*मोड आलेली कडधान्ये व वातरक्तविकार*
अनेक आहार, जिम तज्ञा कडून *मोड आलेले कडधान्य* खाण्याचा सल्ला दिला जातो ,त्यामुळे प्रोटिन्स मिळतात ,
पण आपण एवढे *हेवी वर्क आउट किंवा व्यायाम* करत आहोत का *एवढे प्रोटिन्स* खायला, दुसरे म्हणजे कडधान्याला मोड आणून आपण त्यामधील अम्ल गुण वाढवतो व ते *पित्तवर्धक व रक्त दुष्टी* करणारे बनवतो ,अगोदरच कडधान्य हे *वातूळ* गुणाचे असतात त्यात मोड आणल्यामुळे ते *वातरक्त दुष्टीकर* होतात व *गाऊट* सारखे *सांध्यांचे आजार* निर्माण करतात व *पचायला जड* असल्यामुळे *गॅसेस, पोट साफ ना होणे, पोट गच्च होणे, ऍसिडिटी* निर्माण करणे असे अनेक *पचनाचे आजार* सुद्धा निर्माण करतात ,
*डाळी पचाव्यात यासाठी किती त्याच्यावर संस्कार करावे लागतात बघा*
डाळ शिजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो आपण कुकर वापरून तिला लवकर शिजवतो पण त्यामुळे तिच्यावरचा अग्नि संस्कार अर्धवट होतो व तिच्यामुळे शरीरात निर्माण होणारा टिकावू पणा सुद्धा कमी होतो . त्यामुळे *डाळी पातेल्यातच शिजवाव्यात*
डाळ शिजवताना तिचा *वातूळ* पणा कमी व्हावा म्हणून तिच्यामध्ये *आंबट (चिंच ,आमसूल )* हे टाकलेच जाते . (आंबट म्हणजे टोमॅटो नव्हे, ते पुन्हा *पित्त वर्धक व रक्त दुष्टीकर* आहे ,जिथे जिथे टोमॅटो वापरता तिथे तिथे *आमसूल* वापरावे )
आपल्याला हे माहीत नाही कि हे सगळे कश्यासाठी ?? ,
अनेकांना वाटते ते चव येण्यासाठी असेल पण याला शास्त्रीय महत्व आहे, सर्व *डाळी* या *वातूळ ,रुक्ष ( कोरड्या आहेत ), अगदी मूग सुद्धा* त्या डाळी खाल्यामुळे *शरीरातील वात वाढू* नये म्हणून त्यावर *अम्ल संस्कार* केला जातो अम्ल हा रस वातशामक आहे त्यामुळे ती डाळ काहीशी वात शामक होते, त्याच बरोबर डाळ तयार झाल्यावर त्यावर *तूप व लिंबू* टाकले जाते, डाळ कोरडी तर तूप स्निग्ध व पुन्हा लिंबाचा अम्ल संस्कार *वातूळ कमी* होऊन चांगली पचण्यासाठी
डाळींमधील *वात वृद्धीकर गुण कमी करण्यासाठी* शास्त्र कारांनी काय काय योजना केली होती याचे उत्तम उदाहरण म्हणजे *पुरण पोळी*
आता *पुरण पोळीची* रेसिपी पाहुयात
◼️प्रथम चांगली पातेल्यात शिजवली जाते *उष्णतेचा संस्कार* डाळीतील वाताचा शीत ( थंड ) गुण कमी करण्यासाठी
◼️डाळ शिजून झाली कि तिला गुळा बरोबर पाट्यावर वाटतात येथे दोन गोष्टी होतात गुळ हा त्याच्या स्निग्ध (तैलकट ) व उष्ण गुणामुळे वात कमी करतो व दगडावर *घर्षणाने उष्णता निर्माण* होऊन पुन्हा वाताच्या शीत गुणा विरुद्ध उष्ण गुण निर्मिती
◼️गहू *स्निग्ध* गुणाचा त्याबरोबर लाटताना तैल स्निग्ध व उष्ण गुणाचे
◼️पोळी तयार झाल्यावर *भाजणे* ,उष्ण गुण वृद्धी
◼️भाजताना *तैल ( स्निग्ध व उष्ण ) किंवा तुप* ( स्निग्ध ) गुण
◼️पुरण पोळी तयार झाल्यावर *गुळवणी* ( गुळ गरम पाण्यात उकळून घेणे ) स्निग्ध व उष्ण गूण
◼️गुळवणी व पोळी एकत्र केल्यावर त्यावर *पुन्हा तुप* स्निग्ध गुणाचे
◼️त्याबरोबर *कटाची* म्हणजे मसाले अधिक असलेली पाचक व उष्ण मसाले युक्त आमटी व त्यामध्ये अम्ल गुणाचे *आमसूल किंवा चिंच* उष्ण व अम्ल गुणाने परत *वात शमन*
◼️त्या आमटीवर *लिंबू पिळणे* अम्ल गुण वातशामक
◼️तैलात तळलेले पदार्थ जसे *कुरडई ,पापडी* ( स्निग्ध गुण कमी पडू नये म्हणून )
*हरबरा डाळ पचवण्यासाठी एवढे संस्कार करावे लागतात* तर तुम्ही मोड आलेले कडधान्य कसे काय खाता ?? ,
ते पचले नाही तर शरीराला फायदा देण्याऐवजी अपायकारकच ठरतील तर चला तर चांगली *डाळ शिजवून घेऊन त्यामध्ये आमसूल तूप लिंबू टाकून* खावूयात प्रोटिन्स वाढण्यासाठी.
No comments:
Post a Comment