राज्याचे सर्वसमावेशक
जेष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन परिपत्रक क्रमांक : व्हीआयपी-०८१८/प्र.क्र.
४६४/पोल-१३
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.
दिनांक : १० सप्टेंबर, २०१८
वाचा : शासन निर्णय,
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक जेष्ठना २०१६/प्र.क्र. ७१/
सामासू, दिनांक : ०९ जुलै, २०१८
परिपत्रक :-
जेष्ठ नागरिक सुस्थितीत असण्याच्या दृष्टीने
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक ९ जुलै, २०१८ च्या शासन निर्णयान्वये,
राज्याचे सर्व समावेशक जेष्ठ नागरिक धोरण २०१३ ची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सुचना
निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर धोरणाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सुचना देण्यात
येत आहेत.
१) जेष्ठ
नागरिकांचा विविध स्तरातून होणारा छळ, पिळवणूक, यापासून त्यांचे संरक्षण करण्यांत यावे.
२) प्रत्येक जिल्ह्याच्या
ठिकाणी तसेच पोलीस आयुक्तालयात जेष्ठ नागरिकांसाठी हेल्प लाईन सुरु करण्यात यावी. याद्वारे
आणिबाणीच्या वेळी जेष्ठ नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा आवश्यक सुचना तथा सुरक्षा विषयक
मदत उपलब्ध करण्याबाबत उचित कार्यवाही करावी.
३) जेष्ठ नागरिकांना आपत्कालीन
परिस्थिती तातडीने मदत मिळण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करुन आपात्कालीन सतर्क करणारी
(Emergency Alert
System) विकसित करण्यात
यावीत. त्यामध्ये उदा. मोबाईल अलार्म, इंटरनेट, जी.पी.एस. द्वारे सुरक्षेसाठी
संपर्क केल्यास संकटसमयी जेष्ठ नागरिकांना आहे त्या ठिकाणी मदत देणे शक्य होईल.
४) पोलीसांनी जेष्ठ नागरिकांना
व अन्य प्रश्न यामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्यासाठी जागरुकता दाखवावी. जेष्ठ
नागरिकांना होणारे विविध सतावणुकीसंबंधी (Elderly
Abuse) तक्रारी प्राधान्याने व खास
लक्ष देऊन कायद्याच्या चौकटीत सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.
५) आई वडिल व जेष्ठ नागरिक
यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम-२०१० च्या प्रकरण ६ मधील नियम २० मध्ये जेष्ठ
नागरिकांच्या जिवीतांचे व मालमत्तेचे संरक्षण करण्याबाबत कृती आराखडा विनिर्दीष्ट केला
आहे. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्यात त्यांच्या हद्दीत राहणाया सर्व जेष्ठ
नागरिकांचे विशेषत: एकाकी राहणाया
जेष्ठ नागरिकांची अद्ययावत यादी ठेवण्यात यावी.
६) पोलीस जेष्ठ नागरिकांना
मैत्रीपूर्ण लक्ष ठेवतील, पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधीने सामाजिक कार्यकर्ता अथवा स्वयंसेवक
यांच्यासह नियमितपणे एकाकी व अशक्त जेष्ठ नागरिकांनी
७) पोलीस घटक प्रमुख यांनी
वरील सुचना सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणाव्यात व त्या
सूचनांचे तंतोतंत पालन होईल यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच, याच्या अंमलबजावणीचा
आढावा गुन्हे बैठकीमध्ये घेण्यात यावा.
८) पोलीस महासंचालक व
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी यासाठी त्यांच्या कार्यालयांत समन्वय अधिकारी (Nodal Officer) नेमावा व जेष्ठ
नागरिकांच्या संदर्भातील उपरोक्त सूचनांच्या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घ्यावा.
हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यांत आला असून त्याचा संकेतांक २०१८०९११११४४०९२१२९ असा आहे. हे परिपत्रक
डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यांत येत आहे.
महाराष्ट्राचे
राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(युवराज अजेटराव)
उप
सचिव, महाराष्ट्र शासन
No comments:
Post a Comment