Thursday, 15 February 2024

महाखादी कला-सृष्टी २०२४ चे १६ फेब्रुवारीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन · १६ ते २५ फेब्रुवारीदरम्यान खादी, सिल्क आणि विविध मराठमोळ्या खाद्यपदार्थांची मेजवानी

 महाखादी कला-सृष्टी २०२४ चे १६ फेब्रुवारीला

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

·       १६ ते २५ फेब्रुवारीदरम्यान खादीसिल्क आणि विविध मराठमोळ्या खाद्यपदार्थांची मेजवानी

 

            मुंबई१५ :- स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील जनतेला एका धाग्याने बांधण्याचे आणि स्वदेशीचा स्वाभिमान मनामनात जागवण्याचे काम खादी या महावस्त्राने केले. खादीला आजही मोठी मागणी आहे. खादी उद्योगातील लघु उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळमहाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळसुक्ष्मलघु व मध्यम उद्योग मंत्रालयआदिवासी विकास विभागभारतीय लघु उद्योग विकास बॅंकखादी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाखादी कला-सृष्टी २०२४’ चे आयोजन १६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या एक्स्पोचे उद्घाटन १६ फेब्रुवारीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए च्या मैदानावर होणार आहे. 

            या कार्यक्रमाला खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमारखादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठेखासदार पूनम महाजनआमदार झिशान सिद्दिकीउद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळेआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेभारतीय लघु उद्योग विकास बँकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिवसुब्रमण्यम रामनमहाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकरखादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमारतसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला उपस्थित राहणार आहेत.

            या एक्स्पोमध्ये खादी वस्त्रांच्या सोबतच महाराष्ट्रातील लघु उद्योजकांची निर्मिती असलेल्या पैठणीहिमरु शालबांबुच्या वस्तुवारली पेंटिंगमहाबळेश्वर मधुबन मधकोल्हापुरी चप्पलमसालेकेळीचे विविध पदार्थ इत्यादींसोबतच महाराष्ट्रातील विविध पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे. कापड उद्योग आणि फॅशन इंडस्ट्री याची वाढ आणि विकास यावरील चर्चासत्रेपरिसंवाद याशिवाय  फॅशन शो आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. तसेच याठिकाणी उभारण्यात येणा-या 'एक्सपिरीएंस सेंटरमध्ये चरख्यावरील सुतकताईहातमागावर कापड निर्मितीबांबुच्या वस्तुची निर्मिती आदींचा प्रत्यक्ष अनुभव आणि प्रात्यक्षिक १६ ते  २५ फेब्रुवारी दरम्यान अनुभवता येणार आहे.  नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi