/प्र.क्र.१४९/पापु-१४,
दिनांक २१ ऑगस्ट, २००९.
6)
शासन
परिपत्रक, पा.पु. व स्व. वि., क्रमांक :- टंचाई १०१३/प्र.क्र.८४१/पापु-१४,
दिनांक ४ जानेवारी, २०१४.
7)
शासन
निर्णय, पा.पु. व स्व. वि., क्रमांक :- टंचाई २०१४/प्र.क्र.४८/पापु-१४,
दिनांक ६ मे, २०१४.
8)
शासन
परिपत्रक, पा.पु. व स्व. वि., क्रमांक :- टंचाई २०१८/प्र.क्र.२०/पापु-१४,
दिनांक १४ फेब्रुवारी, २०१८.
9)
शासन
परिपत्रक, पा.पु. व स्व. वि., क्रमांक :- टंचाई २०१९/प्र.क्र.०३/पापु-१४,
दिनांक ८ मार्च, २०१९.
परिपत्रक :-
राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या
अनुषंगाने मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १६ एप्रिल,
२०१९ रोजी आढावा बैठक घेण्यात आली असून सदर बैठकी दरम्यान सध्या पिण्याच्या पाण्याच्या
टंचाईच्या अनुषंगाने विविध क्षेत्रीय अधिकायांसह
आढावा घेण्यात आला. भविष्यातील पाणी टंचाई हाताळणाया दृष्टीने
आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-
1)
सध्या
टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असलेल्या टँकरचे पाणी भरण्याचे
ठिकाणी निश्चितपणे किती कालावधी पर्यंत पाणी उपलब्ध होऊ शकेल तसेच सध्या अस्तित्वात
असलेल्या टँकर भरण्याच्या ठिकाणावरील पाण संपल्यानंतर कोणत्या ठिकाणाहून पाणी भरता
येवू शकेल तसेच सदर पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे किंवा कसे, याबाबतची खात्री उप
विभागीय अधिकारी (महसूल) तसेच गट विकास अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे. त्यानुसार टंचाई
कालावधीत पाण्यासाठ्यांचे नियोजन करणे आवश्यक राहील.
2)
टँकर/बैलगाडी
द्वारे पाणी पुरवठा करणे :- या संबंधात बयाच वृत्तपत्रामध्ये,
खाजगी वृत्त वाहिन्यांवर टँकरद्वारे करण्यात येणारा पिण्याचे पाण्याच्या पुरवठा अंतर्गत
टँकरच्या मंजूर फेयापेक्षा कमी फेया संबंधित गावे/वाड्या येथे टाकण्यात येतात अशा तक्रारी प्राप्त
होत आहेत. तरी याबाबत सर्व संबंधित गट विकास अधिकारी यांनी “दररोज” प्रत्येक दिवसाची जी.पी.एस अहवालाची प्रत काढून घेवून प्रत्येक
गावामध्ये झालेल्या फेया व आवश्यक तेवढ्या प्रमाणात
पाणीपुरवठा झाला आहे किंवा नाही याची स्वत: खात्री करावी व प्रत्येक आठवड्याला त्याबाबतचा
अहवाल खालील प्रपत्रात जिल्हा निहाय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी
प्रत्येक १५ दिवसांनी शासनास सादर करावा.
जिल्हा अहवाल
दिनांक:
तालुक्याचे
नाव
|
एकूण टँकर
संख्या
|
गावे/वाड्या
|
मंजूर फेया
|
प्रत्यक्षात
झालेल्या फेया
|
फेया
झालेली
टक्केवारी
(५/४ x १००)
|
१
|
२
|
३
|
४
|
५
|
६
|
|
|
3)
तक्रारीचे
निवारण :- जिल्हास्तरावर टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या
कार्यालयात टंचाई नियंत्रण व समन्वयासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे.
या कक्षाने प्रत्येक आठवड्याला त्यांच्या जिल्ह्यासंबंधी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या
अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये आलेल्या तक्रारी तसेच बातमीच्या अनुषंगाने आवश्यक तो
खुलासा मुदतीत संबंधित माध्यमांकडे करण्यात यावा.
4)
जिल्ह्यांमध्ये
पिण्याच्या पाण्याची टंचाई अनुषंगाने तात्पुरती पुरक पाण पुरवठा योजना व नळ योजनांची
विशेष दुरुस्ती या उपाययोजनांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावावर खालीलप्रमाणे
माहिती सादर करण्यात यावी.
तात्पुरती पुरक पाणी पुरवठा
योजना/नळ योजनांची दुरुस्ती अहवाल
जिल्हा अहवाल
दिनांक :
तालुक्याचे
नाव
|
मान्यता मिळालेल्या प्रस्तावांची संख्या
|
समाविष्ट
असलेली
गावे/वाड्यांची संख्या
|
संबंधित
गावातील
टँकरची
संख्या
|
दिनांक
३०.०४.१९
पर्यंत पूर्ण
होणा-या
उपाययोजना
|
दिनांक
१५.०५.१९
पर्यंत पूर्ण
होणा-या
उपाययोजना
|
दिनांक
३१.०५.१९
पर्यंत पूर्ण
होणा-या
उपाययोजना
|
|
5) 5) जिल्हाधिकारी
/उप विभागीय अधिकारी यांनी गावे/वाड्यासाठी टँकर मंजूरी दिलेल्या आदेशाची प्रत संबंधित
ग्राम पंचायतीच्या तसेच तलाठी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणे आवश्यक आहे
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत
आला असून त्याचा संकेतांक २०१९०४१८१०४२५५७३२८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने
साक्षांकित करुन काढण्यांत येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार
व नावाने.
(राजेंद्र कुमटगी)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र
शासन
No comments:
Post a Comment