Wednesday, 27 July 2022

दीप पूजा

 *दिव्यांची आवस अर्थात दिप अमावस्या/दर्श अमावस्या.*


दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी अंधारात आधार देणा-या मिणमिणत्या पणतीपासून ते लामणदिवा-कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जाते.

घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.

पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. 

पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी.

फुलांची आरास करावी.

सर्व दिवे प्रज्वलित करावेत.

हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी

आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी

कणकेचे उकडीचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवावा.

या मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी.

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।

गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

अर्थात 

‘‘हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.

त्यानंतर दिव्यांची कहाणी करावी. 

घरातील इडापिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते.

सुप्रभात

 🎼🎼 🌺 काटा जरी काट्यासारख वागला तरी,💫💫          🎼🎼🌺 फुलानं आपल फुलणं सोडायचे नसतं,💫💫        🎼🎼🌺 जीवन कितीही खडतर असले तरीही ,💫💫       🎼🎼🌺 माणसानं आपलं जगणं सोडायच नसतं.

  🏃⛹️🏋️🚴🏇           

*प्रामाणिक राहून यश मिळत नाही असे काही लोक म्हणतात..............!!

*'प्रामाणिक राहणे...- हेच खूप मोठे यश आहे........!!!*

     🌸 शुभ प्रभात 🌸

सासरचे नमुने,काय देव्वा


 

 औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही

मुख्यमंत्र्यांचे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागाला निर्देश.

            मुंबई, दि. 26 : आरोग्य सेवा ही एक अत्यावश्यक सेवा असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी करावयाच्या औषधे, सर्जिकल्स साहित्य, कन्झुमेबल्स, रसायने व उपकरणे यांना स्थगितीच्या आदेशातून वगळण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

            राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत १ एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत जिल्हा वार्षिक योजना, राज्यस्तरीय योजना, आदिवासी उप योजना तसेच विशेष घटक योजना इत्यादी निधीतून मंजूर करण्यात आलेल्या परंतू निविदा न काढलेल्या कामाच्या अंमलबजावणीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यासंबंधीचे रितसर प्रस्ताव तत्काळ सक्षम प्राधिकारी यांच्यासमोर निर्णयार्थ सादर करण्यात यावेत, असे मुख्य सचिवांनी कळविले आहे.

            आरोग्य सेवा ही एक अत्यावश्यक सेवा असून, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत तसेच सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ही सेवा राज्यातील जनतेला पुरविण्यात येते. वैद्यकीय शिक्षण देण्याचे व संशोधनाची कामेही करण्यात येतात.

            नुकत्याच आलेल्या कोविड महामारीमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढलेला आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या पावसाळ्यात संसर्गजन्य आजार / साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये बऱ्याच ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या असून, उपकरणाअभावी या सुविधा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी तसेच पावसाळ्यातील साथीचे आजार, कोविडसारखी जागतिक महामारी आणि आरोग्यविषयक अत्यावश्यक सुविधा हाताळण्यासाठी या स्थगिती आदेशामधून या दोन विभागांना वगळण्याचा निर्णय झाला आहे.

००००



सूचना महत्वाची

 यदि आपके पास केवाईसी दस्तावेजों/यूजर आईडी/पासवर्ड/डेबिट कार्ड संख्या/पिन/सीवीवी/ओटीपी आदि को अपडेट या सत्यापित करने संबंधी कोई ई-मेल/मैसेज में एम्बेडेड लिंक/कॉल आते हैं तो कभी भी इनका उत्तर ना दें। यदि आपने अनजाने में अपनी प्रामाणिकता उजागर कर दी हो तो तत्काल अपने पासवर्ड/सीवीवी/पिन को बदल दें।

Tuesday, 26 July 2022

26जुलै भवाताल

 मुंबईत २६ जुलैच्या महापुरातूनमा


र्ग काढणाऱ्या आई-मुलाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ५०)

आज २६ जुलै. सतरा वर्षांपूर्वी म्हणजे २००५ साली याच दिवशी मुंबईत प्रचंड ढगफुटी झाली. त्यामुळे आलेल्या महापुराने मुंबईला जबरदस्त धक्का दिला. जीवितहानी, आर्थिक नुकसान आणि आयुष्यभर जाणवेल असा मानसिक धक्का! या महापुरात सापडलेल्या, पण त्यातून हिमतीने मार्ग काढणाऱ्या एका आई-मुलाची ही गोष्ट! मुंबईतील २६ जुलैच्या संकटाला त्या दिवशी हजारो मुंबईकरांनी अशाच प्रकारे धीराने तोंड दिले. त्याचीच ही प्रातिनिधिक कहाणी...

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक -

https://bhavatal.com/Mumbai-26July

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ५० वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

 गौण खनिज परवान्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात

विशेष शिबिराचे आयोजन करावे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 26 : अल्पमुदतीचे गौण खनिजे परवान्यासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने तातडीने रत्नागिरी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करुन यामधून चिरेखाण व्यावसायिकांना परवाने द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            रत्नागिरी येथील चिरेखाण व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार उदय सामंत, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासह रत्नागिरीचे चिरेखाण व्यावसायिक उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कोकणात चिरेखाणीबरोबरच मुरुममाती काढण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय करण्यासाठी चिरेखाण व्यावसायिकांना अल्प मुदतीचा परवाना आवश्यक असतो. त्यामुळे पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने येथे विशेष शिबिर घेऊन आवश्यक असणारे अल्पमुदतीचे परवाने द्यावे. रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग आणि रायगड येथेही विशेष शिबिर आयोजित करण्यात यावे.

            चिरेखाणी व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या यापूर्वी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात येत होत्या. मात्र आता या परवानग्या जिल्हास्तरावर देण्यात येत नसल्याने अनेक व्यावसायिकांना काम करण्यास अडचणी येतात. या व्यावसायिकांना परवानग्या देताना काही तांत्रिक अडचणी येऊ नये यासाठी पर्यावरण आणि वातावरणीय विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करावा. तसेच तात्पुरता परवाना जलदगतीने मिळण्यासाठी तातडीने रत्नागिरी येथे आणि तद्नंतर सिंधुदुर्ग येथे विशेष शिबिर आयोजित करुन एक आठवड्यात परवानग्या देण्याबाबतचे नियोजन करावे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


००००



Featured post

Lakshvedhi