Wednesday, 31 July 2024

ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 ग्रामीण डाक सेवक पदासाठी

 अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. ३० : भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील डाक सेवक पदासाठी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.

            नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदाच्या ५१ जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच भारतीय डाक विभागाद्वारे उमेदवारांना केवळ पत्रव्यवहार केला जातोफोन कॉल्स केले जात नाहीत. तसेच उमेदवारांनी वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नये, असेही अधीक्षक डाकघर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

०००

जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतील कामांचे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावे -

 जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतील कामांचे

सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावे

-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबईदि.30 : जलजीवन मिशन अंतर्गत कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी योजनेतील कामांचे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावेतअसे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

            जल जीवन मिशनबाबत आढावा बैठक मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाविभागाचे सहसचिव अमन मित्तलमुख्य अभियंता मनीषा पलांडेअतिरिक्त प्रकल्प संचालक सुषमा सातपुतेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजय सिंग आदी उपस्थित होते.

            पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणालेजलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची होणारी कामे नागरिकांसाठी महत्त्वाची असून यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे. विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी कालमर्यादा लक्षात घेऊन कामे करावीत. योजनेतील ज्या कामांमध्ये तांत्रिक कारणास्तव व निविदा प्रक्रिये दरम्यान मूळ अंदाजपत्रकापेक्षा वाढ होऊन पंधरा टक्के जास्त फरक होत आहे. अशा कामांसाठी सुधारित मान्यता गरजेची असून यादृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव वित्त विभागास सादर करावेत, अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

            या बैठकीत प्रधान सचिव श्री.दराडेकार्यकारी संचालक श्री. कृष्णाश्री. मित्तलश्रीमती पलांडे यांनी माहिती सादर केली. यावेळी सुधारित मान्यतेसाठी वित्त विभागास सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावावरील अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली व कार्यवाही बाबत सूचना देण्यात आल्या.

कराड विमानतळ विस्तारीकरणाची कार्यवाही कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी

 कराड विमानतळ विस्तारीकरणाची कार्यवाही कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी

- राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

 

            मुंबईदि. ३० : कराड विमानतळाचे विस्तारीकरण करून सर्व सुविधांनी युक्त विमानतळ करायचे आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमीनीचे संपादन करून विमानतळ विकास कंपनीकडे जमीनीचा ताबा द्यावा. विमानतळ विस्तारीकरणासाठी निधी उपलब्ध असून कालबद्ध कार्यक्रम राबवून कराड विमानतळ विस्तारीकरणाची कार्यवाही पूर्ण करावीअसे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

            मंत्रालयातील समिती कक्षात कराड विमानतळ विस्तारीकराबाबत बैठकीचे आयोजन उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेअपर जिल्हाधिकारी तेजूसिंग पवारप्रदीप पाटील उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सहभागी झाले होते.

            मंत्री श्री. देसाई म्हणाले कीविमानतळ विस्तारीकरणासाठी वारूंजी येथील जमीन जवळ आहे. या जमिनीच्या संपादनासाठी खातेदार शेतकऱ्यांची संमती घ्यावी. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने जमिनीचे संपादन करावे. भूसंपादनासाठी शिल्लक असलेल्या जमिनीबाबत 10 ऑगस्टपर्यंत कार्यवाही पूर्ण करावी. पुनर्वसन करावयाच्या नागरिकांना सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

            विमानतळ विस्तारीकरणामध्ये येत असलेल्या भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी वळवून घ्यावी. योजनेचे पाणी द्यायचे असून पाणीपुरवठा बंद करू नये. या पाणी पुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी निधी उपलब्ध आहे. त्यामुळे योजनेच्या पाईप वळतीकरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे,  अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

            विमानतळासाठी 47.27 हेक्टर जमीन संपादनाची आवश्यकता आहे. त्यापैकी 43 हेक्टर जमिनीचा ताबा  विमानतळ कंपनीकडे देण्यात आला आहे.  तसेच 36.90 हेक्टर जमिनीचा मोबदला 861 खातेदार शेतकऱ्यांना देण्यात आला आहेअशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.      

सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यास शासन सकारात्मक

 सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी

लागू करण्यास शासन सकारात्मक

 - राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

 

            मुंबईदि. 30 : सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची उन्नती साधण्यासाठी लाड पागे समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. समितीने दिलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी शासन सकारात्मक  असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सांगितले.

            मंत्रालयातील समिती कक्षात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या मागण्यांच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीस अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप निवालेसंघटनेचे गोविंद परमारराजेश रेवतेनगर परिषद प्रशासन संचालनालयाचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकरनागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अ.रा. चारणकरमुंबई महापालिकेचे उपायुक्त (घनकचरा) सं. सु कबरेसहायक कामगार आयुक्त श्री. शिंदेसामाजिक न्याय विभागाचे उपसचिव रवींद्र गोरवे आदी उपस्थित होते. 

            सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन संवेदनशील असल्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणाले कीसफाई कर्मचाऱ्यांना आश्रय योजनेतंर्गत घरकुले देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त व नगर पालिका मुख्याधिकारी यांनी शासकीय जमिनीचा शोध घ्यावा. जमिनीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे देऊन अशा जमिनींवर सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरकुले बांधण्यात यावीत. सध्या मुंबई महापालिका घरकुले बांधत आहेत. ही घरकुले सेवाज्येष्ठतेनुसार सफाई कर्मचाऱ्यांना वितरीत करावी. तसेच मोठ्या मल:निस्सारण वाहिनीमध्ये अजूनही मानवी हस्तक्षेपाने कामे करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही कामेही यांत्रिकीकरणाने करण्याबाबत स्वतंत्र धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

म्हाडा’तर्फे बृहतसूचीवरील पात्र अर्जदारांकडून आकारण्यात येणारे ना-हरकत प्रमाणपत्र शुल्क माफ - मंत्री अतुल सावे म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील १५८ पात्र अर्जदारांना देकार पत्र प्रदान

 म्हाडा’तर्फे बृहतसूचीवरील पात्र अर्जदारांकडून आकारण्यात येणारे

 ना-हरकत प्रमाणपत्र शुल्क माफ

- मंत्री अतुल सावे

म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील १५८ पात्र अर्जदारांना देकार पत्र प्रदान

            मुंबई‍‍दि. ३० : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील बृहतसूचीवरील (मास्टर लिस्ट) जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील संगणकीय सोडतीद्वारे गाळे वाटप झालेल्या व स्वीकृती कळविलेल्या १५८ पात्र अर्जदारांना आज गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते देकार पत्र प्रदान करण्यात आले. म्हाडातर्फे या पात्र विजेत्या अर्जदारांकडून प्रत्येकी आकारण्यात येणारे ७०५०० रुपये ना-हरकत प्रमाणपत्र शुल्क माफ करण्यात आल्याची घोषणाही मंत्री श्री. सावे यांनी यावेळी केली.

           वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी मंत्री श्री. सावे म्हणाले कीबृहतसूचीवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील २६५ पात्र भाडेकरू-रहिवाशी यांना सदनिकांचे वितरण करण्यासाठी व या प्रक्रिया अधिक पारदर्शक व गतिमान करण्यासाठी मंडळातर्फे पहिल्यांदा २८ डिसेंबर २०२३ रोजी संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीसाठी ४४४ सदनिका उपलब्ध होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सकारात्मकतेमुळे हा ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेता आला. या निर्णयामुळे बृहतसूचीवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू/रहिवाशी यांना पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळी सदनिकांचे वितरण संगणकीय सोडतीद्वारे करण्यात आले. मात्रया सोडतीतील विजेत्या अर्जदारांच्या कागदपत्रांची फेरपडताळणीची मागणी करण्यात आली. या मागणीनुसार म्हाडातर्फे फेरपडताळणी करण्यात येऊन २६५ पैकी २१२ अर्जदार पात्र ठरले आहेत. त्यापैकी स्वीकृती कळविलेल्या १५८ पात्र अर्जदारांना आज देकारपत्र देण्यात आले. उर्वरित ५३ अर्जदारांची पडताळणी सुरू आहे. उर्वरित ५४ अर्जदारांनी स्वीकृती पत्र द्यावे असे आवाहनही मंत्री श्री. सावे यांनी अर्जदारांना केले.

            मंत्री श्री. सावे म्हणाले कीया ऐतिहासिक फेरबदलामुळे बृहतसूचीवरील सदनिका वितरण प्रक्रिया पारदर्शकगतिमान झाली असून सदनिका वितरणाच्या प्रक्रियेत सुसूत्रता आली आहे. तसेच भाडेकरू/रहिवासी यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. वर्षानुवर्षे संक्रमण गाळ्यात राहणाऱ्या भाडेकरू/रहिवासी यांना मुंबईत आपले हक्काचे घर मिळाले असून यात समाधान असल्याचे मत मंत्री श्री. सावे यांनी व्यक्त केले. 'म्हाडा'ने गेल्या वर्षभरात पुणेछत्रपती संभाजीनगरकोकण मंडळातर्फे संगणकीय सोडती काढून सुमारे वीस हजार सदनिका सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबई मंडळाची २००० सदनिकांची संगणकीय सोडत लवकरच काढण्यात येईलअसेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.  प्रत्येकाला घर मिळावे हा शासनाचा हेतू आहे. त्यादृष्टीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)धनगर घरकुल योजना याद्वारे शासन घरे उपलब्ध करून देत आहेअसे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.         

         म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल म्हणाले कीजुन्या उपकरप्राप्त इमारतीतील पात्र भाडेकरू / रहिवाशी यांना बृहतसूचीवरून सदनिका वितरण करण्यासाठीची नियमावली निश्चित करण्यात आली. त्यासंदर्भातील परिपत्रक दि. २२ डिसेंबर२०२३ रोजी जारी करण्यात आले. बृहतसूचीवरून भाडेकरू / रहिवाशी यांना सदनिका वितरणाच्या धोरणाचा भाग म्हणून यापूर्वीचे प्राधिकरणाचे ठरावपरिपत्रकेआदेश रद्दअधिक्रमितसुधारित करून त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन नियमावलीनुसार निवासी गाळा वितरणाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून निवासी गाळ्यांचे वितरण संगणकीय प्रणालीने करण्याचा निर्णय घेऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जात असल्याचे श्री. जयस्वाल यांनी सांगितले.

            अर्जदाराने देकार पत्र प्राप्त झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत देकारपत्रातील नमूद अटी व शर्तींची पूर्तता करून ताबा घेणे बंधनकारक असून तसे न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता सदनिकेचे वितरण रद्द होणार असून बृहतसूचीवरील हक्क संपुष्टात येणार आहे.  

        यावेळी मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी  मिलिंद शंभरकरमुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकरउपमुख्य अधिकारी अनिल वानखेडेमुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघमुंबई मंडळाच्या सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशीगृहनिर्माण विभागाचे उपसचिव अजित कवडेउपमुख्य अधिकारी लक्ष्मण मुंडे आदी उपस्थित होते.     

००००

शैलजा पाटील/विसंअ

 


Tuesday, 30 July 2024

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय 60 वर्षांपासूनची मागणी पूर्ण, लाखो नागरिकांना दिलासा मिळणार मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या

 जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय

60 वर्षांपासूनची मागणी पूर्णलाखो नागरिकांना दिलासा मिळणार

मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 30 - मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या जमिनी मूळ मालकाला मिळणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यामुळे 60 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे. मुख्यमंत्री असताना श्री. फडणवीस यांनी अशाच प्रकारचा निर्णय विदर्भासाठी घेतला होता आणि लाखो शेतकऱ्यांना कसत असलेल्या जमिनींचा मालकी हक्क मिळाला होता.

            मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील या जमिनींबाबत विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. याचा विचार करून या खालसा झालेल्या इनाम जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला होता.

            मराठवाड्यात साधारणतः 13,803 हेक्टर इतक्या मदतमाश जमिनी आहेत. मराठवाडयातील मदतमाश इनाम जमीनीचे हस्तांतरण करण्यासाठी व परवानगीशिवाय झालेली हस्तांतरणे नियमित करुन सदर जमीनींचा दर्जा वर्ग-1 करण्यासाठी सन 2015 मध्ये नजराण्याची 50 टक्के रक्कम शासनाने निश्चित केली होती. तथापिही रक्कम जास्त असल्याने हस्तांतरणे नियमित करण्यासाठी कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे नजराणा रक्कम कमी करण्याची मराठवाडयातील अनेक लोकप्रतिनिंधीची मागणी होती. आज झालेल्या बैठकीमध्ये मदतमाश जमिनीच्या हस्तांतरणासाठी नजुल जमिनींचे हस्तांतरण नियमित करण्याबाबत शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच मदतमाश जमिनीच्या हस्तांतरणाकरिता बाजारमूल्य 5 टक्के दराने नजराणा आकारण्यात यावायाकरिता सदर प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर निर्णयार्थ ठेवण्यात यावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले.

            त्याचप्रमाणे मराठवाड्यात साधारणतः 42,710 हेक्टर इतकी खिदमतमाश जमीन आहे. या खिदमतमाश जमिनींवर देखील मोठया प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. तसेच बेकायदेशीर बांधकामे देखील झालेली आहेत. त्यामुळे अशा जमिनीच्या हस्तांतरणाची तरतूद उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली होती. यास्तव मराठवाड्यातील खिदमतमाश इनाम जमिनीचे हस्तांतरणासाठी 100 टक्के दराने नजराणा आकारण्यात येऊन हस्तांतरण नियमित करण्यात यावेयाकरिता यथायोग्य प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर निर्णयार्थ ठेवण्यात यावाअसेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            या 100 टक्के नजराणा रकमेवरील 40% रक्कम देवस्थानच्या कायमस्वरुपी देखभालीकरिता देण्यात येणार असून 20 टक्के रक्कम देवस्थानच्या अर्चकासाठी देण्यात येणार आहे तर उर्वरित 40 टक्के रक्कम शासनाकडे जमा करण्यात येईल. उपरोक्त दोन्ही निर्णयांमुळे मराठवाड्यातील सामान्य नागरिकांचा सुमारे 60 वर्षापासूनचा प्रलंबित असलेला जमीनींसंदर्भातील प्रश्न संपुष्टात येणार आहे.

            सदर निर्णयामुळे मराठवाड्यातील  छत्रपती संभाजीनगरजालनापरभणीनांदेडहिंगोलीबीडलातूरधाराशिव या जिल्ह्यांमध्ये जवळपास 55 हजार हेक्टर जमिनी खुल्या होणार आहेत.

            या बैठकीस खासदार अशोक चव्हाणसुरेश धसराणा जगजितसिंह पाटीलमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारछत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडेउपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

०००००

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तेलंग मेमोरियल आणि मातोश्री वसतिगृहाची केली पाहणी

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी

 तेलंग मेमोरियल आणि मातोश्री वसतिगृहाची केली पाहणी

 

            मुंबईदि. 30 : आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चगेट येथील तेलंग मेमोरियल मुलींचे वसतिगृह आणि मातोश्री मुलांचे शासकीय वसतिगृह येथे भेट देऊन पाहणी केली.

            यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांची विचारपूस करून  वसतिगृहाच्या  स्वच्छता राखण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.

            मुलांच्या वसतिगृहातील खोल्यांची, पिण्याचे पाणी व्यवस्था याची प्रत्यक्षात  पाहणी  करून विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा देण्यात याव्याअसे सांगून वसतिगृहाचे  उर्वरित राहिलेलं काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

            यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकरउपसचिव अशोक मांडेउच्च व तंत्र शिक्षण मुंबई विभागाचे  सहसंचालक हरिभाऊ शिंदेसहसंचालक प्रकाश बच्छावमातोश्री शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक निलेश पाठकसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi