Monday, 22 April 2019

थोडक्यात आयुर्वेद


दोन दोन तासाने खा, असे सांगितले हे योग्य कि अयोग्य ?
        सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराने रुटीन बिघडते. दोन दोन तासाने खावे. सकाळी उठून एखाद केळ खाल्ल की, आपण नंतर नीट नाश्ता करु शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावण, थालीपीठ अस खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारख पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. जेवताना शक्यतो पाणी पिऊ नये, जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास आणि प्यावे व जेवणानंतर एक तासाने पाणी प्यावे. त्यानंतर मध्ये एखाद दुसर फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही मग रात्री पेज किंवा भात खावा म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.
घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती ?
        चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करुन ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाईल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करुन खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुध्द्‌ा संध्याकाळी ५-६ च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुध्द्‌ा लाडू चांगला.
वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा.
        वयानुसार आपल शरीर बदलत पण ते बिघडू देऊ नये. आपल रुटीन नियमित फॉलो केल पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालत, वय वाढल म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.
सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे यात किती तथ्य आहे ?
        सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साध, माठाच किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.
साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?
        प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्यची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नांव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा.
केस, त्वचेसाठी काय सल्ला.
        केस गळण्यापासून वाचविण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.
आपला दिवस कसा असतो?
        मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋñतुमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडत, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेह­र्‍यावर दिसते.
फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा.
१)      नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा.
२)      जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या.
३)      जेवणानंतर एखादे फळ खा.
४)      संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात.
५)      रात्री ८.३० च्या दरम्यान हलका आहार घ्या.
६)      हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुस­या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.
आहारातून उपचार :
        पुढील आजार झाल्यास त्यांच्या खाली दिलेले अन्नपदार्थ खा. आजार लवकर बरे होतील.
१)      आम्लपित्त- काळी मनुका, आलं, थंड दुध, आवळा, जिरे खा.
२)      मलावरोध पेरु, पपई, चोथा/फायबरयुक्त असलेले अन्न, दुध, पाणी, कोमट पाणी, त्रिफळा चूर्ण घ्या, पोटाचे व्यायाम करा, टॉयलेटला बसल्यावर हनुवटी प्रेस करा. लवकर पोट साफ होते.
३)      हार्ट अॅटॅक/ब्लॉकेज लसूण, कांदा, आल खा रक्ताच्या गाठी होत नाहीत. रक्ताभिसरण उत्तम होते.
४)      डिसेन्टरी/जुलाब - कापूर, गुळ एकत्र करुन खा त्यावर पाणी प्या. लगेच गुण येतो.
५)      खोकला - २/३ काळी मिरी चोखा, दिवसातून तीन वेळा, खोकला थांबतो.
६)      मुळव्याध - नारळाची शेंडी जाळून राख ताकातून दिवसांतून २/३ वेळा घ्या. चांगला गुण येतो.
७)      दारुचे व्यसन - वारंवार गरम पाणी प्या तसेच दारु पिण्याची आठवण येईल त्यावेळी जरुर गरमच पाणी प्या. २/३ महिन्यांत दारु सुटेल.
८)      डोळे येणे - डोळ्यांना गाईचे तूप लावा. आराम पडेल, कापूर जवळ ठेवा, संसर्ग वाढणार नाही.
९)      स्टोन - पानफुटीची पाने खा. कुळीथ भाजी खा. भरपूर पाणी प्या.
१०)     तारुण्यासाठी - भाज्यांचा रस, आरोग्य, पेय, फळे खा, गव्हांकुराचा रस, ग्रीन टी प्या.
आरोग्य संदेश
        संतुलित आहारात उपचार आहेत खरे, सर्वच आजार नक्कीच होतील बरे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi