Monday, 1 April 2024

त्या" तलावातील गाळामुळे कोणतं रहस्य उलगडलं? • तुमच्यासाठी खास कोर्स ‘पुरातत्वशास्त्राची ओळख’

 त्या" तलावातील गाळामुळे कोणतं रहस्य उलगडलं?

• तुमच्यासाठी खास कोर्स ‘पुरातत्वशास्त्राची ओळख’


पुण्याकडून सासवड-जेजुरीला जाताना दिवे घाट लागतो. या घाटातून खाली पाहिलं की एक सुंदर तलाव दिसतो- मस्तानी तलाव. पावसाळ्यात चांगला पाऊस झाला तर तलावात बऱ्यापैकी पाणी असतं, नाहीतर कोरडा ठणठणीत. २००२ ते २००४ हा काळ महाराष्ट्रासाठी दुष्काळी होता. तलाव कोरडाच होता. त्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यातला गाळ उपसण्याचे ठरले. शेतकऱ्यांनी शेतासाठी गाळ उपसून न्यावा, असे जाहीर करण्यात आले. त्यांना गाळ मिळेल आणि तलावातला गाळही कमी होईल. या आवाहनाला थोडाफार प्रतिसाद मिळाला.

तलाव कोरडा असल्याची संधी साधून काही पुरातत्वअभ्यासकांनी त्यातल्या गाळाचा अभ्यास करण्याचे ठरवले. वेगवेगळ्या खोलीवरील गाळाचे नमुने मिळवले आणि त्यांचे विश्लेषण केले. त्यातून सर्वसाधारणपणे असे लक्षात आले की सुमारे दीड हजार वर्षांच्या काळात त्या भागातील हवामान आतासारखेच कोरडे होते. त्यात इतक्या काळात विशेष फरक पडला नव्हता... पण गाळावरून इतक्या जुन्या काळातील हवामानाचा उलगडा कसा करता आला?

छोट्याशा गोष्टीवरून इतिहास, संस्कृती उलगडणारी अभ्यासशाखा म्हणजे पुरातत्वशास्त्र (Archaeology)! त्याबद्दल अनेकांना कुतूहल असते, पण नेमकी माहिती नसते. म्हणूनच ‘भवताल इको-कोर्सेस’ तर्फे सर्वसामान्यांसाठी ‘पुरातत्वशास्त्राची ओळख’ (Introduction to Archaeology) हा शनिवार-रविवार असा ऑनलाईन वीकेंड कोर्स आखण्यात आला आहे.

कालावधी:
२७ एप्रिल ते २६ मे २०२४

(जागा मर्यादित.)

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लिंक:

संपर्क:
9545350862 / bhavatal@gmail.com

--

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi