Wednesday, 15 September 2021

 🦯 *वय वाढेल तसे माणसाचे*

 *ज्ञान, मन, अंतकरण आणि दृष्टिकोन* 

         व्यापक व्हायला हवा .

🦯 ज्येष्ठता ही श्रेष्ठतेकडे झुकणारी असावी, तरच ती आदरयुक्त आणि उपयुक्त ठरते.

🧟‍♀️ जी गोष्ट निरुपयोगी ठरते तिचा त्याग करण्याची मानसिकता आपोआप बनत जाते. 

_निरुपयोगी वस्तू टाकून देणे , फेकून देणे किंवा दुर्लक्षित करणे, हा व्यवहारातील सुज्ञपणा समजला जातो_. 

🤑व्यवहारात 😩भावनेला

 स्थान नसते. 

         आजचा जमाना 

    हा शुद्ध व्यवहारी आहे , 

_येथे फक्त उपयुक्ततेचा विचार प्रधान आहे, येथे फक्त फायदा तोट्याचा विचार केला जातो_. ज्या व्यवहारात तोटा आहे तो करणे मूर्खपणाचे लक्षण समजले जाते . 

👎🏾आजच्या जमान्यात भावनेला

         शून्य किंमत आहे .

🧑‍🦽🧑‍🦽🧑‍🦽🧑‍🦽🧑‍🦽🧑‍🦽🧑‍🦽🧑‍🦽🧑‍🦽🧑‍🦽

 🦯ज्येष्ठता अटळ आहे , 

🦯वय वाढेल तसे ती येणार आहे . 

_आपली जेष्ठता ही निरुपयोगी किंवा इतरांना त्रासदायक ठरेल अशी असू नये , याची दक्षता प्रत्येक ज्येष्ठ होणाऱ्या व्यक्तीने घेतली पाहिजे_. 

💄💋 *भावना/emoTions*💋💄 

💃🏽आपल्यापुरती मर्यादित असावी , 

💃🏽आपली भावना आणि हट्ट इतरांवर लादू नये करण लादलेली कोणतीच गोष्ट कोणालाही , कधीही सुख देणारी नसते , त्यामुळे यांची प्रतिक्रिया 🌚तिरस्काराच्या रूपाने उमटल्याशिवाय राहत नाही . 

😩 _ही तिरस्काराची प्रतिक्रिया आपल्या पोटच्या मुलांकडून, सूनांकडून, भावंडांकडून उमटली, तर ती खूप वेदनादायी असते_.

*_भावनेचा अभाव_ असल्यामुळे कोणाकडून फारशी अपेक्षा ठेवण्यात काहीच अर्थ नाही आणि अशी अपेक्षा ठेवणाऱ्या माणसाच्या वाट्याला _मनःस्ताप , दुःख आणि अवहेलना_ या शिवाय दुसरे काही येत नाही*,

    हे वास्तव एकदा मान्य झाले की 

       मग श्रेष्ठतेची किंमत कळते .

💰या व्यवहारी जगात 

❌ज्येष्ठतेला किंमत नाही , तर

✔️ श्रेष्ठतेला किंमत आहे म्हणून

🧑‍🦽 माणसाने ज्येष्ठ होण्यापेक्षा

✌🏾 श्रेष्ठ होण्यासाठी प्रयत्नशील असावे . 

🦯दोन पिढ्यांमधील वैचारिक आणि व्यवहारीक फरक ज्येष्ठ व्यक्तींनी मनाचा मोठेपणा करून स्वीकारला पाहिजे . 

🦯आपल्या जीवनातील अनेक सुखांचा उपभोग घेऊन झालेला असतो. 

मुलांना जन्म देणे, त्यांचा सांभाळ करणे, त्यांना स्थिर करणे या आपल्या जबाबदाऱ्या असतात , 

🤭त्यांना आपण उपकार समजू नये . 

_मुलांना सांभाळणे , वाढविणे हा उपकार समजू लागलो तर परतफेडीची अपेक्षा मनात निर्माण होते आणि अपेक्षाभंग होताच, 😡तापटपणा करणे , रुसणे , फुगणे , 👹सर्वांचे मानसिक स्वास्थ्य बिघडून जाईल असा हेकटपणा करणे , याने आपण सर्वांच्या मनातून उतरून जातो_, 

          हा वृद्धापकाळातील

       सर्वात मोठा तोटा असतो .

हा तोटा ज्येष्ठतेत आपल्या वाट्याला येण्यास आपणच काही अंशी जबाबदार ठरतो .

      *वय वाढेल तसे वैराग्य येणे*, 

     *हे श्रेष्ठतेचे लक्षण आहे*.

😡 वयाबरोबर आपला वैताग वाढत असेल तर आपण श्रेष्ठ नाही तर कनिष्ठ बनत आहोत असे निश्चित समजावे . 

कनिष्ठ व्यक्तीला मिळणारी वागणूक 

     ही नेहमी कनिष्ठच असते .

👣 आपण काय असावे  ? 👣

हे ज्याच्या त्याच्या हातात असते .

🧑‍🦽 वय वाढेल तसे वैराग वाढले ,

🧑‍🦽 कोणताच स्वार्थ उरला नाही ,

🧑‍🦽 अंतःकरण, दयेने आणि प्रेमाने 

     भरून गेले , 

🧑‍🦽ज्ञानाने आत्मज्ञानाची उंची गाठली , 

🧑‍🦽अनुभवाने परिपक्वतेची सीमा पार केली, तर 

_आपली उपयुक्तता ही शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांसाठी आदरयुक्त ठरते_,

✌🏾 हेच खरे ज्येष्ठतेतील श्रेष्ठत्व आहे आणि

🙏🏻 हे नेहमी वंदनीय आणि पूजनीय 

       आहे , होते आणि राहणार .

😩 यात जे जेष्ठ बसत नाहीत त्यांच्या वाट्याला 🤦🏻‍♂️अपमान , 👹तिरस्कार आणि 💔अवहेलना निश्चित येणार . मग 

ती पोटच्या कडूनही येऊ शकते किंवा 

पाठच्या कडूनही येऊ शकते .

    कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो I 

    तुका म्हणे काळ आता करू न शके बळ II

      ही खरी |ज्ये|ष्ठ|ता| आहे.


      

➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi