Sunday, 20 November 2022

कां कुणास ठाऊक,

 *कां कुणास ठाऊक,* 

*कांही कळलंच नाही,*   

*मन मात्र म्हणतंय तरुण आहे मी.*🤔

*कसा संपला ०६ पासून ६० वयापर्यंतचा हा प्रवास,*

*कांही कळलंच नाही.*

*काय मिळवलं, काय कमावलं,*

*काय गमावलं,*

*कांही कळलंच नाही.*

*संपलं बालपण,*

*गेलं तारुण्य,*

*केव्हा आलं ज्येष्ठत्व,*

*कांही कळलंच नाही.*

*काल मुलगा होतो,* 

*केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो,* 

*कांही कळलंच नाही.*

*केव्हा 'बाबा' चा*

*'आबा' होऊन गेलो,*

*कांही कळलंच नाही.*

*कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी,*

*कोणी म्हणतं हाती आली काठी,*

*काय खरं आहे,* 

*कांही कळलंच नाही.*

*पहिले आई बापाचं चाललं,*

*मग बायकोचं चाललं,*

*मग चाललं मुलांचं,* 

*माझं कधी चाललं*, 

*कांही कळलंच नाही*.

*बायको म्हणते,* 

*आता तरी समजून घ्या* , 

*काय समजू,*

*काय नको समजू,* 

*कां कुणास ठाऊक,* 

*कांही कळलंच नाही.*

*मन म्हणतंय तरुण आहे मी,*

*वय म्हणतंय वेडा आहे मी,*

*या साऱ्या धडपडीत केव्हा* 

*गुडघे झिजून गेले,* 

*कांही कळलंच नाही.*

*झडून गेले केस,* 

*लोंबू लागले गाल,*

*लागला चष्मा,* 

*केव्हा बदलला हा चेहरा* 

*कांही कळलंच नाही.*

*काळ बदलला,*

*मी बदललो*

*बदलली मित्र-मंडळीही*

*किती निघून गेले,* 

*किती राहिले मित्र,*

*कांही कळलंच नाही.*

*कालपर्यंत मौजमस्ती*

*करीत होतो मित्रांसोबत,*

*केव्हा सीनियर सिटिझनचा* 

*शिक्का लागून गेला,* 

*कांही कळलंच नाही.*

*सून, जावई, नातू, पणतू,*

*आनंदीआनंद झाला,* 

*केव्हा हासलं उदास हे*

*जीवन,*

*कांही कळलंच नाही.*

*भरभरून जगून घे जीवा*

*मग नको म्हणूस की,*

*"मला कांही कळलंच नाही.*



           🌹🙏🏻😌

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi