Wednesday, 21 September 2022

प्रवेशद्वार आरोग्य सेवेचे

 महाराष्ट्र दर्जेदार, समग्र आरोग्यसेवेचे प्रवेशद्वार

- पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

 

            नवी दिल्ली20 : महाराष्ट्र दर्जेदार आणि समग्र आरोग्यसेवेचे प्रवेशद्वार आहे. भारताच्या आरोग्य पर्यटन बाजारपेठेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. राज्य आरोग्यसेवेच्या पर्यटन क्षेत्रात सतत चांगले बदल करीत असल्यामुळे महाराष्ट्र आरोग्य आणि उपचारांसाठीचे एक पसंतीचे ठिकाण बनले असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी धर्मशाला येथे आयोजित राष्ट्रीय पर्यटन परिषदेत केले.

            हिमाचल प्रदेश येथे धर्मशालामध्ये केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन सोमवारी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. आज दुसऱ्या दिवशी या राष्ट्रीय परिषदेस राज्याचे पर्यटन मंत्री श्री. लोढा यांच्यासह इतर 11 राज्यांचे पर्यटन मंत्री परिषदेस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

            श्री. लोढा यांनी सांगितलेआरोग्य पर्यटन क्षेत्राशी निगडीत पायाभूत सुविधा राज्यात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे आरोग्य पर्यटन क्षेत्रात पहिल्या पसंतीचे राज्य आहे. राज्यात 4 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. 2 प्रमुख बंदरे तर 53 छोटी बंदरे आहेत. जवळपास राज्यात दिड लाख परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचारी वर्ग आहे. शीर्ष वैद्यकीय पर्यटन स्थळांपैकी महाराष्ट्र हे एक प्रमुख  आहे.  500 च्या जवळपास योग केंद्र1400 रूग्णालय1 लाखाच्यावर कौशल्यपूर्ण डॉक्टर्स आहेत. 65 आयुर्वेदिक विद्यालय असल्याची माहिती मंत्री श्री. लोढा यांनी परिषदेत दिली.

            श्री. लोढा पुढे म्हणालेराज्यात ऑर्थोपेडिक आणि सांधे बदलण्याची शस्त्रक्रियाइंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी बायपासकृत्रिम गर्भधारणाकॉस्मेटिक शस्त्रक्रियादंत प्रत्यारोपणकर्करोग उपचार (रेडिओथेरपीकेमोथेरपी आणि इतर प्रगत तंत्रज्ञान)नेत्ररोग शस्त्रक्रियाअवयव प्रत्यारोपण अशा अवघड शस्त्रक्रियांसाठी तसेच इतर आरोग्यसेवांसाठी राज्यात अनेक नामांकित खासगी तसेच शासकीय रूग्णालये असल्याची माहिती ही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी दिली.

            आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण संस्था राज्यात असल्याची माहिती देत मंत्री श्री. लोढा यांनी सांगितलेमुंबईत योगसंस्थाइगतपुरीला (नाशिक) निसर्ग उपचार पद्धतीपुणे येथे अय्यंगार योगगोराई (मुंबई) विपश्यना ध्यान साधना केंद्र,  मिकी मेहता यांचे आरोग्य केंद्रनागपूरला मेडीसीटीपुण्याला सुविश आरोग्य केंद्र असे राज्यातील विविध ठिकाणी विविध आरोग्याशी निगडीत संस्था असल्याची माहिती दिली.

००००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi