कार्ये
विधी
सेवा प्राधिकरण/समिती द्वारा खालील कार्ये केली जातात.
न्यायालय/न्यायाधिकरण/प्राधिकरण समक्ष कोणतेही
प्रकरण किंवा इतर कायदेशीर कार्यवाही चालविण्याच्या प्रक्रियेत समुपदेशनाच्या स्वरुपात
मोफत विधी सहाय्य पुरविणे आणि मोफत विधी सेवा पुरविणे.
खर्च वेळेची बचत करुन तसेच तांत्रिक बाबींचा
अडसर टाळून प्रकरणांमध्ये तसेच असे वाद जे न्यायालयासमक्ष आणले गेले नाहीत अशा वादांमध्ये सुध्द्ा समझोता
करीता लोक न्यायालय आयोजित करणे.
वैवाहिक वाद मध्यस्थ आणि समेट पध्द्तीने
मिटविणे.
कज्जे वादातील पक्षकार आणि सर्व सामान्य
जनतेत, सामाजिक विधी दृष्ट्या महत्वाच्यसा मुद्यांवर कायदेशीर बाबी संबंधी जागरुकता
निर्माण करणे.
कैद्यांना आणि न्यायाधिन बंदीना मोफत विधी
सेवा प्रदान करणे.
विधी
सहाय्य प्रात करण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करावा.
संक्षिप्त स्वरुपात तक्रार किंवा सहाय्यता
प्राप्त करण्याचे कारण नमूद करुन एका लिखित स्वरुपात अर्ज दाखल करुन.
जर अर्जदार अशिक्षित असेल किंवा लिहिण्याच्या
स्थितीत नसेल तर विधी सेवा प्राधिकरणाची/समितीचे सदस्य सचिव किंवा अधिकारी त्यांचे
तोंडी निवेदन नोंदवून घेतली आणि नोंदविलेल्या निवेदनावर त्यांची सही/अंगठ्याचा ठसा
घेतली आणि असे निवेदन अशा व्यक्तीचा अर्ज समजण्यात येईल.
अर्जदार विधी सेवा प्राधिकरण/समितीकडे विनाशुल्क
उपलब्ध असलेल्या एका विहीत नमुन्यात शपथपत्र निष्पादित करुन द्यावे लागेल ज्यायोगे
अर्जदाराची विधी सहाय्य प्राप्त करण्यासंबंधी निकष तपासू न
घेता येईल.
विधी सेवा प्राधिकरण/समितीचे सदस्य सचिव
अर्जदाराची त्यांने शपथपत्रामध्ये सांगितलेल्या तथ्यांची पडताळणी करण्यासाठी तपासणी
सुध्द्ा करु शकतात.
कोणकोणत्या
विषयासंबंधात कायदेशीर सहाय्य उपलब्ध करुन घेता येणार नाही
मानहानी, विद्वेषपूर्ण अभियोग, न्यायालयाचा अवमान किंवा खोटी
साक्ष देणे या आरोपाखाली कार्यवाही करण्यांत येणाया व्यक्ती,
कोणत्याही निवडणूकसंबंधी कार्यवाही, आर्थिक गुन्हेसंबंधी आणि सामाजिक कायद्यांच्या
विरुध्द् गुन्हे जसे की, अस्पृश्यता किंवा जातीच्या आधारावर किंवा जातीय पुर्वग्रह
दुषिततेच्या विरोधातील तक्रारींचा प्रतिवाद करणे.
विधी
सेवा प्राधिकरण/समिती खालील व्यक्तींना मोफत विधी सेवा पुरविते.
अनुसूचित जाती किंवा जमातीतील व्यक्ती, अवैध
मानवी व्यापारातील बळी किंवा भिकारी, स्त्रिया किंवा बालके, अपंग व्यक्ती म्हणजेच अशी
व्यक्ती ज्या अंधत्व, कुष्ठरोग, एका ठिकाणाहून दुसया ठिकाणी
जाण्यात असमर्थता, बहिरेपणा, मानसिक असमर्थता यांनी ग्रस्त आहेत.
सार्वत्रिक आपत्ती, जाती हिसांचार, जातीय
अत्याचार, पूर, दुष्काळी, भुकंप किंवा औद्योगिक आपत्तीचे बळी,
औद्योगिक कामगार, अन्विक्षाधीन, न्यायालयीन
कोठडीत असलेल्या व्यक्ती ज्यामध्ये सुरक्षा गृहातील किशोरवयीन अपराधी, म्हणजेच १८ वर्षे
पर्यंत वय असलेल्या व्यक्तींचा किंवा मनोरुग्णालयातील अथवा शुश्रूषालयातील मानसिक रुग्ण
यांचा समावेश आहे.
वार्षिक उत्पन्न रुपये २,००,०००/- पेक्षा
कमी असलेल्या.
विधी
सेवा केव्हा परत घेतल्या जाऊ शकतात ?
जर सहाय्यित व्यक्तीजवळ पुरेशी साधने उपलब्ध असतील तर,
जर सहाय्यित व्यक्त्ीने विधी सेवा लबाडीने
अथवा कपटाने प्राप्त करुन घेतलेल्या असतील तर,
जर सहाय्यित व्यक्ती विधी सेवा प्राधिकरण/समिती
अथवा विधी सेवा पुरविणारे वकिल यांच्या बरोबर सहकार्य करीत नसेल तर,
जर त्या व्यक्तीने विधी सेवा प्राधिकरण/समिती यांनी नेमलेल्या विधी व्यवसायी
व्यतिरिक्त इतर विधी व्यवसायीची नेमणूक केलेली असेल तर,
जर सहाय्यिता व्यक्तीचा मृत्यु झाला तर,
ज्या दिवाणी खटल्यांमध्ये अधिकार किंवा दायित्व टिकून आहेत ते खटले सोडून.
जर विधी सेवा प्राप्त करुन घेण्यासाठीचा
अर्ज किंवा प्रश्नांकित विषय हे कायदेशीर प्रक्रिया किंवा विधी सेवा यांचा दुरुपयोग
आहे असे आढळून आल्यास.
कोणत्या
स्वरुपाची विधी सहाय्यता पुरविली जाते ?
कोणत्याही न्यायालयीन कार्यवाहीशी संबंधित
देय किंवा झालेला सर्व खर्च
कोणत्याही कायदेशीर कार्यवाहीमध्ये मसुदा
लेखन करणे, दस्तएैवज तयार करणे आणि कायदेशीर कार्यवाहीमध्ये विधी व्यवसायीने प्रतिनिधीत्व
करणे यासाठीचा खर्च.
कायदेशीर कार्यवाहीमध्ये आदेशांच्या, न्यायनिर्णयांच्या
प्रती/प्रमाणीत प्रती मिळविण्यासाठी लागणारा खर्च व इतर किरकोळ खर्च.
कायदेशीर कार्यवाहीमध्ये झालेला इतर खर्च
उदा. खटल्याचे कागद-पुस्तक तयार करणे (ज्यामध्ये कागद, छपाई आणि कागदपत्रांचे भाषांतर
सामिल आहे) आणि त्यास अनुषंगिक इतर खर्च.
लोकन्यायालय
लोकन्यायालय
म्हणजे काय
वाद उद्भवला तर तो शक्यतोवर सामंजस्याने
सोडवावा ही आपली प्राचीन परंपरा, गावातील जुनी-जाणती माणसे एकत्र येत आणि कोणाहीमध्ये
उद्भवलेला कुठल्याही स्वरुपाचा वाद समजुतीने मिटवित. ज्यांच्यापुढे वाद नेला जाई ते
त्या गावातील आदरणीय आणि नि:पक्षपाती लोक असत. यालाच गाव-पंचायत असे म्हणत, सध्याचे
लोकन्यायालय म्हणजे या गाव पंचायतीचेच अधुनिक रुम. जेथे कायदा जाणणाया नि:पक्षपाती लोकांचे न्यायमंडळ त्यांच्यापुढे येणाया प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय्य तडजोड घडविते.
लोकन्यायालये
कोठे भरविली जातात
लोकन्यायालये राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये
नियमितपणे भरविली जातात. प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी दोन महिन्यातुन
किमान एकदा व आवश्यकता भासल्यास त्याहून अधिक वेळा योग्य त्या सूचना देऊन त्या त्या
न्यायालयामध्ये लोक न्यायालयाचे आयोजन केले जाते. जिल्ह्याच्या ठिकाणी होणारी लोकन्यायालये
जिल्हा न्यायालयात तर तालुक्याच्या ठिकाणी होणारी लोकन्यायालये तालुका कोर्ट परिसरांत
भरविली जातात. उच्च न्यायालयामध्ये मुंबई येथे तसेच नागपूर आणि औरंगाबाद खंडपिठाचे
ठिकाणी देखील लोकन्यायालये भरविली जातात.
लोकन्यायालयाचे आयोजन कोण करते
?
लोकन्यायालयाचे आयोजन विधी सेवा प्राधिकरणार्फत
केले जाते. राज्य व जिल्हा धिी प्राधिकरणे, तालुका विधी सेवा समित्या व उच्च न्यायालय
विधी सेवा समिती याद्वारा विधी सेवा प्राधिकरण
अधिनियम १९८७ मधील तरतुदी अंतर्गत लोकन्यायालयाचे वेळोवेळी आयोजन केले जाते. लोकन्यायालयाची
तारीख सामान्यत: एक महिना अगोदर जाहीर केली जाते.
लोकन्यायालयाची
रचना कशी असते
लोकन्यायालय देखील एकअर्थी कोर्टच असते.
उलटपक्षी कोर्टात जेथे तुमच्या खटल्याच्या निवाड्यासाठी एकच न्यायाधिश असतात तेथे लोकन्यायालयात
किमान तीन जाणकार व्यक्तींचे पॅनल न्यायाधिशांची भूमिका बजावते. कार्यरत अथवा निवृत्त
जेष्ठ न्यायाधिश पॅनेलचे प्रमुख म्हणून तर अनुभवी वकिल अथवा कायद्याच्या जाणकार व्यक्ती
सदस्य म्हणून लोकन्यायालयाचे काम पहातात.
लोकन्यायालयापुढे कुठले खटले
येतात ?
लोकन्यायालयामध्ये दिवाणी फौजदारी दोन्ही
स्वरुपाची प्रकरणे समेटासाठी येऊ शकतात. मोटार अपघात व भू-संपादन नुकसान भरपाईचे दावे, बँका व अन्य वित्तीय संस्थाचे वसुलीचे
दावे, वैवाहिक संबंधातील वाद, निगोशिएबल इन्स्ट्र्यूंमेंट अॅक्टच्या कलम १३८ खाली दाखल
झालेली प्रकरणे वगैरेसाठी स्वंतत्ररित्या खास लोकन्यायालये आयोजित केली जातात. वरील
प्रकारात मोडणारी न्यायालयांत प्रलंबित असलेली प्रकरणे तर लोकन्यायालयात घेता येतातच
शिवाय कोर्टात दाखल न झालेली प्रकरणे देखील
लोकन्यायालयापुढे समेटासाठी येऊ शकतात व त्याबाबत देखील न्यायालयात निवाडा देखील
होऊ शकतो म्हणजेच तुमचा वाद तुम्ही कोर्टात प्रकरणे दाखल करण्याअगोदर देखील लोकन्यायालयासमोर
नेऊन त्याचा निवाडा करुन घेऊ शकता.
लोकन्यायालयासमोर दावा कसा येऊ
शकेल ?
ज्या न्यायालयांत आपला खटला प्रलंबित आहे
तेथे एक साधा अर्ज देऊन केसच्या कुठल्याही टप्प्यावर आपण आपला खटला लोकन्यायालयापुढे
नेऊ शकतो, असा अर्ज आल्यावर न्यायाधिश दोन्ही पक्षांचे म्हणणे एैकून घेतात व दाव्यातील
वाद आपसांत समजुतीने मिटू शकेल असे मत झाल्यास प्रकरण लोकन्यायालयापुढे ठेवण्याचा आदेश
करतात. दावा व कैफियतीतील कथनांवरुन संबंधीत न्यायाधिशांना प्रकरणाची आपपसांत समजूतीने
मिटण्याची शक्यता वाटली तर कुठल्याही पक्षाचा अर्ज नसला तर न्यायाधीश स्वत:हून खटला
लोकन्यायालयाकडे वर्ग करु शकतात.
लोकन्यायालयाचे कामकाज कसे चालते
?
जाहिर झालेल्या तारखेस नेमलेल्या ठिक्ाणी
लोकन्यायालयाचे पॅनेल कामकाजास सुरुवात करते. लोकन्यायालत त्या दिवशी सुनावणीसाठी घ्यावयाच्या
खटल्यांची यादी पुर्वीच जाहिर झालेली असते. त्यातील खटले अनुक्रमे लोकन्यायालयासमोर
सुनावणीसाठी घेण्यात येतात. लोकन्यायालयासमोर पक्षकार स्वत: अथवा वकिलांमार्फत त्याची
बाजू मांडू शकतात आवश्यक भासल्यास लोकन्यायालय ती माहिती संबंधीतांकडून पुराव्याच्या
स्वरुपात मागू शकतात. खटल्याची सर्व कागदपत्रे मूळ स्वरुपातच लोकन्यायालपुढे असतात
व पॅनेल सदस्य त्यांची योग्य ती दखल नेहमीच घेऊ शकतात. दोन्ही पक्षकारांचे म्हणणे एैकल्यावर
पॅनल सदस्य दोघांनाही समेटासाठी योग्य पर्याय देखील सुचवित असतात. पॅनल सदस्य तटस्थपणे
काम करीत असल्याने बहुतांश वेळा त्यांच्या सुचनांचा पक्षकारांकडून आदर केला जातो व
त्यानुसार समेट घडून येतात. ज्या अटी व शर्ती वर आपसांत समझोता होतो त्या लगेचच लेखी
स्वरुपात उतरविण्यांत येतात व दोन्ही पक्षकार आणि त्यांचे वकील त्याखाली सह्या करतात.
तद्नंतर लोकन्यायालयाचे पॅनल सदस्य देखील त्याखाली आपल्या सह्या करतात अशा प्रकारे
लोकन्यायालयाचा निवाडा तयार होतो.
लोकन्यायालयाच्या निवाड्याची
अंमलबजावणी कशी होते ?
लोकन्यायालयांत होणारा निवाडा म्हणजे कोर्टाचा
पक्का हुकूमनामाच, लोकन्यायालयापुढे पक्षकार जी आपसांत समजुत करतात किंवा आपसांत समजुतीचा
जो मसुदा तयार करतात त्याचेच रुपांतर लोकन्यायालयाच्या निवाड्यात होते. कोर्टाच्या
हुकूमनाम्याची व्हावी तशीच अंमलबजावणी लोकन्यायालयांत झालेल्या निवाड्याची करता येते
आणि त्याहून महत्वाचे म्हणजे लोकन्यायालयात होणारा निवाडा हा अंतीम असतो त्या विरुध्द्
अपील करता येत नाही.
लोकन्यायालयात
समेट झाला नाही तर काय
समजा काही कारणास्तव तुमचा वाद लोकन्यायालयांत
मिटू शकला नाही तर तुमचा दावा संबंधीत कोर्टाकडे परत जातो व प्रचलित न्याय पध्द्तीप्रमाणे
दाव्या संदर्भातील दरम्यानचे काळात तात्पुरती थांबलेली कारवाई पूढे सुरु होते दावा
कोर्टात दाखल करण्यापुर्वी लोकन्यायालयापुढे आणला असेल व त्याचा निवाडा होऊ शकला नाही
तर कोर्टात केस दाखल करण्याचा मार्ग मोकळा राहतोच लोकन्यायालयासमोर तुम्ही काही तडजोड
प्रस्ताव दिला असला तरी तो मुळ केसच्या रेकॉर्डवर कुठेही येत नाही व दाव्याच्या गुणवत्तेच्या
आधारे निकाली होण्याच्या प्रक्रियेवर त्याचा काहीही अनुकूल अथवा विपरित परिणाम होत
नाही. सारांश लोकन्यायालयापुढे येण्यात नुकसान काहीच नाही.
लोकन्यायालयाचे फायदे
१) केसचा झटपट निकाल लागतो. तोंडी पुरावा, उलटतपासणी,
दिर्घ युक्तीवाद या बाबी
टाळल्या जातात.
२) लोकन्यायालयाच्या निवाड्या विरुध्द् अपील
नाही एकाच निर्णयात कोर्ट बाजीतून कायमची सुटका होते.
३) लोकन्यायालयांत होणारा निवाडा हा आपसांत समजुतीने
होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाची हार.
४) लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान
देतो.
५) परस्परसंमतीने निकाल होत असलयाने एकमेकांतील
द्वेष वाढत नाही व कटूताही निर्माण होत नाही.
६) कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणेच लोकन्यायालयांत
होणाया निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत
करता येते.
७) वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होते.
८) लोकन्यायालयांत निकाली निघणाया प्रकरणामध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.
मध्यस्थी
मध्यस्थी
एक प्रक्रिया-एक उद्दीष्ट
मध्यस्थी म्हणजे हस्तक्षेप प्रक्रियेचा एक
भाग, ज्यात एक तटस्थ व्यक्ती म्हणजे मध्यस्थ, जो विवादक पक्षकारांमध्ये असणारा तंटा
परस्पर संमतीने सोडविण्यासाठी मदत करतो, मध्यस्थ म्हणजे संरचनात्मक, अनौपचारीक वाटाघाटी
प्रक्रिया अशी प्रतिक्रीया ज्यात तटस्थ असा मध्यस्थ विशेष विशेषकृत संवाद व चर्चा तंत्राचा
वापर करतो. ज्यात तंटा मिटविण्याकरिता सहाय्य करणारी अशी ऐच्छिक, गोपनिय, पारदर्शी
आणि लवचिक प्रक्रिया.
मध्यस्थीकरिता संदर्भित करण्यात
येणारी प्रकरणे
सर्व दिवाणी प्रकरणे ज्यांत मनाई हुकूमाकरिता,
नुकसान भरपाई, मालमत्तेची वाटणी, आर्थिक दावे, कौटूंबिक वाद, धनादेश न वटणे अशी प्रकरणे
परंतु ज्यात लबाडीचा गंभीर दोषारोप नाही. अशी प्रकरणे सोडून परक्राम्य लेख अधिनियमाच्या
कलम १३८ अंतर्गत प्रकरणे, योग्य फौजदारी प्रकरणे आणि ज्यांत नियमानुसार समझोता करता
येईल अशी प्रकरणे सुध्द्ा मध्यस्थीकरिता संदर्भित करता येईल.
मध्यस्थीसाठी अर्ज कसा करता
येईल.
एखाद्या प्रकरणात सामोपचाराने तंटा मिटविण्याचा
जराही वाद असल्यास पीठासीन अधिकारी सदर प्रकरण पर्यायी निराकरणाकडे संदर्भित करु शकतील.
दोन्हीही पक्षकार समझोता करण्यास कबूल नसतील, परंतु त्याची मध्यस्थीच्या माध्यमाने
समेटाची शक्यता शोधण्याची इच्छा असल्यास, अशावेळी सुध्द्ा मध्यस्थीकडे प्रकरण संदर्भित
करणे योग्य आहे आणि जर पिठासन अधिकायास तसे
करणे योग्य वाटल्यास, प्रकरण मध्यस्थीकरिता मध्यस्थी केंद्राकडे संदर्भित केले जाते.
मध्यस्थीची प्रक्रियामधील टप्पे
१) ओळख - मध्यस्थी त्यांची ओळख पक्षकारांना करुन
देतो व मध्यस्थी प्रक्रियेची माहिती समजावून सांगतो.
२) दोन्हीही पक्षकारांची संयुक्त बैठक - ज्यांच्यातील
वाद संदर्भात सामोपचाराने समेट घडून यावे याकरिता अनुकूल वातावरण निर्माण करतो.
३) वैयक्तिक (क्लिक) बैठक - यांस पक्षकारांना
त्यांच्या तक्रारी, मागण्या, अपेक्षा विस्तृतपणे सांगण्याची मुभा देतो.
४) करार - मध्यस्थ समेटाच्या अटीवर शिक्कामोर्तब
करुन त्याची स्पष्टता व्यक्त करतो आणि पक्षकारांना स्विकार्य असेल त्याप्रमाणे समेटाच्या
अटींची स्पष्टपणे, मुद्देसूद आणि ठोसपणे नोंद करतो.
मध्यस्थी
प्रक्रियेला किती कालावधी लागतो
अनेक प्रकरणे २-१ बैठकीत सोडविली जातात,
परंतु काही किचकट वाद प्रकरणात परिणामकारक निराकरणाकरिता अधिक सत्राची गरज लागू शकते,
सर्वसाधारणपणे मध्यस्थ प्रक्रियेकरिता अधिकतम ६० दिवसांचा कालावधी लागतो.
मध्यस्थी
पध्द्तीचे फायदे
१) विषयांतील पक्षकारांना त्यांची मते, दृष्टीकोन
प्रत्यक्षपणे, अनौपचारिक, गोपनियतेने आणि सुडाच्या भितीशिवाय मांडता येतात.
२) वेळ, पैसा आणि शक्तीची बचत होते.
३) दोन्ही पक्षकारांतील वैरभाव कमी होतो.
४) त्यांना त्यांचा व्यवसाय/धंदा व वैयक्तिक संबंध
पुन:प्रस्थापित होण्यास व टिकवून ठेवण्याची संधी प्राप्त होते.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी आनंद वसंत निरगुडे
ReplyDeleteमुंबई, दि. 23 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती श्री.आनंद वसंत निरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन कायदा 2013 ची प्रभावीपणे
ReplyDeleteअंमलबजावणी करण्याचे निर्देश
मुंबई, दि. 31 : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे अंधश्रद्धा निर्मुलन कायदा, 2013च्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात (क्रिमिनल याचिका क्र.469/2015) 5 जानेवारी 2021 अन्वये आदेश निर्गमित केले आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
यावेळी गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी, तसेच सामाजिक न्याय व गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013 लागू आहे.
कोणत्याही व्यक्तीने स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अशा स्वरुपाची कोणतीही कृती केली असेल आणि या अधिनियमाच्या तरतूदीचे उल्लंघन करुन नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा याची जाहिरात, आचरण, प्रचार किंवा प्रचालन केले तर तो या अधिनियमाच्या तरतूदीखाली अपराध ठरेल आणि अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती, दोष सिद्ध झाल्यानंतर शिक्षेस पात्र असेल अशी तरतूद यामध्ये आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले.
या अधिनियमाची अंमलबजावणी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी प्रभावीपणे करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
0000
🙏 *आनंदाची बातमी !*
ReplyDelete३० जून रोजी रीटायर्ड होणाऱ्या सेवानिवृतांना जुलैचे इंक्रीमेंट द्या;असा निर्णय पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता . त्याविरुद्ध सरकारने रीव्हू पीटीशन दाखल केला होता.
तो सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. त्या निकालाची प्रत आपल्या सर्वांच्या माहिती साठी देत आहे.ती पहावी आता सरकारच्या ऑर्डरची वाट पाहू! =आपला खेडकर
*Increment on 1st July, retired on 30th June: Supreme Court dismissed*
*Review Petition 1731/2019 filed by the Government*
Text of the Supreme court judgement follows:
IN THE SUPREME COURT OF INDIA
INHERENT JURISDICTION
R.P.(C) No. 1731/2019 in S.L.P. (C) No.22008/2018
UNION OF INDIA & ORS.
Petitioner(s)
VERSUS
P. AYYAMPERUMAL
Respondent(s)
O R D E R
Delay in filing the Review Petition is condoned.
This review petition has been filed against Order dated 23rd July, 2018 whereby the Special
Leave Petition was dismissed.
We have considered the review petition on merits. In our opinion, no case for review of Order
dated 23rd July, 2018 is made out. Consequently, the review petition is dismissed on merits.
Pending application filed in the matter also stands disposed of.
....................J
(N.V. RAMANA)
.....................J
(DEEPAK GUPTA)
NEW DELHI;
8TH AUGUST, 2019.
Digitally signed by
VISHAL ANAND
Date: 2019.08.09
16:55:01 IST
ITEM NO.1004
SECTION XII
S U P R E M E C O U R T O F I N D I A
RECORD OF PROCEEDINGS
R.P.(C) No. 1731/2019 in SLP(C) No. 22008/2018
UNION OF INDIA & ORS.
Petitioner(s)
VERSUS
P. AYYAMPERUMAL
Respondent(s)(FOR ADMISSION and IA No.98411/2019-STAY APPLICATION and IA No.98414/2019-
CONDONATION OF DELAY IN FILING REVIEW PETITION )
Date : 08082019 This petition was circulated today.
CORAM :
HON'BLE MR. JUSTICE N.V. RAMANA
HON'BLE MR. JUSTICE DEEPAK GUPTA
By Circulation
UPON perusing papers the Court made the following
O R D E R
Delay in filing the Review Petition is condoned.
The review petition is dismissed on merits in terms of the signed order.
Pending application filed in the matter also stands disposed of.
(VISHAL ANAND)
COURT MASTER (SH)
(RAJ RANI NEGI)
ASSISTANT REGISTRAR
(Signed Order is placed on the file)
Message by JVSR Krishna - 9441903448 (jvsrkrishna[@]gmail.com)
Flash....Flash....Flash.....Flash,
Increment Issue: for those retired on 30th June, due increment is 1st July. Supreme Court of
India dismissed Review petition No.1731/2019 judgement dt.8th Aug. 2019 filed by the
Government, indicated based on the merit, review petition submitted by Government was
dismissed. Now, the national forums responsibility is to insist the government to implement the
same to all the central government servants who are similarly placed, instead of everybody
approaching the court of law for justice and it is shear waste of money and time.
महाराष्ट्र विश्वस्त कायदा सुधारणेबाबत
ReplyDeleteराज्यमंत्री विधि व न्याय यांच्या उपस्थितीत बैठक
मुंबई, दि.२८:महाराष्ट्र विश्वस्त कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबत विधी व न्याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या दालनामध्ये बैठक झाली.
यावेळी राज्य विधिमंडळात सदस्यांनी उपस्थित केलेल्या सूचना, शासनाला प्राप्त झालेली निवेदने याबाबींच्या अनुषंगाने महाराष्ट्र विश्वस्त कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार कपिल पाटील, विधी व न्याय विभागाचे सचिव डी. एन. गुरव, विधि सल्लागार-नि-सह सचिव नितीन जिवने, धर्मादाय सह आयुक्त श्रीमती पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र विश्वस्त कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने विविध विश्वस्त संस्थांमधील निवडणुका, विश्वस्त संस्थांमध्ये नव्याने करण्यात आलेल्या नियुक्त्या, विश्वस्त आयुक्त यांच्याकडे घ्यावयाच्या नोंदी म्हणजेच चेंज रिपोर्ट स्वीकृत करणे, विश्वस्त संस्थांच्या संबंधित न्यायालयीन बाबींचा निपटारा करणे आदींच्या अनुषंगाने महाराष्ट्र विश्वस्त कायद्यामध्ये काही मूलभूत सुधारणा करण्याबाबत सर्वसमावेशक चर्चा यावेळी करण्यात आली.
राज्यमंत्री कु.तटकरे यांनी महाराष्ट्र विश्वस्त कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश विभागास दिले. विभागाकडून प्राप्त झालेल्या सर्वसमावेशक प्रस्तावावर शासन स्तरावर निर्णय घेऊन व आगामी अधिवेशनामध्ये या बाबतचे विधेयक सादर करणे सुलभ होईल, या अनुषंगाने कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं *155260 ही हेल्पलाइन* सुरू केली आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन फ्रॉडला बळी पडलेले असाल तर तातडीनं या क्रमांकावर संपर्क साधा.
ReplyDeleteपुढच्या *७ ते ८ मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यातून ज्या आयडीवरुन पैसे चोरले* गेले आहेत. त्या *बँकेच्या किंवा ई-साइटला अलर्ट मेसेज हेल्पलाइन क्रमांकावरुन जाईल.* त्यामुळे *बँक खात्यातून वजा होणारी रक्कम होल्डवर जाईल* आणि तुमचे *पैसे वाचू शकतात.*
ऑनलाइन फ्रॉडच्या घटनांना रोखण्यासाठी गृह मंत्रालयाच्या सायबर पोर्टल
https://cybercrime.gov.in/ आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलसोबत 155260 हा पायलट प्रोजेक्ट गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आला होता. पण आता संपूर्णपणे याची तयारी करुन लॉन्च करण्यात आला आहे. इंडियन सायबर क्राइम *कोऑर्डिनेशनचं* हे असं व्यासपीठ आहे की दिल्ली हे राज्य याचं सर्वप्रथम यूझर बनले आहे. यासोबतच राजस्थानला देखील जोडण्यात आलं आहे. यानंतर हळूहळू *सर्व राज्या या प्रोजेक्टशी जोडले जाणार आहेत.*
*जवळपास ५५ बँका, ई-वॉलेट्स, ई-कॉमर्स साइट्स, पेमेंट गेटवे व इतर संस्थांसोबत मिळून इंटरकनेक्ट प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.* ज्याचं नाव *'सिटिजन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग सिस्टम'* असं ठेवण्यात आलं आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं *कमीत कमी वेळेत फ्रॉडला बळी पडलेल्या लोकांची मदत करता येते.* या हेल्पलाइनच्या सहाय्यानं आतापर्यंत २१ लोखांच्या ३ लाख १३ हजार रुपये ऑनलाइन फ्रॉड होण्यापासून वाचविण्यात यश आलं आहे.
विशेष म्हणजे, हेल्पलाइनच्या एकूण १० वेगवेगळ्या लाइन्स तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरुन हेल्पलाइन कधीची व्यस्त राहणार नाही. *हेल्पलाइन नंबर 155260 वर कॉल करताच तुम्हाला तुमचं नाव, नंबर आणि घटना घडल्याची वेळ विचारण्यात येते.* प्राथमिक माहिती दिल्यानंतर संबंधित पोर्टल आणि बँक, ई-कॉमर्सच्या डॅशबोर्डला घडलेल्या घटनेची तातडीनं माहिती पोहोचविण्यात येते.
यासोबतच *फ्रॉडला बळी पडलेल्या व्यक्तीच्या संबंधित बँकेसोबतही घटनेची माहिती दिली जाते.* ऑनलाइन फ्रॉड झाल्यापासूनचे पुढचे २ ते ३ तास अतिशय महत्वाचे ठरतात. फ्रॉड झाल्या क्षणाला तुम्हाला तातडीनं तक्रार करणं गरजेचं ठरतं.
तुम्ही *https://cybercrime.gov.in/* या संकेतस्थळावरही तक्रार दाखल करू शकता.
महाराष्ट्र वस्तु व सेवाकर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या
ReplyDeleteप्रारुपास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
कार्यपद्धती सुलभ होणार, करदात्यांचे हित जोपासणार
करदाते व वस्तु आणि सेवा कर विभाग यांच्यामध्ये भविष्यात उद्भवणारे वाद कमी होऊन कार्यपद्धती अधिक सुलभ करण्याच्या तसेच करदात्याचे हित जोपासण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारुपास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
यामध्ये संपूर्ण कर दायित्वाऐवजी निव्वळ देय रकमेवरील व्याजाची आकारणी पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजचे वस्तु आणि सेवाकर पद्धतीच्या अंमलबजावणीपासून करण्याची सुधारणा प्रस्तावित करण्यात आली आहे. या सुधारणेमुळे करदात्यांनी उशीराने भरलेल्या करावरील व्याजाचा बोजा व कर अनुपालन खर्च दोन्ही कमी होण्यास मदत होईल.
करदात्यांचे कर अनुपालन अधिक सुलभ व्हावे यासाठी लेखापाल तसेच सनदी लेखापाल यांच्याद्वारे वस्तु आणि सेवा कर लेखापरिक्षण व आपसमेळ विवरण दाखल करण्याच्या प्रक्रियेस या सुधारणेमुळे सुट मिळणार आहे.
केंद्रीय वस्तु व सेवा कर अधिनियम २०१७ यामध्ये फायनांस ॲक्ट २०२१ अन्वये सुधारणा करण्यात आली असून त्या सुधारणा २८ मार्च २०२१ रोजीच्या राजपत्राद्वारे प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय वस्तु व सेवा कर कायदा, २०१७ व महाराष्ट्र वस्तु व सेवा कर कायदा २०१७ यामधील तरतूदींमध्ये एकसुत्रता राखण्यासाठी महाराष्ट्र वस्तु आणि सेवा कर कायदा २०१७ मध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. या पार्श्वभुमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र वस्तु आणि सेवाकर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारुपास मान्यता देण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र वस्तु व सेवा कर अधिनियम २०१७ मधील १२ कलमे आणि एक अनुसूची यामध्ये सुधारणा करण्यात येतील.
कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश
ReplyDeleteविदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलाधाना , नागपूर, वर्धा, यवतमाळ, जिल्हे व राजुरा तालुका सोडून चंद्रपूर जिल्हा याप्रमाणे उर्वरित राज्यांतील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव संमत करण्यात आला
या निर्णयाचा फायदा कैकाडी समाजातील अंदाजे १.५ लाख लोकसंख्येस मिळेल.
लसीकरण वाढीव डोसेस
केंद्र सरकारने राज्यास प्रति महिना लसींचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत असा ठराव आज विधानमंडळात मंजूर करण्यात आला.
राज्यात १० लाख किमान व कमाल १५ लाख लसीकरण दररोज करू शकतो
दोन तीन महिन्यांच्या आत वेगाने लसीकरण करून संपवायचे आहे.
राज्यात महिनाभरात ३ कोटी लसीकरण करू शकतो.
===================================================
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 9 विधेयके मंजूर
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन – 2021 आज संस्थगित झाले. या दोन दिवसांच्या अधिवेशनात मांडण्यात आलेली विधेयके आणि त्याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे.
दोन्ही सभागृहात संमत विधेयके
9
विधान सभेत प्रलंबित विधेयके
4
विधान परिषदेत प्रलंबित विधेयके
0
संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके
1
संमत विधेयके
(1) सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र. 8.- महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, 2021 (पर्यावरण व वातावरणीय बदल विभा
*देशात समान नागरी कायदा करा....दिल्ली उच्च न्यायालय*📍
ReplyDeleteदिल्ली वृत्तसेवा १०:- भारतामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र राहत असल्यामुळे इथे समान नागरी कायदा असण्याची गरज अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, त्यावर ठोस निर्णय किंवा त्या दिशेने ठोस प्रयत्न होताना दिसले नाहीत. आता थेट दिल्ली उच्च न्यायालयाने देशात समान नागरी कायद्याची गरज व्यक्त केली आहे. यासंदर्भातल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे मत व्यक्त केलं आहे. तसेच, या संदर्भात न्यायालयानं केंद्र सरकारला आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश देखील दिले आहेत. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये त्या त्या धर्माचे किंवा समुदायासाठी केलेले कायदे न्यायदान प्रक्रियेमध्ये अडथळा ठरू शकणार नाहीत आणि सर्व भारतीयांना एका समान कायद्याच्या आधारे न्याय देता येईल, असं देखील मत न्यायालयाने यावेळी नमूद केलं.
भारतात हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसाहक्क कायदा, भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा, भारतीय घटस्फोट कायदा पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा असे अनेक कायदे आहेत. याशिवाय, मुस्लीम समाजामधल्या या चालीरितींसाठीचे बहुतांश नियम घटनात्मक कायदे स्वरूपात नसून ते त्यांच्या धर्मग्रंथांमध्येच नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये न्यायदान प्रक्रिया क्लिष्ट ठरते. विशेषत: वेगवेगळ्या धर्मांच्या व्यक्ती जेव्हा विवाह किंवा घटस्फोटासारख्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या असतात, तेव्हा त्यांना कोणत्या कायद्याप्रमाणे न्यायदान करावं, असा प्रश्न देखील उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर समान नागरी कायदा आल्यास या सर्व गोष्टींसाठीचे समान नियम सर्व धर्मीयांना लागू करता येऊ शकतील, अशी भूमिका आजवर अनेकदा मांडण्यात आली आहे.
घटनेच्या कलम ४४ नुसार पुरस्कृत करण्यात आलेल्या समान नागरी कायद्यावियी अनेकदा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील भूमिका मांडली आहे. हा नागरी कायदा भारतातील सगळ्यांसाठी समान असेल. त्यामुळे लग्न, घटस्फोट किंवा वारसा अशा प्रकरणांमध्ये समान नियम लागू करण्यास यामुळे मदत होईल", असं देखील न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी यावेळी म्हटलं.
*निवेदिता फास्ट न्यूज*
देशात समान नागरी कायदा करा....दिल्ली उच्च न्यायालय📍
ReplyDeleteदिल्ली वृत्तसेवा १०:- भारतामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र राहत असल्यामुळे इथे समान नागरी कायदा असण्याची गरज अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, त्यावर ठोस निर्णय किंवा त्या दिशेने ठोस प्रयत्न होताना दिसले नाहीत. आता थेट दिल्ली उच्च न्यायालयाने देशात समान नागरी कायद्याची गरज व्यक्त केली आहे. यासंदर्भातल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे मत व्यक्त केलं आहे. तसेच, या संदर्भात न्यायालयानं केंद्र सरकारला आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश देखील दिले आहेत. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये त्या त्या धर्माचे किंवा समुदायासाठी केलेले कायदे न्यायदान प्रक्रियेमध्ये अडथळा ठरू शकणार नाहीत आणि सर्व भारतीयांना एका समान कायद्याच्या आधारे न्याय देता येईल, असं देखील मत न्यायालयाने यावेळी नमूद केलं.
भारतात हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसाहक्क कायदा, भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा, भारतीय घटस्फोट कायदा पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा असे अनेक कायदे आहेत. याशिवाय, मुस्लीम समाजामधल्या या चालीरितींसाठीचे बहुतांश नियम घटनात्मक कायदे स्वरूपात नसून ते त्यांच्या धर्मग्रंथांमध्येच नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये न्यायदान प्रक्रिया क्लिष्ट ठरते. विशेषत: वेगवेगळ्या धर्मांच्या व्यक्ती जेव्हा विवाह किंवा घटस्फोटासारख्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या असतात, तेव्हा त्यांना कोणत्या कायद्याप्रमाणे न्यायदान करावं, असा प्रश्न देखील उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर समान नागरी कायदा आल्यास या सर्व गोष्टींसाठीचे समान नियम सर्व धर्मीयांना लागू करता येऊ शकतील, अशी भूमिका आजवर अनेकदा मांडण्यात आली आहे.
घटनेच्या कलम ४४ नुसार पुरस्कृत करण्यात आलेल्या समान नागरी कायद्यावियी अनेकदा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील भूमिका मांडली आहे. हा नागरी कायदा भारतातील सगळ्यांसाठी समान असेल. त्यामुळे लग्न, घटस्फोट किंवा वारसा अशा प्रकरणांमध्ये समान नियम लागू करण्यास यामुळे मदत होईल", असं देखील न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी यावेळी म्हटलं.
निवेदिता फास्ट न्यूज
श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामांचा आढावा
ReplyDeleteप्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने विकासकामे पूर्ण करावी
- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 20 : श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय साधून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिले.
आराखड्यातील विकासकामांच्या प्रगतीबाबत श्री.सामंत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांच्यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.सामंत म्हणाले, श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्याला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आराखड्यातील विविध कामे प्रलंबित आहे. विकासकामे तातडीने पूर्ण करावे. विकासकामांना पूर्णत्वास नेण्याची प्रत्येकाची सांघिक जबाबदारी आहे. जनतेला पायाभूत सुविधा पुरविणे ही नैतिक जबाबदारी ओळखून प्रशासनाने काम करावे. येत्या जानेवारी पर्यंत विकास आराखड्यातील सर्व पायाभूत सुविधांची कामे, शैक्षणिक क्षेत्रातील कामे, पाणीपुरवठा, नळपाणी योजना, रस्ते विकास आणि व्यापारी संकुलाविषयी प्रलंबित कामांची प्रक्रिया राबवून प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही श्री.सामंत यांनी यावेळी दिले.
००००
मुंबईतील सर्व न्यायालयात 1 ऑगस्ट रोजी लोक अदालत
ReplyDeleteई-लोक अदालतीचीही सुविधा
मुंबई,दि.20 : न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी रविवारी दि.1 ऑगस्ट रोजी मुंबई येथील सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पक्षकारांनी लवकर न्यायालयात विनंती अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबईचे सचिव हितेंद्र वाणी यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार ही लोक अदालत होणार असून यात विशेष म्हणजे यावेळेस ई-लोक अदालतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे व त्याद्वारे दुरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा देण्यात आली आहे.
या लोकअदालतीत धनादेश अनादराची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकाबाबतची प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, आयकर कायद्यातील फौजदारी स्वरूपातील तडजोडपात्र प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रकरणे, वैवाहिक वाद संपादन प्रकरणे व दिवाणी द्यावे तसेच उपरोक्त नमूद स्वरूपातील दाखल पूर्व प्रकरणे सुनावणी करिता ठेवण्यात येणार आहेत.
विनंती अर्ज सादर करावेत
ज्या पक्षकारांना वर नमूद प्रकारची प्रकरणे दि.1 ऑगस्ट 2021 रोजी लोकअदालतीत ठेवावयाची आहेत त्या पक्षकारांनी संबंधित न्यायालयात आपापल्या प्रकरणात विनंती अर्ज लवकर सादर करावा व प्रकरण आपसी सामंजस्याने तात्काळ मिळवावे, असे आवाहन मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीनिवास बी. अग्रवाल व सचिव हितेंद्र वाणी यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीचे फायदे :
1. प्रकरणात जमा केलेली संपूर्ण कोटी परत मिळते.
2. लोकअदालतीतील निवाड्यास कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही.
3. आपसी सामंजस्याने वाद मिटल्यामुळे वेळ व पैसा दोन्हींची बचत होते.
4. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना आपली बाजू स्वतः मांडण्याची संधी मिळते, अशी माहिती या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
0000