Wednesday, 30 March 2022

 *माठातील पाणी पिण्याचे फायदे* 


माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. आपल्याकडे पूर्वी माठातील पाणी पित होते. आजही बरेच जण माठातील पाणीच पितात. जाणून घेऊया माठातील पाणी पिण्याचे फायदे

👉🏻 माती नैसर्गिकरीत्या अल्कलाइन असते. शरीरातील ॲसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून शरीराच्या आतील वातावरण ॲसिडिक असण्यापेक्षा अल्कलाइन असेल तर आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरीत्या अल्कालाइन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाइन होते.

👉🏻 मातीमध्ये कोणतीही हानिकारक रसायने नाहीत. बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. पाणी दूषित होत नाही.

👉🏻 नैसर्गिक थंडावा- लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात खूप वेळ लोडशेडिंग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा खंडीत होतो. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे.

👉🏻 मातीचे गुणधर्म- माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत भरपूर खनिजे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो.

👉🏻 मेटॅबॉलिझम (चयापचय) सुधारते- माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.

👉🏻 उष्माघाताला आळा बसतो

उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या.

👉🏻 घशासाठी चांगले असते

सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी अतिथंड नसते त्यामुळे घशासाठी चांगले असते.

मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi