Tuesday, 24 June 2025

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय

 त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २३ : त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिकभाषा तज्ञराजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

 त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक आज रात्री पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशालेय शिक्षण मंत्री दादा भुसेराज्यमंत्री डॉ.पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावीनवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचे ॲकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने नुकसान होऊ नयेयासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मराठी भाषेचे अभ्यासकसाहित्यिकराजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचे सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबविण्यात यावीअसे या बैठकीत ठरले. ही सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईलअसेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे आता पुढची सल्लामसलतीची प्रक्रिया प्रारंभ करणार आहेत.

 या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीउपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ताउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोनाशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओलशिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंहमहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार हे उपस्थित होते.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi