Saturday, 20 April 2019

थोडक्यात संपूर्ण आयुर्वेद


नियोजनबध्द्‌ आहार कोणता ?
       आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही,  याची खंत आहे.
वाढलेली चरबी कशी कमी करावी.
       आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तर कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते याचा अर्थ आपण आळशी होत आहोत हे समजून घ्या म्हणूनच गरज आहे ती “मूव्ह मोअर अँड सिट लेस”.
कोणती फळे खावीत ?
       आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.
मधुमेहासाठी आहार कसा असावा.
       खर तर मधुमहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळ आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेवू नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टि.व्ही. पाहणे टाळावे.
शुगर फ्रीचा वापर करावा का ?
       शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते. तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणा­या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करु नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.
वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे ?
       वाढत्या ताणामुळे वजन वाढत, फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सुत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होती.
कडधान्य कशी खावीत ?
       आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची ? ती उकडून, उसळ करुन खाणेच योग्य.
जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे.
       शेंगण्याचे घाण्यावरुन करुन आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जाते. तेल बनविण्याची पारंपारिक पध्द्‌त अतिशय शुध्द्‌ आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यामध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.
आहारातून ड जीवनसत्व कमी झाल्यास काय होते ?
       शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते. आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का.
       आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुध्द्‌ा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगांवी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरु ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुध्द्‌ा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखत, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात पण खरे तर व्यायाम करत नाही म्हणून अंग दुखत. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लॅनिंग करुन ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याच योग्य नियोजन होत नाही, त्याच गांभिर्य लोकांच्या लक्षात येत नाही.

      

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi