Monday, 11 December 2023

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 'शाळेत चला अभियान' राबविणार

 शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी

'शाळेत चला अभियानराबविणार

 - मंत्री दीपक केसरकर

            नागपूरदि. ११ : राज्यात ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात 'शाळेत चला अभियानराबविण्यात येईलअशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.

             मंत्री श्री. केसरकर म्हणाले की१७ ऑगस्ट२०२३ ते ३१ ऑगस्ट२०२३ या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यात १६२४ मुले व १५९० मुली असे एकूण ३२१४ बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. या सर्वेक्षणानुसार संपूर्ण मुंबईत एकूण ३५६ बालके शाळाबाह्य आढळून आले असून ही सर्व ३५६ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यात ३८० बालके शाळाबाहय आढळून आले असून त्यापैकी २९७ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेतरायगडमध्ये ३८ बालके शाळाबाहय आढळून आले असून ती सर्व बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. तर पालघर मध्ये ९२८ बालके शाळाबाहय आढळून आले.  सर्वेक्षणाच्या कालावधी मध्ये ७१ बालके व सर्वेक्षणाच्या कालावधी नंतर ९४ अशी एकूण १६५ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. उर्वरीत ७६३ बालकांना देखील नजीकच्या शाळेत दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

           राज्यात विशेषत: पालघरठाणे आणि बुलढाणा या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जाईल. शालेय शिक्षण विभागमहिला व बालकल्याण आणि नगरविकास विभागाच्या समन्वयातून शाळांची दुरुस्तीशाळेतील विद्यार्थी संख्येत वाढ आदी बाबींवर लक्ष दिले जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यासंदर्भात सदस्य जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला होता.

शिक्षक भरती प्रक्रिया सुरू

            राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय बिंदूनामावली अंतिम करण्यात आली आहे. आता विद्यार्थांना पसंती क्रमांक देण्यास सांगितले जाईल. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

            या वेळी सदस्य ॲड. आशिष शेलारनाना पटोलेॲड. यशोमती ठाकूरयोगेश सागर आणि बाळासाहेब थोरात यांनी उपप्रश्न विचारले.

000

येईल *चाळीशी येईल *पन्नाशी

 ⚜️🔱⚜️🔱⚜️🔱⚜️🔱⚜️

एक सुरेख कविता...


                   🌸जगणं 🌸

           

        येईल *चाळीशी

       येईल *पन्नाशी 

        करायची नाही 

        कुणीच *चिंता,*

        प्रत्येक दिवस 

      मजेत जगायचा

        वाढवायचा नाही 

        अपेक्षांचा *गुंता.* 


       वय झालं 

     म्हातारपण आलं,

       उगाच *कोकलत* 

       बसायचं नाही.

       विनाकारण *बाम* लावून,

       चादरीत *तोंड* खुपसायचं नाही.


       तुम्हीच सांगा 

      छंद जोपासायला,

      वयाचा संबंध* असतो कां ?

      रिकामटेकडं *घरात* 

              बसून

        माणूस *आनंदी* 

        दिसतो कां ?


        पोटा-पाण्यासाठी 

       *पोरं-सुना*

        *घर* सोडून जाणारच, 

         प्रत्येकाच्या 

        आयुष्या* मध्ये

         असे *रितेपण* 

         येणारच. 


         *करमत* नाही 

         *करमत* नाही

         सारखे-सारखे 

        *म्हणायचे* नाही,

       *आवडत्या कामात*

        *दिवस घालवायचा*

         उगाचच *कुढत* 

         बसायचं   नाही.


         घरातल्या *घरात* 

         वा *बागेत*

       *हिंडाय-फिरायला*  

        जायचं,

         वय जरी *वाढलं* 

        असलं तरी

         मनपसंत *गाणं* 

         मनमोकळं गायचं.


          *गुडघे* गेले,  

    *कंबर* गेली

          नेहमी नेहमी 

    *कण्हायचं* नाही,

          आता आपलं 

          काय    राहिलं?

          हे फालतू वाक्य कधीच        *म्हणायचं* नाही.


         पिढी दर पिढी *चालीरीतीत*

         थोडे फार *बदल* होणारच, 

         पोरं-पोरी त्यांच्या *संसारात* 

         कळत नकळत *गुंतणारच.* 


         तू-तू, मै-मै, जास्त *अपेक्षा*

         कुणाकडूनही *करायची*    नाही,

         मस्तपैकी *जगायचं* सोडून

         रोज थोडं थोडं *मरायचं* नाही.


          स्वत:च स्वत:ला *समजवायचं* असतं

          पुढे पुढे *चालत* 

  *राहायचं     असतं,*

          वास्तू *तथास्तू* 

        *म्हणत असते*

          हे उमजून निरामय *जगायचं* असतं.


  *चाळीशी पन्नाशी पर्याय पोहचलेल्या 

*सर्व  मित्रांमैत्रिणींना समर्पित. *

🌸🌸 🌹 🌸🌸

Our Ancient 🇮🇳 Bharatiya Sages were actually the scientists.*

 *Our Ancient 🇮🇳 Bharatiya Sages were actually the scientists.* They've given certain Crucial HEALTH TIPS in Sanskrit translated into English for common understanding.


*Highly relevant even today !*


*1. अजीर्णे भोजनं विषम्।* 

If previously taken Lunch is not digested..taking Dinner will be equivalent to taking Poison. Hunger is one signal that the previous food is digested 


*2. अर्धरोगहरी निद्रा।*

Proper sleep cures half of the diseases..


*3 मुद्गदाली गदव्याली।*

Of all the Pulses, Green grams are the best. It boosts Immunity. Other Pulses all have one or the other side effects. 


*4. भग्नास्थि-संधानकरो लशुनः।*

Garlic even joins broken Bones.. 


*5. अति सर्वत्र वर्जयेत्।*

Anything consumed in Excess, just because it tastes good, is not good for Health. Be moderate. 


*6. नास्ति मूलमनौषधम्।*

There is No Vegetable that has no medicinal benefit to the body.. 


*7.  न वैद्यः प्रभुरायुषः।*

No Doctor is capable of giving Longevity. (Doctors have limitations.) 


*8. चिंता व्याधि प्रकाशाय।*

Worry aggravates ill-health.. 


*9. व्यायामश्च शनैः शनैः।*

Do any Exercise slowly.

(Speedy exercise is not good.) 


*10. अजवत् चर्वणं  कुर्यात्।*

Chew your Food like a Goat.

(Never Swallow food in a hurry. 

Saliva aids first in digestion.) 


*11.  स्नानं नाम मनःप्रसाधनकरंदुः स्वप्न-विध्वंसनम्।*

 Bath removes Depression.

 It drives away Bad Dreams.. 


*12. न स्नानमाचरेद्  भुक्त्वा।*

Never take Bath immediately after taking Food.  (Digestion is affected). 


*13. नास्ति मेघसमं तोयम्।*

No water matches Rainwater in purity.. 


*14.  अजीर्णे भेषजं वारि।*

When there is  indigestion taking plain water serves like medicine.


*15. सर्वत्र नूतनं  शस्तं, सेवकान्ने पुरातने।*

Always prefer things that are Fresh.. 

Whereas Rice and Servant are good only when they are old.


*16. नित्यं सर्वा रसा भक्ष्या:।*

Take the food that has all six tastes.

(viz: Salt, Sweet, Bitter, Sour, Astringent and Pungent). 


*17. जठरं पूरायेदर्धम् अन्नैर्, भागं जलेन च।*

*वायोः संचरणार्थाय चतर्थमवशेषयेत्।*

Fill your Stomach half with Solids, 

(a quarter with Water and rest leave it empty.)


*18. भुक्त्वा शतपथं गच्छेद् यदिच्छेत् चिरजीवितम्।*

Never sit idle after taking Food.

Walk for at least half an hour. 


*19. क्षुत्साधुतां जनयति।*

Hunger increases the taste of food..

In other words, eat only when hungry.. 


*20. चिंता जरा नाम मनुष्याणाम्* 

Worrying speeds up ageing.. 


*21. शतं विहाय भोक्तव्यं, सहस्रं स्नानमाचरेत्।*

When it is time for food, keep even 100 jobs aside. 


*22. सर्वधर्मेषु मध्यमाम्।*

Choose always the middle path. Avoid going for extremes in anything


*Golden words of wisdom in Sanskrit by our sages.*


*Please share with your loved ones.*

भगवान से माँगना नहीं चाहिए और अगर माँगना ही है तो माँगना आना चाहिए।

 *‼️🙏जय श्रीहरि 🙏‼️*


हरे कृष्ण 🙇‍♂️🙏🙇‍♂️🙏


भगवान से माँगना नहीं चाहिए और अगर माँगना ही है तो माँगना आना चाहिए। 

मांगना भी एक कला है जैसे -------- 


प्रहलादजी ने भगवान से माँगा: "हे प्रभु मैं यह माँगता हूँ कि मेरी माँगने की इच्छा ही ख़त्म हो जाए।"


महारानी कुंती ने भगवान से माँगा: "हे प्रभु मुझे बार बार विपत्ति दो ताकि आपका स्मरण होता रहे।"


महाराज पृथु ने भगवान से माँगा: "हे प्रभु मुझे दस हज़ार कान दीजिये ताकि में आपकी पावन लीला गुणानुवाद का अधिक से अधिक रसास्वादन कर सकूँ।"


और सुग्रीवजी तो बड़ा ही सुंदर कहते हैं: "अब प्रभु कृपा करो एही भाँती।सब तजि भजन करौं दिन राती॥"


अथार्त हे प्रभो अब तो इस प्रकार कृपा कीजिए कि सब छोड़कर दिन-रात मैं आपका भजन ही करूँ। 


भगवान से माँगना दोष नहीं मगर साथ में क्या माँगना ये हमें आना चाहिए


*🚩जय श्री कृष्ण🚩*

Sunday, 10 December 2023

मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये

 मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये

                                                                             :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांमध्ये तब्बल १५६ कोटींपर्यंत अर्थसहाय्य वाटप

                               १९ हजार हुन अधिक रुग्णांचे वाचले प्राण

 

                मुंबई दि. 10 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे.या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गोरगरीब - गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

 

                आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १७ महिन्यात १९ हजार पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण १५६ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

                 मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली होती.

                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील जुलै महिन्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली.ऑगस्ट महिन्यात २४४ रुग्णांना १ कोटी १ लाखसप्टेंबर महिन्यात ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाखऑक्टोबर महिन्यात २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाखनोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाखडिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाखजानेवारी २०२३ मध्ये १०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाखमार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९३ लाखएप्रिल मध्ये ११९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाखमे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाखतर जून मध्ये १७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाखजुलै १४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाखऑगस्ट मध्ये १५६७ रुग्णांना १३ कोटी १४ लाखतर सप्टेंबर मध्ये विक्रमी १४०८ रुग्णांना ११ कोटी ७७ लक्ष रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.

                मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे.यामध्ये अँजिओप्लास्टीबायपास सर्जरी ,  कर्करोगावरील शस्त्रक्रिया केमोथेरपी,  डायलिसिसजन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रिया,सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया,रस्ते अपघात ,विद्युत अपघात ,भाजलेले रुग्ण ,जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

 

रेशीम संचालनालयाची गट-क व गट-ड संवर्गातील भरती प्रक्रिया रद्द

 रेशीम संचालनालयाची गट-क व गट-ड संवर्गातील भरती प्रक्रिया रद्द

                 मुंबई दि.१० : रेशीम संचालनालयाने जाहिरात क्रमांक ०१/२०२० नुसार दि. १३ मार्च २०२० अन्वये गट-क व गट-ड संवर्गातील अनुसूचित जमाती या प्रवर्गातील वरिष्ठ तांत्रिक सहायक-२ व प्रयोगशाळा परिचर-१ सरळसेवेची पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्याकरीता दि. १३ मार्च  २०२० रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.  ही भरती प्रक्रिया कोवीड २०१९ व प्रशासकीय कारणामुळे राबविण्यात आली नाही. रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील १२४ रिक्त असलेली पदे भरण्याचे प्रस्तावित आहे. या रिक्त पदांमध्ये वरील जाहिराती मधील अनुसूचित जमाती प्रवर्गाचे पदे समाविष्ठ असल्याने जाहिरात क्रमांक ०१/२०२० दि. १३ मार्च २०२० अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली भरती पक्रिया रद्द करण्यात येत आहे असे नागपूर येथील रेशीम संचालक गोरक्ष गाडीलकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.                                                

पालघर जिल्ह्यातील अधिक रकमेच्या वीज देयकांची तपासणी करून सुधारित बिले देणार

 पालघर जिल्ह्यातील अधिक रकमेच्या वीज देयकांची तपासणी करून

सुधारित बिले देणार

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

          मुंबईदि. 8 : पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात काही ठिकाणी अतिरिक्त वीज देयके दिल्याचे निदर्शनास आले आहे. त्याठिकाणी सुधारित देयके देऊन ते भरण्यासाठी टप्पे तयार करून देण्यात आले आहेत. अजूनही काही रहिवाश्यांना अतिरिक्त देयके आल्याची तक्रार आल्यास त्यांनाही वीज मीटरचे प्रत्यक्ष फोटो घेऊन सुधारित देयक देण्यात येतीलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. चुकीचे देयक देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

 

सदस्य विनोद निकोले यांनी या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला होता.

 

          उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीमागील वर्षाच्या तुलनेत चुकीची देयके देण्याचे प्रमाण अर्ध्यावर आले असून ते आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जानेवारी 2022 पर्यंत फोटो रिजेक्शनचे 45 टक्क्यांपर्यंत असलेले प्रमाण आता तीन टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. राज्यात स्मार्ट मीटर लावण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वीज वितरण प्रणाली सुधारण्याच्या कामांना गती देण्यात येणार असून वीज चोरी रोखण्यासाठी एबी केबलचा वापर करण्यात येईल. वीज देयक थकित राहिल्याने वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला जातोत्यानंतर पुन्हा जोडणीची प्रक्रिया सोपी करण्यात येईलअसे सांगून वीज देयके समजण्यास सोपी असावीत याबाबत एमईआरसीला सूचना करण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

 

          या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनील भुसाराराजेश टोपेॲड.आशिष जयस्वाल आदींनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi