प्राचीन संस्कृती, इतिहास कसे उलगडतात?
- तुम्हालाही पुरातत्वशास्त्र शिकता येईल
अलीकडेच मराठवाड्यातील प्रसिद्ध औसा किल्ल्यात प्रातिनिधिक उत्खनन झाले. त्यात काचेचे अतिशय बारीक आकाराचे मणी सापडले, त्यांना इवलीशी छिद्रं सुद्धा होती. याशिवाय इतरही गोष्टी मिळाल्या. ही आपल्या महाराष्ट्रातली गोष्ट.
प्रसिद्ध सिंधू अर्थात हरप्पण संस्कृतीची गोष्ट तर रोमांचक आहे. ब्रिटिशांच्या काळात रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी लोक कुठून तरी चांगल्या पक्क्या विटा आणत होते. त्याचा माग घेतल्यावर प्राचीन जुन्या शहराचे अवशेष सापडले आणि या संस्कृतीचा शोध लागला...
एखादे मातीचे भांडे, खापरे, नाणे, वास्तू यावरून अनेक गोष्टींचा उलगडा होतो. पण या गोष्टींचा नेमका अर्थ कसा लावतात? गाडल्या गेलेल्या वस्तू व्यवस्थित कशा काढतात? त्यांची इतिहासाशी, संस्कृतीशी सांगड कशी घालतात? मुळात हे सारे कशासाठी करतात?
हे सर्व प्रश्न सामावून घेणारी अभ्यासशाखा म्हणजे पुरातत्वशास्त्र (Archaeology)! त्याबद्दल अनेकांना कुतूहल असते, पण नेमकी माहिती नसते. म्हणूनच ‘भवताल इको-कोर्सेस’ तर्फे सर्वसामान्यांसाठी ‘पुरातत्वशास्त्राची ओळख’ अर्थात Introduction to Archaeology हा शनिवार-रविवार असा ऑनलाईन वीकेंड कोर्स आखण्यात आला आहे.
कालावधी: २७ एप्रिल ते २६ मे २०२४
(जागा मर्यादित; लगेचच नावनोंदणी करा.)
अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी लिंक:
संपर्क:
9545350862 / bhavatal@gmail.com
भवताल
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment