Wednesday, 1 January 2025

दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यावर भर देणार - सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यावर भर देणार

-         सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

सार्वजनिक आरोग्य विभागाचा घेतला आढावा

 

मुंबईदि. १ : रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असून राज्यातील जनतेचे आरोग्य जपण्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. उत्कृष्ट वैद्यकीय उपचार, औषधे आणि अनुषंगिक सेवांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरविण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्यांची त्रयस्थ पद्धतीने तपासणी करण्याचे निर्देशही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. 

 आरोग्य भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीत सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी विभागाचा आढावा घेतला. बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरप्रधान सचिव नवीन सोनावैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगेआरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायकराज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाणआरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकरसंचालक स्वप्निल लाळे यांच्यासह आरोग्य विभागातील विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते.

11 जहाल नक्षलींचे समर्पण

 11 जहाल नक्षलींचे समर्पण

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत आज 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात 8 महिला आणि 3 पुरुष आहेत. यात दोन दाम्पत्य आहेत. या 11 जणांवर महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते. छत्तीसगड सरकारने सुद्धा त्यांच्यावर बक्षिस जाहीर केले होते. यात दंडकारण्य झोनल कमिटीच्या प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का आहेत. 34 वर्षांपासून त्या नक्षली चळवळीत आहेत. 3 डिव्हिजन किमिटी मेंबर तर 1 उपकमांडर2 एरिया कमिटी मेंबर आहेत. या सर्वांना पुढचे जीवन जगण्यासाठी 86 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात 5 नक्षली ठार झाले. 2024 या वर्षांत 24 नक्षली ठार झाले आणि 18 माओवाद्यांना अटक करण्यात आली. गेल्या 6 महिन्यात 16 जहाल नक्षलवादी आणि आज 11 असे 27 जण मुख्य प्रवाहात आले आहेत. पोलीस दलाच्या प्रयत्नामुळे सातत्याने माओवादींचे आत्मसमर्पण सुरू असून यामुळे माओवादाची कंबर तोडण्याचं काम होत असल्याचे ते म्हणाले.

उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झालीलवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल. गेल्या 4 वर्षांत एकही युवक किंवा युवती माओवादात सहभागी झाली नाहीही फार मोठी उपलब्धी आहे. 11 गावांनी नक्षलवाद्यांना बंदी केली आहे. सी-60 च्या जवानांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता संविधानविरोधी चळवळीत कुणीही जायला तयार नाहीही आनंदाची बाब आहे. न्याय मिळायचा असेल तर भारतीय संविधानानेच मिळू शकतोतो माओवादी विचारसरणीने मिळू शकत नाहीहे जनतेला आता पटले आहे. येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणारअसे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते पोलीस दलाला ५ बस१४ चारचाकी३० मोटारसायकलीचे ‍लोकार्पण करण्यात आले. तसेच येथील पोलीस दलाच्या नूतन हेलिकॉप्टर हॅंगर चे उद्घाटनही करण्यात आले. तसेच विविध नक्षल चकमकीमध्ये शौर्य दाखविणाऱ्या सी-60 च्या पोलीस जवानांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडाविशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ पाटीलजिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पलआमदार धर्मरावबाबा आत्रामआ. डॉ. मिलिंद नरोटेपद्मश्री पूर्णामासी जानीपद्मश्री परशुराम खूणेलॉईड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन उपस्थित होते.

000

नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माओवाद्यांनी संविधानाचा मार्ग स्विाकारावा

 नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माओवाद्यांनी संविधानाचा मार्ग स्विाकारावा

* ताराक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात प्रथमच अहेरी-गर्देवाडा बससेवा सुरु

* लॉईडच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ6200 कोटींची गुंतवणूक9000 रोजगार

* कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे समभाग प्रदान

* गडचिरोलीपासून 200 कि.मी. दूर पेनगुंडा येथे जवानग्रामस्थांशी संवाद

* सी-60 जवानांचाही सत्कार

* पोलीस दलाला ५ बस१४ चारचाकी३० मोटारसायकलीचे ‍लोकार्पण

गडचिरोलीदि. 1  : नववर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीसाठी विकासाची नवीन पहाट घेवून आला असून विकासाच्या,  सामाजिक सलोख्याच्याशांततेच्या आणि औद्योगीकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल सुरू राहीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात व्यतित केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला आणि त्या बसमधून प्रवासही केला. लॉईडच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यातून 6 हजार 200 कोटींची गुंतवणूक होत असूनचार हजारावर रोजगारनिर्मिती होत आहे. 

आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे थेट ताडगुडा ब्रीज येथे गेले. गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसेच ताडगुडा पुलाचे त्यांनी लोकार्पण केले. पेनगुंडा येथे त्यांनी जवानांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. हा परिसर अतिदुर्गम व नक्षलप्रभावीत मानला जातो. थेट मुख्यमंत्र्यांनी त्याठिकाणी जाऊन एक वेगळा संदेश दिला. या भागात जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत.

त्यानंतर दुपारी कोनसरी येथेलॉईड्सच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यात कोनसरी येथे डीआयआय प्लांट (400 कोटी रुपये गुंतवणूक700 रोजगार)पेलेट प्लांट आणि स्लरी पाईपलाईन (3000 कोटी रुपये गुंतवणूक1000 रोजगार)हेडरीएटापल्ली येथे आयर्न ओअर ग्राईडिंग प्लांट (2 हजार 700 कोटी रुपये गुंतवणूक1 हजार 500 रोजगार)वन्या गारमेंट युनिट (20 कोटी रुपये गुंतवणूक600 रोजगार) याचा समावेश आहे. शिवाय लॉईडस काली अम्मल हॉस्पीटल आणि लॉईडस राज विद्यानिकेतन सीबीएसई शाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केला. सुमारे 1 हजार 200 विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळणार आहे. पोलिसांसाठी निवासस्थानेजिमखानाबालोद्यान इत्यादींचेही लोकार्पण करण्यात आले. कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे समभाग प्रदान करुन एकप्रकारे मालकी देण्याचाही स्तुत्य उपक्रम लॉईड्सने हाती घेतला. हे समभाग मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

गडचिरोलीत ग्रीन माईनिंगचाही शुभारंभ करण्यात आला. यातून खाणींचे संरक्षण होणार असून लोहखनिजासाठी स्लरी पाईपलाईनमुळे इंधन बचत होणारकार्बन उर्त्सजन कमी होणाररस्त्यावरील अपघातही कमी होणार आहेत. ग्रीन माईनिंगचा प्रयोग देशातून गडचिरोलीत प्रथमच राबविण्यात येत आहे. गोंडवाना विद्यापीठ ऑस्ट्रेलियन विद्यापीठाशी एक करार करणार असूनत्यातून मायनिंगशी संबंधित सर्व अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. यातून गडचिरोलीतील तरुणांना रोजगार मिळणार आहेअशीही माहिती, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

- कृषीमंत्री अॅड.माणिकराव कोकाटे

 

 मुंबई, दि. 30 कृषी विभागातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषीमंत्री अॅड.माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. राज्याचे कृषीमंत्री म्हणून पदभार घेताना मंत्रालय येथे ते बोलत होते.

             कृषी विभागात आवश्यक तिथे सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राज्यात राबवताना अधिक समन्वय साधला जाईल. कृषी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. प्राधान्याने हाती घ्यावयाचे विषय, नवीन धोरणे यांचा अभ्यास करण्यात येईल. शेती आणि शेतकरी यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असल्याचेही कृषीमंत्री ॲड.कोकाटे म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावलेउपसचिव हेमंत म्हापनकर, उपसचिव संतोष कराडउपसचिव प्रतिभा पाटीलउपसचिव अंबादास चंदनशिवेउपसचिव प्रफुल्ल ठाकूर उपस्थित होते.

                                               

गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार

 गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. 29 :-गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या नाशिक येथील जिल्हा परिषदमहानगरपालिका आणि खासगी शाळेच्या विविध 50 विद्यार्थ्याच्या उपस्थितीत मंत्रालयात श्री. भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारला.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले कीशालेय शिक्षण विभागाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असणार आहेत. आनंददायी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विभाग काम करणार आहे.  राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे सव्वा दोन कोटी विद्यार्थी आहेत. एक लाख 8 हजार  शाळा असून 7 लाख 29 हजार  शिक्षक आहेत. विविध उपक्रम योजनांसाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल. पुढील काही दिवसात शिक्षकविद्यार्थीपालकशैक्षणिक संस्था यांच्याशी चर्चा करून त्यांचे मनोगत आणि अनुभव जाणून घेणार आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात येतील. यासाठी ग्रामस्थ आणि पालकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येईल.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच आरोग्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी विभाग कटिबध्द असल्याचे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राला शैक्षणिक चळवळीचा वारसा आहे. शिक्षण क्षेत्राला देदिप्यमान परंपरा आहे. पुढेही ही परंपरा कायम राहणार असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित विविध 50 विद्यार्थ्यांनी माध्यमांशी संवाद साधलाप्रांजली जाधव या विद्यार्थिनीने महात्मा फुलेक्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह महापुरुषांनी स्त्री स्वातंत्र्यासह शिक्षणाचे महत्व पटवून दिले. याची माहिती भाषणातून दिली.

000

स्मार्ट रेशनकार्ड स्थलांतरीत कामगारांना प्राधान्याने द्या

 स्मार्ट रेशनकार्ड स्थलांतरीत कामगारांना प्राधान्याने द्या


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या कामांचा आढावा


मुंबई, दि. 30 : स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावे. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असले तरी त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही रास्त-भाव दुकानात धान्य मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.  


अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावेत, सर्व शिधापत्रिका धारकांना स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण करण्यात यावे. लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीने ‘एक गाव एक गोदाम’ उभारण्याची कार्यवाही सुरू करावी. वाहनांचे जिओ टॅगीग करावे, अन्नधान्य वाटपामध्ये ‘एक देश एक शिधापत्रिका’ धोरण राज्यात राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य देण्यात यावे. गरजू लाभार्थ्यांचा सण उत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी राज्यात सणांच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो. या वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.


आगामी वर्षात 25 लक्ष नवीन लाभार्थ्यांचे सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी समावेशन करून त्याचे ई-केवायसी करून प्रमाणीकरण करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, मागील 6 महिन्यात एकदाही अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करावी, शिधापत्रिकामधून मयत व्यक्ती वगळाव्या, 100 पेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेरतपासणी करावी. तसेच संगणकीकृत न झालेल्या 14 लक्ष लाभार्थ्याचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.


या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


00

ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक व गुणवत्तापूर्ण करावी

 ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे

पारदर्शक व गुणवत्तापूर्ण करावी

 

- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

 

मुंबईदि. १ : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावेअसे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

मंत्रालयात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतिश चिखलीकरवित्तीय नियंत्रक अभय धांडेउपसचिव प्रशांत पाटील, कार्यासन अधिकारी विवेक शिंदेअच्युत इप्परविजय चौधरी उपस्थित होते.

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री. गोरे म्हणाले कीप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईलजेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात यावेत. ग्रामीण तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले. कंत्राटी कामगार वेतन थकबाकीसंदर्भातील आढावाही यावेळी घेण्यात आला.

Featured post

Lakshvedhi