Tuesday, 1 August 2023

एनसीएचयु विद्यापिठात निवड झालेला नोबेल हा एकमेव भारतीय विद्यार्थी

 नोबेल हजारे यांची तैवानमधील आणखी एका विद्यापिठात उच्च शिक्षणासाठी निवड


* पत्रकार उत्तम हजारे यांच्या मुलाचे घवघवीत यश

* एनसीएचयु विद्यापिठात निवड झालेला नोबेल हा एकमेव भारतीय विद्यार्थी

बीड, दि. ३१ (लोकाशा न्यूज) : बीड येथील पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा नोबेल उत्तम हजारे हा विदेशात शास्त्रज्ञ बनणार असून, तैवानमधील एनडीएचयु विद्यापिठानंतर तैवानमधील आणखी एका ताईचुंग येथील एनसीएचयु विद्यापिठात त्याची उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे .नोबेल हजारे यांच्या या यशाबद्दल बीड जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.


 औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा विद्यार्थी असलेला नोबेल हजारे यांचे प्राथमिक शिक्षण बीड येथील संस्कार विद्यालयात झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण बलभीम महाविद्यालयात झालेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एमएस्सी पूर्ण केल्यानंतर, पीएचडीसाठी झालेल्या पुर्व परिक्षेत नोबेल हजारे हा मुंबई विद्यापीठ औरंगाबाद विद्यापीठ व नांदेड विद्यापीठासाठी पात्र झाला होता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रो. बी.एन. डोळे सर, एम. डी. सिरसाट सर ,प्रो. अनिता मुरुगकर मॅडम, मेंटार विजयकिरण नरवडे सर ,प्रो. भरत मडावी सर , प्रो. ताटे बी. टी.सर तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केल्यानंतर, नोबेल हजारे यांची तैवान देशातील नॅशनल डाँग युनीव्हरसिटी (एनडीएचयु) विद्यापिठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली होती, त्यानंतर ताईचुंग येथील एनसीएचयु या नामांकित विद्यापिठात त्याची निवड झाली आहे. याबाबतचे पत्र त्यास नुकतेच प्राप्त झाले आहे.

    या महिन्यात जाणार तैवानला

नोबेल हजारे यांनी विद्यापिठातील प्रवेश निश्चित केला असून, या महिन्यात पंधरा ऑगस्टनंतर तो विदेशात जाणार आहे. एनसीएचयु विद्यापिठात उच्च शिक्षणासाठी निवड झालेला नोबेल हा एकमेव भारतीय विद्यार्थी आहे .

सिरसमार्गचा नावलौकिक

सिरसमार्ग येथील भूमीपूत्र असलेले ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांच्या मुलाने शैक्षणीक क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन केले असून, सिरसमार्गचा नावलौकिक वाढवला आहे, सिरसमार्ग व परिसरातुन विदेशात शिक्षणासाठी जाणारा नोबेल हजारे हा पहिला वि

द्यार्थी आहे .

राज्यात मंगळवारपासून (दि.1 ऑगस्ट) महसूल सप्ताहाचे आयोजन

 राज्यात मंगळवारपासून (दि.1 ऑगस्ट) महसूल सप्ताहाचे आयोजन

डिजिटल युगात सुलभ आणि जलद सेवा देण्यावर भर !

 

            दरवर्षी राज्यभरात  1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. मागील तीन वर्षे ‘कोविड’मुळे हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नाही. मात्र, यावर्षी 1 ते 7 ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

            महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणेवसुलीच्या नोटीस पाठवणेमोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येईल.

            शासकीय कामात महसूल विभागाची महत्वाची भूमिका आहे. 1 ऑगस्टपासून नवीन महसूल वर्षाला सुरूवात होत असते. या महसूल दिनापासून सर्वसामान्यांना सुलभ आणि जलद सेवा देण्यासाठी अधिकाधिक डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे. वाढती लोकसंख्यानागरिकरणऔद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील कामकाजामध्ये मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. पण या डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास नक्कीच मदत होईल. सर्वसामान्य नागरिकांचा महसूल विभागाशी दैनंदिन कामकाजासाठी संबंध येत असतो. येणाऱ्या काळात महसूल विभाग अधिक लोकाभिमुखपारदर्शक आणि गतिमान होण्याबरोबरच प्रशासनातील सर्व घटकांच्या सक्रिय सहभागावर भर देण्यात येणार आहे. महसूल सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये महसूल विभागभूमी अभिलेख विभाग तसेच मुद्रांक व नोंदणी विभाग यांनी एकत्रितपणे नियोजन करुन गावतालुका आणि जिल्हा पातळीवर कसे कामकाज करावे याचे या सप्ताहात नियोजन असणार आहे.

            महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विशेष मोहीमकार्यक्रमउपक्रमशिबिरेमहसूल अदालतचे आयोजन करण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. 2 ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 3 ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा’ हा कार्यक्रम4 ऑगस्ट रोजी ‘जनसंवाद’5 ऑगस्ट रोजी ‘सैनिकहो तुमच्यासाठी’6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचा संवाद आणि 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभ होईल.

            या कार्यक्रमांचे नियोजन करुन याबाबतची प्रचार व प्रसिध्दी करण्याबरोबरच महसूल विभागभूमी अभिलेख आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्यामार्फत शासकीय योजनांची माहिती विशद करणाऱ्या लघु चित्रफिती तयार करुन देण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हाधिकारीउपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्कहेल्पलाईन तयार करुन मदत करण्याकरिता यंत्रणा कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहादरम्यान शासनाचे महत्वाचे कायदेविकास योजनाउपक्रमधोरणांना प्रसिद्धी देण्यासाठी सखोल माहिती असलेल्या तज्ञाच्या मुलाखती तसचे व्याख्यानांचे प्रक्षेपण स्थानिक वृत्तवाहिन्यांवर करण्यात येईल. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रेत्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहितीपत्रके तयार करुन नागरिकांना देण्यात येतील.

            महसूल विभागाला मोठी परंपरा आहे. राज्यातील महसूल गोळा करण्याबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमान अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी या विभागावर असते. महसूल दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुधारीत नमुन्यातील 7/12 चे वितरण सुविधाडिजिटल स्वाक्षरीत फेरफार नोंदवहीची वितरण सुविधाई - मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्तनोंदणीशी संलग्न करणे या सुविधा आता देण्यात येत आहे. सर्वसामान्यांना मध्यवर्ती ठेवून त्यांच्या प्रश्नांची/अडचणींची सोडवणूक करण्याला प्राधान्य देण्यात येते. याशिवाय सलोखा योजनासुधारित वाळू धोरणमहाराजस्व अभियानाची प्रभावी अंमलबजावणीई पीक पाहणीदस्तनोंदणीचे अद्ययावतीकरण असे अनेक निर्णय गेल्या वर्षभरात महसूल विभागने घेतले. विशेष म्हणजे या सर्व निर्णयांचा लाभ शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना होणार आहे.

महसूल विभाग प्रशासनाचा कणा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

            महाराष्ट्राच्या विकासात आजपर्यंत महसूल या विभागाने महत्वाचे योगदान दिले आहे. यापुढील काळातही हा विभाग सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात अग्रेसर राहील. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडीत असल्याने हा विभाग प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्यांना सहज आणि जलदगतीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यांमध्ये बदल करताना काही कायदे रद्दही करावे लागतात. नवीन डिजिटल युगात नागरिकांना सहजपारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असून यापुढील काळातही हा विभाग लोकाभिमुख करताना सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहीलअसा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

अळूची पाने आरोग्यासाठी वरदान !*

 *अळूची पाने आरोग्यासाठी वरदान !* 

*‘हे’ फायदे जाणून घ्या.* 


अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदातही याचे महत्व सांगण्यात आले आहे. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. या भाजीचे कोणते फायदे आहेत, जाणून घेवूयात.


हे आहेत फायदे -


*ब्लड प्रेशर* 

ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तणावाची समस्या होत नाही.


*वजन* 

यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सक्रिय राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.


*पोटाच्या समस्या* 

पोटांच्या समस्यांवर गुणकारी आहे. पचनक्रिया सुरळीत होते.


*पूरळ* 

अळूची पाने जाळून त्यांची राख नारळाच्या तेलामध्ये मिसळून लावल्यास पूरळ नाहीसे होण्यास मदत होईल.


*दृष्टी* 

यातील व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होतात.


*सांधेदुखी* 

सांधेदुखीत दररोज अळूच्या पानांचे सेवन केल्यास आराम मिळेल


डॉ. प्रमोद ढेरे,


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*



_*(

Monday, 31 July 2023

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांचीदिलखुलास' कार्यक्रमात मुलाखत

 आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांचीदिलखुलास' कार्यक्रमात मुलाखत

            मुंबई, दि. ३१ : आपत्ती व्यवस्थापन ही आज काळाची गरज झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनात नागरिकांशी संवाद साधून जनजागृती करणे हे नियंत्रण आणि कार्यक्षम अंमलबजावणीत महत्त्वाचे आहे. यासाठी यंदाच्या पावसाळ्यात शासनस्तरावर कशा प्रकारे खबरदारी घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासाहेब धुळाज यांनी याविषयी माहिती दिली आहे.


            आपत्कालिन व्यवस्थापन हा आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख भाग आहे. यामध्ये बचाव, शोध आणि शून्य मृत्यू हे महत्वाचे उद्दिष्ट आहे. आपत्ती पीडितांना आपत्तीमधून सोडविण्यासाठी, मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन दलाकडून त्वरित प्रतिसाद देण्यात येतो. त्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येतो. शासन - प्रशासन यंत्रणेच्या जोडीने आपत्तीपूर्व, आपत्तीदरम्यान आणि आपत्ती पश्चात कोणकोणती कामे करावीत याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येते. आपत्कालिन परिस्थितीत केंद्र सरकार, राज्य शासन आणि जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनाची स्वतंत्र यंत्रणा कशा प्रकारे काम करीत आहे याबाबतची सविस्तर माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. धुळाज यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि. 1 आणि बुधवार दि.2 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000

पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांना आवाहन

 पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांना आवाहन

 

            मुंबईदि.३१ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानितविना अनुदानितकायम विना अनुदानित शाळाकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत  सुविधा पुरविण्यासाठी अल्पसंख्याक विभागामार्फत सन 2023-24 साठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

            या योजनेंतर्गत शासनमान्य शाळांना अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            या अनुदान योजनेसाठी इच्छूक शाळांकडून दि. ऑक्टोबर, 2015 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या शाळांचे विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित शाळाकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ७० टक्के व अपंग शाळामध्ये ५० टक्के विद्यार्थी हे अल्पसंख्याक समुदायातील असणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी संबंधित शाळाकनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना शासनाकडून मान्यता मिळालेली असणे आवश्यक आहे.

            स्वयंअर्थसहाय्यित शाळा या योजनेसाठी पात्र असणार नाहीतअसे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीअर्ज सादर करण्याचे आवाहन

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीअर्ज सादर करण्याचे आवाहन


      मुंबई, दि. ३१ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/ व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20, 2020-21, 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.


            यापूर्वी अर्जदार/ संस्था ज्यांनी सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वित्तीय वर्षाकरीता अर्ज केला आहे, त्यांना नव्याने या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ज्या वर्षाकरीता अर्ज केला आहे. त्या वर्षाकरीताचा चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा. या कालावधीकरीता पूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तींनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता विहीत केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी या पुरस्कारासाठी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रांसह करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे व समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी केले आहे. या विविध पुरस्कारांची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


0000

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राबविणारलोकशाहीर अण्णा भाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम'

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राबविणारलोकशाहीर अण्णा भाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम'


- मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. 31 : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.


            या कार्यक्रमामार्फत तयार झालेल्या अभ्यासक्रमातून बांबूपासून शिल्प व वस्तू बनवण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना मिळेल तसेच अर्थार्जनासाठी या कौशल्याचा वापर कसा करावा याबाबतसुद्धा मार्गदर्शन मिळेल. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि स्वयं रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन कार्यरत आहे.


            लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे सर्वांचेच प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या साहित्याचा वसा घेऊन आपण सर्वच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत आहोत. त्यांच्या जयंतीनिमित्त सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. तरुणांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन आपल्या राज्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह आणि राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी उपस्थित होते.


****

Featured post

Lakshvedhi