Wednesday, 1 September 2021

 राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा

            शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय  आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            शाळांमधील भौतिक सुविधांचा तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करून आदर्श शाळांची निर्मिती केली जाईल. भौतिक सुविधांच्या विकासामध्ये स्वतंत्र शौचालयेपिण्याच्या पाण्याची व्यवस्थासुस्थितीत असलेले वर्गआकर्षक इमारतक्रीडांगणक्रीडा साहित्य, ICT लॅबसायन्स लॅबग्रंथालय यासारख्या सुविधांचा समावेश राहील.  तर शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक पोषक  वातावरण उपलब्ध  करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील याकडे लक्ष देण्यात येईल. शाळेच्या  ग्रंथालयामध्ये पूरक वाचनाची पुस्तके आणि संदर्भ ग्रंथइनसायक्लोपिडिया उपलब्ध असतील.  स्वअध्ययनासोबतच गट अध्ययनासारखे रचनात्मक पद्धतीचे शैक्षणिक कार्यक्रमही  याअंतर्गत राबविले जातील.

            आदर्श शाळेतील  विद्यार्थ्यांमध्ये 21 व्या शतकातील कौशल्यांचा विकास होईल याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाईल यामध्ये नवनिर्मितीला चालना देणारेसमीक्षात्मक विचारवैज्ञानिक प्रवृत्ती - संविधानिक मुल्ये अंगी बाणवणारेसोबत काम करण्याचे कौशल्य तसेच संभाषण कौशल्य  या सारखी अन्य कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येतील. 

            आज मंजूरी देण्यात आलेल्या 488 आदर्श शाळा च्या विकासासाठी 494 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

-----०-----

 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

करण्यासाठी विविध समित्या स्थापणार

            राज्यात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हा अमृत महोत्सव राज्यात आयोजित करण्यात येईल.  यासाठी विविध समित्या देखिल स्थापन करण्यात येत आहेत.  या संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने आज एका सादरीकरणाद्धारे माहिती दिली.

            या महोत्सवाची आखणीनियोजन व प्रभावी अंमलबजावणी याकरिता राज्यस्तरीय समितीकोअर समितीअंमलबजावणी समितीजिल्हास्तर समितीपंचायत व ग्रामस्तर समिती अशा विविध समित्या स्थापन करण्यात येतील.  सांस्कृतिक कार्य विभाग हा या महोत्सवाचे समन्वयन करेल.  या विभागाच्या अधिपत्याखाली एकछत्र योजना तयार करण्यात येऊन विविध विभागांकडून प्रस्ताव प्राप्त करून घेण्यात येतील व त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील अंमलबजावणी समिती मंजुरी देईल.

-----०-----

 सार्वजनिक खासगी गुंतवणुकीद्धारे राज्यात

नवीन वैद्यकीय महाविद्यालयेअतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करणार

            सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करून वैद्यकीय सुविधात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या धोरणाची अंमलबजावणी पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या (IFC) मदतीने करण्यात येईल.

            दुर्गम भागातील प्रकल्पांना आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून उद्योग विभागाची पॅकेज स्कीम ऑफ इन्सेन्टीव्हज देखील या योजनेसाठी लागू केली जाऊ शकते. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील शक्तीप्रदत्त समिती या तरतूदींची  तपासणी करेल आणि मंजुरी देईल. याद्वारे पदव्युत्तर शिक्षणामध्ये 3 वर्षांत 1000 पदव्युत्तर (एमडी / एमएस / डीएनबी) जागा वाढ (नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 350 आणि विद्यमान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 650 जागा) होणार आहे. तसेच 10 वर्षांत पदवी शिक्षणामध्ये दर वर्षी 2600 एमबीबीएस विद्यार्थी जागा वाढ (नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून 1800 एमबीबीएस विद्यार्थी आणि विद्यमान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून 800) होणार आहे.

            तसेच प्रतिवर्षी बाह्यरूग्ण विभागामध्ये 1 कोटी आणि आंतरूग्ण विभागामध्ये 10 लक्ष वाढ होईल. दर वर्षी अतिरिक्त 2500 मुख्य शस्त्रक्रियाप्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय दरवर्षी ५,००,००० बाह्यरूग्ण सेवा आणि 5०,००० रूग्णांना आंतरूग्ण सेवा पुरविता येईल. सन 2026 पासून दर वर्षी 200 अतिरिक्त अतिविशेषोपचार जागा निर्माण होतील आणि दर वर्षी सुमारे 3,००,००० बाह्यरूग्ण आणि सुमारे 75,000 आंतरूग्ण सेवा पुरविता येईल. सार्वजनिक खाजगी गुंतवणुकीद्वारे नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन केल्याने लहान शहरांमध्ये कुशल आणि अकुशल रोजगार निर्माण होतील.

            राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागवैद्यकीय शिक्षण विभागमहानगरपालिका तसेच नगरपालिकामार्फत आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात.  तथापिराज्यातील बराचसा भाग ग्रामीण असल्यामुळे तेथील आणि लहान शहरातील जनतेस दर्जेदार व परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधांचा अभाव जाणवत आहे. सद्य:स्थितीत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेचे जिल्हा रुग्णालय किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाचे रूग्णालय आरोग्य सेवा देण्याचे कार्य करत आहेत.

            तथापिराज्यात सध्या डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागातील व सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांची बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्याच्या निमशहरीग्रामीणदुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेस आरोग्य विषयक प्राथमिक सुविधा अत्यंत अल्प प्रमाणात उपलब्ध होतात. तसेच बऱ्याचशा दुर्धरअनुवंशिकजीर्ण आजारांवर अतिविशेषोपचार तृतीयक आरोग्य सेवा (Tertiary care) देखील उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सतत होणारी लोकसंख्या वाढ विचारात घेता राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून डॉक्टरांच्या संख्येत वाढ करणे नितांत गरजेचे असून त्यासाठी राज्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करणे आवश्यक आहे.

            त्यानुषंगाने सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी निधीचा स्त्रोत उपलब्ध करण्यात येईल. त्याद्वारे अतिविशेषोपचार आरोग्य सेवापदवी व पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधेत वाढ करण्यात येईल. विद्यमान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण अध्यापन अधिक बळकट करणे आणि कुशल तज्ञ मनुष्यबळ निर्मिती करण्यात येईल. परावैद्यक व परिचर्या महाविद्यालयांची स्थापना करुन प्रशिक्षित परावैद्यक व परिचर्या संवर्गातील मनुष्यबळ निर्मिती करण्यात येईल. व्यवसायिकदृष्ट्या व्यवहार्य पीपीपीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून व्यवहार्यता तफावत निधी (VGF) द्वारे अर्थसहाय्य उपलब्ध करून घेण्यात येईल. रूग्णांचे / कर्मचाऱ्यांचे हित संरक्षित करणेखाजगी भागीदाराच्या गुंतवणूकीचा योग्य परतावा मिळण्यासाठी संतुलित कराराचा आराखडा तयार करण्यात येईल. सन 2030 पर्यंत निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे सक्षमपणे गाठण्यासाठी व प्रस्तावित धोरण राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा (प्राधिकरण / महामंडळ / तत्सम यंत्रणा) उभारण्यात येईल.

            निती आयोगाने विकसित केलेल्या मॉडेल कन्सेशन ॲग्रीमेंट व मॉडेल आरएफपी यामध्ये आवश्यक ते फेरबदल करुन त्याआधारे प्रस्तावित सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण (PPP) मॉडेलच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे व अतिविशेषोपचार रुग्णालय सुविधा निर्माण करणे व सदर सुविधांमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

            त्यानुषंगानेनवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे व अस्तित्वात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करणे तसेच अतिविशेषोपचार रुग्णालय सुविधा निर्माण करणे व सदर सुविधांमध्ये वाढ करणे यासाठी प्रस्तावित पीएफआय व पीपीपी मॉडेलचा आराखडा तयार करुन राबविण्यात येईल.

-----०-----

 

 वातावरणीय बदलाच्या परिणामांवर कृती करण्यासाठी

राज्य वातावरणीय बदल परिषद

            इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालाबाबत आज पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सादरीकरण करून महाराष्ट्रामध्ये या वातावरण बदलाचे किती गंभीर परिणाम होतील याविषयी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहअध्यक्षतेखाली राज्य वातावरणीय बदल परिषदेची स्थापना करण्याचे देखील ठरले.

            सदर अहवालातील नमूद केलेल्या गंभीर परिणामांची दाहकता कमी होण्यासाठीसंयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेले ५R (Reduce, Refuse, Reuse, Recycle, Recover) नुसार राज्यामध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र हा उष्ण कटीबंध प्रदेशात येतो.  वातावरणात 2 ते 2.5 अंश डिग्री तापमान वाढ झाल्यास राज्यातील सागर किनारपट्टी पाण्याखाली बुडण्याची तसेच मध्य महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ व जंगलांमध्ये वणवे लागण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आयपीसीसीच्या अहवालात भारतातील १२ शहरांतील सागरी किनारपट्टी पाण्याखाली जाण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.  याशिवाय अर्बन हिट आयलंड इफेक्टभूसख्खलन असे देखील परिणाम होऊ शकतात. आज वातावरण बदलाचा राज्याचा कालबद्ध कृती आराखडा असावा तसेच यासाठी यामध्ये वातावरणीय बदलाशी संबंधित सर्व मंत्र्यांचा समावेश करावा असे मंत्रिमंडळास सादर करण्यात आले.

मूल्यांकन अहवाल 6 (AR६) म्हणजे काय?

            दर काही वर्षांनी आयपीसीसी ही संस्था वातावरण बदलावरील घडामोडींवर अहवाल प्रकाशित करते. आत्ता पर्यंत असे ६ अहवाल प्रकाशित झाले असून या आहावालांसाठी जगभरातून अनेक वैज्ञानिक योगदान देतात.

दृष्टीक्षेपात अहवाल

            नुकताच प्रकाशित झालेल्या अहवालाप्रमाणेआपली पृथ्वीचे तापमान औद्योगिक काळापेक्षा 1.1°C  ने वाढले आहे. त्याचेच परिणाम म्हणजे वारंवार होणारी चक्रीवादळेवाढत्या प्रमाणात भूस्खलनअतिवृष्टीच्या वाढत्या घटनाउष्णतेच्या लाटा. या सर्व घटनांमागे ग्रीनहाऊस वायू उत्सर्जन असल्याचे अहवालात नमूद आहे. हे उत्सर्जन मानव निर्मित असल्याचे स्पष्टपणे अहवालात नमूद केले आहे.

            या अहवालानुसार या पुढेही काहीच उपाय योजना न केल्यासपृथ्वीचे तापमान 4-5°ने वाढण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम अत्यंत भयावह असतील. परंतु योग्य उपाययोजना केल्यास पृथ्वीच्या तापमान वाढीचा वेग कमी करता येऊ शकतो.

-----०-----

 मुलांनी चिखलात का खेळायचे?


शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख.


 ज्यांनी ही डिझाईन केली त्यांना मानसशास्त्र, मज्जामानसशास्त्र आणि शरीरशास्त्र या तिघांची उत्तम जाण असणारा आहे कारण लहान मुलांनी चिखलामध्ये मातीमध्ये भरपूर आणि सातत्याने खेळणे अत्यंत आवश्यक आहे. 


मुलं चिखलात लोळली की आई ओरडते, बाबा मारतात.. "ए घाणेरड्या" नावाने संबोधले जाते. यातून *माती घाण असते असा चुकीचा विचार या बालवयात बिंबवला जातो आणि मग पुढे मुलं चिखलात पाय ठेवण्याची हिंमतच ठेवत नाही.*


याचा दुष्परिणाम असा होतो की *मुलांची रोग प्रतिकारक्षमता विकसित होत नाही.* ज्या मुलामुलींना चिखलात खेळण्याचे, मातीत उड्या मारण्याचे स्वातंत्र्य असते त्यांची रोगप्रतिकार क्षमता म्हणजेच इंम्युन सिस्टिम चांगली बनते.


आजकालची मुलं साधं शंभर किलोमीटर वर गाव बदलले की सर्दी होते, पाणी ची चव बदलली की पोट दुखते कारण *शरीरामध्ये कुठलेही बॅक्टेरिया आले की त्याला फाईट करण्याची पेशी या तयार झालेल्या नसतात.* या पेशी तेव्हा तयार होतात जेव्हा मुलं निसर्गतः सर्व गोष्टीला एक्सप्लोर करत असतात. *म्हणून मुलांना माती, चिखलात, पावसात खेळू दिले पाहिजे.*


आजकालच्या प्रतिष्ठित आयांना सांगावेसे वाटते की *मुलांच्या आयुष्यात बॅक्टेरिया (जिवाणू) चे स्वागत करा.* तुम्हाला टीव्ही मधली जाहिरात सांगते की मुलांच्या एका हातावर लाखो जीवाणू असतात ते घालवण्यासाठी आमचा साबण वापरा.. *"राजू तुम्हारा साबून स्लो है क्या?"*, सांगून कंपनीवाले करोडो रुपये कमावतात. आपण साधा विचार करत नाही की, आपल्या लहानपणी किंवा आपल्या आजोबांकडे असले साबण नव्हते. तरी ते कधीही आजारी पडले नाही.. आपल्यापेक्षा जास्त रोग प्रतिकार क्षमता त्यांची होती. *कारण त्यांच्या डोक्यात असले जाहिरातीची खुळ (सजेशन) नव्हते आणि ते निसर्गात वाढत होते.*


मुलांना मातीत खेळल्याने मेंदूच्या पेशींची वाढ अधिक उत्तम होते. पहिल्या आठ वर्षाच्या आत बाल मेंदूची जडणघडण सर्वात अधिक होत असते. 80% मेंदू या वयात घडत असतो. *जितक्या मेंदूच्या पेशींना चेतना मिळेल तेवढे सिन्याप्स निर्मिती होत असते. जितकी सिन्याप्स निर्मिती होईल तेवढा मेंदू अधिक शक्तिशाली व बुद्धिमान बनतो. सिन्याप्स निर्मिती तेव्हा जास्त होते जेव्हा मुल मनसोक्तपणे, तणावरहित आणि पाचही ज्ञानेंद्रियांना सोबत खेळेल. चिखलात खेळतांना पाचही ज्ञानेंद्रियांचा विकास होतो.* चिखलामध्ये मूलं जेव्हा खेळतात तेव्हा त्यांची संवेदन क्षमता अधिक विकसित होते.


सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटीचा पाया हा लहानपणी मनसोक्त हुंदडण्या मध्ये असतो आणि या हुंदडण्या मध्ये महत्त्वाची एक्टिविटी म्हणजे चिखलात उड्या मारणे, पाणी उडवणे, लोळणे,खेळणे असते. 

*मुलं नखशिकांत चिखलात माखलेल्या असताना जेव्हा हातामध्ये मातीचा गोळा घेतात आणि वरती आकाशाकडे पाहत ढगांच्या आकाराचे मातीचे गोळे बनवतात तेव्हा या क्रियेमुळे मुलांची क्रिएटिव्हिटी अधिक विकसित होते.*


सर्वात महत्त्वाचे मूल जेव्हा चिखलात उड्या मारतात तेव्हा त्यांच्या मनात कळत-नकळत साचलेला ताण निघून जातो.. मुलं अधिक रिलॅक्स होतात.. हे करू नको, ते करू नको.. घाणीत जाऊ नको.. चिखल घाण आहे.. *या सर्व वाक्यांचे कुंपण तोडून ते अधिक मुक्त होतात. ते अधिक आनंदी व्यक्तिमत्त्वाकडे वाटचाल करतात.*


अतिचंचल मुलांसाठी चिखलात खेळणे तर गरजेचेच असते.


सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुलं जेव्हा चिखलात खेळतात तेव्हा ते आपल्या *मातीशी कनेक्ट होतात.* मातीचा स्पर्श काय असतो तो त्यांना समजतो. चप्पल बूट न घालता खुल्या पायांनी जेव्हा ते एक तास चिखलात राहतात तेव्हा ते खऱ्या अर्थाने या मातीशी या पृथ्वीशी संपर्कात येतात. त्यामुळे मुलांना अधून-मधून शूज न घालता मातीमध्ये जाऊद्या. 


मी हे सर्व सांगतोय हे शास्त्र जागतिक स्तरावर मान्य केलेले असून कितीतरी हेल्थ ऑर्गनायझेशन *"मड थेरपी"* नावाखाली या सर्व ॲक्टीव्हीटी आयोजित करत असतात.


म्हणून आपल्या मुलांना या पावसाळी वातावरणात जवळपास कुठे शेत असेल, भाताची पेरणी चालू असेल असेल तिथे घेऊन जा. *मुलांना चिखलात खेळू द्या कारण आयुष्याच्या अखेरीस अभ्यास किती लक्षात राहिला हे आठवणार नाही तर आनंदाचे क्षण किती निर्माण झाले तेच लक्षात राहतील.*


*इस्पॅलियर स्कूल* मध्ये हे आनंदाचे क्षण आयुष्यभर लक्षात राहण्यासाठी सातत्याने पावसाळ्यामध्ये "मड पार्टी" आयोजित केली जाते. विद्यार्थी त्यांच्या टीचर सोबत मनसोक्त चिखल खेळतात. कारण ही शाळा असा विचार करते की *विद्यार्थ्यांना खेळायला भरपूर टॉईजची आवश्यकता नाही.. आवश्यकता आहे ती थोड्या साहसी खेळाची..*

 "स्वदेशी अन्न खा स्वस्थ रहा"

                   (भारतीय अन्नघटक)


         अनेक वर्षे *बदाम* चा ढोल पिटल्यानंतर आता हळूच सांगितले जात आहे की, *‘बदाम खा, पण फक्त कॅलिफोर्नियाचे.’* असे काय पोषण या बदामांतून मिळते जे आपल्याकडच्या बदामांमधून मिळत नाही ? बदामांतून मिळणाऱ्या *रक्तवर्धक लोहाचे* प्रमाण आहे *५.०९ मि. ग्रॅ*.! तर आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या *तीळांतून* त्याहून अधिक म्हणजे *९.३ मि.ग्रॅ*. आणि *हळिवांमधून* तर तब्बल *१०० मि. ग्रॅ.* लोह मिळते. 


         बदामाइतकीच अत्यावश्यक मेदाम्ले *कलिंगडाच्या बियां* मधून मिळतात. *तीळां* तून तर ती अधिक संतुलित स्वरूपात मिळतात.  *शेंगदाण्यांमधून- ३.९० मि. ग्रॅ.* आणि *तीळांतून तर १२.२० मि. ग्रॅ*.! 


            हाडांना पोषक असलेले *कॅल्शियम बदामांमधून मिळते २३० मि. ग्रॅ.*, तर *तीळांमधून तब्बल १४५० मि. ग्रॅ.!* महत्त्वाचं म्हणजे १०० ग्रॅम तीळ दिवसभरातून खाता येतील, पण १०० ग्रॅम बदाम खाणार कसे ? आणि खाल्ले तरी पचवणार कसे? तरीही प्रत्येकाने ‘मूठभर बदाम खा!’ असे जाहिरातींमधून सांगितले जाते. मग ते तुम्हाला पचोत वा बाधोत !


            अ‍ॅन अ‍ॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे ?


             प्रचारामध्ये *किवी* आणि *सफरचंदामधून* मिळणाऱ्या *‘क’ जीवनसत्त्वाच्या* अलौकिक गुणांचे वर्णन केले जाते; जे बऱ्याच अंशी खरे आहे. मात्र प्रत्यक्षात या फळांमधून ‘क’ जीवनसत्त्व (Vitamin C) किती मिळते ?? *सफरचंदामधून मिळते केवळ १ मि. ग्रॅ.!* परदेशी सफरचंदामधून जरा बरे म्हणजे * ८ ते १० मि.ग्रॅ. तर *किवीमधून मिळते ६३.९६ मि. ग्रॅ.*. त्या तुलनेत आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या *भारतीय फळांमधून* कितीतरी अधिक ‘क’ जीवनसत्त्व मिळते.


 जसे- *चिंच १०८ मि. ग्रॅ.,*

*काजू फळ १८० मि. ग्रॅ.*,

*पेरू २१२ मि. ग्रॅ*. आणि

*आवळा तब्बल ६०० मि. ग्रॅ.* 


             रक्तवर्धक लोह, रक्तवाहिन्या व चेतातंतूंना पोषक मॅग्नेशियम, स्नायूंना (पर्यायाने हृदयस्नायूंना) पोषक पोटॅशिअम, रोगप्रतिकारक शक्तिवर्धक आणि प्रजनन क्षमता संवर्धक जस्त वगरे अनेक पोषक घटकांची एतद्देशीय फळांशी तुलना करता *किवी व परदेशी सफरचंद भारतीय फळांसमोर उभेसुद्धा राहू शकत नाहीत.*


         ब्रोकोलीमधून काय मिळते ?*

    ब्रोकोलीमधून आपल्या आरोग्याला उपकारक असे काय मिळते जे आपल्या भाज्यांमधून मिळत नाही ? *कोथीबीर (४८०० मायक्रो ग्रॅम),*

*अळू-पान (५९२० मायक्रो ग्रॅम)* आणि *माठ (८३४० मायक्रो ग्रॅम)* यांच्याहून पावपटीपेक्षाही कमी *(६२३ मायक्रो ग्रॅम)* *बीटा-कॅरोटिन ब्रोकोलीमधून* मिळते. रक्तनिर्मितीमध्ये आवश्यक *फॉलिक अ‍ॅसिड* ब्रोकोलीपेक्षा (६३ मायक्रो ग्रॅम)* कितीतरी अधिक पालक, माठ व टाकळ्यामधून मिळते. विविध जीवनसत्त्वे आणि लोह, जस्त आदी खनिजे, प्रथिने आदी सर्वच पोषक घटक पुरविण्यात ब्रोकोली भारतीय भाज्यांपेक्षा बरीच कमजोर आहे. *मगं लोक का खरेदी करतात ब्रोकोली ?*

                 ५६ हून अधिक प्रकारच्या पालेभाज्या आणि ४४ हून अधिक प्रकारच्या फूल-फळभाज्या ज्या भारतात पिकतात तिथल्या लोकांनी परकीय भूमीत उगवणारी, खुडल्यानंतर बर्फात साठवलेली आणि कोणतेही विशेष पोषणमूल्य न देणारी ब्रोकोलीसारखी भाजी का खावी ?


          *भारतीयांना ओट्सची गरजच काय ?*


           ओट्ससारखे अमेरिकेमध्ये *घोडे व डूकरांचा खुराक* म्हणून वापरले जाणारे धान्य कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त म्हणून खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मुळात जिथे कोलेस्टेरॉलचा रक्तवाहिनी चिंचोळी होण्याशी आणि पर्यायाने हार्ट अटॅकशी संबंध शंकास्पद आहे, तिथे ओट्स का खायचे ? ज्या देशात *तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, जव पिकतात त्यांनी आपल्या मातीत न पिकणारे धान्य का म्हणून खायचे ?* महत्त्वाचे म्हणजे ओट्समधून आपल्याकडील या धान्यांपेक्षा फार पोषक तत्त्वे मिळतात असंही नाही. *ओट्सपेक्षा (३६१)* अधिक आरोग्यदायी उष्मांक *बाजरीतून (३८९)* मिळतात. *ओट्सहून (११)* अधिक चोथा *बाजरीमधून (११.३)* मिळतो. भारतीयांना अत्यावश्यक असणारी *कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह* आदी तत्त्वे ओट्सहून जास्त बाजरी किंवा नाचणीमधून मिळतात.


              *तांदळामुळे नव्हे, तर रिफाइण्ड तांदळामुळे भारतीय स्थूल होत आहेत.* जे पुरवणारा अन्नपदार्थ म्हणजे आपला वरण-भात. महत्त्वाचे म्हणजे वरण-भात, दाल-रोटी, भाजी-भाकरी, डोसा-सांभार खाताना तुम्ही डाळी, भाज्या, औषधी व पाचक मसाले यांसोबत ते धान्य खाता. आणि तेही संपूर्णत:नैसर्गिक स्वरूपात.

*याउलट, ओट्समधून मिळणारे पोषण एकांगी असते.* ओट्स आपल्यासमोर येतात तेव्हा तो विविध कृत्रिम प्रक्रिया केलेला एक पदार्थ असतो; ज्यातून साखर, मीठ, प्रिझव्‍‌र्हेटिव्हज्सुद्धा आपल्या पोटात जातात. जे विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतात. *आपण नाचणी, बाजरी अशा देशी धान्यांचे सेवन वाढवले तर त्यांचा खपही वाढेल आणि त्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात आपला थोडा हातभार लागेल.* ओट्स खाऊन अमेरिकेची भर करण्यापेक्षा हे कधीही चांगलेच नाही का ?


               *गुण सांगता.. दोषांचे काय/?*


               याशिवाय अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे *ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी* आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही. *सफरचंदाने होणारा मलावरोध* आणि मलावरोधजन्य विकृती, शरिरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फॅटी अ‍ॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार या सर्व आरोग्य संकटांकडे भारतीयांनी कानाडोळा करावा काय ?


                  *आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्य धोके का सांगितले जात नाहीत ?*


                त्याला आर्थिक बाजु सुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी १३,५०० टनांवर जाईल अशी अपेक्षा आहे. ऑलिव्ह तेलाच्या लीटरमागे अगदी वीस टक्के- म्हणजे २०० रुपये फायदा आहे असे गृहीत धरले तरी १३,५०० टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रु. इतका फायदा विक्रेत्यांना होईल. 


               आजमितीस *भारतीयांना एक कोटी १७लाख टन खाद्यतेल* लागते. त्यातला केवळ *०.१ टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह* तेलाचा आहे; जो वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत. भारतीयांना ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या खाद्यतेलांच्या सेवनातील हा वाटा जर दहा टक्क्यांवर गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी.


            सकाळचा नाश्ता, रोजच्या जेवणासाठी लागणारे खाद्यतेल, जेवणातील प्रमुख धान्य, भाजी, फळे, सुकामेवा असे सगळेच अन्नपदार्थ जर आपण अमेरिका व युरोपमधून आयात करणार असू, तर त्याचा आपल्या देशाचा आर्थिक ताळेबंद आणि एकंदर आíथक स्थर्यावर काय व किती विपरीत बोजा पडेल याची कल्पनासुद्धा करता येणार नाही. परकीय खाद्यान्नातून देशाचे होणारे हे आíथक नुकसान व भारतीयांच्या आरोग्याला संभवणारे धोके समाजासमोर येणे म्हणूनच अगत्याचे आहे.


               आज जग जवळ आले आहे. त्यामुळे *वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थाचा चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची पार वासलात लागेल हे नक्की. आयुर्वेदानुसार जो आहार देशसात्म्य आहे अर्थात निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच; उलट, ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल.*

              अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की, *याच पाश्चात्त्यांनी आपल्या बापजाद्यांना लाल तांदूळ सोडून पांढरा, रिफाइण्ड तांदूळ खायला शिकवले; जे आता पांढरा तांदूळ आरोग्याला कसा घातक आहे, हे पटवून लाल तांदळाचे गुणगान गाऊ लागले आहेत. याच पाश्चात्त्यांनी दातांवर मिठाचे मंजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांना अडाणी ठरवून टुथपेस्टने दात घासायला शिकवले. आणि आता त्याच टुथपेस्टमध्ये मीठ आहे का, म्हणून विचारताहेत.*


               यांनीच आपल्या मागच्या दोन पिढय़ांना वनस्पती घी खायला घालून रोगी बनवले आणि नंतर वनस्पती घी कसे घातक आहे, ते सांगू लागले.


             यांनीच खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉलचा व हार्ट अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले; आणि आज तेच खोबरेल तेलाचे प्राशन कसे दीर्घायुष्य देते, हे सांगत आहेत. गूळ खाल्ल्यामुळे कृमी होतात, असे सांगून भारतीयांना साखरेची चटक लावली; आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात, असे ते म्हणू लागले आहेत.


            ज्या पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते प्रत्येक वेळी बदलतात, त्यांच्या सल्ल्यावर, आहारावर विश्वास ठेवायचा कसा? तो सुध्दा आयुर्वेदासारखी संपन्न आरोग्य परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती ज्यांना लाभली आहे त्या आपल्या भारतीय देशवासीयांनी?


(संदर्भ: नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबाद)

 *घाली लोटांगण वंदीन चरण*

   

*|| वैशिष्ट्ये व अर्थ ||*


*बाप्पाची आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते.*


*अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हणले जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.*


*आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ.* 


*ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हे एक मंत्र आहे.*


*वैशिष्ट्ये*


(१) *प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत.*


(२) *ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.*


(३) *पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत.*


(४) *बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते.*


(५) *सर्व  कडवी कृष्णाला  उद्देशूनआहेत. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.*


(६) *वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.*


*आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया*


१) घाली लोटांगण वंदीन चरणl                               डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |

प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |

भावे ओवाळीन म्हणे नामा |


*वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे*


अर्थ..

*कृष्णाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन  अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.*


२) त्वमेव माता च पिता त्वमेव |

     त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |

    त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |

    त्वमेव सर्व मम देव देव |


*हे कडवे आद्यगुरू शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.*


 अर्थ..

*तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.*


(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |

  बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात |                      करोमि यद्येत सकल परस्मै |

नारायणापि समर्पयामि ||


*हे कडवे श्रीमदभगवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.*


अर्थ...

*श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.*


(४) अच्युतम केशवम रामनारायणं | 

कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |

श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |

 जानकी नायक रामचंद्र भजे ||


*वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.*


अर्थ...

*मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.*


हरे राम हरे राम |

राम राम हरे हरे |

हरे कृष्ण हरे कृष्ण |

कृष्ण कृष्ण हरे हरे |


*हा सोळा अक्षरी मंत्र "कलीसंतरणं" या उपनिषदातील आहे.*

( ख्रिस्तपूर्व काळातील असावा) 


*कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे.*

          

*अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो.*


      🙏 *राम कृष्ण हरी* 🙏

Featured post

Lakshvedhi