Tuesday, 7 January 2025

Patna मे पा सौ साल पुरणा शिवमंदिर


 

कुंभमेळा शास्त्रीय कारण

 


Unique daredevilry in 20 sports

 


दर घोटाळा: कोट्यवधींची फसवणूक करून, गुंतवणूकदारांची

*दा

दर घोटाळा: कोट्यवधींची फसवणूक करून, गुंतवणूकदारांची फसवणूक करून टोरेस ज्वेलरीचा मालक फरार* दादर येथील टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कंपनीने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आल्यामुळे, गुंतवणूकदार आता आपल्या मूळ रकमा परत मिळवण्याची मागणी करत आहेत. अनेक गुंतवणूकदारांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला काही देयके दिल्यानंतर, मागील दोन आठवड्यांपासून कोणतेही हप्ते मिळालेले नाहीत. यामुळे गुंतवणूकदार निराश झाले आहेत. कंपनीकडून कोणताही संपर्क किंवा माहिती मिळत नसल्याने गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. टोरेस कंपनीने गेल्या वर्षभरात मुंबईतील विविध भागांमध्ये 10% परताव्याचे आकर्षक आश्वासन दिले होते. मात्र, अलीकडे देयके थांबवल्याने गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. संतप्त गुंतवणूकदार आता मूळ रकमेच्या परताव्याची मागणी करत आहेत आणि सांगत आहेत की, "आम्हाला व्याज नको, फक्त आमचे पैसे परत द्या." अहवालांनुसार, नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, कंपनीचा मालक सध्या परदेशात असल्याचे समजते. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमलेली असतानाही *शिवाजी पार्क दादर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे. दादर येथील शिवाजी पार्क पोलीस स्टेशन हे नेहमी अशा घोटाळ्यांमध्ये दुर्लक्ष करत असते व कारवाई करण्यास हलगर्जीपणा आणि दिरंगाई दाखवत असते. अद्याप कोणताही गुन्हा नोंदवला गेला नाही, तसेच कोणत्याही चौकशीचे आदेश देण्यात आलेले नाहीत.* *या प्रकरणावर आधारस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष सतीश थोरात यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रशासन आणि स्थानिक नेत्यांवर टीका करत म्हटले आहे की, "दादरसारख्या ठिकाणी एवढा मोठा घोटाळा उघडपणे घडत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी शांत आहेत. गरीब फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी हेच अधिकारी तत्पर असतात, मग कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?"* *सतीश थोरात यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, टोरेस कंपनीसारख्या घोटाळ्यांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी. अशा आर्थिक घोटाळ्यांविरोधात ठोस पावले उचलून जनतेला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.*

गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी जागरूकतेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा

 गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी जागरूकतेने 

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम

नांदेड दि. 6 जानेवारी :- बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) अर्थात कृत्रिम बुध्दीमत्ता वापरुन दैनंदिन कामे अधिक गतीमान व अचूक करण्यावर भर देण्यात येत आहे. माध्यम प्रतिनिधीनीही गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी जागरूकतेने पत्रकारितेत कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावाअसे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज जिल्हा प्रशासनपोलीस प्रशासनविविध पत्रकार संघटना व जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पण दिनाला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी पत्रकारांसाठी आयोजित 'कृत्रिम बुद्धीमत्ता आणि बातमीदारी', या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमारजिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्यासह नांदेड येथील ज्येष्ठ संपादकवरिष्ठ पत्रकारवार्ताहरजिल्हा प्रतिनिधीविविध वाहिन्यांचे प्रतिनिधीसमाज माध्यमातील प्रतिनिधी उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धीमत्ता या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी हे तंत्रज्ञान सकारात्मकतेने व प्राधान्याने आत्मसात केले पाहिजे.आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला अनेक कामे सहजसुलभ झाले असून एका क्लिकवर अनेक विषयाची माहिती खूप कमी कालावधीत मिळू शकते. तसेच अनेक श्रमाची कामेबौध्दिक कामे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करणे शक्य झाले आहे. विविध विषयाची माहिती कमी वेळेत संकलित करणे शक्य झाले आहे. माहितीपूर्ण बातमी देण्यासाठी वाचकांना अधिक शिक्षित करण्यासाठी व अतिरिक्त माहिती देण्यासाठीबातमीतील गुणवत्ता वाढवण्यासाठी याचा वापर करावा. यातील फायदेशीर बाबीचा विचार करुन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास निश्चितच गतीशील बातमीदारीसाठी फायदा मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चॅटजिपीटीजेमीनीमेटा अशा काही प्राथमिक ॲपच्या वापराला नवपत्रकारांनी सुरुवात करावीसरावातून यावर प्राविण्य मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सोबतच त्यांनी यातील धोक्याची जाणीव करून दिली. बहुतांश डाटा हा विदेशातील असल्यामुळेमाहिती कोणाकडून निर्माण झाली असावी याबाबतही तपासणी करणे खूप आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. अस्मितापरंपरासंस्कृती भंजन होणार नाही. तसेच आपली लिखाणाची शैली गमावली जाणार नाही. आपली बातमीवरील लिखाणावरील व्यक्तिगत छाप कमी होणार नाही याचीही काळजी घेणे एक बातमीदार म्हणून आवश्यक असल्याचे  सांगितले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार यांनीही संबोधित केले .बातमीदारीला रंगत आणते ते स्पॉट रिपोर्टिंगग्राउंड रियालिटी हे स्पॉट रिपोर्टिंग मधून समजते. त्यामुळे आपल्या बातमीदारीत कॉपी-पेस्टची निरसता येणार नाहीयाची काळजी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यावीअशी सूचना त्यांनी केली. काळानुसार माध्यमात खूप बदल घडत आहेत. परंतु स्थानिक पातळीवरील महत्वाची कामे किंवा बातमीतील भावकॉपी राईटॲपमध्ये संकलित करण्यात येत असलेले माहितीचे वर्गीकरणयाबाबत अनेक फायदे व तोटे आहेत. त्याचे वर्गीकरण करण्याचे प्राविण्य मिळवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणालीचा शासनात वापर करण्यात येत असून नुकतेच नागपूर येथे कृत्रिम बुद्धीमत्ता सेंटर सुरु केले आहे. पोलीस विभागाच्या तपासात सुध्दा याचा उपयोग मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. सर्व माध्यमाद्वारे आपण सध्या कृत्रिम बुद्धीमत्ता या तंत्रज्ञानाच्या जवळ पोहोचलो आहोत. यांचा चांगला कायदेशीर वापर करणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी श्री. टाके यांनी खिळे लावण्यापासून सुरू झालेल्या पत्रकारितेला आता कृत्रिम बुद्धीमत्ता सारख्या नव्या आयुधाच्या वापराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या बदलाला समजून घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करताना ज्यांच्याकडे उत्तम ज्ञान आहेवाचन आहेसमज आहेपरिणामाची जाणीव आहेअशाच पत्रकारांना या नव्या तंत्रज्ञानाचा अधिक वापर होणार आहे. त्यामुळे पत्रकारितेतील मूलभूत आणि पायाभूत अशा बाबींसाठी प्रशिक्षणवाचन आजही आवश्यक असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाची सुरुवात करताना मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संतोष पंडागळे यांनी पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी श्री. राऊत यांचे स्वागत केले. तर प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार यांचे स्वागत केले.

0000

*-li.आनंदी°पहाट.il-* 🌻 *राजस अन्नसेवनाची*

 🌹⚜️🌸🔆🌅🔆🌸⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


            *राजस अन्नसेवनाची*


🌸🌾🛕🔆🌞🔆🛕🌾🌸


        *जपाकुसुम संकाशं*

        *काश्यपेयं महद्‌द्युतिम् ।*

        *तमोरिंसर्वपापघ्नं*

        *प्रणतोऽस्मि दिवाकरम् ॥*

        *..... महर्षी व्यास*


        *जास्वंद फुलाप्रमाणे लाल रंग असलेल्या, कश्यप ऋषीचा पुत्र असलेला, तेजस्वी, अंधाराचा शत्रू आणि पापनाशक असलेल्या दिवाकराला (सूर्याला) मी प्रणाम करतो.*

        *"उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म" ही आमची अन्न सेवनाची भावना. भारतीय संस्कृतीच्या ऋतू चक्राप्रमाणे असलेले सण.. प्रथापरंपरांचे अर्थ.. फायदे आता जगमान्य झालेत. धनुर्मास परंपरा ही यापैकीच एक आहे.*                  

        *सूर्याने धनु राशीत प्रवेश केल्याने सध्या सुरू असलेल्या महिन्याला धनुर्मास.. धुंधुरमास म्हणतात. या धनुर्मासातील राजस भोजनाचा आस्वाद आगळाच. जगभरात रोज अन्न ग्रहण सगळेच करतात. पण सध्या भारतातील सूर्योदयाच्या वेळी जे अन्न ग्रहण होतेय त्याचा हेवा देवराज इंद्रालाही वाटावा असे हे राजस अन्न आहे.*

        *बाहेर पहाटे कुठे थंडी.. कुठे धुके आहे. पण घरोघरी भल्या पहाटे स्वयंपाक सुरू आहे. विज्ञानही हे सांगते की, ब्रह्म मुहुर्तावर पहाटेच्या वेळी हवा अतिशय शुद्ध असते. प्राणवायूचे प्रमाण भरपूर असते. हे वातावरण, प्रदूषणमुक्त उत्साहवर्धक असते. या आल्हादी शुद्ध वातावरणात शिजवलेले अन्न.. त्याचे सेवन हे अत्युत्तम. याचा आरोग्याला एवढा फायदा होतो की, मग जगातील कोणत्याही घातक विषाणूने दारावर कितीही टकटक केली तरीही अपाय होत नाही. म्हणूनच धुंधुर मासात पूर्व दिशेला सूर्याची रांगोळी रेखाटून सूर्योदयवेळी नैवेद्य दाखवला जातोय.*

        *थंडीत पहाटेच भूक लागते. जठराग्नी प्रज्वलीत होतो, त्याला शांत करणारा हा सूर्यदेवाला अर्पण करायचा नैवेद्य. हा नैवेद्यच नाही तर घरघुती आयुर्वेदीय औषधच. बाजरीची भाकरी.. वांग्याची.. पापडी.. मटार यांची लेकुरवाळी भाजी, मुगाच्या डाळीची खिचडी, त्यावर लोणी.. तुप.. सोबत शेंगदाणा चटणी असा हा पहाटेच दिवसभर उर्जा देणारा गरिबांचाही राजेशाही आहाराचा नैवेद्य. खाणारेही संतृप्त आणि ही भक्तांची संतृप्ती बघून सूर्यदेवही संतुष्ट.*

        *काळ कितीही बदलला तरीही आज ही परंपरा कायम आहे. अनेक मंदिरात तसेच शहरात घरोघरी किमान एक दिवसतरी सूर्याला हा नैवेद्य दाखवला जातो. तर ग्रामीण भागात तर वारकरी बांधवांकडून ही परंपरा अव्याहत सुरु आहे.*

        *सूर्य.. ज्याच्या कृपेशिवाय हे जीवन जगणे अशक्यच. तो प्रभातीच सोन्याचा रथ घेऊन येतो, गावाला जागे करतो. तो येताच जीवनातील अंधाराचा अंत करतो. ज्ञान दीप लावून जीवनात चैतन्य निर्माण करतो. त्याला पूजेत साध्या पुष्प.. पत्राचीही अपेक्षा नाही. शिवाय न बोलवताही भक्तांची काळजी करायला स्वतः घरी येतो, कारण भक्तांमध्ये त्याचा जीव गुंतलाय. तो निरपेक्षपणे भक्तांचे सदैव भलेच करतो.* 

        *मग चराचराला संजीवनी देणाऱ्या, गरीबांनाही राजस अन्न उपलब्ध करुन देणाऱ्या.. जीवनाला उर्जा देत आमचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या या सूर्य देवाविषयी कृतज्ञता व्यक्त करुन वंदन करुया.*


🌺🍃🌾🔆🛕🔆🌾🍃🌺


            *॥ सूर्याष्टकम् ॥*


  *आदिदेव नमस्तुभ्यं*

  *प्रसीद मम भास्कर ।*

  *दिवाकर नमस्तुभ्यं*

  *प्रभाकर नमोऽस्तुते ॥*


  *सप्ताश्वरथमारूढं*

  *प्रचण्डं कश्यपात्मजम् ।*

  *श्वेतपद्मधरं देवं तं*

  *सूर्यं प्रणमाम्यहम् ॥*


  *लोहितं रथमारूढं*

  *सर्वलोकपितामहम् ।*

  *महापापहरं देवं तं*

  *सूर्यं प्रणमाम्यहम् ॥*


  *त्रैगुण्यं च महाशूरं*

  *ब्रह्माविष्णुमहेश्वरम् ।*

  *महापापहरं देवं तं*

  *सूर्यं प्रणमाम्यहम् ॥*


  *बृंहितं तेजःपुञ्जं च*

  *वायुमाकाशमेव च ।*

  *प्रभुं च सर्वलोकानां*

  *तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥*


  *बन्धूकपुष्पसङ्काशं*

  *हारकुण्डलभूषितम् ।*

  *एकचक्रधरं देवं*

  *तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥*


  *तं सूर्यं जगत्कर्तारं*

  *महातेजःप्रदीपनम् ।*

  *महापापहरं देवं*

  *तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥*


  *तं सूर्यं जगतां नाथं*

  *ज्ञानविज्ञानमोक्षदम् ।*

  *महापापहरं देवं*

  *तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥*


        *॥ इति श्रीशिवप्रोक्तं*

        *सूर्याष्टकं सम्पूर्णम् ॥*


🌸🥀🎶🔆🌞🔆🎶🥀🌸


  *संगीत : केदार पंडित* 

  *स्वर : पं. जसराज*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧

     

   *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

              *-०७.०१.२०२५-*


🌻🍃🌸🥀🌺🥀🌸🍃🌻                   

नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करावीत

 नवी मुंबईनागपूरशिर्डी विमानतळांची कामे 

गतीने मुदतीत पूर्ण करावीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विमानतळांच्या विकास कामांचा आढावा

मुंबईदि. 6 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूरशिर्डी विमानतळांची कामे दिलेल्या मुदतीत गतीने पूर्ण करावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व विमानतळांच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे फार गरजेचे आहे. देश पाच ट्रीलीयन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असतानाहे क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे.याक्षेत्रातील बारीक बारीक गोष्टीवर देश आणि राज्याला काम करावे लागणार आहे. या क्षेत्रातील वाढती संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे.  सोलापूर आणि कोल्हापूर येथे नाईट लँडिंग होईलअसे नियोजन करावे. शिर्डी नाईट लँडिंग सुविधा लगेच सुरू करावे. नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे अडलेले प्रश्न ३१ मार्चपर्यंत सोडवावे. जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करावे, पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करावी. पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करावी अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, वाढवण बंदर हे केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. जगातील सर्वात मोठ्या १० बंदरापैकी एक हे बंदर असणार आहे. देशातील सर्वात मोठी व्यापारी वाहतूक या ठिकाणाहून होणार आहे. याभागातून बुलेट ट्रेनकोस्टल रोड जाणार आहे. याठिकाणी चौथी मुंबई साकारणार आहे.यासाठी वाढवण येथे तात्काळ नवीन विमानतळाचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाची चांगली प्रगती असुन अधिक गतीने काम सुरू करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. नवी मुंबई विमानतळ 85 टक्के पूर्ण झाले आहे. त्याची क्षमता मुंबई विमानतळापेक्षा दुप्पट असणार आहे. कामे गुणवत्तापूर्ण  कालमर्यादेत करण्यासाठी प्रयत्न करावा. अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

नाईट लँडींगची सुविधा असलेल्या विमानतळांविषयी असलेल्या अडचणी सोडवाव्यात. विमानतळांच्या कामांना होत असलेल्या उशिराची कारणे शोधून त्यावर मार्ग काढावा आणि कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

यावेळी नवी मुंबईनागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळांविषयी सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये झालेले कामउर्वरित कामासाठी लागणारा कालावधीप्रलंबित परवानग्याआर्थिक बाजू, भू-संपादन अशा विविध विषयांचा आढावा घेतला. याबरोबर राज्यातील सर्व विमानतळांचा सादरीकरणाच्या माध्यमातून आढावा घेतला.

यावेळी  नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सह सचिव रुबिना अलीअसंगबा चुबा एओसहसंचालक नयोनिका दत्ताजे. टी. राधाकृष्णप्रादेशिक कार्यकारीभारतीय विमानतळ प्राधिकरणपश्चिम क्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी फैज अहमद किडवाईसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासूनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री सचिवालय तसेच विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिवसचिव आदी उपस्थित होते.


Featured post

Lakshvedhi