Wednesday, 10 May 2023

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती

 शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती


– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा


            मुंबई, दि. 9 : शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार ज्ञानराज चौगुले यांचेसह वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.


            शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याच्या उद्दिष्टाने सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतून ६ हजार कृषि फीडर्स सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहेत असे सांगून शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलासाठी वीज पुरवठा खंडीत करु नये असे निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सव्वा दोन लाख सौर कृषि पंप देण्याचे उद्दिष्ट असून गेल्या वर्षी ७५ हजार सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. ज्यांना वीजेची जोडणी नाही त्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्याचे धोरण असून ज्यांच्याकडे वीजजोडणी आहे, त्यांनी मागणी केल्यास त्यांनाही सौर कृषिपंप देण्यासाठी सविस्तर कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


            केवळ एक रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल, असा निर्णय अर्थसंकल्पात घेतला असून विम्याच्या हप्त्याची रक्कम शासन भरणार आहे, त्यासाठी ३३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक अशा विविध योजना शासन राबवित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला जागतिक बॅंकेने मान्यता दिली आहे. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास दोन लाख रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल. प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना जाहीर केली आहे, यात प्रतिवर्ष प्रति शेतकरी ६ हजार रुपये अतिरिक्त राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत, त्यासाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अवकाळी, गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७ हजार कोटी रुपये वाटप केले आहे, सिंचनाच्या २८ योजना मंजूर केल्या आहेत, त्यातून ५ लाख हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            कर्जवसुलीसाठी मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष द्या, छोट्या शेतकऱ्यांच्या मागे लागू नका, त्यांना त्रास देऊ नका अशा सूचना जिल्हा बॅंकांना देण्यात आल्या आहेत. हे सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.


०००००

शेती महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने

 शेती महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने
सोनेवाडी येथे ‘मल्टिमॉडेल पार्क’ उभारण्याबाबतचा आराखडा तयार करावा


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील


 


            मुंबई, दि. 9 : महसूल विभागाअंतर्गत येणारे शेती महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे सोनेवाडी येथे मल्टिमॉडेल लॉजिस्टिक आणि बिझनेस पार्क उभारण्याबाबतचा आराखडा तयार करावा असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज दिले.


            शेती महामंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात आयेाजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.


            महसूल मंत्री श्री. विखे - पाटील म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी यापूर्वी कार्यान्वित झाला आहे. तर दुसरा टप्पा शिर्डी ते इगतपूरी येथील काम पूर्ण झाले आहे. याशिवाय शिर्डी विमानतळावर येथे होणारी गर्दी हे सगळे लक्षात घेऊन आगामी काळात सोनेवाडी येथील एमआयडीसीच्या भूखंडावर मल्टिमॉडेल पार्क उभारण्याबाबतचा आराखडा तयार करावा.


            सोनेवाडी येथे मल्टिमॉडेल पार्क कार्यान्वित झाल्यास येथे अनेक रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्योग, रोजगार वाढीसाठी आवश्यक यंत्रणा, आयटी हब येथे कसे एकाच छताखाली आणता येईल का याबाबतचा सूक्ष्म अभ्यास करुन आराखडा तयार करण्यात यावा. समृध्दी महामार्ग आणि शिर्डी विमानतळामुळे थेट औद्योगिक, कृषी आणि इतर उत्पादनांना थेट देशात आणि विदेशात पाठविणे सोपे होईल. फुड पार्क, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस, पॅकेजिंग सेंटर यासारख्या सुविधाही येथे उपलब्ध करुन देता येऊ शकतील. त्यामुळे याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल तयार करण्यात यावा, असे निर्देशही मंत्री श्री. विखे - पाटील यांनी यावेळी दि

महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान

 महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान


            नवी दिल्ली, 9 : पोलीस सेवेत साहसी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील तीन पोलिसांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.


            राष्ट्रपती भवन येथील दरबार सभागृहात आज ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते याप्रसंगी शौर्य पुरस्कार आणि किर्ती चक्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.


            या कार्यक्रमात महाराष्ट्रातील भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) सोमय मुंडे, पोलीस नाईक टीकाराम काटेंगे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र नेताम यांना नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईसाठी ‘शौर्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.


            आज झालेल्या कार्यक्रमात 29 शौर्य पुरस्कार आणि 8 किर्ती चक्र प्रदान करण्यात आले. यामध्ये पाच मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे.



००००




मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचेराज्यस्तरीय पत्रकारिता

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचेराज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान


ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर, अजय वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान


आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत भरीव तरतूद करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 9 : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सुरू केली असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात येईल आणि या योजनेसाठीच्या अटी यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे सन २०२१ आणि २०२२ चे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार हेमंत गोडसे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रभारी महासंचालक हेमराज बागुल यांच्यासह विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, कार्यवाह प्रवीण पुरो, कोषाध्यक्ष विनोद यादव यांची उपस्थिती होती.


            शासकीय योजनांच्या प्रगतीची, राज्याच्या विकासाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध विकास योजना, त्यांची अंमलबजावणी, या अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील लोकांचा सहभाग जनतेपर्यंत पोहोचविणे व त्याद्वारे संबंधितांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. ही भूमिका जबाबदारीने पार पाडण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना पुरस्कार देऊन मान्यता देणे आवश्यक आहे.


            पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस मदत करण्याच्या उद्देशाने शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचे पुनर्गठन तसेच अधिस्वीकृती समितीचा लवकरात लवकर शासन निर्णय काढला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. बदलत्या काळानुसार स्वरूप बदलत आहे. प्रिंट माध्यमांचे महत्त्व कमी झाले नसल्याचे सांगून इलेक्ट्रॉनिक माध्यमांचेही महत्त्व आहे. आता समाज माध्यम दुधारी तलवारीसारखे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ते विविध विषयाला वाचा फोडत आहे. पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी जे शक्य आहे ते करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांना जाहीर झालेला सन २०२१ चा कृ.पां. सामक राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार श्री. केतकर यांच्या अनुपस्थितीत अनिकेत जोशी यांनी स्वीकारला. सन २०२२ चा ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देवून पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले. यामध्ये सन २०२१ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तपत्र) दै. बीड रिपोर्टर, बीडचे शेख रिजवान शेख खलील, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक माध्यम) न्युज १८ लोकमत, मुंबईचे विलास बडे, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वार्ताहर संघ सदस्य) दै.भास्कर, मुंबईचे विनोद यादव यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तर सन २०२२ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तपत्र) दै.पुण्यनगरी, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक माध्यम )ब्युरो चिफ साम टिव्ही मुंबई च्या रश्मी पुराणिक, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वार्ताहर संघ सदस्य) दै.पुण्यनगरी मुंबईचे किशोर आपटे यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.


            यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य आलोक देशपांडे, मनोज मोघे, कमलाकर वाणी, खंडुराज गायकवाड, भगवान परब यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण पुरो यांनी केले. सूत्रसंचालन रिताली तपासे आणि राजेंद्र हुंजे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष महेश पवार यांनी मानले


0000


राजू धोत्रे/विसंअ/


 

प्रभती सुर नभी रंगते

 






मेट्रो- ३ मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार

 मेट्रो- ३ मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार

मेट्रो रेल्वे खऱ्या अर्थाने मुंबईची जीवनरेषा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चर्चगेट ते विधानभवन मेट्रो-३ भुयारी मार्गाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

 

            मुंबईदि. १० :  मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून येत्या डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत मेट्रो रेल्वेचा हा टप्पा पूर्ण होईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई मेट्रो-३  टप्प्याच्या चर्चगेट ते विधानभवन या भुयारी मार्गाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंहमुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प ) सुबोध गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भुयारी मार्गातून चालत प्रकल्पाची पाहणी केली आणि कामाची संपूर्ण माहिती घेतली. मुंबई मेट्रो मार्ग-३ (कुलाबा-वांद्रे- सिप्झ ) हा मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच वाहतुकीच्या पर्यायी सुविधेसाठी हा मार्ग असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मेट्रोमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला  प्राधान्य देण्यात आले आहे. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हवाध्वनी प्रदूषण होणार नाहीयाची काळजी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            मेट्रो ३ मार्ग हा मेट्रो -१,६ आणि ९ यांना तसेच मोनोरेलला जोडला जाणार आहे. याशिवायउपनगरी रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याशिवाय मुंबईतील विमानतळांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे.  या मेट्रो -3 रेल्वेमार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे तसेच रस्त्यावरील सहा लाख वाहने कमी होतील असा विश्वास  व्यक्त करून या मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत तर दुसरा टप्पा जून २०२४ पूर्वी पूर्ण केला जाईल,  असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            राज्याच्या विकासाचे जे प्रकल्प आहेतत्यांना विलंब होणार नाही. आरेचा कारशेडचा विषय मार्गी लागला आहे. मेट्रो रेल्वेचे अधिकारी- कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होतीलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ प्रकल्प : एक दृष्टिक्षेप

 कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा ३३.५ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग आहे

 या मार्गावर २७ स्थानके असून त्यापैकी २६ भुयारी तर एक जमिनीवर आहे.

 या मार्गामुळे प्रमुख व्यवसाय आणि रोजगार केंद्रेरुग्णालयेशैक्षणिक संस्थाधार्मिक स्थळेमनोरंजनाच्या सुविधा तसेच उपनगरीय रेल्वेशी न जोडलेल्या काळबादेवीगिरगाववरळीआंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांसारख्या भागांना जोडणी मिळेल.

 २०२४ पर्यंत मेट्रो-३ च्या प्रत्येकी ८ डब्यांच्या ३१ गाड्या कार्यरत असतील.

 इतर मेट्रो मार्गमोनोरेलउपनगरीय रेल्वे आणि एसटी बस सेवांशी एकत्रित जोडणी करत असून उपनगरीय रेल्वेतील १५% प्रवासी मेट्रो-३ कडे वळतील.

 सन २०४१ पर्यंत मेट्रो-३ मुळे वाहनांच्या फेऱ्यांमध्ये प्रतिदिन ६.६५ लाखाने घट होईल.

 या मार्गामुळे दरवर्षी २.६१ लाख टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल.

पहिला टप्पा : आरे ते बीकेसी

 एकूण स्थानके या मार्गावर १० स्थानके असून त्यापैकी ९ भुयारी तर एक जमिनीवर आहे.

 अंतर १२.४४ किमी

 दोन गाड्यांमधील कालावधी ६.५ मिनिटे

 पहिल्या टप्प्यातील गाड्यांची संख्या ९ गाड्या

 मेट्रो ३ मार्गाचे पहिल्या टप्प्यातील एकूण ८७.२% काम पूर्ण

 एकूण ९७.८% प्रकल्प बांधकाम पूर्ण

 एकूण ९३% स्थानक बांधकाम पूर्ण

 एकूण ६५.१% प्रणालीची कामे पूर्ण

 रेल्वे रुळाचे एकूण ८६.३% बांधकाम पूर्ण

 सेवेची चाचणी ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे.

दुसरा टप्पा :  बीकेसी ते कफ परेड

 एकूण स्थानके १७ .

 अंतर २१.३५ कि.मी.

 दोन गाड्यांमधील कालावधी ३.२ मिनिटे

 दुसऱ्या टप्प्यातील गाड्यांची संख्या २२ गाड्या

 मेट्रो ३ मार्गाचे (दुसऱ्या टप्प्यातील) एकूण ७६.९% काम पूर्ण

 एकूण ९५.३% प्रकल्प बांधकाम पूर्ण

 एकूण ८८.३% स्थानक बांधकाम पूर्ण

 एकूण ४२.४% प्रणालीची कामे पूर्ण

 रेल्वे रुळाचे एकूण ४६.६% बांधकाम पूर्ण

 हा मार्ग अंदाजे जून २०२४ मध्ये सुरू होणार

 मेट्रो ३ मार्गाचे एकूण ८१.५% काम पूर्ण

 एकूण ९२.८% प्रकल्प बांधकाम पूर्ण

  ८९.८% स्थानकांचे बांधकाम पूर्ण

  ५०.९% प्रणालीची कामे पूर्ण

 रेल्वे रुळाचे ६१.१% बांधकाम पूर्ण

 भुयारी मार्गाचे १००% काम पूर्ण

 ४२ ब्रेकथ्रू संपन्न

 डेपोचे ६३% बांधकाम पूर्ण

 सद्यस्थितीत डेपो ३१ गाड्यांच्या देखभालीसाठी सज्ज

 आरे डेपोमध्ये वेगवेगळ्या कंत्राटदारांच्या समन्वयाने मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहेत. डेपोमध्ये देखभाल आणि कार्यशाळा इमारत कामेऑपरेशन कंट्रोल सेंटर,ओव्हरहेड इक्विपमेंट सिस्टममेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लंबिंगची.कामेस्टॅबलिंग लाइनऑक्झिलरी सबस्टेशनवॉश प्लांटरेल्वे रुळ घालणे इत्यादी कामांचा समावेश आहे.

मेट्रो-३ च्या गाड्या

 आतापर्यंत मेट्रो-३ च्या तीन गाड्या मुंबईत दाखलअजून दोन गाड्या श्रीसीटी आंध्र प्रदेश येथील ऑस्तोम कारखान्यातून मुंबईकरिता रवाना झाल्या असून दि. १७ किंवा १८ मेपर्यंत या गाड्या मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे. यानंतर उर्वरित ४ गाड्या प्रत्येक महिन्यात २ अशा मुंबईत दाखल होतील.

मेट्रो मार्ग-३ चा दक्षिण मुंबईतील विस्तारकफ परेड ते नेव्ही नगर

 एकूण लांबी - २.५ किमी

 स्थानकाची संख्या १ (नेव्ही नगर स्थानक)

 स्थानकाचे ठिकाण-  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च (टीआयएफआर) जवळील डॉ. होमी भाभा रोड

 अंदाजे खर्च साधारण २४०० कोटी

 या भागातील पुनर्विकासाचा विचार करता नेव्ही नगरमधील अंदाजे ५० हजार लोकांना या मेट्रो मार्गाचा फायदा होईल.

००००

बहुगुणी नोनी

 *नोनी फळ.......*


..एक लहानश्या बटाट्याइतके पण अननसाप्रमाणे फोडि दिसणारे, पिवळे व हिरव्या रंगाचे एक फळ असते. हिचे झाड जास्त मोठे नसते. पाने मोठी हिरविगार असतात. व पाने समांतर पण अर्ध्या फुटांवर असतात. ही झाडे विशेषतः केरळ व उत्तर भागात पर्वतिय क्षेत्रात आढळतात... तसे हे क्वचित महाराष्ट्र भागातही दिसून येते. या फळाची विशेषतः हे आहे की हे फळ एकच रोग नाही तर अनेक गंभीर रोगांवर निश्चित औषध आहे. याचे औषधी गुणधर्म पोटासंबधित सर्व प्रकारच्या समस्या, मधुमेह, दमा, संधिवात, ह्रुदयरोग, कर्करोग, पुरुषांचे रोग, यावर परिणाम कारक आहे..

              ***** यात सापडणारे जेरोनाईन सर्वात खास द्रव्य आहे. हे फळ रोगप्रतिकारक शक्ति साठी अम्रुतासम आहे. नोनि हे एकमेव फळ आहे. आणि यात जीवनसत्त्व व अॅंटिआॅक्सिडंट, अॅंटिबॅक्टेरिअल, अॅंटिव्हायरल, व अॅंटि ट्युमर, अॅंटिइंफ्लेमेटरी देखिल गुण सम्रूद्ध आहे....


                 


 पोटदुखी, गॅसेस, अॅसिडिटि, अल्सर, इत्यादी साठी रोज नोनि चा रस काढून घ्यावा. आराम मिळतो..

   रक्तातील साखर नियंत्रणात राहते शिवाय इन्सुलिनची हि वाढ होते. उच्च रक्तदाब व मायग्रेन असलेल्या लोकांनी दिवसातून दोन वेळा घ्यावा याचा रस. तसेच बद्धकोष्ठता, अपचन, जुलाब डिसेंट्री, सारख्या रोगांवर रामबाण औषध आहे.. जर तुमचे केस गळत असेल, किंवा टक्कल पडले असेल तर नोनि फळांचा रस काढून घ्यावा, याने वरील त्रास दूर होतात..हे अनियमित मासिक पाळी व अति रक्तस्राव होणे, कंबरदुखी या सर्व त्रासांवर रामबाण औषध आहे.. चेहर्यावर सतत पिंपल्स मुरूमे येणं, तसेच.. सोरायसिस एक्जिमा, हर्पिस, यासारख्या चर्म रोगांवर नोनिचा रस काढून घ्यावा फरक पडतो व रोग बरे होतात..नोनि फळांमध्ये सांधेदुखी, कडकपणा, स्नायू दुखि, दूर करण्याचि क्षमता आहे..

    अस्थमा दमा श्वसनमार्गाचे विकार, असल्यास नोनि फळांचा रस काढून घ्यावा.. याने त्रास दूर होतात..


                      


..नोनि रसाचे प्रमाण..**/...सेवन... नोनिचा ज्यूस मोठ्यांसाठी ३० मि.ली.. व मुलांना २-२ चमचे एका ग्लास पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी व रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी प्यावे.. मिक्सर मधे नोनि फळांचे तुकडे व थोडे पाणी घालून फिरवून घ्यावे. व गाळून घ्यावे मग हा ताजा रस घेउ शकता. यात दुसरी फळे टाकता येईल.. रिकाम्या पोटी हा रस प्यावा. कारण आपण जे जेवण घ्याल ते लवकर व सहज पचेल.. मात्र रात्री झोपताना घेउ नये. कारण याने एनर्जी मिळते, आणि मग झोप येत नाही...या फळाचा फार मोठा फायदा हा आहे की, हा तुम्हाला निरोगी ठेउन १०० वर्षे आयुष्य देऊ शकतो.आणि व्रुद्धावस्था लवकर येउ देत नाही... किमान सिझन प्रमाणे हे फळ आहारात असू द्यावे

.. आणि उत्तम आरोग्य राखावे.....


  सुनिता सहस्रबुद्धे.....


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Featured post

Lakshvedhi