आणीबाणी विरोधात लोकतंत्र सेनानींनी केलेला संघर्ष प्रेरणादायी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशात २५ जून, १९७५ हा काळा दिवस होता. या दिवशी आणीबाणी लागू करण्यात आली. अशा या काळ्या दिवसाला आज ५० वर्ष पूर्ण झाली. लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी या आणीबाणीचा उपयोग करण्यात आला. हा काळ नागरिकांना व्यवस्थेचे गुलाम करणारा होता, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणीबाणीचा निषेध व्यक्त केला.
आणीबाणी विरोधात लोकतंत्र सेनानींनी केलेला संघर्ष हा प्रेरणादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, संविधानाची हत्या करीत नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर नियंत्रण आणले गेले. भारताचे संविधान अखंड आहे, जे कुणीही बदलू शकत नाही. देश हा संविधानाने चालत राहणार आहे.
आणीबाणीच्या संघर्षकाळात लढा देणाऱ्या सेनानींचे कार्य कधीही विसरले जाणार नाही. अशा संघर्ष केलेल्या लोकतंत्र सेनानींच्या पाठीशी शासन उभे आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.
कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, लोकतंत्र सेनानी उपस्थित होते. प्रास्ताविक राज्यपाल यांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले. सुरूवातीला आणीबाणी काळातील मान्यवरांनी चित्रमय प्रदर्शनाची पाहणी केली. कार्यक्रमादरम्यान मुंबई शहर जिल्ह्यातील श्रीपाद गंगाधर मुसळे, अनिल रामनाथ लोटलीकर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील मेधा सोमय्या, उदय माधवराव धर्माधिकारी, राजेंद्र यादव या सेनानींचा सत्कार करण्यात आला. आभार मुंबई शहरचे जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी मानले
No comments:
Post a Comment