Thursday, 8 December 2022

एक अद्भुत बोगदा... लाव्हारसाचा !

 एक अद्भुत बोगदा... लाव्हारसाचा !

आपल्याच महाराष्ट्रात किती अद्भुत गोष्टी लपल्या आहेत, याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल. यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्रात असलेला एकमेव “लाव्हारसाचा बोगदा” (Lava Tunnel). तो पाहिला आणि त्याची निर्मिती समजून घेतली तर थक्क व्हाल. बस्स, पुढील लिंक क्लिक करा आणि अद्भुत महाराष्ट्राचा खराखुरा आनंद घ्या.

व्हिडिओ लिंक:

https://youtu.be/OFEbtMis9pc

वेळ काढून ‘भवताल’सोबत तो पाहायलाही चला.

वंडर्स ऑफ जिऑलॉजी !

- अनोखा महाराष्ट्र एक्सप्लोर करणारी फिल्ड टूर

माहिती व नावनोंदणीसाठी:

https://bhavatal.com/EcoTours/Geology

संपर्कासाठी :

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

--

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


Heart attack भीती


 Pl share 

मी येथे गीतेच्या सर्व १८ अध्यायांचे सार केवळ १८ वाक्यांत देत आहे.

 मी येथे गीतेच्या सर्व १८ अध्यायांचे सार केवळ १८ वाक्यांत देत आहे.


 वन लाइनर गीता -

 तुम्ही हे सर्वांना फॉरवर्ड करून प्रसारित कराल का? प्रत्येकाने हे 4 दिवसात जास्तीत जास्त लोकांना पाठवण्याची विनंती केली आहे. हे केवळ तुमच्या राज्यातच नाही तर संपूर्ण भारताला पाठवले पाहिजे.


 वन लाइनर गीता


 *अध्याय 1 - चुकीचा विचार हीच जीवनातील समस्या आहे.*

 *अध्याय २ - योग्य ज्ञान हेच ​​आपल्या सर्व समस्यांचे अंतिम समाधान आहे.*

 *अध्याय 3 - निस्वार्थीपणा हाच प्रगती आणि समृद्धीचा एकमेव मार्ग आहे.*

 *अध्याय 4 - प्रत्येक कृती ही प्रार्थनेची कृती असू शकते.*

 *अध्याय 5 - व्यक्तित्वाच्या अहंकाराचा त्याग करा आणि अनंताच्या आनंदाचा आनंद घ्या.*

 *अध्याय 6 - दररोज उच्च चेतनेशी कनेक्ट व्हा.*

 *अध्याय 7 - तुम्ही जे शिकता ते जगा.*

 *अध्याय 8 - स्वतःला कधीही सोडू नका.*

 *अध्याय 9 - तुमच्या आशीर्वादांची कदर करा.*

 *अध्याय 10 - सर्वत्र देवत्व पहा.*

 *अध्याय 11 - सत्य जसे आहे तसे पाहण्यासाठी पुरेसे समर्पण करा.*

 *अध्याय 12 - तुमचे मन उच्च स्थानात ग्रहण करा.*

 *अध्याय 13 - मायेपासून अलिप्त व्हा आणि परमात्म्याशी संलग्न व्हा.*

 *अध्याय 14 - तुमच्या दृष्टीशी जुळणारी जीवनशैली जगा.*

 *अध्याय 15 - देवत्वाला प्राधान्य द्या.*

 *अध्याय 16 - चांगले असणे हे स्वतःच एक बक्षीस आहे.*

 *अध्याय 17 - आनंददायी वर अधिकार निवडणे हे शक्तीचे लक्षण आहे.*

 *अध्याय 18 - जाऊ द्या, देवाशी एकरूप होऊ या.*

 (या प्रत्येक तत्त्वाचे आत्मपरीक्षण)

                          

                   || ॐ तत्सत् ||


 P. S. - मी तुम्हाला वारंवार विनंती करतो की हे जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा आणि गीतेचे महत्त्व समजावून सांगा.


 ♥️♥️♥️♥️♥️♥️

पोक्रा-2 मध्ये नवतंत्रज्ञान, कृषि संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा

 पोक्रा-2 मध्ये नवतंत्रज्ञान, कृषि संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा

- कृषिमंत्री अब्दुल सत्तार


            मुंबई, दि. 7- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा) माध्यमातून कृषि व ग्राम विकासाचे काम होत आहे. पहिल्या टप्प्यात कृषि विषयक योजनांच्या अंमलबजावणीतून पायाभूत सुविधांना बळकटी करण्याचे काम झाले. पोक्राचा दुसरा टप्पा हा अधिक विस्तारित, अधिक गावांचा सहभाग असणारा आणि कृषि क्षेत्रात झालेल्या संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळेल, अशा स्वरुपाचा असावा आणि त्यासाठी जागतिक बॅंकेने सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.


            मंत्रालयात आज पोक्राच्या दुसऱ्या टप्प्याच्या अनुषंगाने जागतिक बॅंकेच्या टास्क टीमचे प्रमुख रंजन सामंतराय यांच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव सरिता बांदेकर - देशमुख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी बोलताना मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, पहिल्या टप्पा राबविताना आपण सर्वप्रथमच अनेक गोष्टी करीत होतो. साडेचार वर्षाच्या काळात आता कृषि विषयक योजनांच्या माध्यमातून गावांचा विकास करण्यासाठी अधिकच्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, ते जाणवले आहे. त्यामुळेच अशा बाबींना नव्या टप्प्यात समाविष्ट करण्याची गरज आहे. पीक उत्पन्न वाढीसाठी आपण प्रयत्न केले. त्याचबरोबर आता पीक उत्पादनाच्या विक्रीसाठीची व्यवस्था तयार करणे, नवतंत्रज्ञान आणि संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणे याबाबींना आता अधिक महत्व देण्याची गरज आहे. यासाठी विद्यापीठातील कृषि शास्त्रज्ञ, हवामान बदल, पीक पद्धतीतील बदल याचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचेही सहाय्य घ्यावे, असे त्यांनी नमूद केले.


            यावेळी जागतिक बॅंकेच्या टास्क टीमचे प्रमुख श्री. सामंतराय म्हणाले की, पहिला टप्पा संपताच लगेचच दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरु व्हावी, असा प्रयत्न आहे. केंद्र सरकार आणि जागतिक बॅंकेने प्रामुख्याने दुष्काळप्रवण जिल्ह्यांच्या विकासासाठी ही योजना राबविण्याचे ठरविले आहे. सध्या बिजोत्पादन ते पीक उत्पादन, पीक उत्पादन ते काढणीपश्चात मशागत, कृषि यांत्रिकीकरण अशा विविध बाबींचा विचार पहिल्या टप्प्यात केला गेला आहे. दुसऱ्या टप्प्यात अधिक व्यापक स्वरुपात पोक्रा-2 राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


            आयुक्त श्री. चव्हाण यांनी, पीक उत्पादनानंतर त्याचे मार्केटींग आणि विक्रीसंदर्भात व्यापक स्वरुपात काही करता येईल का, याबाबत जागतिक बॅंकेने मदत करावी, असे सांगितले.


000

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022

 प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022

विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 1868 कोटी 64 लाख नुकसानभरपाईचे वितरण

कृषिमंत्री अब्दुल सत्तार.

            मुंबई, दि. 7 - प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 868 कोटी 64 लाख रुपयांची नुकसानभरपाई रकमेचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले असून प्रलंबित 364 कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम तात्काळ वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विमा कंपन्यांना दिले आहेत.


            प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या आढावा संदर्भात आज मंत्रालयात कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव सरिता बांदेकर- देशमुख, कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील, कृषि आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे आदींसह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


            स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये शेतकऱ्यांकडून एकूण प्राप्त झालेल्या सूचना, सर्वेक्षण पूर्ण झालेल्या सूचना, नुकसान भरपाई लाभार्थी संख्या आणि निश्चित लाभार्थी संख्या याचा आढावा यावेळी मंत्री श्री. सत्तार यांनी घेतला. आतापर्यंत एकूण 39 लाख 88 हजार 380 शेतकऱ्यांना एकूण 1 हजार 868 कोटी 64 लाख रकमेचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. उर्वरित नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ वर्ग करावी. पीक विमा भरलेला एकही शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी विमा कंपन्यांना दिले.


            मंत्रालयात यासंदर्भात भारतीय कृषि विमा कंपनी, एचडीएफसी इर्गो, आयसीआयसीआय लोंबार्ड, युनायटेड इंडिया कंपनी आणि बजाज अलियान्झ या पाचही विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


000

अभिवादन बाबासाहेब,तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही....

 अभिवादन

बाबासाहेब,तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही....


उणेपूरे मिळालेले ६५ वर्षांचे आयुष्य

त्यात ३० वर्षे शिक्षणात 

आणि १९४६ नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहीलेला

अवघी २५ वर्षे मिळाली बाबासाहेबाना चळवळ आणि लेखनाला...

त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. 

इतक्या थोड्या काळात हा माणूस 

 नियतकालिके चालवतो, 

२३ ग्रंथ लिहितो,

शेकडो लेख लिहून 

भाषणे करत राहतो


मनुस्मृती दहन, चवदार तळे,काळाराम मंदिर आंदोलन,

 शिक्षणसंस्था स्थापना, राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका, 

गोलमेज परिषद आणि हजारो मैलांचा प्रवास...

वाचन लेखनावरची पकड सुटू न देता...


हे सारे सारे कसे जमवले असेल याचा हिशोब लागत नाही...


आजच्या नेत्यांसारखे विमान,हेलिकॉप्टर हाताशी नाही

मिडिया,इलेक्ट्रॉनिक मिडियामधून पोहोचणे नाही,

अनुयायांना संदेश द्यायला Whatsapp नाही की बोलायला फोन नाही...


खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून

  गावकुसाबाहेरच्या

 त्या नॉट रिचेबल वस्त्यावस्त्यावर  


कसे वेगाने पोहोचले असतील बाबासाहेब ?


कसे पोहोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे, खेडी सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे...

पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा,

 ती सारी माणसे काही टेक्नोसॅव्ही नसणारी...

फाटकी,निरक्षर,अन्यायाने पिचलेली, भेदरलेली


त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदेपंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असेल...? 

की ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे थेट व्यवस्थेची गचांडी पकडू शकली.....


न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल त्या खेड्यापाड्यातील माणसांची....?


नुसत्या टाइम मॅनेजमेंट साठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब,

आणि माणसांपर्यंत पोहोण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला

 हव्यात 

कारण आज सगळी साधने हाताशी असूनही आम्ही गावकुसाबाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत......कोसो दूर....


 *हेरंब कुलकर्णी* 


( हेरंबकुलकर्णी यांच्या ' अस्वस्थ क्षणांच्या नोंदी' या पुढील आठवड्यात प्रसिद्ध होत असलेल्या कवितासंग्रहातून...प्रकाशक : अस्वस्थ प्रकाशन 9921288521)

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, रेवस-कारंजा पूलाचे काम प्रगतीपथावर

 मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, रेवस-कारंजा पूलाचे काम प्रगतीपथावरजमिनअधिग्रहण संदर्भात जनतेला अद्ययावत माहिती द्या


- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर


 


            मुंबई, दि.7 :- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि रेवस-कारंजा पूल या महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे जलद वाहतूक तसेच व्यापारउद्दिम, दळणवळण यांना चालना मिळणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प वेळेत सुरु व्हावा आणि बाकी असलेल्या कामांसंदर्भात जमिनअधिग्रहण विषयक प्रश्न उद्भवू नयेत, यासाठी जनतेला अद्ययावत माहिती जिल्हाधिकारी यांचेमार्फत देण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज दिले.  


            आज विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प व रेवस-कारंजा पूल कामांच्या सद्यस्थिती संदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सिडको यांचेतर्फे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष यांनी पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेत या प्रकल्पाचे मूळ उद्दीष्ट्य गाठले जावे आणि भविष्यात गर्दीच्या ठिकाणी "बॉटलनेक" परिस्थिती निर्माण होऊ नये, यादृष्टीने महत्वाच्या सूचना दिल्या.    


             एमटीएचएलचा हा प्रकल्प शिवडी येथे सुरु होऊन चिर्ले येथे संपतो. रेवस-कारंजा प्रकल्प सिडको द्रोणागिरी जवळ सुरु होऊन रेवसकडे जातो. रेवस-कारंजा प्रस्तावित पुलाची लांबी ८.८ कि.मी. आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पाचे काम डिसेंबर, 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. रेवस ते रेवदंडा मार्ग विभागात जमीन खरेदी-विक्री व बांधकामाचे व्यवहार वेगात सुरु आहेत. स्थानिक शेतकऱ्यांचे आणि रहिवाश्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रस्तावित महामार्गाची आखणी, नकाशा, बाधित होणारे सर्व्हे नंबर याबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी तातडीने प्रसिध्द करावी, असे निर्देश ॲङ श्री. राहुल नार्वेकर यांनी दिले.


             समुद्रात मार्ग उभारणीचे काम अत्याधुनिक पध्दतीने सुरु आहे, याबाबतचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार असून पर्यायाने विकासाचा पुढील टप्पा गाठला जाणार आहे. हे काम वेगाने पूर्ण होत असल्याबद्दल ॲङ श्री. राहुल नार्वेकर यांनी समाधान व्यक्त केले असून तातडीने सदर प्रकल्प कार्यान्वित व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.


०००



Featured post

Lakshvedhi