Wednesday, 10 July 2024

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 116 वी बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली

 महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 116 वी बैठक

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली

 

            मुंबई दि.9 : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 116 वी बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे पार पडली.

            यावेळी कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी परिषदेतील संचालक डॉ.हरिहर कौसडीकर राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि परिषदेचे सदस्य दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी श्री. मुंडे म्हणाले कीकृषी महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी कृषी महाविद्यालयांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यापीठांनी आवश्यकतेनुसार सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ही मंत्री श्री मुंडे यांनी यावेळी दिल्या.

            या बैठकीमध्ये एकूण ५४ विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये शिक्षण विभागसंशोधन विभाग,  विस्तार शिक्षण व साधनसामग्री विकास विभाग आणि प्रशासन या विषयासोबतच कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय यांच्या प्रलंबित विषयांवरही चर्चा करण्यात आली.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi