Wednesday, 30 April 2025

अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे

 अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी

संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबईदि.२९ अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर  विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावेअसे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.

 

निर्मल भवन येथे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह रोखणेबाबत करावयाच्या कार्यवाही संबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी दुरदृश्य प्रणालीद्वारे महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडेसह आयुक्त राहुल मोरे व जिल्हाधिकारीपोलीस अधीक्षक आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या कीबालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुली आणि २१ वर्षांखालील मुलांचे विवाह करणे बेकायदेशीर आहे. परंतु आजही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होतांना दिसतात. त्यामुळे जिल्हाधिकारीपोलीस अधीक्षक यांनी याबाबत कार्यपद्धती ठरवून काम करावे. गावपातळीवर ग्रामसेवकअंगणवाडी सेविकाआशा वर्कर्सपोलीस प्रशासनमहिला व बाल विकास अधिकारी यांनी विशेष लक्ष ठेवून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेतअसेही  राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

 

बालविवाह रोखणे ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी असल्याचे सांगून बाल विवाहाबाबत तक्रार आल्यास त्यावेळी  सरपंचपोलीस पाटील यांना देखील जबाबदार धरण्यात यावे. आदिवासी भागातही बालविवाहाचे प्रमाण अधिक असून त्या भागात कार्यरत अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवावी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी दर तीन महिन्याला आढावा घ्यावाअसेही राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

 

परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक दिसून येते त्यामुळे तिथे विशेष मोहीम राबवण्यात यावी,  अशी सूचनाही श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना 

महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानीत विविध कार्यक्रम

 महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानीत विविध कार्यक्रम

 

नवी दिल्लीदि. ३० : महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिवस गुरूवारी १ मे रोजी साजरा होणार आहे या निमित्ताने राजधानी दिल्लीत विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे.

कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपरनिक्स मार्गावरील महाराष्ट्र सदनांमध्ये सकाळी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांचा हस्ते ध्वजारोहणाचा मानाचा सोहळा संपन्न होईल.

दिल्लीतील उपराज्यपाल कार्यालयातर्फे सायंकाळी महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास दिल्लीचे उपराज्यपाल  विनय कुमार सक्सेना,  मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि  केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रमुख हा विशेष कार्यक्रम होणार आहे.

यावेळी दिल्लीत विविध क्षेत्रांत कार्यरत मराठी भाषिक व्यक्तींशी संवाद साधून त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतील. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे प्रदर्शन या ठिकाणी होईल.

कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याला जागर करणारा खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याच्या सहकार्याने आणि कोकण हापूस आंबा उत्पादक संघदेवगडसिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ मे दरम्यान भौगोलिक मानांकन प्राप्त हापूस आंब्याचे विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचा सुगंधी राजा’ हापूस आंब्याची खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी दिल्लीकरांना उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांत मराठी आणि अमराठी भाषिक दिल्लीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा आणि सांस्कृतिक वैभव सर्वांपर्यंत पोहोचणार आहे.

0000

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम

 महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम

 

           मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन गुरुवारी (दि. १ मे) छत्रपती शिवाजी महाराज मैदानदादरमुंबई येथे शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज वंदन करणार आहेत.

            महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचा जनतेला उद्देशून संदेश गुरुवारी (१ मे) दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरून सकाळी ८ वाजता तसेच आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन सकाळी ९ वाजता  प्रसारित केल्या जाणार आहे. 

Programmes of Governor on Maharashtra Day

           Mumbai, 30 : The Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan will unfurl the National Flag on the occasion of the 66th   Foundation day of  Maharashtra at Chhatrapati Shivaji Maharaj Park, Dadar, Mumbai at 0800 hrs on Thursday, 1st May 2025.

            DoorDarshan Sahyadri will broadcast the Governor’s Maharashtra Day Message at 8.00 am and Asmita Vahini of Akashvani will telecast the Governor’s Maharashtra Day Message at 9.00 am on 1st May. The Message will also be broadcast by all Akashvani Kendras in the State.

0000


नागरिकांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

 नागरिकांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी

सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली

पुणे महापालिकेत महाप्रितच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा

 

मुंबईदि. 30 : पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची गुणवत्ता अबाधित राखून वेळेचे काटेकोर नियोजन करावे. नागरिकांना वेळेत सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावेअसे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची आढावा  बैठक नगरविकाससामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बीकेसी येथील महाप्रितच्या कार्यालयात झाली.

यावेळी महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक श्री. माळीपुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारेउपायुक्त महेश पाटीलविद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा सेकटकरआपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनवणे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या प्रकल्पांच्या माध्यमातून पुणेकरांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि नव्याने समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. महापालिका व महाप्रित यांच्यातील प्रभावी सहकार्यामुळे पुणे शहराचा विकास अधिक गतिमान होत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या उपक्रमांमुळे पुणेकरांचे जीवन अधिक सुखकर व सुविधा संपन्न होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये पुढील महत्त्वाच्या योजनांवर चर्चा करण्यात आली:

एलईडी विद्युत दिव्यांचे रूपांतर: नवसमाविष्ट गावांतील जुन्या विद्युत दिव्यांना एलईडी तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक दिव्यांमध्ये रूपांतरित करण्याचे काम वेगाने सुरू असूनएकूण ७०,००० दिव्यांचे रूपांतर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ९,००० दिव्यांचे रूपांतर पूर्ण झाले असूनयामुळे ऊर्जा बचतीसोबतच देखभाल खर्चातही लक्षणीय घट होणार आहे.

सौरऊर्जा प्रकल्प: पर्यावरणपूरक विकासासाठी ५० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पावर भर देण्यात येत असूनहा प्रकल्प लवकरच अंमलात आणला जाणार आहे.

आधुनिक आदेश व नियंत्रण केंद्र (ICCC): सुमारे २८३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात आपत्ती व्यवस्थापनवाहतूक नियंत्रणसार्वजनिक सुरक्षितताजल व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या सेवा एका केंद्रीकृत प्लॅटफॉर्मवर नियंत्रित केल्या जाणार आहेत. यामुळे शहराच्या व्यवस्थापनात अधिक वेग आणि कार्यक्षमतेची भर पडणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली

महाराष्ट्र राज्यातील प्रशासनाचे अधिकारी,नॅस्कॉमचे विशेषज्ञ,नवसंधी निर्माण करणारा उपक्रम

 महाराष्ट्र राज्यातील प्रशासनाचे अधिकारी

              'महसूल विभागात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर'या विषयावर महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांचे, 'स्टार्टअप डेमो डे - महा-राईज प्लॅटफॉर्म'या विषयावर कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, 'आपत्ती निवारण व पुनर्वसनात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर'या विषयावर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, 'कुंभमेळ्यात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांचे, 'नागरी क्षेत्रात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांचे, 'वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरया विषयावर कृषी आयुक्त सुरज मांढरे यांचे तसेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक यांचे व्याख्यान होणार आहे.


 

नॅस्कॉमचे विशेषज्ञ

            'कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)' या विषयावर एलटीआय माईंडट्रीचे  'इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)' या विषयावर एलायड डिजिटलचे रवींद्र देशपांडे यांचे ,'ब्लॉकचेनया विषयावर बेकर ह्युजेस या विषय लौकिक रगजी यांचे ,'सायबरसुरक्षाया विषयावर नॅस्कॉमचे प्रसाद देवरेसुक्रित घोष यांचे,'स्मार्ट मिटिंग्स कशा घ्याव्यातया विषयावर झूमचे शैलेश रंगारी व मेहर उल्लीपालेम यांचे, 'डिजिटल जागरूकताया विषयावर मास्टेकचे प्राजक्ता तळवलकरराहुल मुळे यांचे व्याख्यान  होणार आहेत.

                   कर्मयोगी भारत हे डिजिटल शिक्षणासाठी मुख्य भागीदार,नॅस्कॉम हे  स्टार्टअप सहयोगी व तंत्रज्ञातील विशेषज्ञाचे भागीदारइन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - पोषण व आरोग्य संवर्धनासाठी पाककला सत्र या सर्वांचा या प्रशिक्षण उपक्रमात सहभाग असणार आहे.

आजीवन शिक्षणाचा प्रसार

              डिजिटल इंडियाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत, TECH- वारीने निरंतर शिक्षण संस्कृतीला चालना दिली आहे. आयगॉटसारख्या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मचा वापर वाढवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रेरित केले आहेत. महाराष्ट्रातील 5 लाख कर्मचारी आयगॉटवर आहेत व 10 लाखांहून अधिक कोर्स पूर्ण केले आहेत.

प्रशासनातील नवोपक्रमांना चालना

            TECH-वारी हे सिद्ध करते कीकेवळ खासगी क्षेत्रच नाही तर शासनही नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून परिवर्तन साधू शकते. सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना नवीन कल्पना आणि डिजिटल उपायांमध्ये सहभागी करून महाराष्ट्र एक अभिनवकार्यक्षम व लोकाभिमुख प्रशासन घडवत आहे.

नवसंधी निर्माण करणारा उपक्रम

           TECH-वारी हे केवळ शिक्षणापुरते सिमित नसून, उद्योजकता व नाविन्यपूर्ण उत्पादने यांना संधी देणारे हे व्यासपीठ आहे. कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता विभागाच्या सहकार्याने "महाराईज- स्टार्टअप पिचिंग" हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. ज्यात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2025 मधून विजयी ठरलेल्या 24 स्टार्टअप्सना प्रशासनातील  वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपले उत्पादने व सेवा  सादर करण्याची संधी मिळणार आहे.

भविष्याकडे निर्धारपूर्वक पाऊल

            TECH-वारीच्या माध्यमातून महाराष्ट्र ठामपणे सांगतोय - आपण फक्त बदलाचा स्वीकार करत नाहीतर बदलाचे नेतृत्व करतो आहोत. प्रत्येक कर्मचारी हा परिवर्तनाचा वाहक आहे आणि एका तंत्रसज्जप्रगत व संवेदनशील महाराष्ट्रासाठी आपली जबाबदारी पार पाडत आहे.

                                          

TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल"

 TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल"

            मुंबई, दि. 29 : सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने "TECH वारी - टेक लर्निंग वीक" या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वस्तरांवरील कर्मचाऱ्यांना डिजिटल युगासाठी आवश्यक ज्ञानसाधने आणि विचारसरणीने सज्ज करणारा हा उपक्रम आहे. ५ ते ९ मे२०२५ दरम्यान मंत्रालय, मुंबई येथे TECH-वारी हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. हा प्रशिक्षण उपक्रम महाराष्ट्राच्या प्रशासनात होणाऱ्या डिजिटल परिवर्तनातील आघाडीचा ठरणार आहे. वारी या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या संकल्पनेवर आधारित TECH-वारी ही समर्पण व सामूहिक प्रगतीचे प्रतीक आहेजे शासनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये निरंतर शिक्षण व सहयोगाची भावना जागृत करते. या सामूहिक प्रवासाचा उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान आत्मसात करून अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासनाकरीता सक्षम करणे हा आहे.

उदयोन्मुख तंत्रज्ञानाद्वारे सक्षमीकरण

                  TECH-वारीचा गाभा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सहजसोपे आणि समजण्याजोगे बनवणे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेनइंटरनेट ऑफ थिंग्ज् (IoT), सायबर सुरक्षाडिजिटल फायनान्स अशा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे हे जटिल विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जातील. प्रशासन सक्षमीकरण, सेवा प्रदान व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल हे सांगितले जाईल. केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर मानसिक व भावनिक आरोग्यही महत्त्वाचे आहे, सर्वांगीण आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी TECH-वारीमध्ये तणाव व्यवस्थापन, संगीत थेरपीध्यानधारणा, कार्य-जीवन समतोल या विषयांवर विशेष सत्रे आयोजित केली आहेत. यामुळे एक संतुलित व सुदृढ शासकीय कर्मचारी वर्ग घडवण्यास मदत होईल.

प्रसिद्ध वक्त्यांचा अपूर्व मेळा

            या कार्यशाळेत सुप्रसिद्ध वक्त्यांचा समावेश असून 'प्रभावी व तणावमुक्त जीवनया विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपालदास यांचे ५ मे २०२५ रोजी व्याख्यान होणार आहे. 'प्रवास पाककृतीचा'या विषयावर ६ मे २०२५ रोजी सुप्रसिद्ध शेफ माधुरा बाचल यांचे व्याख्यान होणार आहे.'आरोग्यपूर्ण जीवनशैलीया विषयावर रूजता दिवेकर यांचे ७ मे रोजी तर,'जीवन संगीतया विषयावर डॉ.संतोष बोराडे यांचे ८ मे रोजी २०२५ रोजीध्यान आणि अंतरिक शांती या विषयावर व्याख्यान होणार आहेत.

प्रशासनातील तंत्रज्ञान परिवर्तक

              'तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचे परिवर्तनया विषयावर सचिव (MeitY) श्री. एस. कृष्णन,'कृत्रिम बुद्धिमत्ता'या विषयावर मुख्य कार्यकारी अधिकारी एआय इंडिया मिशन चे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंह यांचे,'विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेक'या विषयावर निती आयोगाच्या फेलो देबजानी घोष यांचे, 'भाषा अडथळे दूर करणारे तंत्रज्ञान'या विषयावर डिजिटल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांचे व्याख्यान होणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील प्रशासनाचे अधिकारी

              'महसूल विभागात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर'या विषयावर महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांचे, 'स्टार्टअप डेमो डे - महा-राईज प्लॅटफॉर्म'या विषयावर कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, 'आपत्ती निवारण व पुनर्वसनात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर'या विषयावर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, 'कुंभमेळ्यात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांचे, 'नागरी क्षेत्रात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांचे, 'वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरया विषयावर कृषी आयुक्त सुरज मांढरे यांचे तसेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक यांचे व्याख्यान होणार आहे

वडाळा मुंबई येथील आधुनिकीकृत नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन

 वडाळा मुंबई येथील आधुनिकीकृत नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन

नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन

 

मुंबई, दि. 29 : भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. मात्र त्यासोबतच देशात अंध आणि दृष्टीबाधित लोकांची संख्या देखील फार मोठी आहे. सामाजिक व आर्थिक कारणांमुळे अंधत्वावर उपचार करू न शकणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे. या सर्वांना दृष्टिलाभ करून देण्यासाठी आधुनिक नेत्र रुग्णालयांनी ग्रामीण आणि आदिवासी भागात वेळोवेळी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करावी. तसेच नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

वडाळा मुंबई येथील अद्ययावतीकरण करण्यात आलेल्या आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाचा शुभारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. आदित्य ज्योत नेत्र रुग्णालय हे 35 वर्षे जुने नेत्र रुग्णालय आता विविध देशांमध्ये नेत्र रुग्णालयांचे जाळे असलेल्या अगरवाल नेत्र रुग्णालय साखळीचा भाग झाले आहे.

आदिवासी भागांचे संविधानिक पालक या नात्याने आपण राज्यातील आदिवासी भागांमधील लोकांच्या आरोग्याबाबत चिंतीत आहोत. या दृष्टीने नेत्र रुग्णालयांनी ग्रामीण तसेच आदिवासी बहुल भागात नेत्र चिकित्सा शिबिरे आयोजित करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. अगरवाल नेत्र रुग्णालयाने गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी फिरते नेत्र रुग्णालय सुरु केल्यास ती भारतमातेची चांगली सेवा ठरेल असे राज्यपालांनी सांगितले. 

आपण झारखंड येथे राज्यपाल असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला अनेक लोकांकडून नेत्रदानाची प्रतिज्ञा करवून घेतली होती तसेच आपण आपल्या कुटुंबीयांसह नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता असे सांगून यंदा प्रधानमंत्र्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७,५०० लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करणार आहोतया दृष्टीने अधिकाधिक लोकांनी नेत्रदानासाठी संकल्प करावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

सुरुवातीला राज्यपालांनी आधुनिकीकृत आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय सेवा प्रमुख डॉ. एस. नटराजन यांनी राज्यपालांच्या दृष्टीची तपासणी केली.   

उद्घाटन सत्राला अगरवाल आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अगरवालडॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या मुख्य नियोजन अधिकारी डॉ. वंदना जैनराज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi