[9/29, 7:04 PM] Mahiti Mohite: वृत्त क्रमांक:-992 दिनांक:- 29 सप्टेंबर 2021
*नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली जे.एन.पी.टी.- सिडको परिसराची पाहणी*
*बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी व पार्किंग प्रश्नाबाबतच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात संबधित विभागाला दिले आदेश*
अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका):-बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर वाहनांची होणारी वाहतूक कोंडी व पार्किंग प्रश्न यावर लवकरात लवकर उपाययोजना करून याबाबतच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात संबधित विभागाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे निर्देश दिले.
नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आज बुधवार, दि.29 सप्टेंबर 2021 रोजी शिवस्मारक, जे.एन.पी.टी., उरण येथील दास्तान फाटा, द्रोणागिरी सीएफएस येथील पार्किंगच्या जागेची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी संबंधित विभागाला ठाणे-बेलापूर रस्त्यावरील सिडको व जे.एन.पी.टी. कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची होणारी ट्राफिक कोंडी तसेच पार्किंग प्रश्न यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत आवश्यक ते निर्देश दिले.
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सिडको, जेएनपीटी आणि वाहतूक पोलीस यांच्या मदतीने नियोजन करणे आवश्यक आहे. याकरिता टप्य्याटप्प्याने वाहने सोडण्यात येणार असून सीएफएस आणि तालुक्याबाहेर जाणाऱ्या वाहनांना कलर कोड स्टिकर देण्यात येतील. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास भेडसावत आहे. मात्र वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी समन्वय पथक तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर जेएनपीटी आणि दास्तान येथील पार्किंगच्या जागेमध्ये वाहनांची नियोजनबध्द पार्किंग व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, विश्वस्त जे.एन.पी.टी. श्री.दिनेश पाटील, श्री.नरेश रहाळकर, श्री.संतोष ठाकूर, श्री.महादेव घरत, श्री.सदानंदराव भोसले, श्री.बी.एन.डाकी, श्री.गणेश शिंदे, श्री.विनोद म्हात्रे, प्रदीप ठाकूर, के.एम. घरत, अमित भगत, संदेश पाटील, जि.प.सदस्य विजय भोईर, पं.स.सदस्य दिपक ठाकूर, पं.स.सदस्य हिराजी घरत, श्री.नितेश पाटील, श्री.हितेश पाटील, रमेश म्हात्रे, सौ. ममता पाटील, सौ.ज्योती म्हात्रे, सौ.भावना म्हात्रे, सुजाता गायकवाड, तसेच तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, सिडकोचे अधिकारी, जे.एन.पी.टी. चे अधिकारी, पोलीस अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000
[9/29, 7:04 PM] Mahiti Mohite: वृत्त क्रमांक:-991 दिनांक:- 29 सप्टेंबर 2021
*रायगड जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू*
अलिबाग,जि.रायगड,दि. 29 (जिमाका):- शिक्षा मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय, ता. माणगाव, जि.रायगड या विद्यालयात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
यावर्षी प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समितीद्वारा प्राप्त झाली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती https://cbseitms.nic.in/registrationClass6/registrationClass6 व http://www.navodaya.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रवेश अर्ज निःशुल्क ऑनलाईन भरण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालकांनी नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाईटवरील प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेऊन इंटरनेटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. हा अर्ज भरत असताना पालकांची सही विद्यार्थ्यांची सही, फोटो आवश्यक आहे.
सहावीसाठी निवड चाचणी प्रवेश परीक्षेस बसणारा विद्यार्थी सलग तिसरी व चौथी पास असावा. पाचवीत संपूर्ण वर्ष रायगड जिल्हयात शिकणारा असावा. त्याचा जन्म 1 मे 2009 ते 30 एप्रिल 2013 (दोन्ही दिवस पकडून) पर्यंतच असावा.
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख दिनांक 30 नोव्हेंबर 2021 असून त्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत.
ही परीक्षा दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे.
अधिक माहितीसाठी (संतोष चिंचकर 9881351601) (कैलाश वाघ 9527256185) व (अण्णासाहेब पाटील 9960582046) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य श्री. किरण इंगळे यांनी केले आहे.
00000000
[9/29, 7:05 PM] Mahiti Mohite: वृत्त क्रमांक:- 989 दिनांक:- 29 सप्टेंबर 2021
*राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती प्रजातींबाबत जनजागृतीपर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न*
अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका):- राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती लागवड साहित्य निर्मिती (औषधी वनस्पती रोपवाटिका), औषधी वनस्पती लागवड काढणोत्तोर व्यवस्थापन प्रक्रिया व मूल्यवर्धन इ. घटकांसाठी तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तथापि अशा शेतकऱ्यांना या घटकांचा लाभ घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व्हावे, यासाठी एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक आत्मा श्रीम.उज्ज्वला बाणखेले यांनी दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत आयोजित केली होती.
या कार्यशाळेच्या माध्यमातून औषधी वनस्पती लागवड साहित्याची निर्मिती कशी करावी, औषधी वनस्पतींचे फायदे व कोणत्या वातावरणात या वनस्पती लागवड केल्यानंतर आपणास त्यापासून भरघोस उत्पन्न मिळू शकते,याबाबतचे मार्गदर्शन डॉ. दिगंबर मोकाट, प्रमुख शास्त्रज्ञ, विभागीय औषधी वनस्पती प्रोत्साहन केंद्र, पुणे विदयापीठ, पुणे यांनी केले आणि इतर काही महत्वाच्या मुद्यांवर प्रशिक्षणही दिले. तसेच औषधी वनस्पतींची लागवड, काढणी पश्चात व्यवस्थापन व प्रक्रिया व मूल्यवर्धन याबाबत मिळणाऱ्या सबसिडी योजनेबाबत श्री.ए.आर. सासिवेकर, अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ पुणे यांनी अत्यंत महत्वपूर्ण माहिती या कार्यशाळेत दिली. त्याचप्रमाणे औषधी वनस्पती लागवड केल्यानंतर पणन (Marketing) सुविधा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील व शेतकऱ्याच्या यासंदर्भातील अडचणी याबाबत श्री. प्रशांत नायर, दातार अँड सन्स, पनवेल यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती प्रजातींच्या लागवडीकरीता अनुकूल वैविध्यपूर्ण हवामान, मानवी आरोग्याकरिता औषधी वनस्पतीचे महत्त्व, वाजवी उत्पन्न देणाऱ्या औषधी वनस्पतींची नगदी पिके, औषधी वनस्पती क्षेत्रात स्वयंरोजगार निर्मिती इत्यादी बाबींच्या अनुषंगाने औषधी वनस्पती क्षेत्र विकासास भरपूर वाव आहे. तथापि याचा विचार करता जिल्हयातील औषधी व सुगंधी वनस्पतींच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्याचे नियोजन राष्ट्रीय आयुष अभियान औषधी वनस्पती योजनेंतर्गत करण्यात येत आहे.
या कार्यक्रमास 50 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सन 2021-22 करिता रायगड जिल्ह्यात 45.90 हेक्टर लागवड क्षेत्राचे नियोजन केले असून त्याकरिता 694.80 लाख इतका निधी प्रस्तावित केला आहे,अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले यांनी दिली आहे.
0000000