Saturday, 13 November 2021

 भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आत्मनिर्भर भारत;

14 नोव्हेंबर रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन

 

          नवी दिल्ली, 12 : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. आत्मनिर्भर भारत या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात देशातील सर्व राज्ये आपापल्या राज्याच्या प्रगतीचे दर्शन घडवीत आहेत. महाराष्ट्राने यंदा राज्यातील औद्योगिक वाटचालीचा आलेख आत्मनिर्भर संकल्पनेखाली साकारला आहे. या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते रविवारी दि. 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वा. होणार आहे.

            दि. 14 ते 27 नोव्हेंबर 2021 या कालावधीत प्रगती मैदान येथे 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या मेळ्याची मध्यवर्ती संकल्पना आत्मनिर्भर भारत  ही आहे. या मेळ्यात महाराष्ट्राने आपल्या प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन औद्योगिक वाटचालीतील महाराष्ट्राचा विकास या  संकल्पनेतून साकारले आहे.

            आत्मनिर्भर ही संकल्पना मांडताना यंदा उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी तसेच डिजीटलई-तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासनिर्यातलघुउद्योगस्टॉर्टअपला चालना देणारे धोरणआदी सर्वच विषयांना स्पर्श करणारे आकर्षक प्रदर्शन यंदा महाराष्ट्राने आयोजित केले आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणारे 13 स्टॉल्स असणार आहेत. बचत गटांचे 8 स्टॉल्सकारागीरांचे 7 स्टॉल्ससूक्ष्मलघुमध्यम उद्योगातंर्गत  येणारे उद्योग समुह (क्लस्टर) चे 8 स्टॉल्स आणि  स्टॉर्टअप चे 6 स्टॉल्स यंदा असणार आहेत.

            प्रगती मैदान येथील गेट क्रमांक 5 बीमधील नवीन बांधकाम इमारतीमधील 2 क्रमांक इमारतीतील दुस-या मजल्यावर महाराष्ट्र दालन आहे. या महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन रविवारी दि.14 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते होणार आहे. या उद्घाटनप्रसंगी उद्योग राज्यमंत्री कु. अदिती तटकरेमहाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडेअपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त श्यामलाल गोयल उपस्थित राहतील. यावर्षी भागीदारी राज्य बिहार असून फोकस राज्य झारखंड आहे.

००००


 आरोग्य विभागाच्या तत्सम योजना

जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर शासन निर्णय निर्गमित

 

            मुंबईदि. 12 : राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या तत्सम योजनांना जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण) म्हणून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. याबाबतचे शासन निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार निर्गमित झाले आहेत.

            या शासन निर्णयानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीउपकेंद्रांसाठी औषधी साहित्य व साधन सामुग्री खरेदी करणे. प्राथमिक आरोग्य केंद्रांचेउपकेंद्रांचे बांधकामविस्तारीकरणदेखभालदुरूस्ती व परिक्षण करणे. अग्न‍िसुरक्षा यंत्रणा खरेदी तसेच देखभाल दुरूस्ती करणे, रूग्णालयाच्या इमारतींचेविद्युत जोडणीचे लेखापरिक्षण करणे. पीट बरियल बांधकाम करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रमाणकानुसार (मंजूर संख्येनुसार) रूग्णवाहिकांची खरेदी करणे तसेच देखभाल दुरूस्ती करणे. प्राथमिक आरोग्य केंद्रांचेउपकेंद्रांचेआयुर्वेदिकयुनानी दवाखान्यांचे बळकटीकरणसोयी-सुविधांमध्ये वाढ करणे. जिल्हा परिषद दवाखानेप्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम करणे आदी योजनांना राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण)म्हणून राबविण्यात येणार आहे.

            राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत रूग्णालयासाठी औषधीसाहित्यसाधनसामुग्री खरेदी करणे. रूग्णालयांचे बांधकाम विस्तारीकरणदुरूस्ती व देखभालअग्न‍िसुरक्षा यंत्रणा खरेदी तसेच देखभाल दुरूस्तीरूग्णालयांच्या इमारतींचेविद्युत जोडणीचे लेखापरिक्षण करणे आदी योजना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)म्हणून राबविण्यात येणार आहे.

            या शासन निर्णयामुळे राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच सर्व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यवाही सुरू करतील. नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे या निर्णयामुळे शक्य होणार आहे.

*******


 

 

 

 यंदा राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार;

राज्याबाहेरील व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा

                                              - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

            मुंबईदि. 12 :कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेलीहीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबरपासून सुरू होईलअशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली. सांस्कृतिक कार्य संचालनालयमार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध केंद्रांबरोबरच राज्याबाहेरील संघांसाठी एक व देशाबाहेरील संघांसाठी एक अशी दोन नवीन ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतीलअसेही त्यांनी सांगितले.

            राज्याच्या हीरक महोत्सवी व देशाच्या अमृत महोत्सवी तसेच स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून  स्पर्धेची व्याप्ती अधिक वाढविण्यात येत आहे.  त्यामुळे राज्याबाहेरील व देशाबाहेरील मराठी रंगकर्मींना या स्पर्धेचा लाभ घेता येईल यामुळे मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होईल,असा विश्वास  श्री.देशमुख यांनी व्यक्त केला.

            सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले, की दर वर्षी या स्पर्धांमधून जवळजवळ एक हजार संघ सहभागी होतात. या सर्व संघांच्या माध्यमातून जवळपास 20 हजार कलाकार वीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. अनेक रंगकर्मीसंस्थासंघटना यांनी या स्पर्धा लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी केली होती. त्या मागणीस अनुसरूनकोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या डिसेंबर पासून संपूर्ण राज्यात नेमून दिलेल्या केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

            मराठी हौशी नाट्य स्पर्धाबालनाट्य स्पर्धासंगीत नाट्य स्पर्धासंस्कृत नाट्य स्पर्धाहिंदी नाट्य स्पर्धादिव्यांग नाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील रंगकर्मींनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घेऊन कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करूनप्रयोग सादर करावेत असेही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आवाहन केले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही लवकरच घेण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

००००

 राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

गृहमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून; पोलीस प्रशासनाला दक्ष राहण्याचे निर्देश

 

          मुंबई, दि. 12 : त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

            गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे   कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

            यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावेअशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.

            तसेच पोलीसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचनाही  त्यांनी दिल्या आहेत.

 दिलखुलासकार्यक्रमात नगररचना विभागाचे संचालक नोरेश्वर शेंडे

यांची मुलाखत

 

         मुंबईदि. १२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास या कार्यक्रमात नगररचना विभागाचे संचालक नोरेश्वर शेंडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एअरया ॲपवर शनिवार दि. १३  सोमवार दि.१५,मंगळवार दि.१६ आणि बुधवार दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

              नगररचना विभागाची कार्यपद्धती,प्रादेशिक योजना,विकास योजना आणि नगर रचना योजना कशा प्रकारे केल्या जातात आदि विषयांची माहिती श्री. नोरेश्वर शेंडे यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

०००

 ए2 दूध हा काय प्रकार आहे?



Bal Belge


, Ph.D, LLB, M.Sc Agri, Dr.PDKV Akola (2004)


April 7, 2021 अपडेट केले


मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची माहीती काळजीपुर्वक वाचा.

🔸तुमच्या घरी रोज येणारे दुध 🍼हे A1 प्रकारचे आहे की A2 प्रकारचे आहे हे जाणुन घ्या.कारण ते तुमच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम करु शकते.

🔸A1 दुध आणि A2 दुध म्हणजे नक्की काय ?????

दुधामधे प्रथीने( proteins ) असतात.प्रथीने केसीनपासुन बनतात.ह्या केसीनमधे अमिनो आम्ले ( amino acids ) असतात.दुधामधील केसीनच्या प्रकारावरुन दुधाचे दोन प्रकार पडले आहेत A1 दुध आणि A2 दुध .

🔸A1 दुध - विदेशी वंशाच्या काउ संबोधल्या जाणारया 🐄जर्सी , होल्स्टेन फ्रीजीयन ,रेड डॅनिश यांचे तसेच यांपासुन तयार केलेल्या संकरीत काउ यांचे दुध हे A1 प्रकारचे असते.या प्राण्यांच्या पाठीला वशींड(Hump) नसते.खरे तर या प्राण्याना गैरसमजुतीने cow चे भाषांतर गाय असे केल्यामुळे गाय म्हणतात ,पण ते चुकीचे आहे . असो ,हे वेगळे दुध देणारे प्राणी आहेत.

🔸A2 दुध - भारतीय वंशाच्या देशी गायींचे दुध हे A2 प्रकारचे असते.या मुळ भारतातील गायी असुन त्यांच्या पाठीला वशींड Hump असते.या दुधातील प्रथीन हे A2 बीटा केसीन प्रकारचे असल्याने या दुधास A2 दुध असे म्हणतात.यामधे प्रोलाइन (proline) नावाचे मानवी आरोग्यास अत्यंत पोषक अमिनो आम्ल असते.

🔸A1 दुधाचे घातक परिणाम - या प्रकारच्या दुधातील प्रथीन हे A1 बीटा केसीन प्रकारचे असते.म्हनुन या दुधास A1 दुध असे म्हणतात.या दुधातील या प्रथीनामधे हिस्टीडीन ( Histidine ) नावाचे घातक अमिनो आम्ल असत.जेव्हा हे दुध पिले जाते त्यावेळी लहान आतड्यामधे त्याचे पचन होताना हिस्टीडीन विभक्त ( split ) होते व त्यापासुन बी सी एम 7 ( BCM 7 - Beta Caso Morphine 7 ) हे अमली पदार्थांच्या गटातील एक अतिशय घातक रसायन बाहेर पडते. हे BCM 7 थेट स्वादुपिंडावर( pancreas ) हल्ला करुन तेथील इनसुलीनची ( Insulin ) निर्मीती पुर्ण बंद पाडते. आपणा सर्वाना माहीत आहे की इनसुलीन हे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करत असते.ते कमी झाल्यावर मधुमेह हा रोग होतो.आणि तसेही आता मधुमेही रुग्ण घरोघरी झाल्यामुळे इनसुलीन हा शब्द प्रत्येकाच्या तोंडी असतोच.आता विचार करा A1 दुधातील BCM 7 मुळे जर इनसुलीन ची निर्मीती बंद पडली तर त्याचे परिणाम किती भयानक असतील ते !!!

🔸यामुळे पहिला परिणाम होतो तो म्हणजे अशा व्यक्तीला मधुमेह (Diabetis ) हा रोग होतो.पण एवढ्यावरच हे संकट थांबत नाही.कारण आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव इतर अवयवांशी जोडलेला असल्यामुळे त्यांचे कार्य सयुक्तपणे चालते.या दुधामुळे ह्रदयरोग ,ऑटीझम (स्वमग्नता) सिझोफ्रेनिया , कॅनसर किडनीचे रोग स्रीयान्मधील इंडोमेट्रियॉसिस - यामुळे गर्भाशयाच्या अस्तराला सुज येउन स्त्रीयान्मधे वांझपणा येतो डोळ्यांची दृष्टी कमी होणे पुरुषान्मधील नपुंसकत्व इत्यादी एकुण 80 प्रकारचे रोग माणसाला होतात.असे न्युझीलंडमधे झालेल्या सरकारी संशोधनावरुन सिध्द झाले आहे.यासंदर्भात न्युझीलंड येथील शास्त्रद्न्य कीथ वुडफोर्ड यांचा डेव्हील इन द मिल्क ( Devil In The Milk दुधातील सैतान ) हा संशोधन ग्रंथ प्रसिध्द झाला आहे.वेबसाइटवर पहा The politics and practice of sustainable living.. A1 व A2 milk संदर्भातील ही सर्व माहीती इंटरनेटवरही उपलब्ध आहे.

🔸न्युझीलंडमधे लहान वयातील मुलान्मधे मधुमेहाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते.त्याची कारणे शोधण्यासाठी शासनाने तद्न्यांची समीती 1993 मधे नेमली होती.या समीतीने मधुमेही लहान मुलांच्या आहाराचे जैवरासायनिक विश्लेषन ( biochemical analysis ) केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली ती म्हणजे या सर्व रोगाचे कारण म्हणजे जर्सी , होल्स्टेन फ्रीजीयन , रेड डॅनिश या काउ चे दुध हे आहे.या संशोधनानंतर या विषयावर परत 97 वेळा विविध तद्न्यानी अभ्यास केला.सर्वांचा निष्कर्ष सारखाच आहे. भारतीयांचे डोळे खाडकन उघडावे अशी घटना म्हणजे जेव्हा या शास्रद्न्यानी भारतीय वंशाच्या गायीच्या दुधाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की भारतीय गायीचे दुध हे A2 प्रकारचे असुन ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे .इतकेच नाही तर मधुमेह ह्रदयरोग कॅनसर इ.विविध आजार दुर करण्याची त्यामधे क्षमता आहे.भारतीय देशी गायीच्या तुपामुळे ह्रदयरोग्याच्या रक्तवाहीन्यामधील कोलेस्टेरॉल दुर होते तर गोमुत्रामुळे कॅनसर बरा होतो.विचार करा आपल्या प्राचीन भारतीय क्रृषीमुनींचा अभ्यास किती सखोल होता ते.जे आधुनिक शास्त्रद्न्याना समजायला इतकी वर्षे लागली की देशी गायीचे दुध तुप गोमुत्र मानवी आरोग्यासाठी वरदान आहे हे हजारो वर्षापुर्वीच आपल्या आयुर्वेदात सांगीतलय .ज्याप्रमाणे महाभारतामधे कृष्णाला विषारी दुध पाजुन मारायला पुतना नावाची राक्षसीन आली होती अगदी त्याच पध्दतीने सध्या भारतीयांपुढे जर्सी होल्स्टेन फ्रीजीयन या प्राण्यांच्या दुधाचे ओढवुन घेतलेले संकट आहे असे कोणाला वाटल्यास त्यात अतिशयोक्ती नाही.

🔸 दुधावरील या संशोधनामुळे न्युझिलंड अमेरिका ऑस्ट्रेलिया ब्रिटन ब्राझील या देशामधे जर्सी ,होल्स्टेन फ्रिजियन या प्राण्यांचे A1 दुध पिणे बंद केले असुन भारतीय गायींच्या दुधाला प्रचंड मागणी वाढली आहे.इतकेच काय पण तिथे विकल्या जाणारया दुधाच्या पिशव्यांवरही ते दुध A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याचे बंधन आहे.खरे तर भारतातही दुधाच्या पिशव्यांवर त्यातील दुध हे A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याची मागणी ग्राहकानी करायला हवी कारण आपण काय विकत घेतो त्याबद्दल जाणुन घेण्याचा ग्राहकाना कायद्याने पुर्ण अधिकार असतो.जसे तंबाखु सिगारेटच्या पॅकेटवर त्याचे सेवन आरोग्यास घातक असल्याची सुचना लिहिली जाते त्याप्रमाणे ...

🔸भारतात मात्र या बाबतील पुर्ण गोंधळच आहे.अजुन आम्हाला दुधाच्या A1 व A2 मधील फरकच माहीत नाही.सर्वसामान्य जनतेला गायीचे दुध (cow milk)या गोंडस नावाने जर्सी या घाणेरड्या प्राण्याचे रोगकारक A1दुध विकले जाते.सध्या लोकाना आपली खरी गाय कोणती व विदेशी जर्सी प्राणी कोणता हा फरकच समजानासा झालाय.इतका की अगदी Whats app च्या smileys मधे देखील 🐄🐄🐄🐄🐄 हे जर्सीचे चित्र दिले आहे,त्यास आपण गैरसमजाणे गाय समजतोय.देशी गाय व जर्सी हे एकमेकांपासुन पुर्ण वेगळे आहेत.दोनही समोर ठेउन निरिक्षण करा म्हणजे फरक समजेल. जर्सीचे दुध पिल्यामुळे मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.अगदी लहान मुलान्मधे देखील मधुमेहाचे प्रमाण खुप वाढले आहे.आम्ही एकीकडुन मधुमेहावर उपाय म्हणुन महागडी औषधे घेतो तर दुसरीकडे गायीचे समजुन जर्सीचे A1 दुध पितो.कसा रोग बरा होणार ??आहे की नाही गौंधळ ??

🔸गेल्या 40 वर्षांपासुन विदेशातुन जर्सी भारतात आणल्या तेंव्हापासुन भारतात मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.आपल्या शास्त्रद्न्यानी श्वेतक्रांतीच्या नावाखाली भारतीय देशी गायींचे विदेशी जर्सी प्राण्यांबरोबर संकर करुन भारतीय गायींचा वंश नासवला त्यामुळे देशी गायींच्या 80 पैकी 57 जाती नामशेष झाल्या व जर्सीचे रोगकारक दुध पिण्याची वेळ जनतेवर आली. एके काळी देशी गायींच्या दुधाने समृध्द असणारया आपल्या देशात आज देशी गायीचे दुध मिळणे अवघड बनले.देशी गायीचे तुप मिळणे तर फारच दुर्मीळ,

परदेशानी मात्र गेल्या काही वर्षात भारतामधुन देशी गायी नेउन त्यांची उत्तम शुध्द स्वरुपात जोपासना केली आहे.ब्राझीलमधे साठ लक्ष शुध्द भारतीय गीर गायी आहेत.तर मुळ भारतात त्यांची संख्या शिल्लक आहे फक्त तिन हजार... ब्राझीलमधे एका भारतीय गीर गायीचे दिवसाचे दुध उत्पादन आहे 64 लिटर.(इंटरनेटवर ही सर्व माहीती आहे.)असे असुनही आपले डोळे अजुनही उघडलेले नाहीत.भारतात आजही दिवसाला लक्षावधी देशी गायींचा जर्सीबरोबर संकर करुन त्यांचा वंश आपण नासवुन विषारी बनवत आहोत.हे असेच चालु राहीले तर येत्या पाच वर्षात देशी गायी भारतातुन नामशेष होतील असा इशारा तद्न्यानी भारताला दिला आहे.

मित्रानो आपल्या घरी विकत घेतले जाणारे दुध खरया देशी गायीचे आहे की त्या नावाखाली जर्सीचे दुध आहे हे तपासा. देशी गायीच्या दुधाचे सेवन करुन आरोग्य सांभाळा . तसेच बाहेर जेवताना पनीर ,चीज कोणत्या दुधापासुन बनवले आहे याची खात्री करुन आपले व कुटुंबाचे आरोग्य जपा ही विनंती.

अतिशय छान माहीती.जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सत्य पोहोचवा ही विनंति.

Friday, 12 November 2021

 निम्न पैनगंगा धरणापर्यंत 44.54 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी;

यवतमाळहिंगोलीनांदेड जिल्ह्यांना होणार लाभ

- जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती

·       मराठवाड्याच्या दृष्टीने ठरणार दिलासादायक निर्णय

 

            मुंबई दि. 12 : निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी दिल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे यवतमाळहिंगोलीनांदेड जिल्ह्यातील काही भागास अधिकचे पाणी उपलब्ध होईलअसेही त्यांनी सांगितले. हा निर्णय मराठवाड्याच्या दृष्टिने दिलासादायक ठरणार असल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.

            जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले कीगोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे. या पूर्वी विविध बैठकांमध्ये पैनगंगा नदीत ११७.८७ टीएमसी पाणी आहेअसे गृहीत धरून आंध्रप्रदेश शासनासोबत चर्चा केली जात होती.

            अलीकडेच मराठवाड्यातील विविध भागात दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी पाण्याबाबत  समस्या मांडल्या. जल विज्ञान कार्यालयाचे मुख्य अभियंता यांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत ११७.८७ ऐवजी १६७.४६ टीएमसी पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले.

            या पाण्याचा वापर पैनगंगा उपखोऱ्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील प्रत्यक्ष तूट भरून काढण्यासाठी व उर्वरित पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या निम्न भागात वापरण्यात येऊ शकेल. याचा फायदा हिंगोलीयवतमाळ व नांदेड जिल्ह्यांना होणार आहे. मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर आणि नियोजन पूसअरूणावती व उर्ध्वपैनगंगा प्रकल्पांच्या खालील भागात करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा मधील क्षेत्रामध्ये सुमारे ४४.५४ टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणार आहेअसे त्यांनी सांगितले.

            या निर्णयाने हिंगोलीयवतमाळनांदेड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम शासनाने केले आहे. मराठवाड्यात अधिक समृद्धी येण्यासाठी ज्या गोष्टी करता येईल त्या गोष्टी येत्या काळात जलसंपदा विभागामार्फत केल्या जातीलअसेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

००००


 


Featured post

Lakshvedhi